महाभारताबद्दल काही गैरसमजुती – भाग १

काही शब्दप्रयोग आपल्या कानावर बालपणापासून पडत आलेले आहेत आणि त्यामुळे ते खरेच आहेत असे आपण गृहीत धरतो. पण ते गैरसमजुतीवर आधारलेले असतात.
१. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ –
जयद्रथ वधाचे दिवशी कृष्णाने काहीतरी उपायाने काही काल सूर्य दिसणार नाहीं असें केले. मग जयद्रथ ‘आपण आतां वाचलो’ असें समजून गैरसावध झाला. कौरव वीरही गैरसावध झाले. जयद्रथ अर्जुनासमोर आल्यावर कृष्णाने सूर्यासमोरचे आच्छादन अचानक काढून घेतले व अर्जुनाला म्हटले ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ मग लगेच अर्जुनाने जयद्रथाला बाण सोडून मारले. अशी कथा बालपणापासून हरदास पुराणिक आपल्याला सांगत आले. आणि ती आपण खरी मानत आलो!
महाभारतात असें काही नाहीं. प्रत्यक्षात काय घडले याचे विस्तृत विवेचन मी पूर्वी केलेच आहे. अर्जुनाने अखेरचा बाण मारून जयद्रथाचा वध केला तोपर्यंत तो स्वत:च्या रथावर बसून जमेल तसा अर्जुनाचा प्रतिकार करत होता कृष्णाने अर्जुनाला सावध केले कीं ‘सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा वेळ फुकट घालवू नकोस.’ मग अर्जुनाने तो अखेरचा बाण सोडला व जयद्रथाचा वध केला. त्यानंतरही काही काळ युद्ध चालू राहिले व मग सूर्यास्त झाला. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ असें शब्द महाभारतात कृष्णाच्या तोंडी मुळीच आलेले नाहीत. आपले गैरसमज मात्र पक्के असतात त्यामुळे यां शब्दांना साहित्यात व व्यवहारातही अनेकदां स्थान मिळते.

How Add Numbered Page Navigation Widget for Blogger

ज्या प्रमाणे एखाद्या वेबसाईट च्या पायथ्याशी पेज नंबर असतात त्या मुळे आपोआपच आपल्या ब्लॉगच्या पेज Visit वाढतात. आणि आपला ब्लॉग हि एखाद्या वेबसाईट प्रमाणे दिसतो. ते छान से Widget आपल्या ब्लॉग मध्ये टाकण्या साठी खाली दाखवल्या प्रमाणे कृती करा .

               खाली दिलेला Widget code Copy करा.
<!–Super Numbered Page Navigation Widget By blogger9/ @ http://www.blogger9.com/ –>

<style type=”text/css”>
#blog-pager{padding:5px 0 !important;}
.showpageArea {font-weight: bold;margin:5px;}/* www.blogger9.com */
.showpageArea a {text-decoration:underline;color: #fff;}/* www.blogger9.com */
.showpageNum a, .showpage a {color: #fff;text-decoration:none;border:1px solid #999;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px; margin:0 3px;padding:3px 5px; background: #3b679e; background: -moz-linear-gradient(top, #3b679e 0%, #2b88d9 50%, #207cca 51%, #7db9e8 100%); background: -webkit-gradient(linear, left top, left bottom, color-stop(0%,#3b679e), color-stop(50%,#2b88d9), color-stop(51%,#207cca),  color-stop(100%,#7db9e8)); filter: progid:DXImageTransform.Microsoft.gradient( startColorstr=’#3b679e’, endColorstr=’#7db9e8′,GradientType=0 ); }/* www.blogger9.com */
.showpageNum a:hover, .showpage a:hover {border: 1px solid #ccc; background: #aebcbf; background: -moz-linear-gradient(top, #aebcbf 0%, #6e7774 50%, #0a0e0a 51%, #0a0809 100%); background: -webkit-gradient(linear, left top, left bottom, color-stop(0%,#aebcbf), color-stop(50%,#6e7774), color-stop(51%,#0a0e0a), color-stop(100%,#0a0809)); filter: progid:DXImageTransform.Microsoft.gradient( startColorstr=’#aebcbf’, endColorstr=’#0a0809′,GradientType=0 ); }/* www.blogger9.com */
.showpagePoint {color: #aaaaaa;text-decoration:none;border:1px solid #999;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px; margin:0 3px;padding:3px 5px; background: #e2e2e2; background: -moz-linear-gradient(top, #e2e2e2 0%, #dbdbdb 50%, #d1d1d1 51%, #fefefe 100%); background: -webkit-gradient(linear, left top, left bottom, color-stop(0%,#e2e2e2), color-stop(50%,#dbdbdb), color-stop(51%,#d1d1d1), color-stop(100%,#fefefe)); filter: progid:DXImageTransform.Microsoft.gradient( startColorstr=’#e2e2e2′, endColorstr=’#fefefe’,GradientType=0 ); }/* www.blogger9.com */
.showpageOf {text-decoration:none;padding:3px;margin: 0 3px 0 0;}/* www.blogger9.com */
.showpageNum a:link,.showpage a:link {text-decoration:none;color:#fff;}/* www.blogger9.com */
</style>
<script type=’text/javascript’>
var home_page=”/”;
var urlactivepage=location.href;
var postperpage=3;
var numshowpage=7;
var upPageWord =’Previous’;
var downPageWord =’Next’;
</script>
<script src=’http://bloggertrickandtoolz.googlecode.com/files/www.bloggertricksandtoolz.com-bloggerpagenavi.js’ type=’text/javascript’></script>
<–http://www.blogger9.com/ –>

         खाली दाखवल्या प्रमाणे copy केलेला Widget Code post च्या खाली Paste करा.
  var postperpage=3 हे आपले postperpage दाखवते जसे येथे 3 आहे. तर एका पेज वर हे आपले ३ post दाखवेल आणि var numshowpage=7; बटण वर असलेले आकडे दाखवते जसे येथे 7 आहे म्हणून हे 7 पर्यंत आकडे दाखवेल जसे वरती देलेल्या चित्रात दाखवले आहे.

