जरा हटके जरा बचके !!!सर्वसाधारणपणे क्रिकेटच्या पुस्तकातील फलंदाज बाद होण्याचे त्रिफळाचीत, झेलबाद, धावचीत, पायचीत, यष्टिचीत हे नियम आपणा सर्वांना ठाऊक असतात. पण क्रिकेटसारख्या रंजक खेळात नेहमीपेक्षा हटके काही घडलं नाही तर मग त्यात नावीन्य ते काय…


या नेहमीच्या पद्धतींखेरीजही क्रिकेटजगतात अत्यंत विचित्र पद्धतीने फलंदाज बाद झाले आहेत.

यातील काही प्रसंग लक्षात घेऊन यासाठी आधीच काही नियम आस्तित्वात होते, तर काही घटना मात्र क्रिकेटबुकलाही नवीन होत्या… नेहमीपेक्षा हटक्या पद्धतीने फलंदाज बाद झालेल्या अशाच काही विचित्र विकेट्सचा हा आढावा…

हॅन्डल्ड  बॉल

२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौ-यातील कर्णधार स्टीव वॉची विकेट अनेकांना स्मरणात असेल. चेन्नई टेस्टमध्ये हरभजन सिंग वॉला गोलंदाजी करत असताना एक वेगळाच किस्सा मैदानावर घडला होता. टेस्टच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी सुरू होती आणि ३४० या धावसंख्येवर त्यांचे फक्त ३ गडी बाद झाले होते.

यावेळी वॉने हरभजन सिंगच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन सरळ त्याच्या पॅडवर आदळला. हरभजनसकट यष्टीरक्षक आणि स्टम्प्सजवळील सर्वच क्षेत्ररक्षकांनी पायचीतचे जोरदार अपील केले. मात्र पंचांनी लागलीच ते फेटाळून लावले.

परंतु याच वेळी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या द्रविडची नजर मात्र चेंडूवरच होती. वॉच्या पॅड्सवर चेंडू आदळळ्यानंतर तो तसाच टप्पा खाऊन स्टम्प्सवर जाण्याच्या बेतात होता. घाईगडबडीत तो चेंडू स्टंम्पसवर जाऊ नये म्हणून वॉने तो आपल्या हातानेच अडवला आणि नेमकं हेच द्रविडच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही आणि तत्काळ त्याने पंचांकडे हॅन्डलिंग द बॉलचं अपील केले. पंचांनीही लगेच आपलं बोट उंचावत वॉ बाद असल्याचा निर्णय दिला.

क्रिकटेच्या नियमांनुसार बॅट हातात नसताना फलंदाजाने हलता चेंडू आपल्या हाताने अडवल्यास (काही अपवादात्मक प्रसंग सोडून) त्याला हॅन्डल्ड द बॉल या नियमाअंतर्गत बाद ठरविण्यात येते. स्टीव वॉ याच नियमानुसार बाद ठरविण्यात आला होता.

मात्र अशा रितीने बाद होणारा स्टीव वॉ हा काही एकमेव फलंदाज नाही. वॉच्या आधीही द. आफ्रिकेचा रसेल एनडीन, ऑस्ट्रेलियाचा अॅन्ड्रू हिडीक, पाकिस्तानचा मोशिन खान, वेस्ट इंडिजचा डेस्मंड हेन्स, भारताचा मोहिंदर अमरनाथ, इंग्लंडचा ग्रॅहम गूच आणि द. आफ्रिकेचा डॅरल कलिनन हे सुद्धा काहीशा अशाच पद्धतीने बाद ठरविण्यात आले होते.

स्टीव वॉ नंतर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा भारताबरोबरच खेळताना इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉ देखील याच नियमाचा शिकार झाला होता. हा निर्णय मात्र काहीसा विवादास्पद ठरलेला. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या अशा एकूण ९ प्रसंगांपैकी चार प्रसंगात भारताचा त्या सामन्यात सहभाग होता. तीन वेळा भारतीय संघ गोलंदाजी करत होता, तर एकात भारताचाच फलंदाज यात बाद झाला आहे.


ऑबस्ट्रक्टींग  फिल्ड 

पुन्हा एकदा याही विचित्र नियमाची ओळख नव्या पिढीतील बहुतेकांना भारताच्याच एका सामन्यादरम्यान झाली. ६ फेब्रुवारी २००६ रोजी पेशावरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हक या दुर्मिळ पद्धतीने बाद झाला होता. मालिकेतील या अत्यंत महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला हा नियम चांगलाच महागात पडला.

भारताच्या ३२९ या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही चोख प्रत्त्युत्तर देत ५ गडी बाद २८९ अशी मजल मारली होती. ५ विकेट्स शिल्लक असताना त्यांना ४१ चेंडूंमध्ये फक्त ४० धावा हव्या होत्या. फलंदाजीला होता कर्णधार इंझमाम (बटाट्या)…

लक्ष्य आवाक्यात आले आहे असे वाटत असतानाच इंझमामने स्वत:च्या हाताने (की बॅटने (!) आपलाच घात करून घेतला. श्रीसंथचा एक सरळ चेंडू हलकाच मिडऑफच्या दिशेने तटवल्यानंतर इंझमाम दोन-तीन पावलंच पुढे सरकला होता. मिडऑफला उभ्या असणाऱ्या सुरेश रैनाने हे पाहिले आणि सहजच चेंडू यष्टिंच्या दिशेने फेकला.

चेंडू झपकन आपल्या दिशने येत असल्याचे लक्षात येताच क्रीझच्या बाहेर असलेल्या इंझमामने तसाच उलट्या पावली मागे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू नेमका अचूकरित्या यष्टींच्या दिशेने जात असल्याने इंझमाम चेंडूच्या मार्गात आला. त्याने स्वत:ला चेंडू लागू नये म्हणून बॅट मध्ये घातली. मात्र यावेळी इंझमाम क्रीझच्या बाहेरच होता आणि तो सरळ स्टंम्पसवर जाणाऱ्या थ्रोच्या मध्ये आला होता. त्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षकांनी यावर आक्षेप घेताच पंच सायमन टॉफेल यांनी त्याला ऑबस्ट्रक्टींग द फिल्ड अंतर्गत बाद ठरवले. पाकिस्तानी संघासाठी हा एक मोठा धक्का होता आणि यानंतर त्यांनी हातातोंडाशी आलेला सामनाही गमावला.

