नैतिकतेचे डांगोरे

गॉसिपिंग‘  हा आपला राष्ट्रीय आवडता छंद आहे. कोणीही उठून कोणाबद्दलही  काय वाट्टेल ते बोलू शकतो. भाषणस्वातंत्र्य‘  ही तर आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेली खास देणगी आहे. जिचा चोख फायदा घेत आपल्या दुधारी जिभेचे धारदार दांडपट्टे  सतत  चालूच असतात. बरं आपल्याला सगळ्या विषयांतलं सगळं कळतं, आणि त्यावर अजिबात लायकी नसतानाही ठाम मतप्रदर्शन करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे असा एक विशेष समज आपल्या मनीमानसी रुजलेला आहे. त्यामुळे सचिनच्या सेंच्युरीपासून ते कतरीनाच्या बिकीनीपर्यंत, आणि अण्णा हजारेंच्या उपोषणापासून ते ओसामा बिन लादेनपर्यंत कुठल्याही गोष्टीवर सर्व लहानथोर प्रचंड अधिकारवाणीने बोलत असतात. त्यातून नीतिमत्ताहे तर राखीव कुरण! तिथे जर कोणी घसरलं, की मग तर समस्त संस्कृतीरक्षक बाह्या सरसावून उभे ठाकलेच. नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजेसध्या चालू असलेला (माझ्या मते) नॉनसेन्स वितंडवाद. 
मणिपूरची लोहकन्या‘ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलंकी “डेझमंड कुटीन्हो नावाच्या गोव्यात जन्मलेल्या ब्रिटीश लेखकसामाजिक कार्यकर्त्यासोबत माझं अफेअर चालू आहे.” झालं. वादाचा प्रचंड धुरळा उडाला. तिचे विरोधकच  नाहीतर समर्थक सुद्धा हडबडले. ही बातमी खरी नसून ती शर्मिलाविरुद्ध कसलीतरी  भयानक ‘स्टेट कॉन्स्पिरसीआहेअसंही बोलून झालं. एलिट‘ वर्गाने नेहमीप्रमाणे “तिच्या आयुष्यात तिने काय करावं हा तिचा  वैयक्तिक प्रश्न आहेअसं म्हणून सोयीस्करपणे विषय झटकून टाकला. म्हणजे यांच्या ‘ड्रिंक पार्टीज‘ मध्ये चघळायला विषयही झालाआणि सामान्य  मध्यमवर्गीयांच्या नीतीमत्ताविषयक कचकड्याच्या कल्पनांना भूकंपाचे धक्केही बसायला नकोत!

माझ्या मनात थैमान चालू आहे ते वेगळ्याच विचारांनी. काय झालं, समजा शर्मिलाला बॉयफ्रेंड असला तर? काय फरक पडतो तिचं कोणाबरोबर अफेअर असलं तर? या एका कारणामुळे तिचं आजपर्यंत असलेलं सगळं कर्तृत्व लगेच डागाळलं? गेली दहा वर्ष ही एकटी बाई कोणतेही मिडिया स्टंट न करता मणिपूर मधून आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट (AFSPA) हा अन्यायकारक कायदा रद्द व्हावा म्हणून उपोषण करते आहे, सरकार नामक अजस्त्र राक्षसाशी एकटी हिंमतीने झुंजते आहेअनन्वित छळाला सामोरी जाते आहेतिच्या कार्याच्या जोरावर तिथल्या लोकांच्या गळ्यातली ती ताईत बनली आहे, ही सत्य परिस्थिती केवळ वरच्या एका घटनेमुळे आपण नाकारायची??
तिचं आयुष्यभराचं सगळं कर्तृत्व या एका घटनेने कस्पटासमान ठरवायचं??  का कोणाला तिच्या बचावासाठी हे म्हणण्याची गरज पडावी, की “अहो, हे कसं शक्य आहे, कारण शर्मिला तर कडक बंदोबस्तात पोलीस पहाऱ्यात होती. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिच्यावर इतकी कडक नजर होती, की तिचे कुटुंबीयही तिला भेटू शकत नसत. मग हे अफेअर वगैरे कसं शक्य आहे?” का वेळ यावी हे बोलायचीकिंवा हे क्लॅरिफिकेशन घाईघाईने द्यायला लागावं, की “ते दोघं आता एंगेज्डआहेत, त्यामुळे अफेअर करून गमावलेलं(?) सिव्हील सोसायटी मधलं स्थान आता शर्मिलाला परत मिळालं आहे!!!” कुठल्या नैतिकतेचे डांगोरे पिटणं चालू आहे आपलंबाकी सगळं सोडून देऊपण एक स्वतंत्र ‘व्यक्ती‘ म्हणून शर्मिलाचा ‘प्रेमात पडण्याचा अधिकार‘ हिरावून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे

तिचं बाईपणही गोष्ट आणखीनच गुंतागुंतीची करून ठेवतं. कारण कुठल्याही आदर्श स्त्रीला आपल्याकडे देवी माँहोऊनच राहावं लागतं, जगावं लागतं. तीही कालीमातेसारखी कठोर नाही, तर मध्यमवर्गीय पितृसत्ताक मानसिकतेला आवडेल, झेपेलपचेल इतकीच साधीसोज्वळपतिपरमेश्वरपरायण सीताम्हणून. त्यामुळे ही मणिपूरची लोहकन्या शर्मिला; शक्तीदयाक्षमाशांतीकरुणा, आणि त्यागाचं प्रतीक असणारी शर्मिला, हिने प्रेमाबिमासारख्या क्षुद्र मानवी भावनांमध्ये अडकून कसं चालेलतिने असा विचारही करणंठार चुकीचंच नाही का! अब्रह्मण्यम!!  
आपल्याकडच्या चॅनल्सनाही त्यांचा TRP वाढवायला, हे असले विषय चघळायला बराच वेळ असतो, त्यामुळे त्यांनी तर साधारण, “जिला आपण सर्व आदर्श मानतो, अशा एका कमकुवत मनाच्या स्त्रीने आपल्या भाबड्या निष्ठावंतांची केलेली घोर फसवणूक..!!” इतक्या हीन पातळीला शर्मिलाचा विषय आणून ठेवलाय. एका पेपरने तर शर्मिलाला तिच्या प्रियकराने अॅपलचं मॅकबुक भेट दिलं‘ अशीही बातमी छापली. पण दुर्दैवाने कुठल्याही पेपरने त्यावर, ‘सो व्हॉट?’ , ‘मग काय?’ असा स्टॅंड घेतलेला नाही. आपल्याकडे राज्यकर्ते आणि सेलिब्रिटीज यांची असंख्य वेळा घडणारी- तुटणारी अफेअर्स आपल्याला चालतात. त्या गोष्टीवर त्यांचं ‘ग्लॅमरआणि आपली ‘क्रेझ‘ सहज पांघरुण घालते. 
मग हाच न्याय त्या मणिपूरच्या ‘आयर्न लेडीला का नाही? तिच्यावर नीतीमत्ताहीन‘ असल्याचा शिक्का मारण्यापूर्वी हा विचार का नाही? ‘प्रेमात पडण्याचा अधिकारतिच्या नशिबी का नाही..??!!  