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

आजवर ज्या महान व्यक्तींनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांचा वारसा पुढे न्यायचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आज आपण अशाच एका महान समाजसुधारकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीने  समाजाच्या आणि गावाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपल पूर्ण आयुष्य खर्च केलं त्या व्यक्तीबद्दल लिहायला मिळणे हे मी माझ भाग्य समजतो. निर्भय समाजसुधारक, भाषाशास्त्रज्ञ आणि उदारमतवादी विचारवंत कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचा जन्म २४ डिसेंबर १८५० या दिवशी अहमदनगर येथे लष्करी छावणीत झाला. त्यांचे वडील कै. धोंडजी सखाराम खानोलकर हे ब्रिटीश लष्करात नोकरीस होते. धोंडजी खानोलकर हे बुद्धीमान, नम्र आणि विद्याव्यासंगी होते. त्यांच्या या स्वभावगुणांमुळे ते लष्करात खूप लोकप्रिय होते. त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी अशी चार अपत्ये होती. डॉ. रामजी हे जेष्ठ चिरंजीव. डॉ. रामजी अत्यंत हुशार असल्यामुळे वडीलांनी त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. डॉ. रामजी खानोलकर यांचा जीवनप्रवास बराच खडतर होता. कराची येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. रामजी सकाळी काम करायचे आणि रात्री एकाग्रतेने अभ्यास करायचे. त्यांनी स्वयंशिस्त कधीच मोडली नाही.

कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असल्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी ते मेडीकल स्कूलची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची नेमणूक लष्करामध्ये सब असिस्टंट सर्जन म्हणून झाली. त्यांनी लष्करासोबत अनेक देशांचा प्रवास केला. इराण, अफगाणिस्तान, एडन, चीन, अरबस्थान या देशांचा प्रवास त्यांनी केला. १८८६ साली त्यांची नेमणूक क्वेटा या शहरातील सरकारी लष्करी इस्पितळात झाली. १९०० च्या चीन मधील बॉक्सर युध्दात त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. १९०६ साली ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यावर लोकाग्रहास्तव त्यांनी क्वेटयातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. क्वेटा शहरात त्यांनी स्वत:चा खाजगी दवाखाना सुरू केला. क्वेटातील पंजाबी, बलुची, सिंधी, शीख जमातीमध्ये ते खूप लोकप्रिय होते. लोकांना रामजींबद्दल आदर आणि विश्वास होता. त्याकाळी दिवाण जमित राय आणि रामजी खानोलकर यांचीGrand Old Men of Quettaअशी ओळख होती. एक कोकणी डॉक्टर बलूचीस्तानच्या क्वेटा शहरात निस्वार्थीपणे मानवसेवा करत होता याच अनेकांना आश्चर्य वाटायचं. त्यांच्या कार्याचा बलुची लोकांवर खूप प्रभाव होता.

रामजी चांगले डॉक्टर तर होतेच पण ते चांगले माणूस आणि नागरिक देखील होते. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू होता. अखिल मानवी समाजाबद्दल त्यांना प्रेम होते आणि त्यामुळेच ते आदरणीय होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. संकुचित दृष्टिकोन कधीच नव्हता. समाजाला सुधारायचे असेल तर शिक्षणाची गरज त्यांनी ओळखली आणि त्यामुळे त्यांनी ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसाराच पवित्र कार्य हाती घेतलं. समाजसुधारकांच्या नामावलीत रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचे नाव बरेच वरचे आहे. परमवीरचक्राची निर्मिती करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर लिहितात की, “He initiated a campaign against the Temple artist system custom. It was mainly thanks to him that a law was passed by the British India in this respect. He encouraged villagers by arranging for their tutions and crusading in favor of laws to better the community.”

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांनी १८९२ साली जोरदार समाजसुधारणा मोहीम हाती घेतली. जुन्या लोकांनी सुरू केलेली ही मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पुढे चालवली. सावंतवाडी संस्थानचे (सावंतवाडी, वेंगुर्ला,डिचोली,पेडणे,कुडाळ आणि मळेवाड) तत्कालीन पोलिटिकल एजंट कर्नल नट यांच्या सल्यानुसार त्यांनी प्रथम शिक्षणप्रसारावर भर दिला.  १९०३ साली मठ (पूर्वीचे सावंतवाडी संस्थान) ता. वेंगुर्ला येथे स्वखर्चाने शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. सर्वच समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या. अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी खानोलकर यांनी शिष्यवृत्ती दिल्या. रायसाहेब यांनी गावच्या मुलभूत गरजा म्हणजेच विहिरी, धर्मशाळा आणि शिक्षणाची सोय ह्यावर लक्ष केंद्रीत केलं. आजही खानोलकरांनी स्थापन केलेले प्राथमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय दिमाखात उभे आहे आणि शिक्षणप्रसाराचे काम करत आहे. रायसाहेब रामजी खानोलकर यांचे समाजकार्य केवळ स्वत:च्या गावापुरते मर्यादित नव्हते. क्वेटातही त्यांनी बरेच समाजकार्य केले. क्वेटा येथे त्यांनी स्वखर्चाने बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे क्वेटामधील हिंदूपंचायत आणि स्वामी देशराज धर्मशाळा (प्रार्थना मंदीर) या संस्थांचे कित्येक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या समाजसेवेच्या प्रभावामुळे क्वेटा येथील रस्त्याला “रामजी लेन” असे नाव दिले होते. आजही स्वतंत्र पाकिस्तानने हे नाव कायम ठेवले आहे. आजही क्वेटा मधील तो रस्ता रामजी लेन या नावानेच ओळखला जातो. पाकिस्तानमधील एका खाजगी कंपनीच्या वेबसाईटवर मिळालेला पत्ता त्याचाच पुरावा आहे.    