इंझमामच्या आधीही तीन फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद झाले होते. त्यापैकी हॅन्डल्ड द बॉल पाठोपाठ येथेही भारतातर्फे नंबर लावला होता मोहिंदर अमरनाथने. श्रीलंकेविरूद्धच्या अहमदाबाद येथील सामन्यात धावचीत होण्यापासून वाचण्यासाठी अमरनाथने चेंडूलाच लाथ मारली होती. लेन हटन आणि रमीझ राजा सुद्धा एकदा याचप्रकारे बाद झाले होते.


टाइम आउट

टेस्ट आणि वनडेपेक्षा २०-२० मध्ये अनेक नव्या आणि निराळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यातलीच एक म्हणजे सामना चालू असताना फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू ड्रेसिंग रूमऐवजी चक्क बाऊंन्ड्रीलाइनवरील डगमध्ये बसू लागले आणि प्रेक्षकांना तारे जमीं परचा आभास होऊ लागला. यावेळी २०-२० चे ग्लॅमरस रूप लक्षात घेऊन खेळाडूंना सतत प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवण्याच्या उद्देशाने आयसीसीने हे आदेश दिले की काय अशी शंका अनेकांना आली होती.

मात्र यामागे असलेतसले कोणतेही तद्दन कारण नसून क्रिकेटमधील एका विशिष्ट नियमामुळे सर्व संघांना असे करणे भाग पडले होते. क्रिकेटमध्ये सहसा कधीही उल्लेख न केला जाणारा फलंदाजाला बाद ठरवण्याचा अजून एक नियम म्हणजे टाइम आऊट’.. एखादी विकेट पडल्यावर पुढच्या फलंदाजाने किती वेळात खेळपट्टीवर हजर व्हायचे यासंबंधी मर्यादा घालून वेळेची शिस्त लावणारा नियम म्हणून याचा उल्लेख करावा लागेल.

याअंतर्गत वनडे आणि कसोटी सामन्यात एक गडी बाद झाल्यावर ३ मिनिटांच्या आत पुढच्या फलंदाजाला खेळपट्टीवर हजर व्हायचे असते. तर २०-२० मध्ये हीच वेळ कमी करून अवघे ९० सेंकद इतकी करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणजे आपल्याला बाऊन्ड्रीलाइनवरील डगमध्ये पॅड, ग्लोव्स इत्यादीसह कोणत्याही क्षणी फलंदाजीसाठी तयार असलेले खेळाडू दिसू लागले आहेत.

कसोटी तसेच वनडेमध्ये ठराविक वेळेत फलंदाज खेळपट्टीवर न पोहोचल्यास निव्वळ विरोधी संघाच्या अपीलवरून एका फलंदाजाला बाद ठरवले जाऊ शकते. तर २०-२० मध्ये मात्र इथेही थोडासा बदल करून गोलंदाजाला रिकाम्या खेळपट्टीवर (फलंदाजाशिवाय) गोलंदाजी करण्याची संधी देत त्याने त्रिफळा उडवल्यास विकेट बहाल करण्याचा नियम करण्यात आला आहे.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशाप्रकारे फलंदाजाला बाद देण्याचे काही मोजके प्रसंग घडले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनतरी असा किस्सा घडला नाहीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अशा चार प्रसंगापैकी भारतातील त्रिपुरा वि. ओरिसाच्या एका सामन्यात हेमूलाल यादव या नियमाचा बळी ठरला होता.

हिट  बॉल ट्वाइस

२००१ चा लगान आठवतोय ??? त्यातला आमीरचा सहकारी गुरा अजही अनेकांच्या स्मरणात असेल. जंगलातून आलेला प्राणी अशी संभावना झाल्यावर चवताळलेल्या गुराने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता.. हा गुरा लोकांच्या खास लक्षात राहिला तो त्याच्या आगळ्यावेगळ्या बॅटिंग स्टाइलमुळे…

ब्रिटिश गोलंदाजाचा वेगवान चेंडू एकदा जागच्याजागी बॅटने अडवून त्याला थोडीशी उंची द्यायची आणि मग पुन्हा एकदा त्याला जोरदार हाणायचा… ही या गुराची अनोखी शक्कल.. मात्र लगेचच ब्रिटिश कप्तानाने आक्षेप घेतल्यावर त्याला तसे खेळण्यापासून रोखण्यात आले.. याचे कारण म्हणजे क्रिकेटमधील हिट द बॉल ट्वाइसचा नियम..

स्वाभाविकपणे क्रिकेटमध्ये गोलंजादाच्या हातून चेंडू सुटल्यावर फलंदाजाला एकदाच बॅटने त्याला टोलवायची मुभा देण्यात आली आहे. आणि जाणीवपूर्वक फलंदाजाने दोनदा चेंडू फटकावल्यास त्याला या नियमाप्रमाणे बाद ठरवण्यात येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याप्रकारे अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये.

(क्रिकेट संबंधित माझे तसेच इतरही ब्लॉगर्स व नामांकित लेखकांचे लेख, क्रिकेटसंबंधित सर्व बातम्या व लाइव्ह अपडेट्स आपण cricketcountry.com/marathi या नव्या क्रिकेट संकेतस्थळावर  पाहू शकता.)


चक दे !

चक दे !