तळेगाव गणपती-शिरगाव-देहू

               आठ दिवसांपूर्वी सहज ’चेहेरापुस्तिका’ (फेसबुक) चाळत बसलो होतो. एका मित्राने त्याचा एका मोठ्ठ्या गणपतीजवळचा फोटो डकवला होता. मस्त ठिकाण वाटत होतं, म्हणून त्याला विचारलं की हे ठिकाण कुठलं आहे? त्याने सांगितलं, हा तळेगावजवळचा ’उघडा गणपती’! रस्त्यावरच आहे! झालं! ठरवून टाकलं, हा शनिवार या सत्कारणी लावायचाच! हा गणपती पुण्याहून मुंबईला जाताना रस्त्यावरुन दिसतो, रेल्वेमधूनही आणि रस्त्याने जातानाही!

                शनिवारी सकाळी लवकरच पुण्याहून निघालो. मुंबई-पुणे हायवेला लागलो आणि अर्ध्या तासातच सोमाटणे फाटा पार करुन गणपतीच्या पायथ्याशी पोचलो. शनिवार असल्याने मुंबई-पुणे हायवेला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे अगदी रमतगमत गाडी चालवूनही अर्ध्या तासात पोचता आलं. पायथ्याशी गाडी पार्क करुन पाय-या चढून वर आलो. सकाळचे पावणेदहा- दहा वाजत होते, त्यामुळे तिथेही गर्दी नव्हतीच. आरामशीर दर्शन झालं. दोन-चार लोक दर्शनाला आले होते. सकाळ असली तरी पितृपक्षाचं ऊन पायाला चटके देत होतं. तिथल्या सिक्युरिटी गार्डकडूनच आमचे फोटो काढून घेतले. वरुन अवतीभवतीचा परिसर खूप छान दिसत होता. नुकताच पावसाळा संपल्याने सगळीकडे हिरवंगार गवत उगवलेलं होतं. त्या गवतात काही छोटी छोटी फुलंही उलमलेली होती. एकंदर मस्त मूड बनवणारं वातावरण होतं. खूप दिवसांनी असं मस्त “फ्रिक आऊट” वाटत होतं. रोजरोजच्या त्याच त्या कामाला उबगून गेल्यावर अशा ठिकाणी मस्त एनर्जी मिळते. आज हा एकदम स्वत: बाहेर जायला कसा तयार झाला या विचाराने बायकोही आश्चर्यचकित झाली होती!

                      (रस्त्यावरुन दिसणारा हिरवागार डोंगर)

                               तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं की इथून शिरगाव, ज्याला प्रतिशिर्डी म्हणतात ते किती लांब आहे? तिथून शिरगाव फक्त दोनच किलोमिटर होतं. मग काय! चलो शिरगाव! शिरगावला पोचलो. साईमंदिरात फार गर्दी नव्हती. छान दर्शन झालं. तितक्यात बायकोला चिंचांची कॅंडी विकणारा माणूस दिसला! मग काय! “अहो….!!!” कँडी घेतल्या. तिथून परतीच्या प्रवासाला लागलो.

               गणपतीला जाताजाता रस्त्याच्या उजव्या बाजूला आधीच देहू फाटा बघितला होता. बायकोला म्हटलं, काय जायचं का देहूला? ती म्हणे चला! मग तिथून देहू! देहूमधे शिरल्याशिरल्या तिथलं वातावरण बघून आपोआप अंगात वारकरी शिरला! आहाहा… काय मस्त वाटतं सांगू! विठ्ठल मंदिरात दर्शनाला गेलो तो हातातली फुलं आणि तुळशी तिथल्या पुजा-याच्या हातात दिली. पुजारी म्हणाला, “अहो वाहा ना तुम्हीच!” खरंच छान वाटलं. आपण नेहेमी जेव्हा इतर मंदिरात जातो तेव्हा पुजारी आपल्या हातातून खसकन पूजासाहित्य ओढून घेतात आणि एक प्रसादाचा दाणा हातावर टेकवून पुढे ढकलून देतात. मी इथेही हीच अपेक्षा केली होती. पण इथे आम्हाला स्वत:च्या हाताने विठ्ठलाची पूजा करायला मिळाली. नेमकं कसं वाटलं नाही सांगता येणार, पण खूप अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. ठरवूनही एकादशीच्या दिवशी मंदिरात न जाणारा मी, त्या दिवशी कसाकाय देहूत पोचलो देव जाणे!
                देहूवरुन निघालो तो न थांबता सरळ घरी! फक्त तीन तासात आम्ही तीन ठिकाणी फिरुन आलो. आता ही एनर्जी बरेच दिवस पुरेल! परत डाऊन वाटायला लागलं की परत असंच एखादं ठिकाण एनर्जीसाठी!

लालबाग चा राजा – 2011

चिंचपोकळीचा चिंतामणी
श्री गणेशाय नमः !
दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवाची मी आतुरतेने वाट बघत होतो ! कारण या कालावधीत आपल्या ब्लॉग चा वाढदिवस असतो ! होय.. आपला ब्लॉग आता चक्क वर्षाचा झाला आहे ! वर्ष पूर्वी गणेश उत्सवात अगदी टाइम पास करत करत छोट्याश्या खोलीत सुरु केलेल्या या उपक्रमाचे आज ६००० हून जास्त भेटी आहेत ! या ब्लॉग ची सुरवात केली होती ती लालबाग च्या राजा च्या पोस्ट ने ! दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवत आहे ! लालबाग च्या राजा च्या भेटीचा हा संक्षेप्त वृतांत !

राजा चे पहिले मुखदर्शन !
या वर्षी आमच्या लालबाग च्या राजाला जाणारी काही जुनी मंडळी आली नव्हती .. तसेच नवीन मंडळी देखील आली ! ( ब्लॉग च्या पहिल्या पोस्ट मधेय उल्लेख केलेला विकास या वेळेस मात्र आला 😀 ) आम्ही मजल दरमजल करीत ट्रेन सोडत सोडत अगदी आरामात करी रोड स्टेशन वर उतरलो ! सर्व प्रथमचिंचपोकळीचा चिंतामणीपहावयास गेलो.. करी रोड स्टेशन च्या दगडी पायर्या उतरल्या कि समोरच आपल्याला हा गणपती बाप्पा दिसून येतो !


रांगेत उभे असलेले !

त्याला नमस्कार करून आता आम्ही प्रत्यक्ष लाल्नाघ ला जाऊ लागलो होतो.. मधेय विविध खाण्याच्या पदार्थांच्या गाड्या दिसत होत्या ! मोह आवरून आम्ही चालत होतो ! आता आम्ही मुख दर्शनाच्या रांगेत शिरलो होतो ! गेल्या वर्षी सारखी चूक आता या वर्षी आम्ही मात्र गेली नाही ! गेल्या वर्षी आम्ही चुकीचं रांगेत शिरून मागे परत फिरलो होतो .. तसेच तडक घरी जायचा निर्णय घेतला होता ! परंतु देवावार्चाय भक्षी मुले आम्ही माघारी फिरलो परत मुख दर्शनाच्या रांगेत शिरलो आणि दर्शन घेतले ! अर्थात या वेळेस मात्र असे काहीही झाले नाही ! गेल्या वर्षी प्रमाणे या वेळेस सुद्धा आम्ही डोक्यावररंगीत शिंगेघातली होती..! आता एका पाठोपाठ एक करत करत आम्ही एकएक रंग सोडत चाललो होतो ! आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी प्रवेश केला ! आणि मला राजाचाची पहिली वाहिली झलक दिसली ! काय सांगू.. माझ्या मनातले सगळे सगळे काही संपले! माझी विचार करण्याची ताकदच जणू सुन्न झाली होती ! इतके विलोभनीय दृश्य होते ते !