       
रायसाहेब रामजी खानोलकर हे संस्कृतचे प्रकांडपंडित होते. त्यांचा वेदांचा अभ्यास दांडगा होता. वेदांतील आदर्श जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत. परोपकारी वृती मानवी जीवनात फार महत्त्वाची आहे. परोपकार विरहीत जीवन जगणारा मनुष्य हा कोणत्याही धर्मात धिक्कार करण्यासारखाच असतो. परोपकार करणारी कोणतीही व्यक्ती पूजनीय असते. प्राणी मेल्यावर त्याची चामडी जर उपयोगात येत असेल तर तो प्राणीही धन्य आणि पूजनीय बनतो.

परोपकारशून्यस्य धिक् मनुष्यस्य जीवितम् । 
जीवन्तु पशवो येषां चर्माप्युपकरिष्यति॥ 

कालिदासाच्या साहित्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. रायसाहेब  रामजी खानोलकर अतिशय सात्विक होते. ते पूर्ण शाकाहारी होते. त्यांना कधीही तंबाखू किंवा दारू इत्यादी व्यसनांचा स्पर्शही झाला नाही. रायसाहेब दर दोन वर्षांनी आपल्या मठ येथिल घरी येत असत. त्यावेळी वाटेत कराचीत ते आपल्या मित्रपरीवाराची जरूर भेट घेत असत. कराची मुक्कामात डॉ. दत्ताराम खानोलकर यांच्या घरी ते सर्वांची भेट घेत असत. डॉ. विश्वनाथ पाटील आणि तुकाराम कांदळगावकर हे त्यांचे खास मित्र होते. मुंबईत आल्यावर आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांची भेट घेतल्याशिवाय ते राहत नसत. त्यांच्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता. आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर हे नाईक मराठा मंडळाचे संस्थापक होते. दोघेही एकाच समाजासाठी काम करत होते फक्त संस्था वेगळ्या होत्या. दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड आदर होता.      

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद त्यांचे परम मित्र होते. रायसाहेबांनी आपल्या एका मुलाची रवानगी वैदिक ब्रम्हचारी चे जीवन जगण्यासाठी स्वामींच्या हरिद्वार येथिल आश्रमात केली होती. रायसाहेब धार्मिक होते. त्याचबरोबर धर्मसुधारणेवर त्यांचा भर होता. काशी येथे विद्वान पंडीतांची ते वेळोवेळी भेट घेत आणि चर्चा करत. रायसाहेब डॉ. खानोलकर यांच्या संस्कृत प्रेमाबद्दल लिहिताना सावित्रीबाई खानोलकर यांनी म्हटले आहे की,  “He had the perfect pronunciation of a Pundit and seemed to relish every word. Do you know that there are more than 20 words in Sanskrit for Water? He would tell me in the way people speak of some wonder of magic and then proceed to enlighten me as to each word and its meaning. I listened bemused and entranced by the music of those words even though I understood nothing of them at that time. I gather, it is from him that I acquired the love of Sanskrit and the desire to learn this perfect and alas neglected language.” 

रायसाहेबांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, उर्दू, पुस्तू, पर्शियन इत्यादी भाषा अवगत होत्या. कालीदासाचे शाकुंतल तर त्यांना पूर्ण अवगत होते. तसेच पर्शियन कविता मुखोद्‌गत होत्या. रायसाहेब संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी काशी येथील पंडीतांच्या सहवासात काही महिने घालवत असत. त्यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. क्वेटा येथे त्यांचे स्वत:चे ग्रंथालय होते ज्यात जगातील दुर्मिळ ग्रंथांचा समावेश होता. १९३५ च्या दुर्दैवी भूकंपात हे ग्रंथालय जमीनदोस्त झाले. त्यांनी मुक्तवली कंठाभरणशाडंकर भाष्य हे संस्कृत ग्रंथ छापण्याचा कामी बरेच सहाय्य केले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी संस्कृत-धात्वर्थ-मंजुषा नामक ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथाला जर्मनीतून प्रचंड मागणी आली होती. त्यांनी काही काळ केसरी वृत्तपत्रासाठी लेखन केले. चीन मध्ये असताना चीनची संस्कृती तेथील चालीरीती या संबंधित लेखं “चीनची पत्रे “ या सदरात लिहिले.