ते आमचे स्वामी विवेकानंद पॉलीटेकनिक मधले शेवटचे वर्ष होते ! आमचे कोलेज चे फेस्ट ” संस्कृती” एव्हाना सुरु झाले होते ! तेव्हढ्यात आम्ह्चे ” स्पोर्ट्स ” सुरु झाले होते ! आणि शेवटच्या वर्षाला असल्याने मी देखील यात भाग घेतला होता ..! प्रत्येक मुलाचे स्वप्न असते के त्याच्या संघाने क्रिकेट चा सामना जिंकावा..! कमीत कमी अंतिम फेरीत तरी नेऊन जावा ..! असेच स्वप्न उराशी घेऊन आमची इंजिनीरिंग ची शाखा मैदानात उतरली होती ! शेवटचे वर्ष असल्याकारणाने सर्वच जण अगदी जीव तोडून खेळत होते..! आमचा संघ बघून आम्हाला खात्री होती की आम्ही कमीत कमी (finals ) मधेय नक्कीच येऊ ! अन घात झाला .. आम्ही पहिल्या फेरीतच साखळी सामन्यात गारद झालो! स्वप्न भंग पावले! मी स्वतःच्या डोळ्यांनी पराभव पहिला.! शेवट चे वर्ष असल्याने आता रिकाम्या हाताने घरी जावे लागणार असेच वाटत होते ! ३ वर्षाची आराधना व्यर्थ गेली ! आणि नकळत डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या !

स्वप्न !

उद्विग्न अश्या मनस्थितीत मी बसलो होतो .. ! मला स्पष्ट दिसत होते .. कि ३ वर्षात आपण क्रिकेट मध्ये काहीच करू शकलो नाही ! आता आयुष्यभर आपल्याला हेच कटू सत्य घेऊन चालावेच लागणार ! तेव्हा अचानक आम्ही बसत असलेल्या जागेवर ( so called pavalian!) काही मुलीना मी क्रिकेट खेळताना मी बघीतले! नीट पहिले तेव्हा कळले कि त्या आमच्याच वर्गातल्या मुली होत्या ! आणि हे देखील कळले कि २ तासांनी आमच्या मुलींच्या संघाचा क्रिकेट सामना आहे ! आशेचे किरण माझ्या डोळ्यात चमकू लागले होते !

जिंकायची आशा !

वास्तविक मुलींच्या क्रिकेट संघाची हलत मुलांच्या संघ पेक्षा खराब ( म्हणजे अगदीच खराब) होती ! कारण धड संघ जागेवर नव्हता.. गेल्या २ वर्षापासून पहिल्या सामन्याला हरायची परंपरा आम्ही कायम ठेवली होती ! 🙂

आता सगळ्या संघाला बोलावण्यास मी एका मुलीला सांगितले.. ! कोणास ठाऊक कसे पण ५-१० मिनटात सगळा संघ हजर झाला ! आणि मग मी त्यांना शेवटच्या वर्षाचे महत्व सांगितले.. की हे शेवटचे वर्ष आहे ..! आपल्याला चांगल्यात चांगल्या आठवणी घेऊन जायचे आहे ! त्यांना मी मला साथ देण्याची विनंती केली व त्यांना अंतिम फेरीत नेण्याचे स्वप्न दाखवले !

नियोजन !

सरावाला सुरवात झाली होती !माझ्याकडे खूप कमी वेळ होता ! देवाने मला अजून एक संधी दिली होती..त्याचा पुरेपूर फायदा कसा उचलू हाच विचार मी करत होतो ! आणि असे करत करत मी माझी मैत्रीण ” करिष्मा” हिला संघाची जवाबदारी दिली! करिष्मा एक उत्तम खेळाडू होती.. सर्वात महत्वाचे म्हणजे करिष्मा मधेय अतिशय उत्तम नेतृत्व गुण आहेत जे मी हेरले होते ! आणि तिच्यात संघाला बांधून ठेवण्याची क्षमता होती ! अश्या प्रकारे प्रतेय्काला त्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे मी संघात क्रमवारी दिली ! आणि बघता बघता पहा सामना झाला 😀

आणि खरेच “करिष्मा” झाला !

पहिला सामना होता आमच्या पेक्षा लहान (इलेक्ट्रोनिक्स ) बरोबर ..ज्यांच्या बरोबर आम्ही पाठच्या वर्षी हरलो होतो ! आणि आम्ही नाणेफेक जिंकले .. मी सांगितल्या प्रमाणे करिश्माने प्रथम फलंदाजी चा निर्णय घेतला ! आणि काय सांगू काही तासांपूर्वी हर्लेल्यात जमा असलेल्या माझ्या संघाने दमदार सुरवात केली .. आमची सलामीची फलंदाज भावना ने तर तडक अर्धशतक ठोकले.. (मी सर्व आकडेवारी \ चुका \ दुरुस्त्या लिहून ठेवत होतो) भावनाने तडक ५४ धावा केल्या आणि करिष्मा देखील एका बाजूने किल्ला लढवत होती ! अश्या प्रकारे आम्ही ६ षटकात 72 धावांचे आव्हान समोरच्या संघाला दिले! मी मनोमन खुश होत होतो आणि प्राथना करत होतो ! आणि हळू हळू एक एक षटक जात होते.. आम्ही विजयाचं जवळ येत होतो.. आणि तो स्खन आला ! आम्ही हिंक्लो! होय आम्ही जिंकलो! २५ धावांनी ! प्रथमच विजय ! ३ वर्षातील पहिला विजय ! आणि आम्ही सार्वजन मी व आमच्या १५ मुली मैदानावर बेफाम नाचायला लागलो! जे मुलांनी ३ वर्षात नाही केले ते आम्ही करून दाखवले ! आणि अश्या प्रकारे श्री गणेशा आम्ही केला 😀

स्वप्नाजवळ वाटचाल !