साक्षात राजा !
दरवषी प्रमाणे लालबाग चा राजा या वर्षी सुद्धा मस्त दिसत ओत ! शेवटी राजाच तो आपला 🙂 .. अश्या प्राकडे आम्ही बाप्पाचे दर्शन पूर्ण केले .. मला शक्य तितक्या जवळून तसेच शक्य तितके फोटोस काढून घायचे होते ! ते झाल्यावर आम्ही बाहेर आलो ! तहानलेल्या व्यक्तीला अचानक पणे पाणी मिळाल्यावर त्याची हालत कशी होते ? तशी आता आमची अवस्था झालेली ! आणि आता आम्ही मोर्चा वालाल्वा तडकपेटपूजेकडे !
दर्शन घेतल्या नंतर ची मुद्रा 🙂

लालबाग ला एवढ्या गर्दीत सुद्धा आम्हाला खायला चांगले हॉटेल मिळाले .. आत जाऊन बघतो तर फक्त पाव भाजी मिळेल असे कळले.. लगेच ओर्देर दिली तसेच तव मारला ! आमची पहिली ट्रेन :०७ ची होती ( कसारा ) आता वाजले होते :१५ ..! म्हणजे आम्हाला अजून ४५ मिनिटे तरी काहीतरी टाइम पास करावयाचा होता तर ! आणि आता आम्ही अजून एक गणपती बघितला .. आणि मग सरळ पहिली गाडी पकडून घरी गेलो !

घरी जाताना मनात असा विचार आला.. कि आज तर आपल्या ब्लॉग चा रा वाढदिवस आहे ! घरी गेल्यावर जरूर ब्लॉग लिहीन असा विचार करत करत मी आता निद्राधीन होऊ लागलो होतो ! :):):):):):):)

पाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग 2 )

आणि हा पाकिस्तान फोटोपुराणाचा दुसरा नि शेवटचा भाग……अगदी पोलिसांपासून….. गुंडांपर्यंत नि मुल्लांपासून ते पार जनते पर्यंत.
ह्या विषयावरील पोस्टचा पहिला भाग  अवघ्या १५ दिवसांपूर्वी प्रकाशित केला होता नि अल्पावधीत ते पहिले पोस्ट गेल्या 30 दिवसात अधिक वाचले/बघितले गेलेले … ह्या यादीत पहिल्या क्रमांकावर येऊन बसले. हे पोस्ट  भारत, संयुक्त  राज्ये/अमेरिका, सिंगापूर, कझाकस्तान, जपान, लाट्‌विया, इथिओपिया, नेदरलँड, मलेशिया, संयुक्त अरब -अमीरात, स्वित्झर्लंड, हंगेरी, पोलंड, कॅनडा, फ्रान्स, नायजेरिया  ह्या आणि इतर काही देशातून बघितले गेले त्यावरून एकूणच आपण भारतीय आणि जगभरातले मराठी वाचक/प्रेक्षक  हे “पाकिस्तान ” ह्या विषया बाबत किती संवेदनशील आहोत हे लक्षात येते.
न जाणो  हे फोटोग्राफ्स कदाचित अगदी नजीकच्या भूतकाळातील नसतीलही …ते अगदी गेल्या काही दिवसातील /महिन्यातील/वर्षातील  आहेत असे जरी क्षणभर गृहीत धरले तरी पाकिस्तान हा गेल्या दशकात  अण्वस्त्रसज्ज देश बनल्याने हे फोटोग्राफ्स बघितल्यावर तेथील कायदा सुव्यवस्था नि एकूण जनतेच्या रहाणीमाना वरून ,फक्त भारतालाच नव्हे तर एकूण जगालाच पाकिस्तानची चिंता का भेडसावते ते जास्त प्रकर्षाने लक्षात येते.
परमेश्वर करो नि तेथील जनते मध्ये नि राज्यकर्त्यांमध्ये धर्म नि धर्मांधता ह्यातील सूक्ष्म फरक,सुज्ञता नि सुजाणपणा लौकरात लौकर येऊन ते माणसात येओत,त्यातच सगळ्यांचे हित सामावले आहे असे नाही का ?
ह्या वास्तवदर्शी फोटोंसाठी त्या मूळकर्त्याचे नि त्या साईटचे (www.nidokidos.org ) पुन्हा एकदा आभार.धन्यवाद.

 हे  पोस्ट आमचे “जस्ट निफ्टीचे” मित्र श्री.कुमार ह्यांचे सहकार्यातून साकार झाले.त्यांनी पाठविलेल्या एका मेलचा हा स्वैरानुवाद .
धन्यवाद श्री. कुमार.   
सायकल

“चांदी की सायकल, सोने की सीट. आओ चले डार्लिंग, चले डबलसीट…”

म्हणतात ना “जहा ना पोहचे रवी, वहा पोहचे कवी”

तुम्हीच सांगा कोणालाही मोटारसायकल पासून विमानापर्यंत सोन्याचे करण्याचे विचार नाही मात्र सायकल सोन्याची बनवली.

आज सायकल चालवतांना सहज एक विचार मनात आला आणि मला बालपणीच्या आठवणीत घेऊन गेला.

लहानपणी आमच्या घरी एक सायकल होती पण ती बरीच मोठी होती. ही ‘भ्रातोपार्जीत’ सायकल कालांतराने माझ्यापर्यंत आली. सायकल चालविण्यासाठी मला फार कष्ट करावे नाही. घरातली ‘भ्रातोपार्जीत’ सायकल मोठी असल्याने दादा भाड्याची लहान सायकल घेऊन आला आणि मला शिकवणी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात मी यशस्वी झालो. माझ्या लहानपणी जालन्यात छोटी सायकल १ रुपया तासाने मिळायची. घराच्या आजूबाजूला मैदानही खुप होती.
जेव्हा सायकल व्यवस्थित जमू लागली की, मी आठवड्यातून एकदा सायकल भाड्याने घेऊन यायचो. त्यासाठी लागणारा १ रुपया मिळण्यासाठी आईच्या मागे लागायचो. बऱ्याचदा तो मिळायचा पण जर कधी मिळाला नाही तर वर एक उपाय शोधला होता. मग मी आईला ५० पैसे मागायचे आणि एका मित्राला तयार करायचो आणि तो ही ५० पैसे घेऊन यायचा. अशा रितीने एक तास दोघे मिळून सायकल खेळायचो.