डॉ. खानोलकर यांचा परिवार बराच मोठा होता. त्यांचे आठ पुत्र, एक कन्या, सुना, नातू नाती, नोकर चाकर मिळून ३०-३५ लोकांचे मोठे कुटुंब होते. “बाबा” ह्या टोपणनावाने ते कुटुंबात प्रसिद्ध होते. संपूर्ण कुटुंबावर त्यांच लक्ष असे. क्वेटा मध्ये त्यांचा मोठा वाडा होता तसेच मठ वेंगुर्ले येथे मूळ घर होते. वाड्याची आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांची पत्नी जानकी (ताई) खानोलकर यांच्यावर असे. डॉक्टरांनी सर्व कुटुंबियांना योग्य त्या सोयी पुरवल्या. त्यांच्या उच्चशिक्षणाची सोय केली. खानोलकरांच्या कुटुंबात शिक्षण हे सक्तीचेच होते. त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विष्णुपंत रामजी खानोलकर यांनी वडीलांच्या इस्पितळात सर्जन म्हणून काम पाहिले. त्यांचे दुसरे पुत्र कर्करोगतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. वसंतराव खानोलकर. मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर. नातू रावसाहेब मधुसूदन खानोलकर आणि डॉ. प्रकाश खानोलकर. सून सावित्री खानोलकर ज्यांनी परमवीर चक्राची निर्मिती केली. या सर्वांनी तसेच खानोलकरांच्या पुढच्या पिढीने रायासाहेबांची कीर्ती साऱ्या जगात पसरवली. रायसाहेबांचे बंधू कै. विठ्ठल खानोलकर यांनी आपल्या जेष्ठ बंधूने सुरू केलेले समाजकार्य तसेच चालू ठेवले. त्यांनीच मठ येथिल डॉ. खानोलकर हायस्कूल बांधून पूर्ण केल.                      
रायसाहेब डॉ. रामजी खानोलकर यांनी प्रामाणिकपणे जे समाजकार्य केले होते त्याची दखल तत्कालीन सरकारने घेतली. १९२८ साली त्यांना “रायसाहेब” हा खिताब देवून गौरविण्यात आले. १९३२ साली त्यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत संपतराव गायकवाड, बडोदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मित्रपरिवाराने श्री जगन्नाथ शंकरशेठ यांच्या दिवाणखान्यात त्यांचा मानपत्र देवून सत्कार केला.      

अशा या समाजसुधारकाचा आणि समाजनेत्याचा मृत्यू  ३१ मे १९३५ रोजी पहाटे ३:०२ मी. क्वेटा शहरात घडलेल्या भयानक भूकंपात झाला. त्यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू या भूकंपात झाला. क्वेटातील ६०००० लोकांचा मृत्यू या भूकंपात झाला होता. डॉ. खानोलकर विचारवंत, समाजसुधारक आणि बुद्धिवादी होते. त्यांनी आपल्या कार्याने स्वत:चा ठसा उमटवला. सामजिक बांधिलकी त्यांनी जपली होती. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या विकासासाठी खर्ची घातल. स्वत:चा आदर्श समाजासमोर ठेवला. कोकण आणि कोकणी लोक यांच्याबद्दल त्यांना फार आपुलकी होती. कोकणातील शिक्षणप्रसाराला त्यांनी हातभार लावला. त्यांचा मुत्यू दुर्दैवी होता पण त्यांच निस्वार्थी कार्य कायम आपल्या सर्वांच्या हृदयात राहील यात शंकाच नाही. त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण आणि त्यांच समाजकार्य पुढे चालू ठेवणे हे आता आपलं कर्तव्य आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की असे महापुरुष ज्या समाजात जन्मले त्या समाजाचा अभिमान बाळगा आणि सर्वच मानवी समाजाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी कार्यरत राहा. धन्यवाद.
जीवितान्मरणं श्रेष्ठ परोपकृतिवर्जितात् ।
मरणं जीवितं मन्ये यत्परोपकृतिक्षमम् ॥

1935 Balochistan earthquake

संदर्भ  –

  1. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर स्मरणिका – केंद्र शाळा मठ नं १ – संकलन श्रीकृष्ण श्रीहरी खानोलकर 
  2. Dr. Ramaji Khanolkar – The Scholar And Reformer by Savitri Khanolkar
  3. नूतन मराठा हितवर्धक संघ नियतकालिके
  4. नाईक मराठा मंडळ नियतकालिके
  5. Pakistan Balochistan Government Official Website

Free Download Easy Button & Menu Maker with serial key

ब्लॉग मध्ये बटण टाका

आपणाला जर ब्लॉग मध्ये डाऊनलोड बटण किंव्हा कसल्या हि प्रकारचे बटण टाकायचे असेल तर हे सॉफ्टवेअर आपणासाठीच आहे या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण आपल्या ब्लॉग किंव्हा वेबसाईट मध्ये छान से बटण टाकता येईल मी याच सॉफ्टवेअरच्या मदतीने खाली दिलेली.Free Download आणि download serial key  हे बटण बनविले आहे.चला तर
 Easy Button & Menu Maker with serial key डाऊनलोड करा आणि आपला आपल्या ब्लॉग मध्ये बटण टाका.

http://depositfiles.com/files/flmzj74r3%20http://depositfiles.com/files/flmzj74r3%20

बडबड गीत

“ये रे ये रे पावसा” किंवा “झुक झुक झुक आगिन गाडी” अशी कितीतरी दुर्मिळ बडबड गीतं ऐकून बराच काळ झाला. ते प्राथमिक शाळेतले दिवस! आहा! आजूनही ते क्षण डोळ्यासमोर आहेत.  बघता बघता १२-१५ वर्ष उलटून गेली पण तरिही सगळं अगदी काल घडल्यासारखे स्पष्ट आठवतय. ते शाळेतले गुरूजी, त्यांचा तो प्रेमळ स्वभाव, अगदी स्वतःची मुलं असल्यासारखे केलेले प्रेम आठवून खरच कंठ दाटून येतो! आजही  प्राथमिक शाळेतले शिक्षक दिसले की नकळतच चेहर्‍यावर स्मीतहास्य येते. खरच ते क्षण “लय भारी” होते. पण खरच ते दिवस आणि आज जे काही अनुभवायला मिळतय यात किती फरक पडलाय नाही?मी एका छोट्या गावात राहतो. “खेड्याकडे चला” चे उत्तम उदाहरण म्हणजे माझे गाव. काहिही सुविधा नसलेले माझे गाव आज एका “शहरा” इतके प्रगत झाले आहे पण त्यातली पोकळी आत्ता थोडी थोडी बाहेर यायला लागली आहे.