दुसरा सामना उपांत्य फेरी साठी होता . हा सामना आमचं बरोबरी च्या ( कॉम्पुटर ) शाखे बरोबर होता ! हा सामना काही चुर्सीचा मुळीच झाला नाही ! आम्ही नाणेफेक हरलो.. आणि आम्ही प्रथम गोलंदाजी केली! आणि…आज अपेक्षा भंग झाला..! आमची गोलंदाजी आज अतिशय सुमार होत होती.. मी करिश्माला जास्तीत जास्त प्रयोग करण्यास सांगितले होते ..कारण आम्ह इपाहीला सामना मित्या फरकाने जिंकलो होतो..आमची गोलंदाजी अतिशय सुमार झाली तरी कोणास ठाऊक आमचं समोरच्या संघाला जास्त धावा काढता आल्या नाही जेमतेम ३९ धावांवर त्यांचा डाव आटोपला ! आणि या वेळेस मी सांगितल्या प्रमाणे आम्ही प्रयोग करून बघितले नेहा आणि करिश्माला पाठवले.. आणि नेहा चमकली.. तिने उत्तम खेळ केला.. आणि काही चांगले फटके मारून सामना एकहाती जिंकावला..! आणि आमचे उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले!

परिश्रम

कालच्या अनुभव वरून मी सर्वाना सकाळी लवकर बोलावले .. आणि सर्वाना खूप काही बारकावे समजावून सांगितले! त्यांच्या कडून खूप मेहनत करून घेतली.. अन्य टवाळ मुल जवळ येत आणि आमच्या या सरावाचं कार्यक्रमास बघून हसत ! मला त्यांची कीव येत असे! आमची सगळ्यात कमजोर बाजू गोलंदाजी आणि क्षेत्र रक्षण मी बर्या पैकी सुधारून घेतल्या होत्या ! आज उपांत्य सामना होता ! त्पुर्वी आम्ही एकत्र भोजन केले .. खरेच हसत खेळत तसेच आजच्या संन्या साठी प्राथना करत आम्ही त्या क्षणाची वाद बघत होतो !

उपांत्य सामना..!

नाणेफेक झाली.. आणि नशिबाने आम्ही नाणेफेक जिंकलो. पहिली फलंदाजी घेतली.. आजचा सामना ( इलेक्ट्रोनिक्स – वीडीओ इंजिनीरिंग ) बरोबर होता.. नानेफेकेचा कौल आमच्या बाजूने लावल्याबद्दल देवाचे आभार मानले! आणि सामना सुरु झाला ! आमची स्टार फलंदाज भावना चौकार सत्कार खेचत होती.. असे वाटत होते आज तिला रोखणे कठीण आहे ! करिष्मा चांगला खेळ करत होती! अन घात झाला करिष्मा धावबाद झाली! परतू तिची जागा लगेच नेहा ने घेतली आणि बघता बघता भावना चे अर्धशतक पुन झाले.. आणि तिचे ६६ रुंस झाले आणि सामना संपला.! आता त्यांची फलंदाजी होती.. गोलंदाजी ठीक ठाक झाली! अखेच्या षटकात १८ धावा जिंकायला हव्या होत्या ! कोणीही धजेना अखेरचे षटक टाकायला..मी हळूच करिश्माला इशारा केला की तू टाक.

पहिला चेंडू – निर्धाव.. सर्व जण आनंदले.. आता ५ चेंडूत १८ धावा हव्या होत्या.. आणि दुसरा चेंडू तडक सीमारेषा ओलांडून गेला ! होय तो एक षटकार होता! मी मैदानातून ओरडून फीलडिंग बद्दल सांगत होतो संघाला ! तिसरा चेंडू करिश्माने थोडासा आखूड टाकला ( बहुदा मी तिला बोललेलो की गोलंदाजीत विविधता ठेव ) आणि काय चमत्कार ! तिने चक्क बळी घेतला होता ! आता पुढील फलंदाजावर याचा नक्की परिणाम होणार हे मला दिसत होते ! ३ चेंडू १२ धावा..आणि हा चेंडू देखील करिश्माने निर्धाव टाकला ! मला आजू आठवते हा चेंडू टाकल्या नंतर तिच्या व बाकीच्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य !

आता २ चेंडू १२ धावा.. करिष्मा पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू टाकू पाहत होती. तेव्हढ्यात फलंदाजाने जोरात चेंडू खेचला.. आणि तो ….षटकार गेला..! काही वेळा पूर्वी स्थिर असलेले आम्ही आता पुन्हा धाकधूक सुरु होती! काय टाकू कसा टाकू हा विचार करिष्मा करत होती ! मी तिला तिथून बोललो..आरामात.. नीट टाक..घाबरू नकोस..आता १ चेंडूत ६ धाव हव्या होत्या आणि करिश्माने चेंडू सोडला ! आता काय होणार! १ चेंडू आमच्या अंतिम फेरीचं स्वप्नाच्या आड येत होता.. आणि फलंदाजाने चेंडू जोरात तडकावला आणि तो सीमारेषेच्या जवळ फोच्ला.. मला वाटले की आता हा षटकार जाणार किवा कॅच तरी पकडणार.. परुंतु सीमा रेशेवार्च्च्या मुलीने कॅच पकडला नाही ! परंतु षटकार सुद्धा जाऊ दिला नाही तिने जोरात चेंडू करिष्मा कडे फेकला.. आणि आम्ही चक्क ३ धावांनी सामना जिंकलो!

माझे व माझ्या संघाचे अंतिम फेरीत पोचण्याचे स्वप्न पूर्ण झाले ! आमचा आनंद गगनात मावेनासच झाला होता ..! काही काळ त्या आनंदात सामावून मी सर्वकाही विसरून गेलो होतो ..