सायकल खेळण्याच्या आनंदाबरोबरच एक नको असलेली गोष्ट पदरात पडली ती म्हणजे “अपघात”. सायकलवरून पडणे, झाडाला धडक… अहो एकदा चक्क रिक्षा लाच धडकलो. मग काय कधी कोपरा, कधी गुडघा तर कधी हातापायाची बोटं फोडून घ्यायचो.

एक अपघात मला अजूनही आठवतो, मी पाचवीत होतो. मी आणि माझा मित्र “अमित” सायकलवर डबलसीट क्रिकेट खेळायला जात होतो. मी सायकलच्या मधल्या रॉड बसलेलो तर मागच्या कॅरीअर ला क्रिकेट कीट आणि सायकलचं वजन आम्हा दोघांच्या एकुण वजनापेक्षा अधीक. त्यात आमचा परोपकार सगळ्या टीम मेंबर्सना बोलवण्याचे काम करत करत मैदानाकडे जात होतो. हे मैदान घरापासून बरच लांब होतं.

मोठ्ठा रस्ता आणि त्यावर एक मोठ्ठा खड्डा…

सायकलचं समोरच चाक त्यात फसले आता ही आमच्या वजनापेक्षा ही जड सायकल आम्हाला काही सांभाळता नाही आली आणि आमच्या सायकलला एक सायकल येऊन धडकली आम्ही सगळे खाली पडलो. उठून उभं राहिलो तेव्हा लक्षात शर्ट पाठीवर संपूर्ण फाटला होता, पण क्रिकेटची मॅच महत्त्वाची होती म्हणून तसेच खेळायला गेलो. मॅच संपल्यावर मित्राच्या आईने मला पाहिले आणि पाठीवरच रक्त दाखवले. घरी येता येता पाठीची आग आग होत होती. घाबरत घाबरत च घरी आलो, आईने विचारले काय झालं??? मग मी फाटलेला शर्ट दाखविला. पाठ इतकी सोलल्या गेली होती की आईला दुसरे काहीच सुचलं नाही आणि तिने सरळ औषध लावायला सुरुवात केली.

आणि घरी आल्यावर आई सोलून काढेल ही भिती नाहीशी झाली….

असे बरेच किस्से आहेत.

आज जेव्हा नियमीतपणे सायकलने ऑफीसला जातो तेव्हा जाणवलं की १५-२० वर्षापूर्वीचे माझं बाल मन किती उधाण होतं. बेफिकीर होऊन सगळ्या गोष्टी करायचो. वाट्टेल तशी सायकल चालविणे. कधी डबलसीट, कधी ट्रिपल सीट तर कधी कॅरीअर वर. तेव्हा आठवड्यातून एकदा तरी सायकल पंक्चर व्हायची आणि आता गेल्या एक वर्षात एकदाही पंक्चर नाही झाली. तेव्हाचं ते चंचल मन हा विचार नाही करायचं की सायकल कुठे, कशी आणि किती वेगाने चालवायची.

“तेव्हा जग फारच लहान वाटायचं इतकं की सायकलवरून सहज फिरून येता येईल एवढं…”

bhashabharati

काव्यकुसुमाम्ना मिळावी प्रकाशाची तिरीप 
म्हणूनच मी घेतला ना इन्टरनेटचा आधार 
ब्लोग उघडिला त्यात कविता सारांयाला
काय लिहिले वा कसे कोणी नसे बघण्याला 
असे होता गवसली एक वेबसाईट मला 
जिथे जमतील काविव्रुंद आणी लेखकू लिहिण्याला 
तिथे पाठवले एक कविता पाहण्याला 
रसिकांना कुवत आपली समजते काय त्याला 
पत्र नंतर साहजिक मलाही आले 
ब्लोग तुमचे आमच्या साइटला जोडावे 
आणी नंतरच मला काही दिसांनी कळले 
की ब्लोगला माझ्याही अनुयायी मिळाले 

राजा तुपाशी, जनता उपाशी

मॅडम ऑफीस मध्ये आल्या आल्या.

मोहन: मॅडम आज एक बॉम्बस्फोट झाला.

मॅडम: हे बघा, सारख्या सारख्या त्याच तक्रारी घेऊन का येता माझ्याकडे?

मोहन: नाही, मॅडम युवराजला जरा रिक्षाने तिथे जायला सांगा ना. ते कसं लोकं त्यांना जवळून ओळखतात ना म्हणून हा विषय काढला.

मॅडम: हे बघा युवराजचे जेवण व्हायचं आहे अजुन, त्यांना त्रास देऊ नका. विनाकारण माझ्या लेकराला उपोषण…

मोहन: उपोषण… मॅडम अण्णा आणि मोदी ही उपोषण करत आहेत.

मॅडम: आता कसं मुद्द्याचं बोललात तुम्ही… एक काम करा विजय आणि अनिषला पाठवा. ते हाताळतील हा विषय.

मोहन (घाबरत): आणि मॅडम “महागाई”चं काय?

मॅडम: अहो पुन्हा तेच… सांगितलं ना युवराज उपाशी आहेत याच मुळे. एक काम करा मी घरी जाऊन येते तो पर्यंत “ऑफीस” सांभाळा.

मॅडम घरी पोहोचतात…

युवराज: मम्मी, जेवायला वाढ.

मम्मी: अरे हातपाय तर धू.

युवराज: काय केलं आहे आज???

मम्मी दोन चिठ्ठ्या असलेली एक डिश युवराज समोर ठेवते.

युवराज:  काय आहे हे मम्मी?

मम्मी नुसतेच हसते…

युवराज (चिडून): पण आहे काय यात???

मम्मी: उघडून बघ…

शेवटी कोणताच पर्याय नाही हे पाहून युवराज एक चिठ्ठी उघडतो.

त्यात लिहिलेलं असतं, “सिलेंडर महाग होणार, पेट्रोल महाग होणार, पर्यायाने भाजी, दुध ही महाग होणार. खर्च कमी करायला हवेत, म्हणून आज स्वयंपाक नाही.”

युवराज चिठ्ठी वाचण्यात मग्न मम्मी परत ऑफीसला जायला निघते.

तितक्यात युवराज ओरडतो, “याला काय अर्थ आहे? म्हणजे आज काहीच नाही.”

मम्मी शांत पणे दुसरी चिठ्ठी उघडायला सांगते. युवराज चिठ्ठी उघडतो.

त्यात एक आश्वासन असतं, “उद्या मी श्रीखंड पुरी करणार आहे.”

मम्मी: बाळा, जनतेला जे आपण दिले तेच आहे यात. जनता गेल्या ६० वर्षापासून हेच खात आहे. एक दिवस तु ही खाऊन बघं.

युवराज एकदम खुश होतो. चहे-यावरचा आनंद पाहुन मम्मी युवराजची पापी घेते आणि पुन्हा ऑफीसला निघते.