माझ्या गल्लीत जवळपास पाच ते दहा वयोगटातली जवळ जवळ ८-१० बारकी आहेत. त्यांना “वानरसेना” म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सध्या नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दिवसभर त्यांचा चिवचिवाट सुरू असतो. एकदा शांत बसून त्यांची बडबड ऐकली तर खरच खुप मजा येते. त्यांचे ते बोबडे बोल ऐकून नकळत आपणही मनात बोबडे बोलायला लागतो :).

परवा असाच पुस्तक वाचत बसलो होतो. नेहमीप्रमाणे सगळी वानरसेना गल्लीभर चिवचिवाट करत सुटली होती. मी पुस्तक ठेवलं आणि हळूच खिडकीतुन त्यांची मजा पाहायला लागलो. साधारण एक पंधरा वीस मिनिटांनी त्यांचा सेनाप्रमुख मोठ्याने ओरडला “ए पकला-पकली बास झाली आता. आता आपन शाला-शाला खेलू”. म्हटलं चला आता फुल टू करमणूक होणार. त्यांचं ते “शाला-शाला” सुरू झालं. अ-ब-क-ड चा तास संपला आणि “बडबडगीतांचा” तास सुरू झाला.

पहिलं बडबडगीत ऐकताच मी हदरलो. आपेक्षेनुसार ते “झुक-झुक-झुक आगिनगाडी” किंवा “येरे येरे पावसा” किंवा फारफार तर “चांदोमामा चांदोमामा लपलास का” वगैरे एखादे असेल पण ही पोरं मोठमोठ्याने “शीला शीला की जवानी” म्हणायला लागली.दोन मिनिट मी सुन्नच झालो. त्यानंतरच त्यांच गाणं होतं “मुन्नी बदनाम हुई, दालिंग तेले लिये”.  अरे हा काय प्रकार आहे? ही कसली बडबड गीतं??माझ्या मनाची चक्र वेगानं फिरू लागली….

ज्यांना साधा शेंबुड पुसता येत नाही अशी ही यंग जनरेशन खरोखरच कसले संकेत देत आहे? खरच यात त्यांचा काही दोष आहे? नाही. दोष आपला आहे. म्हणतात ना जे पेराल तेच उगवते! मग त्यांचा दोष तो कोणता? मध्यंतरी काही कामाकरिता माझ्या जुन्या शाळेत जाऊन आलो. अगदी मोजके जुने शिक्षक राहिलेले. बाकी सगळा स्टाफ नवा, २५-३० वयोगटातला. स्टाफरूममध्ये डोकावलं तर निम्मे अर्धे मोबाईलमध्ये गुंग, एकिकडे वर्ग चालू तर दुसरीकडे यांचे मोबाईल. आज सर्रास मोबाईल फोन वापरात आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सोबत मोबाईल ही देखिल मुलभुत गरज बनली आहे पण म्हणून काय तो या विद्येच्या मंदिरातही गरजेचा आहे? सहज माझ्या एका जुन्या शिक्षकांशी बोलत असताना “शीला,शीला की जवानी” गाणं सुरू झालं. बोलता बोलताच सरांच एकदम लक्ष विचलीत झालं आणि मला त्यांनी मान डोलावून डोकावायला सांगितल. मी सहज काचेतुन डोकावलं तर ती एका मास्तरांच्या मोबाईलची रिंगटोन होती.

आत्ता त्या घटनेची लिंक लागली . जर विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे गुरुजीच केंदाळात वावरत आहेत तर मग त्यात स्वच्छता, निर्मळता कशी राहिल? जणू एखाद्या वादळाच्या वेगाने ही नवी जनरेशन गोष्टी आत्मसात करत असताना त्यांना जर योग्य दिशा दाखवणारेच दिशाभूल होण्यास कारणीभूत असतिल तर खरच ही नींदनिय बाब आहे. केवळ गुरुजीच नव्हे, तर करिअरच्या मागे लागलेले पालकही याला तितकेच जबाबदार आहेत. हा बडबडगीतांचा प्रकार केवळ एक ट्रेलर म्हणाल तरी हरकत नाही.