ट्राफिक सिग्नल

     बरेच दिवस झाले काही लिहिले गेले नाही ब्लोग वर. सारखे काम , काम आणि फक्त कामच थोडा फार वेळ उरला असेल तर तो वाचन करण्यात  आणि समाचार मध्ये अन्ना हजारे यांना पाहण्यात जातो. आज शाळा चार तास लवकर सुटली, तर बराच वेळ मिळाला इथे लिहिण्यासाठी. वाटले थोडे फार लिहावे येथे. हल्ली सुरत मध्ये वाहन चालकावर फारच कडक पद्धतीने शिक्षा केली जात आहे. हेल्मेट नसेल तर दंड, फारच गतीने वाहन चालवत असेल तर, रोंग साईट वर पार्किंग केली असेल तर दंड, येथे तुम्ही म्हणाल कि यात काय नवे ? हे तर प्रत्येक मेट्रो सिटी मध्ये आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच कि आता पर्यंत वाहन चालकावर सक्तीने नियम नव्हते लावले गेले. आता तर तुम्ही जरी दोन मिनिटा साठी वाहन रोंग साईट वर लावली म्हणजे झाले ….समजून घ्यायचे कि खिश्यातून एक महात्मा गांधी ची नोट गेली. सध्या ट्राफिक शाखेतील सर्व पोलिसांना एक फ़िक्ष टार्गेट देण्यात आला आहे कि अमुक दंडाची रक्कम जमा व्हायलाच हवी, नाही तर बदली किवा इतर कार्यवाही साठी तयार असावे. मग गम्मत अशी झाली आहे कि जे ट्राफिक नियंत्रक आहेत ते सकाळी १० ची ड्युटी असतांनाही सकाळी ६.३०  ला  किवा ७ वाजेला त्यांच्या गणवेशात सज्ज होवून रोडवर दिसायला लागतात. आणि मग तेच वसुलीचे रामायण चालू होते. चांगलेच कलेक्शन करून घेतात ते. पण त्यात मात्र ओटो रिक्षा चालकांना चांगलाच त्रास होतो. पहाटे पहाटे गच्च रिक्षा भरून ते स्टेशन कडे निघालेले असतात.साहजिकच पणे  जास्त प्रवासी असल्या कारणाने ते  रोडवर उभे असलेल्या पोलिसाची नजर चुकवून वाट  काढण्याचा प्रयत्न करतात. नजर चुकवून निघून गेले तर चालकांचे गुड लक नाही तर बेड लकच समजावे .कधी कधी पाठलाग पण  करतात. अमुक वेळेस तर तुमच्या कडे सर्व काही असतांना पण काही न काही कारण काढून पैसे वसूल करतीलच. त्या पोलीस अधिकार्यांना त्यांचे वरील अधिकारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्रास देतात तर ते त्रस्त पोलीस वाहन चालकांना एक प्रकारचा त्रास देतात. पुष्कळ वेळा या डोकेदुखी मूळे मला देखील शाळेत पोहचायला उशीर होतो त्यामुळे कधी कधी प्रिन्सिपल ची कट कट ऐकावी लागते.आज देखील ऑटो रिक्षा चालकाला एका पोलिसाने अडविल्याने निव्वड अर्धा ते पौन तास घरी येण्यास उशीर झाला.मला त्या दोघांवर फार राग आला होता, पण काय करणार रोज असाच नित्यक्रम चालणार असल्यास ? इथे ऑटो रिक्षा चालक त्या वाहने नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला “मामा” म्हणून संबोधित करतात. पुढे चालक जवळ जर एखादा प्रवासी बसलेला असेल तर चालक त्याला थोड्या वेळा साठी उतरून देतील आणि म्हणतील “आगे मामा खडा है , थोडा पैदल चल के उधार के  साईट पे निकल , मै मामा को झांसा देके आता हु.”  म्हणजे असेच काही तरी म्हणतील कि जे एकल्या वर हसू येणार. ट्राफिक स्पोट वर कधी कधी फार पाहण्यालायक  दृश्य निर्माण होते. इकडे सारखी वाहनाची गर्दी असते. होर्न वर होर्न वाजून चालक नुसते गोंगाट करत असतात आणि दुसर्या बाजूला रोडच्या एखाद्या कडेला किवा केबिन मध्ये चालक कडून दंडाची रक्कमेच्या नावाने पैसे मोजले जात असतात. अमुक वेळेस गाई म्हशीची रोडवर गर्दी झाल्याने ट्राफिक समस्या निर्माण होते, ती समस्या सोडविण्या साठी पोलिसांना त्यांचा मेन स्पोट सोडून गाई म्हशीच्या मागे हाकलण्यासाठी काठी घेवून पडावे लागते. आणि एकी कडे वाहन चालकांची चांगलीच आरडा ओरड सुरु होते. तेव्हा त्या पोलिसांवर हसू येते. आठवड्यातून दोन तीन दा तर या प्रकारचे दृश्य हमखास पहावयास मिळतात. काही लोक नुसती गम्मत पहावयास मिळेल म्हणून मेन रोडवर जावून विड्या ओढत त्या पोलिसावर आणि येणाऱ्या जाणार्या चालकावर दृष्टी फेकत असतात. पण मात्र अमुक वेळेस ते देखील सहन करतात. जास्तच जर गर्दी झाली तर मात्र बिचारे फटके खात असताना आढळून येतात.

कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन कडे लक्ष ठेवल्यास कमीत कमी ६ लाख तरी कुठेही जात नाहीत. कसे?

समजा कौन बनेगा करोडपती मध्ये पुढील प्रश्न विचारला

शम्मी कपूर यांचे मूळ नाव काय?
अ.सिकंदर        ब.शमशेर        क.शामराज        ड.समरराज

तर उत्तर दिल्यानंतर बऱ्याचदा ते बरोबर आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी अमिताभ बच्चनचीच मदत होते.

समजा स्पर्धकाने उत्तर दिलं   ब.शमशेर तर अमिताभ पटकन विचारेल आप

वडापाव

       सध्या मस्त पाऊस चालू आहे,गरमागरम भजी खायची इच्छा होतेय,मस्त कॉफी पीत खिडकीत बसून पाऊस बघावासा वाटतोय! पण… ऑफिस! जाऊ दे!