काळा चष्मा

या काळ्या चष्म्यामागून
पाहत जाईन तुला…

तुझ्या नजरेस नजर मिळवणे अवघड वाटले
तरी चोरून चोरून पाहीन तुला…

या काळ्या चष्म्याआड दडलेत डोळे
तुझा आदर करणारे…तुझ्यावर प्रेम करणारे…

कधीतरी तुझ्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहणारे वेडे डोळे…
आणि म्हणूनच उघड्या डोळ्यांनी
तुझ्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नाही…

तू ओळखशील माझ्या डोळ्यांतील अपराधी भाव…
तुला दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याने आलेला अपराधीपणा

एव्हाना पर्यंत तू तो ओळखला असशीलच…
पण तरीही तो लपवण्याचा प्रयत्न आहेच…
स्वत:ला फसवत जगण्याचा प्रयत्न आहेच…
मिटल्या डोळ्यांनी हसण्याचा प्रयत्न आहेच…

 -काव्य सागर

"मराठमोळया गप्पांची" विचकट पेट्रोल दरवाढ.

“मी मराठी” वर “मराठमोळया गप्पांची काही अंशी पेट्रोल दरवाढ” झाली. माझ्या पेट्रोल दरवाढ…व्यंगचित्र रूपाने  ह्या पोस्टचे काही अंशी संकलन करून “विचकट” ह्यांनी ते “मी मराठी” ह्या संकेत स्थळावर गप्पाटप्पा या सदरात प्रसिद्ध केले.

प्रिय मित्र विचकट ,
सप्रेम नमस्कार,
माझे पेट्रोल दरवाढ…व्यंगचित्र रूपाने  हे पोस्ट आपण “मी मराठी”या संकेतस्थळावर प्रकाशित करून ते जास्तीत जास्त मराठी वाचकां पर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार,फक्त सर्व व्यंगचित्रे एका ब्लॉगवर मिळाली होती, तेथे ही खालील प्रमाणे लिहलेले दिसले,ह्या ऐवजी जर माझ्या ब्लॉगचा पत्ता,अथवा ऋण निर्देश करता आला असता तर मला, निश्चित अजून आनंद झाला असता यात शंका नाही,कारण त्या योगे अशी अजून बरीच नेहमी पेक्षा कदाचित वेगवेगळ्या विषयावरील पोस्ट आपल्या संकेतस्थळाच्या मदतीने अजून जास्तीत जास्त लोकां पर्यंत, वाचकां पर्यंत ती पोहोचतील असा विश्वास आहे.
मी सुद्धा कोणी लेखक,कवी अथवा फार कोणी मोठा विचारवंत वगैरे नसल्याने, माझ्या स्वभाव धर्मानुसार माझ्या ब्लॉगवर जेथे जेथे मी एखादे पोस्ट कुणाच्या मदतीने प्रसिद्ध केले असेल त्या त्या पोस्टच्या सोबत त्या त्या साईटचा अथवा व्यक्तीचा ऋणनिर्देश आपणास निश्चितपणे आढळून येईल.तसेच माझ्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच “मी एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित (म्हणजे असं त्यास वाटतं )प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले (हो अनेकवचनच)आणि बरेच काही नेहमी प्रमाणे बिनकामाचे.पण न जाणो,कदाचित महत्वाचे,”असे जरी नमूद केले आहे,तरीही हे पोस्ट प्रकाशित केल्या नंतर आपण मला जर एखादा नुसता मेल जरी केला असता तर बरे झाले असते असे वाटते.
तथापि,आपणास धन्यवाद.

काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर……

“अद्व्या मर्दा भूक लागलिये”
“होय रे. आज या प्रोजेक्टच्या नादात वेळ एकदम फास्ट निघून गेला”
“अरे भावांन्नो आणि कोणाला भूक लागलिये काय?”
एकदम सगळे जोरात ओरडले “हो!!!”
“चला मग डबे काढा”
“मी नाय आणला”,“मी पण नाही”,”च्यामारी म्या भी नाय आणला आता काय करायचं?”
“अरे मग ३ डब्यात आपण ८ जण कसे भूक भागवणार?”
“चला मग काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर ला जाऊयात”
“हे आणि काय नविन”
“ते नविन नाय, तू नविन आहेस”
“पण ही भानगड नेमकी आहे तरी काय?”
“अरे त्ये एक मिसळपावचं नवं हॉटेल निघालय हायवेवर”
“हायवे??? अबे किती वाजलेत बघ! आज सकाळचा सगळा वेळ या प्रोजेक्टमधे घालवलाय. जरा लेक्चर-बिक्चर पण करूयात की”
“होय! लय सिंसियर डोक्याचा तू. चल लई शाना हाईस. पुढचं लेक्चर त्या धोंडेच हाय. त्यो गडी कवा पण आत घेतोय. लेट ये, अगदी प्रेसेंटी घ्यायच्यावेळी आलासतरी कायपण म्हणत नाही.”
“हम्म्म्म. तेपण खरच आहे म्हणा. जाऊयात पण अर्ध्यातासात काहीपण करून परतायचं”
“ए तू गपरे. गाडीची किल्ली मला दे आणि गप माज्यामागं बस”
झालं, एकूण ३ गाड्यांवरून आमची ८ जणांची गॅंग नविन निघालेल्या मिसळपावच्या हॉटेलाकडं मार्गस्थ झाली. 
 ——————————————————————————–
“काकी, ८ मिसळपाव द्या. ए कोण कोण तिखट घेणारे ?”
“मी ट्राय करेन”
“ए बामणा! तुला हे खाऊन माहित नाही. उगाच तिखट घेचिल आनि नंतर बोंब मारत सुटशील”
“ए लई शाना आहेस. गप मला तिखट ऑर्डर कर. तुला दाखवतोच ब्राह्मणांत पण किती दम असतो ते!”
“बर बाबा. मानलं तुला. उगाच शापबिप देचिल. यापर्षी कधी नव ते ऑल क्लियर झालोय, उगाच तुझ्या शापानं काय झालं-बिलं तर माझा बाबा मला पायतानानं मारंल”
काऊंटरवरच्या काकूंसकट हॉटेलातली सगळी लोकं खदखदून हसली. असली टारगट पोरं कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या हॉटेलात अवतरली होती. फायनल इयर असल्याने कदाचित आम्ही आणखीनच टारगट बनलो आहोत.
 थोड्या वेळातच गरमा गरम मिसळपाव समोर आली. आधीच भूक लागलेली आणि त्यात हॉटेलात सुटलेल्या खमंग वासाने तोंडाला जबरदस्त पाणी सुटलेलं. मी पहिला घास खाणार तोच माझ लक्ष सगळ्यांकडं गेलं. सगळे लेकाचे मला एकटक पाहात होते.