“क्या हम गलफ्रेंड-बॉयफ्रेंड है” ही मॅकडोनलची जाहिरात कित्येकांना भावली. फेसबुक,ऑर्कुटवर जो-तो उठून “wow! so cute” किंवा “how nice!!” सारख्या उपमा देत ही जाहिरात शेअर करत होता पण जर खरच विचार केलात कधी? गलफ्रेंड, बॉयफ्रेंड म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कधी कळाले ते आठवू शकाल? फार फार तर ५-७ वर्षापुर्वीपासून हे शब्द so called high सोसायटीतून आज खेड्या-खेड्यापर्यंत पोहोचले आहेत. आणि आपण या अशा संस्कृतीची जाहिरात करून नेमकं आपल्या नव्या जनरेशनला काय शिकवू पाहतोय? यावरच एक किस्सा सांगतो. मध्यंतरी एका लग्नानिमित्त सर्व लोक एकत्र आलो होतो. बरेच पाहुणेमंडळी बर्‍याच दिवसांनी एकत्र भेटले होते त्यामुळे गप्पांना उत आला होता. बोलता बोलता बरेच विषय निघत गेले. त्यात हा विषय आला. एक बाई आगदी अभिमानाने म्हणाल्या,
“अहो ऐका हा किस्सा. आमच्या विकीचा (मुलाचे नाव महेश.पण तरिही विकी. का कोणास ठाऊक!) फक्त ८ वर्षाचा आहे. परवा काय म्हणाला माहितिये? त्याच्या बाबाला म्हणाला, ’ए बाबा. आपण आणखी एक घर आणि गाडी घेउयात की’, मग आम्ही आश्चर्याने विचारले, ’का रे? एकदम का तुला सुचलं?’ तर म्हणतो कसा , ’काही दिवसांनी माझी गर्लफ्रेंड येईल. मग आम्ही दुसरीकडे राहायला जाणार. मग आम्ही तुम्हाला हॉलिडेज मध्ये भेटायला यायला गाडी पाहिजेकी’. हा हा हा! ऐकलतं म्हणतो कसा! कित्ती गोड बाळ माझं”

???गोड???नेमकं यात यांना त्याचा अभिमान वाटण्यासारखे दिसले तरी काय?? आजून चड्डी घालता येत नसलेलं शेंबड मुल आत्तापासूनच; वयाच्या ८व्या वर्षा पासूनच “वेगळ राहणार, गर्लफ्रेंड फिरवणार, कधीतरी हॉलिडेजनाच भेटायला येणार” म्हणतोय आणि हे लोक ते अभिमानाने चारचौघांना सांगताहेत??आणि ते ही त्याच्या समोरच??

खरच यावर प्रत्येक पालकाने विचार करायला हवा. मला अत्तापासूनच भिती वाटायला लागलिये की उद्या माझा मुलगा/मुलगी कोणालाही हाताला धरून घरी घेऊन येईल आणि म्हणेल “हे डॅड! लूक! ही इज माय गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड. मी याच्याशी लग्न करणारे. तुमची परवानगी असेल तर नाईस, नसेल तर आम्ही पळून जायचं ठरवल आहे!” आत्ता हे मजेशीर वाटतयं पण प्रत्यक्षात कधी घराघरांत उतरेल काही सांगता येत नाही.

तेवढ्यात “ससा ले ससा,कापूस जसा” गाणं ऐकू आलं आणि भानावर आलो. कदाचित चुकल्या-चुकल्यासारखं काहीसं ऐकू आल्याने तंद्री भंग झाली असेल ! 🙂 पण असो, काही का होईना आमच्यावेळच निदान हे तरी बडबडगीत या वानरसेनेच्या तोंडून ऐकायला मिळालं! पण तरिही जे काही या दरम्यान मनात येऊन गेलं ते बैचेन करण्यालायक नक्कीच होते.

-अद्वैत
माझा हा लेख या आधी येथे प्रकाशित:  http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=29&t=525

वर्षासहलीला जाण्यापूर्वी

वर्षासहलीना जायचं तर धबधब्यांना पर्याय नाही. मात्र, अशा सहलींना जाताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.त्या ठिकाणी काय धोके असतात व त्यांन पासून कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती दिली आहे ज्येष्ठ गिर्यारोहक राम काटदरे. त्याचा हा मी घेतलेला आढावा.