       अशा वातावरणात मस्त गरमगरम वडापाव मिळाले तर काय मजा येईल! आहाहा…

आमच्या गावी एक वडापाववाला आहे, घाशीलाल त्याचं नाव! घाशीलालचा वडापाव आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. चार भाऊ मिळून ते दुकान चालवतात. प्रत्येक भाऊ महिन्याचा एक एक आठवडा दुकान चालवतो. त्या आठवड्याचा खर्चही त्याचा आणि येणारं सर्व उत्पन्नही त्याचंच! असे महिन्याचे चारही आठवडे त्यांनी वाटून घेतलेत. मस्त एक आठवडा बिझनेस करायचा आणि तीन आठवडे आराम, तरीही प्रत्येक भावाची गणना गावातल्या श्रीमंतांमधे होते, इतकं ते एका आठवड्यात कमवतात. त्या दुकानात कधीही जा, वडापाव घ्यायला रांग असते. आपला नंबर यायला किमान पंधरा मिनिट तरी लागतात इतकी गर्दी असते. घाशीलालच्या वडापावचं हेच वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडचा वडा म्हणजे काही साधासुधा नसतो, तर आपण जनरली जेवढया साईजचा वडा बघतो, त्याच्या दुप्पट तरी त्याची साईज असते. आणि एकदम तिखट! दिवसाला दोनेक हजार वड्यांची तरी विक्री होतेच होते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी हा आकडा अजून वाढतो.

      आम्ही शाळेत असतांना सकाळी सात वाजता टेक्निकल हायस्कूलला जायचो तेव्हा त्याच्या दुकानासमोरुन जावं लागायचं. तेव्हा त्याच्याकडच्या लोकांची वड्याचं मिश्रण बनवण्याची लगबग चालू असायची. एका मोठ्या काहीलीत बटाटे उकळत असायचे. दोन जण खाली बसून खलबत्यात मिरची आणि आलं कांडत बसलेले असायचे. त्यांच्या बाजूला मिरची आणि आल्याचं पोतं पडलेलं असायचं. एक जण पोतंभर कांदे चिरत बसलेला असायचा. शंभर किलोच्यावर तरी वड्याचं मिश्रण सकाळी आठ वाजेपर्यंत तयार असायचं. त्यानंतर मोठ्या चुलाणावर मोठ्ठी कढई चढवून आचारी वडे बनवायला बसायचे. तोपर्यंत तीस-चाळीस तरी गि-हाईकं दुकानात आलेलीच असायची. एका वेळेस ते साधारण शंभरेक वडे तळत असत. वडे काढले रे काढले, की दोन वेटर्स ते गरमागरम वडे लगेच बांधून गि-हाईकांच्या ऑर्डर्स पु-या करत असत.

       ह्या वड्यांचा सगळ्यात मोठा ग्राहकवर्ग म्हणजे हातावर पोट असलेला कामगारवर्ग! बांधकामावर काम करणारे मजूर, विटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, बाहेरगावच्या ट्रकचे ड्रायव्हर्स हे नेहेमी हे वडे नेतात. त्या वड्याची साईजच इतकी मोठी असते की एक-दोन वड्यात एका वेळेचं पोट भरतं. ट्रक ड्रायव्हर्स आले की त्यांची ही वडे खाण्याची कॅपेसिटी बघावी, जिथे एक वडा खाता आपल्याला थोडं होतं तिथे हे ड्रायव्हर्स बिनधास्त आठ आठ वडे खातात. त्या वड्यांबरोबर मस्तपैकी लसनाची चटणीही असते, पण मुळात वडाच इतका तिखट असतो की सहसा चटणी खायच्या फंदात कुणी पडत नाही.

      आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवासी वर्गांना जायचो तेव्हा दुस-या दिवशी निघतांना आमच्या सिनिअर्सकडून सगळ्यांना नाष्टा असायचा. आणि नाष्टा ठरलेला असायचा, तो म्हणजे घाशीलालचा वडापाव! इतका भरपेट नाष्टा झाल्यावर जेवणाचे बारा वाजणार हे ठरलेलंच असायचं. कुणाच्या घराचं बांधकाम चालू असेल तर तिथले मजूर मालकाला म्हणायचे, “साहेब जरा वडे आणि जिलबीचं बघा ना!”. त्यांना घाशीलालचे वडे आणि थोडीशी जिलबी आणून दिली की ते पण खूष आणि आपणही!

      खरं तर ह्या वड्यांनी खूप लोकांचा एका वेळचा पोटाचा प्रश्न सोडवलाय! हमाल असू द्या, हातगाडीवाले असू द्या, मजूर असू द्या, क्लासच्या घाण्याला जुंपलेले विद्यार्थी असू द्या, किंवा कुणीही सामान्य मध्यमवर्गीय असू द्या, जिभेला चव आणि वेळोवेळी पोटाला आधार ह्या वड्यांनीच दिलाय, फक्त माझ्या गावातच नाही, सगळीकडेच! मुंबईकरांचा ’वडा’ हा एकदम जिव्हाळ्याच्या विषय आहे. कुणी त्याचा ’शिववडा’ करुदेत, नाहीतर आणखी काही, वडा आणि सामान्य माणूस एकमेकांना कधीच सोडणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

(चित्रे आंतरजालावरुन साभार)

" मी अण्णा हजारे आहे"

आज अण्णा च्या लढाईचा एक टप्पा पार पडला. सरकारने मजबुरीने का होईना संसदे मध्ये जन लोकपाल विधेयकाला पाठींबा दर्शविला.किवा आंदोलना पुढे सरकार दोन पाऊले मागे आली.आता आपली म्हणजे भारतीयांची एक जवाबदारी वाढली जो पर्यंत विध्येयक संसदेत पारित होऊन कायदा तयार होत नाही तो पर्यंत अण्णा जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा त्यांच्या पाठीशी असेच एक होऊन उभे राहायचं. 
आणि अजून एक काम करावयाचे अण्णाची टोपी म्हणजे ” मी अण्णा हजारे आहे” लिहलेली हि पांढरी टोपी घालून आपले कोणतेही शासकीय काम आसो ते होत नसेल किंवा आपल्याला ते करण्या साठी लाच मागितली जात असेल सरकारी बाबू ते करण्यास टाळाटाळ करीत असेल हि टोपी घालून जाऊ.समोरचा सरकारी कर्मचारी वचकून जाऊन ते काम लवकर करेल.आश्या रीतीने आपला त्याचावर वाचक निर्माण होईल.अण्णांच्या भ्रष्टाचार संपविण्याच्या कार्यात आपला सहभाग असेल. आणि अण्णांनी लावली ज्योत आशीच तेवत राहील. 