“काय रे! काय बघताय?”
“काय नाय, तुजी गमजा बघायचिये”
मग लक्षात आलं, च्यामारी आपण तिखट ऑर्डर दिलिये. झालं! आता इज्जत का सवाल था! 🙂 हळूच एक चमचा मिसळ उचलली आणि तोंडात टाकली. तोंडात आगीची पेटती काडी टाकल्यासारखा जळजळीत  चटकाच जणू बसल्यासारखं वाटलं जीभेला. कसतरी करून तोंडावर हसू ठेवून घास गिळला. 
“काय काय सायेब? कशी काय वाटली मिसळ?”
“एक ख्ख्ख!ख्ह!ख्हौओ…….. पाणी…… द ह्ह्ह्ह्ह!”
जबरी ठसका लागला! सगळे लोळलोळ लोळले हसून. गटागट पाणी प्यालो आणि कसाबसा ठसका शांत केला. आता चॅलेंज स्वीकारलेलं, ते कसं मोडणार? त्यामुळं ती झणझणीत मिसळ एका दमात मटकावली. पहिलेच जीभ भाजल्याने पुन्हा त्रास नाही झाला!
“आयला. ह्यानं संपवली की रे”
“मग! बोललेलो! माझ्याशी पंगा नाय घ्यायचा!”
“बर बाबा! तु जिकलास!”
जवळ जवळ अर्धा-पाऊण तास निघून गेला. दंगा मस्तीत वेळ कधी निघून गेला कळालच नाही. सहज घड्याळाकडं लक्ष गेलं तेव्हा वेळेच भान आलं.
“अरे मुर्खांनो अर्ध्यातासापेक्षा जास्तवेळ झालाय. चला आवरा लवकर. संपवा मिसळ आणि चला कॉलेजकडं”
“ए टेन्या! तुझं झालं म्हंजे सगळ्यांच झालं होय? थांब जरा. आणि धोंडे सराची जास्त काळजी नको करू. मी बरोबर सेटिंग करून ठेवलय. काय बोलनार नाही त्यो”
“ते कायपण असो! मी निघालो, यायच असेल तर या.”
“ए थांब की मर्दा. आलो आम्हीपण. झालच थांब”
—————————————————————————————-
साधारण धोंडे सरांचा तास संपायला १५ मिनिट बाकी असताना आम्ही कॉलेजवर पोहोचलो. वर्ग शोधण्यापासून सुरवात. दोन-तीन व्यवस्थित सुरू असलेले वर्ग डिस्टर्ब करून फायनली आमचा वर्ग सापडला.
“मे आय कम ईन सर?”
“येस .प्लीज कम इन”
“बग. बोललेलो किनी? आपला मानूस हाय. काय त्रास देनार नाय. निवांत आत घेईल”
“ए! गप चला आत. ऐकले तर आत घेणार नाहीत.”
पटकन मागच्या मोकळ्या बेंचवर जाऊन बसलो. बॅक बेंचरच आम्ही. नेहमीचे बेंच ठरलेले. 
“आत्ता आलेले सगळे जण उभारा!”
झालं! सगळ्यांची टरकली. काहीतरी लोचा झालाय! सगळे उभारलो.

“कोठे गेला होतात?”
पायात सुतळी बॉंब फोडावा तसा सरांचा हा प्रश्न थाडकनं आमच्यावर आपटला. आमच्या सगळ्यांच्या माना खाली.

“अरे बाळांनो मी तुम्हाला विचारतोय…… कुठे गेला होतात? टेल मी फ्रॅंकली”
परत सगळ्यांच्या माना खाली. काय बोलणार म्हणा!
“कुलकर्णी, कोठे गेला होतात इतका वेळ? मास्तर आपलाच आहे, कधीपण आत घेईल असा जर समज झाला असेल तर तो काढून टाका मनातून. काय कुलकर्णी बरोबर आहे ना? असच वाटलेलं ना?”
“नाही सर! तसं नाही.”
“मग कसं? कुठे गेला होतात?टेल मी फ्रॅंकली”
“सर ते आम्ही…….! सर ते प्रोजेक्ट….”

“टेल मी द ट्रुथ. टेल मी फ्रॅंकली”
माझी मान खाली. काय सांगणार? खोट बोलणं सुचेना, खरं बोलण जमेना! आणि आमचे विद्वान मित्र लोक मागून प्रॉंप्टिंग करत होते.

“अद्व्या सांग पोरिंच्या मागं गेलेलो. ख्या ख्या ख्या”
“अरे नाही, ऑफिसात बोलवलेलं म्हणून सांग” 
“नायतर सरळ सांग काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला गेल्तो म्हनून”
“ए */?*# न्नो गप बसा. इकडे माझी वाट लागलिये आणि तुम्ही मागून मजा करताय??” 
(मी हळूच पुटपुटलो)
“हम्म! बोला कुलकर्णी.”
“तो तुझ्यामागे कदम आहे काय? काय तरी बोलतोय तो. हानं कदम तुम्ही सांगा कुठे गेलेलात?”
“सर ते… आमी…..”
“बोला पटकन. माझ्याकडं वेळ नाही. असं कोणतं काम तुम्हाला पडलेलं की माझं लेक्चर चुकवून ते पुर्ण करण्यात तुम्ही गुंतला होतात. चला लवकर लवकर बोला. कदम बोला पटकन टेल मी फ्रॅंकली”
“सर आमी सगळे  काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला मिसळपाव खायला गेल्तो”
कदमाच्या या “फ्रॅंकली” उत्तराने आता सरांच्या पायात सुतळी बॉंब फुटल्यासारखी सरांची अवस्था झाली. आपण खुपच सज्जन आहोत अशा इनोसंट चेहर्‍याने कदमाने झटकन उत्तर दिले. सगळा वर्ग खदादा हसायला लागला! मास्तरचं डोकं जाम भडकलं! त्यांनी सरळ डस्टर, पुस्तक घेतलं आणि वर्ग सोडून तावातावाने निघाले. दरवाज्यापाशी गेल्यावर आमच्याकडे बघून म्हणाले,
“पुन्हा जर तुम्ही लोक माझ्या लेक्चरला दिसलात तर मी लेक्चर घेणार नाही”
आणि सर निघून गेले. त्यानंतर जो काय आम्ही दंगा केलाय तो शब्दात सांगणं खरच कठीण आहे. “टेल मी फ्रॅंकली” चा इतका फ्रॅंकली कोणी अर्थ घेईल याची कदाचित सरांनाही अपेक्षा नव्हती.
ते काहीही असो, पण हा दिवस खरच आमच्या कॉलेज लाईफमधला काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर….. दिवस ठरला! 🙂
-अद्वैत कुलकर्णी
marathi corner team

दान…

          रस्त्यात फिरणारे भिकारी, देवाचे फोटो आणि कुंकू घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया, लहान लहान मुले, वारकरी आहोत, रस्ता चुकलो आहोत असं सांगणारे यांच्यावर त्यांच्याकडे पाहून दया येते पण क्षणभरच! बसमध्ये प्रवाशांना “मी मुकबधीर असून उच्च जातीची/चा आहे. पण अशी अशी घटना झाली, कृपया मला मदत करा” अशा आशयाची पत्रके वाटली जातात. किंवा कोणी एखादा इसम येऊन मी अमक्या अमक्या गावातून आलो, माझे नातेवाईक दवाखान्यात

अ‍ॅन्ड्रॉईड

      अ‍ॅन्ड्रॉईड ही मोबाईल्ससाठी असलेली चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आहे. ती खास करुन स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट पीसींसाठी बनवलेली आहे. तिचा विकास ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ने गुगलच्या नेतृत्वाखाली केला. अ‍ॅन्ड्रॉईड नावाची मूळ कंपनी गुगलने ५ नोव्हेंबर २००७ ला खरेदी केली आणि नंतर वाढवली. अ‍ॅन्ड्रॉईड ही ’ओपन सोर्स सिस्टीम’ आहे. ओपन सोर्स म्हणजे तिचा सोर्स कोड सर्वांना उपलब्ध आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मायक्रोसॉफ्टची विंडोज जशी आपल्याला विकत घ्यावी लागते आणि आपल्याला तिचा फक्त सेट अप मिळतो तशी अ‍ॅन्ड्रॉईड नाही. त्यामुळे अ‍ॅन्ड्रॉईड वाढवण्यासाठी कुणीही त्यात भर घालू शकतं.अ‍ॅन्ड्रॉईड ही लिनक्स कर्नेल वर चालते. कर्नेल म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि तुम्ही स्थापित (इंन्स्टॉल) केलेले प्रोग्राम्स यातील दुवा.
आज बाजारात अनेक प्रकारचे अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत. ते सर्व मुख्यत: बिझनेस फोन्स किंवा टॅब्लेट पीसी आहेत. त्यावर आपण स्वत: बनवलेले अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन्स टाकू शकतो.