त्यांनी दिलेल्या काही महत्वाच्या टिप्स आणि काही खबरदारी चे उपाय मी येथे देत आहे.
धबधब्याच्या प्रवाहात उतरताना पाण्याचा जोर किती आहे, हे जाणून घ्या. प्रवाहाला खूप जोर असल्यास वाहून जाण्याची शक्यता असते. पांडवकडा, चिंचोटी ह्या ठीकाणी धबधब्यात प्रवासी वाहून गेलेल्याच्या बातम्या मिळाल्या आहेत. 
धबधब्याच्या डोहाचा, त्यात असलेल्या दगडांचा अंदाज घेणे गरजेचे आहे. कारण अशा ठिकाणी दगडांमध्ये कपारी असतात व त्यात अडकून जीव जाण्याचा धोका असतो. चिंचोटी, कोंडेश्वर या ठिकाणी अशा कपारी आहेत. 
शेवाळ आणि बुळबुळीत दगडावरून घसरून पाण्यात पडण्याचा धोका असतो. 
अनेकदा पाण्यात हात-पाय आपटून दुखापत होऊ शकते आणि पाण्यात बुडण्याची शक्यता असते. 
धबधब्यात पाण्याचा रंग बदलून पाणी गढूळ होऊ लागले, पाण्याबरोबर बारीकबारीक दगडगोटे वाहून येऊ लागले, तर हा पाण्यातून बाहेर पडण्याचा इशारा आहे हे लक्षात घ्या. 
जिथे आपण बसलो आहोत, तिथे पाऊस नसला तरी धबधब्याच्या वरच्या भागात मोठा पाऊस होत असल्यास अचानक पाण्याचा लोंढ येण्याचा संभव असतो. 
पाणी वाढून एखाद्या ठिकाणी अडकून पडल्यास पाणी उतरेपर्यंत सुरक्षित जागी थांबा. जास्त वेळ वाट पहावी लागली तरी चालेल पण जीव तरी वाचेल. उगाचच नसते धाडस करू नका. 
कड्याच्या टोकावर उभे असताना वाऱ्यामुळे तोल जाऊ शकतो पडण्याची शक्यता असते. 
अनेकदा धुक्यामुळे आपण कड्याच्या टोकावर असल्यास किंवा बाजूलाच खोल दरी असल्याचा अंदाज येत नाही. माळशेज घाटात असा अनुभव अनेकदा पर्यटकांना येतो. अशा वेळी दु:साहस जीवावर बेतू शकते. 
भुसभुशीत मातीचा अंदाज न आल्यामुळे घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. 
नाला, ओढा पार करताना एकमेकांचा हात धरून, साखळी करून तो पार करावा. त्यासाठी स्थानिकांकडून त्या ठिकाणाची योग्यती माहिती घ्यावी.
ग्रुपमधील सगळ्यांनी एकाच वेळी पाण्यामध्ये उतरू नये. कोणी तरी एकाने काठावरती थांबणे गरजेचे आहे. 
ग्रुपमध्ये कमीत कमी एकाला तरी पोहण्याचे थोडे फार ज्ञान असणे गरजेचे आहे. 
शक्यतो अशा ठिकाणी कॅमेरा ,दागिने आदी किमती वस्तू नेऊ नये. 
आपल्याप्रमाणे अनेक ग्रुपही सहलीसाठी येतात आपल्या आरडाओरडा, मोठ्याने गाणी लावणं, हावभाव आदी वर्तनाचा इतरांना त्रास होणार नाही, हि काळजी घ्यावी. 
अशा ठिकाणी कपड्यांच भान आवश्यक आहे. खास करून मुलींने याची खबर दारी घेणे आवश्यक आहे.
पांढरा, निळा, पिस्ता किंवा अशा लाइट शेड, पारदर्शक दिसणारे कपडे पाण्यात भिजताना घालू नका.त्याऐवजी डार्क शेडचे कपडे घाला.
खूप शॉर्ट किंवा टाइट फिटींगचे कपडे घालू नका.
एका दिवसाच्या पिकनिकला जायचंय, तर महागाचे कपडे कशाला ? असा विचार करत अनेक जणी स्वस्तातले कपडे घेतात पण असे करू नका असे कपडे फाटण्याची शक्यता असते.
साडी किंवा पंजाबी ड्रेस असे कपडे पावसात भिजताना मॅनेजकरता येत नाहीत. म्हणून ते टाळाच. पण, अगदी बिकिनी घालूनही भर रस्त्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
आपल्या वयानुसार आणि शरीराच्या आकारमानानुसार कपडे निवडा.
किरकोळ शेरेबाजी, कमेंट्सचे रुपांतर हाणामारीत झाल्याची उदाहरणे घडतात. वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी हे भान राखणं आवशक्य आहे. 
या ठिकाणी चप्पल घालणे आवशक्य आहे. पायाला जखमा होण्याची अथवा घसरण्याची शक्यता असते. 
सोबत प्रथमोउपचार साहित्य आणि प्रथमोउपचाराचे किमान ज्ञान असणे आवशक्य आहे. 
माळशेज घाटावर अनेकदा गाड्या थांबवून रस्त्यावर नाचतानाची दृश्ये पाहायला मिळतात.वेड्या वाकड्या पार्किंग मुळे अनेकदा अपघात होतात व स्थानिकांनाहि त्रास भोगावा लागतो. 
सर्वात महत्वाच म्हणजे निसर्गाचा आदर राखून वागणं आवशक्य आहे. आपल्या बरोबरच बिस्किट, चॉकलेटचे रॅपर आपल्यासोबत परत आणावेत. 
अशा ठिकाणी काही अपघात झाल्यास पहिली मदत होते ती गावकऱ्यांची त्यामुळे गावकऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. 
आपण कुणाबरोबर आणि कुठे पिकनिकला जातोय, याची माहिती घरी देऊन ठेवा. शक्यतो सोबत असणाऱ्या सगळ्या मौत्रिणीचे आणि त्यांच्या घरच्यांचे टेलिफोन नंबरही घरी देऊन ठेवा. 
जेथे पिकनिकला जाणार आहोत, तिथल्या पोलिस स्टेशनचा नंबरही घरी देऊन ठेवा. 
कपड्यांचे एकदोन जोड सोबत घेऊन ठेवा.सोबत टॉवेल न्यायला विसरू नका.
पोहता येत असेल, तरच समुद्रात किंवा नदी मध्ये उतरावे.
वरील सर्व फोटो गुगलवरून घेण्यात आलेले आहेत.

नकळत एकदा…

आजपण नेहमीप्रमाणे आईने त्याला औषधाच्या गोळ्या काढून दिल्या. आईला नको म्हणून समजावून सांगून सुद्धा तिने गोळ्या आणि पाण्याचा ग्लास आणून दिला. तिला सांगून तरी काय फायदा कि आता ह्या गोळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही आहे. त्यांनी जे काम करायचे ते त्यांचे करून झाले आहे. आता ह्यांचा काही उपयोग नाही पण जाऊदेत तिला तरी कशाला दुखवायचे. म्हणून त्याने गपचूप गोळ्या खावून घेतल्या.आईने  त्याच्या बारीक कापलेल्या केसावरून प्रेमाने हात फिरवला. गोळ्या खाल्ल्यावर ती निघून गेली.