दुसऱ्या स्वतंत्र लढ्याची सुरवात

गेल्या काही महिन्यांपासून उघडकीस आलेल्या एकामागून एक घोटाळ्यातून शासन व्यवस्थेचा खरा चेहरा जनते समोर आला आहे. आपण ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून देतो ते आपले लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्या ऎवजी स्वतः ची तुंबडी भरण्यात मश्गुल झालेले आहेत.कारण निवडणूक असा धंदा आहे, कि त्यामध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि मग पाच वर्ष्यात किती तरी पटीने वसूल करता येतो.
आज संसदेत अर्धेअधिक प्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर काहीं वर न्यायालयात खटले चालू आहेत.खरे तर असे लोक आपण का निवडून देतो हा मुद्दा विचार करण्या सारखा आहे  आपल्या देश्यातील जनता ही रोजच्या कामात इतकी व्यस्त झालेली आहे. कि तिला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असून ती जाणीव पूर्वक त्या कडे दुर्लक्ष करीत आहे. पण आण्णा हजारेच्या सध्या सुरु आंदोलनावरून असे दिसून येते कि सामान्य जनता जागी झाली आहे देश्यात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त होवून ती रस्त्यावर उतरली आहे.कोणतेही आंदोलन हे घरात बसून होत नसते.अण्णांच्या या आंदोलनामध्ये सर्वात जास्त सहभाग आहे तो तरुणांचा.कारण कोणतेही आंदोलन तरुणांच्या सहकार्याने यशस्वी होत.
गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेल्या घोटाळया मुले सर्व सामन्यात असणारा असंतोष व सरकारचा निर्णय घेण्यासाठी वेळ काढू पणा अश्यातच अण्णांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांच्या उद्रेकाला वाट मिळाली. आता नाही तर केव्हा नाही. अश्या विचाराने सामान्य जनता रस्त्यावर आली. हि तर सुरुवात आहे. स्वतंत्र आंदोलनाची सुरवात हि मंगल पांडे यांच्या उठवाने झाली होती तेव्हाची जनता पण इंग्रजांच्या जुलमाला कंटाळली होती. त्याला वाट मिळाली ती मंगल पांड्ये यांच्या उठावामुळे. आजही तशीच परिस्थिती निर्माण झाली.सरकारच्या नाकर्ते पणामुळे व भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारचा वेळकाढूपणा या मुळे सर्व जनतेत   रोष निर्माण झाला. म्हणून सर्वांनी आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा देण्या साठी एकत्र आले. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी शासन व्यवस्था नीट चालावी या साठी कायदे करावे.या कायद्याचा वापर सर्वसामान्याच्या भल्या साठी होईल अशी व्यवस्था निर्माण करावी. हा लोकशाहीचा उद्देश आहे. परन्तु सध्या उलटेच सुरु आहे. या सर्वांवर अंकुश ठेवण्य साठी अण्णांचे जन्लोक्पाल विध्येयक संसदेत पारित होणे गरजेचे आहे.

देशासाठी १ तास आहे का ?देशासाठी १ तास आहे का ?आज देशभर आपण आण्णा हजारे यांना दिलेला पाठींबा पाहताच आहोत ! आता आपल्याला सुद्धा या लढ्यात भाग घायची संधी चालून आली आहे ! मुंबईतल्या मुंबईत राहूनसुद्धा आपण दिल्लीत असलेल्या आण्णा हजारे यांनापाठींबा देऊ शकतो !

कार्यक्रमाची माहिती

आज सायंकाळी ते च्या दरम्यान पवाई येथे मोर्चा काढण्यात येत आहे ! अहिंसक अश्या या मोर्च्यात आपण लक्षणीय संखेय्त सहभागी व्हावे ! याब्बद्ल ची माहित पुढील प्रमणे आपणास उपलब्ध करून देत आहोत..अन्सा इंडसट्री येथे उद्योगपती असलेले श्री जगजीत सिंग काहलोन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .. त्यासाठी या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती साठी कृपया९३२३००४५६५या क्रमाकावर संपर्क साधावा..तसेच कार्यक्रमाची जागा तसेच इतर माहिती वरील छायाचित्रात दिलेली आहे !

जगजीत सिंग काहलोन हे भ्रष्टाचार विरोधी लढ्यात अग्रेसर आहेत.. तसेच त्यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत .. नुकतेच त्यांही पालिकेत ४ अधिकार्यांना लाच घेताना पकडून दिले होते..!

तर आपल्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभावा हीच विनंती !

आपण रविवारी . सुट्टीच्या दिवशी आपल्या देशाला कमीत कमी १ तास तरी देऊ शकतो!

suganha

bakulafulaaMnaa ajoon पाहतो
maLalele तुझिया केसात
raatrlaa स्वप्नी पाहतो
मावळलेल्या diwasaas

चर्चासत्राचे निमंत्रण!

नमस्कार,
सर्वप्रथम आपणांस व आपल्या समस्त परिवारास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शु्भेच्छा!!
आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठी कॉर्नरने एका चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राचा विषय आहे:

“स्वातंत्र्य लढा आणि आज”

या विषयाबद्दल थोडक्यात:
१९४७ हे साल म्हणजे भारतिय इतिहासातले सर्वात महत्वाचे साल. असंख्य
देशबांधवांचे बलिदान, धाडस आणि कष्ट यामुळे भारत इंग्रजांच्या जुलमी
राजवटीपासून स्वतंत्र झाला. आज ६४ वर्षे उलटून गेली पण खरच आज आपण स्वतंत्र
आहोत?? भ्रष्टाचार, हिंसा, इत्यादी कित्येक रोगांनी ग्रासलेला हा देश खरच
स्वतंत्र आहे?