      अ‍ॅन्ड्रॉईडची वैशिष्ट्ये:
      १) हॅन्डसेट लेआऊट्स:
      अ‍ॅन्ड्रॉईड फोन्सची स्क्रीन साईज ब-यापैकी मोठी असते. त्यावर आपण टू डी, थ्री डी अ‍ॅप्लिकेशन्स आरामात वापरु शकतो. (जसे थ्री डी गेम्स.)
      २) स्टोरेज:
      अ‍ॅन्ड्रॉईडमधे स्वत:चा डेटाबेस आहे. त्याला एस्क्युलाईट म्हणतात.
      ३) कनेक्टिव्हीटी:
      अ‍ॅन्ड्रॉईड विविध पद्धतींनी कनेक्ट होऊ शकतो जसं GSM/EDGE, IDEN, CDMA, EV-DO, UMTS, Bluetooth, Wi-Fi, LTE, NFC आणि WiMAX
      ४) भाषा सहाय्य:
      अ‍ॅन्ड्रॉईड वेगवेगळ्या मानवी भाषांमधे काम करु शकतो.
      ५) वेब ब्राऊजर:
      अ‍ॅन्ड्रॉईडकडे चांगला वेब ब्राऊजर आहे.
      ६) जास्तीचा (अ‍ॅडिशनल) हार्डवेअर सपोर्ट
     अ‍ॅन्ड्रॉईड व्हिडिओ/स्टील कॅमेरा वापरु शकतो तसेच टचस्क्रीन, जीपीएस, अ‍ॅक्सिलरोमीटर, गायरोस्कोप,मॅग्नेटोमीटर, डेडिकेटेट गेमिंग कन्सोल, प्रेशर सेन्सर तसेच थर्मोमीटर अशी वैशिष्ट्ये त्यात आहेत.
           याव्यतिरिक्त जावा सपोर्ट, सर्व प्रकारचा मिडिया सपोर्ट (एमपीथ्री/फोर फाईल्स आणि इतर), स्ट्रिमिंग मिडिया सपोर्ट, मल्टिटच, ब्ल्युटूथ, व्हिडिओ कॉलिंग, मल्टिटास्किंग, व्हॉईस इनपुट, टिथरिंग,स्क्रीन कॅप्चर अशी अनेक वैशिष्ट्ये अ‍ॅन्ड्रॉईडची आहेत.

अ‍ॅन्ड्रॉईडवर बाजारात कायकाय उपकरणे उपलब्ध आहेत बघा जरा:

      वापर:
      अ‍ॅन्ड्रॉईडचा वापर प्रामुख्याने स्मार्टफोन्स, नेटबुक, टॅब्लेट कॉम्प्युटर्स, गुगल टीव्ही इत्यादीत होतो. गुगल टीव्ही प्रामुख्याने अ‍ॅन्ड्रॉईडची एक्स८६ ही आवृती वापरते.

अ‍ॅन्ड्रॉईड आवृतींचा इतिहास:

ऑक्टोबर २००३: अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या पाउलो अल्टो येथे अ‍ॅन्डी रबिन, रिक मायनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट यांनी अ‍ॅन्ड्रॉईडची मुहुर्तमेढ रोवली.

ऑगस्ट २००५: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईड कंपनी विकत घेतली.

५ नोव्हेंबर २००७: ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ची स्थापना झाली.

१२ नोव्हेंबर २००७: अ‍ॅन्ड्रॉईडची बीटा आवृती बाजारात आली.

२३ सप्टेंबर २००८: पहिला अ‍ॅन्ड्रॉईड फोन, एच.टी.सी. ड्रीम अ‍ॅन्ड्रॉईडच्या पहिल्या(१.०) आवृतीसह बाजारात आला.यात खालील वैशिष्ट्ये होती.
१) गुगलच्या विविध सेवांबरोबर आदानप्रदान
२) एचटीएमएल, एक्सएचटीएमएल, अनेक एचटीएमएल पेजेसला सहाय्य करणारा वेब ब्राऊजर.
३) अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट वरुन अ‍ॅप्लिकेशन्स उतरवून घेणे (डाऊनलोड करणे) आणि अद्ययावत (अपग्रेड) करणे.
४) मल्टीटास्किंग, इन्स्टंट मॅसेजिंग, वाय-फाय आणि ब्लुटूथ सहाय्य.

९ फेब्रुवारी २००९: फक्त टी-मोबाईल जी१ साठी अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.१ बाजारात आली.

३० एप्रिल २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.५ बाजारात आली, जी कपकेक या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अधिक वेगवान कॅमेरा, आणि वेगवान फोटो कॅप्चर
२) अधिक वेगवान जी.पी.एस. यंत्रणा
३) स्क्रीनवरचा की-बोर्ड
४) यातून व्हिडिओ सरळ तूनळी (यूट्यूब) आणि पिकासावर चढवता (अपलोड करता) येत होते.

१५ सप्टेंबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.६ बाजारात आली, जी डोनट या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) वेगवान शोध यंत्रणा, व्हॉईस सर्च
२) एका क्लिकवर व्हिडीओ आणि फोटो मोडमधे चेंज करता येऊ शकणारा कॅमेरा
३) बॅटरी वापर दर्शक
४) CDMA सपोर्ट
५) अनेक भाषांमधील टेक्स्ट टू स्पीच

२६ ऑक्टोबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.० बाजारात आली, जी इक्लेअर या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अनेक ईमेल अकांऊंट्स
२) ईमेल अकांऊंट्ससाठी मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंजचं सहाय्य
३) ब्ल्युटूथ २.१ सहाय्य
४) नविन ब्राऊजर जो एच.टी.एम.एल. ५ ला सहाय्य करतो.
५) नविन कॅलेंडर

३ डिसेंबर २००९: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.०.१ बाजारात आली.

१२ जानेवारी २०१०: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.१ बाजारात आली.

२० मे २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.२ बाजारात आली, जी फ्रोयो या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) विजेट्स सहाय्य: विजेट्स म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात जे होमस्क्रीनवर डकवता येतात. उदा: आजपासून ख्रिसमसला किती दिवस बाकी आहेत याचा प्रोग्राम, तापमान दर्शक, येण्या-या महिन्यात तुमच्या फोनबुकमधे असलेल्या कुणाचा वाढदिवस आहे हे सांगणारा छोटासा प्रोग्राम इत्यादी.
२) सुधारीत आदानाप्रदान सहाय्य.
३) हॉटस्पॉट सहाय्य.
४) अनेकविध भाषांमधील की-बोर्ड.
५) अ‍ॅडोब फ्लॅश आवृत्ती १०.१ सहाय्य.

६ डिसेंबर २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३ बाजारात आली, जी जिंजरब्रेड या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) सुधारित युजर इंटरफेस.
२) जलदगतीने टाईप करता यावं म्हणून सुधारीत की-बोर्ड.
३) एका क्लिकवर सिलेक्ट करता येण्याजोगं टेक्स्ट आणि कॉपी/पेस्ट.
४) जवळील क्षेत्रातील आदानप्रदान (निअर फिल्ड कम्युनिकेशन).
५) इंटरनेट कॉलिंग.

२२ फेब्रुवारी २०११: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३.३ बाजारात आली, तसेच टॅब्लेट पीसींसाठीची अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती ३.० बाजारात आली, जी हनिकोंब या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) ही आवृत्ती खासकरुन टॅब्लेट पीसींसाठी आणि मोठ्या स्क्रीनच्या फोन्ससाठी बनवली गेली.
२) सुधारीत मल्टीटास्किंग, बदलता येण्याजोगी होमस्क्रीन आणि विजेट्स.
३) ब्लुटूथ टिथरींग
४) चित्रे/व्हिडीओ पाठवण्याची अंतर्गत सोय.

१०-११ मे २०११: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईडच्या ’आईस्क्रीम सॅंडविच’ आवृत्तीची घोषणा केली.

१८ जुलै २०११: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती ३.२ बाजारात आली.

असा अ‍ॅन्ड्रॉईडचा इथपर्यंत प्रवास झाला. आता आपण अ‍ॅन्ड्रॉईडचा बाजारपेठेतला हिस्सा पाहूया.

बाजारपेठेतला हिस्सा:
१२ नोव्हेंबर २००७: अर्धा टक्का.
३ डिसेंबर २००९: ३.९ टक्के.
२० मे २०१०: १७.७ टक्के.
१०-११ मे २०११: २२.२ टक्के.

ही अ‍ॅंन्ड्रॉईडची फक्त तोंडओळख आहे.

संदर्भ: http://www.xcubelabs.com/

निसर्गाची किमया

विजेच्या रुपाने शंखनाद झाला
रवि कुठे ढगा मागे लपला 
गार गार मंद मंद वारा वाहिला 
अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला 
हिरवे हिरवे हे गवत डोलू लागले
मूक जनावर ही काही  तरी गीत बोलू  लागले
माती च्या सुगंधाने मन मोहिले 
नभाने इंद्रधनुष्य रुपी वस्त्र परिधान केले 

काय ते मधुर संगीत पावसाच्या सरी ने निर्माण केले 
ते एकण्यात मन माझे तल्लीन झाले 
कवितेच्या चार ओळी लिहिताना ध्यान माझे निसर्गात गुंतले 
काय लिहिणार ? कारण मना तील सारे विचार पाउसाच्या पाण्यात भिजले. 

कविते साठी बसलो होतो पण ती अपूर्ण राहिली 
कारण निसर्गाची अशी किमया पूर्वी मी कधी न पाहिली
अहो भाग्य माझे , आंतरात्मा निसर्ग सौंदर्याचा साक्षी झाला 
फार फार आभार तुझे परमेश्वरा !! 
मला या स्वर्गात जन्म दिला 
मला या स्वर्गात जन्म दिला 

— जितेन्द्र

रिक्षाचालकांचे राज्य

ठाण्यातील मुजोर, उद्दाम रिक्षाचालकांनी बुधवारी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. ठाण्यातील रिक्षावाले म्हटल्यावर ते मुजोर, उद्दाम असणारच हे आता वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. ठाण्यात कोणत्याही रिक्षा-स्टॅण्डवर वा रस्त्यात अध्येमध्ये वाट अडवून, कोप-यावर दात कोरत, विडी फुंकत, गुटख्याच्या पिचका-या मारत टवाळकी करत उभ्या असलेल्या रिक्षाचालकांना एखाद्या ठिकाणी नेणार का, असे विचारण्याचा अविचार ज्यांनी केला आहे त्या सगळ्यांना या उर्मटपणाची शाब्दिक चपराक केव्हा ना केव्हा तरी बसलेली आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडे नाकारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. पण, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रिक्षावाल्यांना कायद्यापासून, कारवाईपासून जणू अभय मिळाले आहे. ठाण्यात तर कायद्याचे नव्हे, रिक्षाचालकांचे राज्य आहे. ते म्हणतील तोच कायदा अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच समोरचा प्रवासी ज्येष्ठ नागरिक आहे की एखादी अवघडलेली महिला आहे की बाहेगावाहून मुलाबाळांसह आलेले नवखे कुटुंब आहे, याची दखल घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. रिक्षा स्टॅण्डवर रांगेत लावलेली असो वा रस्त्यात उभी असो, ‘नही जाने का’, असे झटकून टाकण्याची मुजोरी ही मंडळी सर्रास दाखवतात. भाडे नाकारणे हा त्यांना मुळी गुन्हा वाटतच नाही. जिवाचा संताप झाला तरी अपमान गिळून प्रवाशांना नाईलाजाने दुस-या रिक्षाचालकाची मनधरणी करावी लागते. अशावेळी वाहतूक पोलिस नेमके बेपत्ताअसतात. इंदिरानगरच्या नाक्यावर रिक्षाचालकांच्या याच उर्मटपणामुळे संतप्त झालेल्या दुर्योधन कदम यांनी या रिक्षाचालकांना दोन शब्द सुनावले आणि उर्मटपणा हा जन्मसिद्ध अधिकार मानणा-या रिक्षाचालकांनी कदम यांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांना मारहाण केली. या मारहाणीत कदम यांनी जीव गमावला असला तरी राज्य रिक्षाचालकांचेच असल्यामुळे या संतापजनक घटनेबद्दल, राजकारणी चमकेश मंडळी वा रिक्षा संघटनांचे आश्रयदाते राजकीय पक्ष यांच्यापैकी कुणीही निषेधाचा चकार शब्दही उच्चारलेला नाही. गणेशोत्सवातील कर्णकटू गदारोळ, वाटमारी आणि वीजचोरी करून केलेला लखलखाट मिरवण्यात मग्न पुढा-यांना रिक्षाचालकांच्या या झुंडशाहीला फटकारण्यासाठी वेळ नाही. वाहतूक पोलिसही प्रवाशांनी आमच्याकडे तक्रार करावी, तक्रार आल्यावर आम्ही कारवाई करतोच’, हे नेहमीचे पालुपद आळवत आहेत. एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याबद्दल ठाण्यातील रिक्षा संघटनांना आत्मक्लेश होणे याची अपेक्षा करणे हाही कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणा-या सर्वसामान्यांच्या भाबडेपणाचा कळस ठरावा असेच हे भीषण चित्र आहे.