तुम्हाला काय वाटते हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. लगेचच आपले विचार येथे
मांडा:

http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=44&t=594

या विषयाला प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वप्रथम “सदस्य प्रवेश” घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे सर्वप्रथम आपण आपले Username आणि password वापरून मराठी कॉर्नरवर
Login व्हावे आणि मग वर दिलेल्या धाग्यावर जाऊन आपले मत मांडावे.

आपल्यासोबत इतरही सदस्य आपले विचार मांडतील आणि हळू हळू एकमेकांचे विचार वाचून
त्यांना उत्तर देऊन हे चर्चासत्र सफल होईल अशी आशा आम्ही करतो.

पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शु्भेच्छा आणि चर्चासत्राचे
आग्रहाचे निमंत्रण!
कळावे,

प्रेम शब्दाचा शोर्ट कट

     आज माहिती तंत्र ज्ञानाच्या प्रगतीमुळे जग फार वेगाने पुढे धावत आहे. प्रत्येक गोष्टी साठी कोणता न कोणता संक्षिप्त मार्ग आहे. कि ज्याच्या उपयोगाने मोठी गोष्ट अगदी थोडक्यात सांगून उरकवता येते. कारण वेळ नाही लोकाकडे. जो तो ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे, आणि कामाची ती गोष्ट पण त्याला कोणता न कोणता शोर्ट कट वापरून लवकर पूर्ण करून घ्यावयाची आहे. 


     त्यात प्रेम देखील हे सुटलेले नाही. आजच्या तरुण पेढीचे प्रेम थोडे टेक्निकल म्हणावे लागेल. कारण पूर्वी जर कोणी आपले प्रेम एखाद्या व्यक्ती साठी व्यक्त करत असेल तर, त्या वर मोठी, एखादी मनाला आणि हृदयाला भेदणारी कवितेचे निर्मिती होत असे. पण आज तसे आढडून येत नाही. कारण आज माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वत्र शोर्ट कट चे भूत माजले आहे. जर प्रियकराला फक्त “आय लव यु ” सारखे शब्द जरी सांगायचे असतील तरी ते तो फक्त “१ ४ ३ ” असे तीन संख्यांचा उपयोग करून दर्शवित असतो.  मुश्किलीने एखादी व्यक्ती कागदावर मनाचे व हृदयातील मोती प्रियकर साठी अंकित करत असेल. आज ” १ ४ ३” चा वापर “माझे तुझ्या वर प्रेम आहे.” या गोड शब्द ऐवजी शोर्ट कट (पर्याय) म्हणून केला जातो. जे वात्सल्य , प्रेम आणि समर्पणाची भावना  “माझे तुझ्या वर प्रेम आहे.” किवा “मी तुला प्रेम करतो ” या शब्दात दिसते ती त्या तीन अंकामध्ये दिसून येत नाही. 

     या “१ ४ ३”  मुळे  प्रेम विषयी तरुणे  व तरुणीच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याचे दिसून येते. जसे आपण रोज नवीन आहार घेत असतो , किवा शॉपिंग मोल मध्ये जावून नव्या वस्तू खरेदी करतो तशी आजची पिढी प्रेम करत असते. त्यांचा ग्रूप पण मोठा असतो. फेसबुक चार असतील, ओर्कुट वर दोन असतील, इतर डेटिंग साईट वर आणखी दोन तीन परिचयाची व्यक्ती असतील….मग काय ? ? ? तेच “१ ४ ३ ” ज्याला आधुनिक जगाने “डेटिंग” सारखा शब्द देखील दिला आहे. डेटिंग म्हणजे काय ?तेच, वस्तू आवडली तर घ्या नाही तर पैसे परत. डेटिंग म्हणजे “प्रेमाचे शोर्ट कट” जर म्हटले तरी त्याला अतिशयोक्ती नाही. एक सार्वत्रिक सत्य आहे कि मन हे भोवऱ्या सारखे असते. ते कधी एका जागेवर नसते. या डेटिंग सारख्या प्रथे मुळे त्याला अधिकच चालना मिळाली आहे.
     अहो ! हल्ली तर एस एम एस सारख्या सुविधेचा वापर करून सुद्धा लोक प्रेमाचा पंचनामा करायला लागले आहेत. फक्त एका वाक्यात विचारले जाते. “are you interested in me ?”  किवा  “Do you like me ?” . बस समोरून लगेच उत्तर मिळते. “No, sorry”किवा “Yeah !! My pleasure” फटक्यात प्रेमाची देवाण घेवाण होते. मग कसली कविता नि कसल्या चारोळ्या ? सर्व काही एकदम फटक्यात…आहे ना कमाल ?!! 
     तो दिवस दूर नाही जेव्हा लोक फोन वर किवा इंटरनेट च्या माध्येमाने लग्न पण करतील आणि घटस्फोट पण होतील. प्रेम विषयीच्या गजल , चारोळ्या , शायरी. ग्रंथ हे फक्त साहित्यातच शिल्लक राहील. सर्वत्र एकच सूत्र दिसेल. “वापरा शोट कट आणि मिळवा परिणाम फटाफट”

आरक्षण २०११ हिंदी चित्रपट बघा ओनलाईन

आरक्षण हा एक असा विषय आहे ज्याचे उत्तर प्रत्येक जन आपल्या सोयीनुसार देतो पण आरक्षण हि या काळाची गरज का आहे हे समजून घेतांना प्रामाणिक पाने विचार करायला हवा कि ज्या लोकांसाठी आता कुठे शिक्षणाची दारे खुली झाली आहेत..आता कुठे हि गावकुसा बाहेत राहणारी मंडळी गावाच्या आडोशाला आली आहेत..अडाणी बापाची आणि ज्यांचे पूर्वज आडणी आहेत त्यांची हि आता त्यांची हि पिढी शिकायला शाळेची पाहिरी चढते आहे..त्यांत हि आपण त्यांना मदतीचा हात पुढे करायला हवा…..जसा या चित्रपटात dr आनंद ने दिला आहे हजारो वर्षा पासून उपेशित असलेल्याना..चला तर एक नवा भारत घडवूया.