Free Download 360Amigo System Speedup with serial key

संगणकाची स्पीड वाढवणारे सॉफ्टवेअर
कधी इंटरनेट स्पीड ठीकठाक असते तरी आपला संगणक खूप हळू चालू लागतो  आणि त्यामुळे आपली सगळीच धांदल  उडते पण असे का घडते तर ते घडते. आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेंव्हा आपल्या संगणकात इंटरनेटवरून काही file आपोआप save  होत राहतात.कालांतराने त्यांची size वाढते आणि  त्यामुळे आपला संगणक फारच हळू कार्य करू लागतो. तसेच आपण संगणकात सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता कालांतराने काढून टाकता पण त्या मुळे काहि Erorr फाईल तयार होतात त्या मुळे हि तुमचा संगणक हळू चालू शकतो.तसेच अनेक प्रकारचे Erorr संगणकात तयार होतात त्यामुळे संगणक हळू चालतो.यावर उपाय म्हणजे registry booster हे सॉफ्टवेअर हे  सॉफ्टवेअर अश्या सगळ्या फाईल ज्या काहीच गरजेच्या नाहीत, आधी सांगितल्या प्रमाणे निर्माण  झाल्या आहेत. त्या सगळ्या  फाईल हे सॉफ्टवेअर संगणकातुन शोधून काढून त्या Delete करत. 360Amigo System Speedup  serial keyसोबत दिली आहे 
http://depositfiles.com/files/flmzj74r3%20http://depositfiles.com/files/flmzj74r3%20

१७० री पार

४ महिन्यात जो प्रतिसाद आपण कोकणस्थ मराठा समाज महासंघ या ब्लॉगसाईटला आणि फेसबुक ग्रुपला दिलात त्याबद्दल आपल्या सर्वाचे धन्यवाद. आज आपण १७० री पार केली. आज आपल्याकडे १७३ सभासद आहेत. यात अनेक अनुभवी आणि महान लोकांचा पण समावेश आहे. गोवा, कारवार, सिंधुदुर्ग आणि मुंबई या परिसरातील अनेक समाजबांधव आपल्या ग्रुपचे सभासद आहेत. लवकरात लवकर आपण ५०० आकडा गाठू हा विश्वास आहे. त्यासाठी आपल्या मदतीचीही गरज आहे. आपल्या मित्रांना, कुटुंबियांना आणि आप्तेष्टांना या ग्रुप मध्ये आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला तर लवकरच आपण आपलं उद्दिष्ट गाठू. असेच सहकार्य करत राहा. धन्यवाद.      
सभासद – Member List

गणोबा..!!

आज सकाळी सकाळी मला एका मित्राने एस.एम.एस.पाठवला.. A cute letter by a small kid who  hates Maths. .” dear maths, please grow up soon and try to solve your problems yourself!!!!!”  मी इतकी हसले माहितेय…मला त्या मुलामध्ये मीच दिसायला लागले…!!!
गणित..कध्धी म्हणजे कध्धीच आवडलं नाही मला! म्हणजे मार्क कमी मिळायचे, पेपरात भोपळे मिळायचे असं काही नाही बरं का.. पण गणित म्हटलं की कंटाळाच यायचा.. अगदी पाचवी-सहावीत असल्यापासूनच… माझे काही मित्र अगदी हिरीरीने अल्जेब्रा / भूमितीतली प्रमेय सोडवत बसलेले असायचे, आणि माझं लक्ष गणिताच्या तासाला कायम वर्गाच्या बाहेर खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावर, झाडांवर, पक्ष्यांवर असायचं!! या रुक्षपणात इतकं रंगून जाण्यासारखं काय आहे? हे कोडं मला कधीच उलगडलं नाही… एक गंमत तर अगदी हमखास करायचे मी, म्हणजे गणिताच्या पेपरात संपूर्ण   गणित चोख सोडवायचे, सगळ्या स्टेप्स एकदम करेक्ट..पण उत्तर लिहिताना १२३ च्या ऐवजी १३२ किंवा xyz च्या ऐवजी yxz !!! माती सगळी!!! पायथागोरस वगैरे महनीय प्रभृतींनी तर जिणं हराम केलं होतं माझं! कारण आमचं गणिताबद्दलचं आकलन अगाध.. अरे तू तुझ्या घरात लाव न काय लावायचेत ते शोध.. आम्हाला काय त्रास!!! असा जेन्युईन त्रागा मी कित्येक वर्षं केलेला आहे.. पण राज्यशासन, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, शिक्षणतज्ज्ञ वगैरेंना माझी कधीच दया आली नाही..!! आणि वर्गमुळं,  घनमुळं,  परिमितीत्रिज्याचक्रवाढ व्याज अशा  भीतीदायक शब्दांची आक्रमणं माझ्या कोमल मनाला घायाळ घायाळ करत राहिली.. कर्कटककंपास  अशा हिंसक ,हानिकारक वस्तू मुलांच्या इतक्या लहान वयात हातात देणं कित्ती चुकीचं आहे…आपल्या समाजातली हिंसक प्रवृत्ती यामुळेच वाढीला लागली  असणार!!!   
चुकून एकदा कशी कोण जाणे पण गणित प्राविण्य परीक्षेच्या पुढच्या फेरीसाठी माझी निवड झाली..( मंडळाचं मार्कांचं गणित चुकलं असणार!!) तर त्याच्या तयारीसाठी आमच्या शाळेने एक  कार्यशाळा घेतली.. दोन दोन मुलांची एक जोडी.. आणि नेमकी मी होते गणिताच्या प्रचंड वेड्या आणि आमच्या शाळेतल्या सगळ्यात हुशार मुलासोबत!! भीषण!!!!! अहो, त्याला काहीही यायचं इयत्ता सातवीत… मी भयचकित.. माझं मन त्याच्याविषयीच्या अत्यादराने आणि स्वतःविषयीच्या आत्यंतिक न्यूनगंडाने  भरून आलं!! एक रुपयाच्या नाण्याचं वजन, का क्षेत्रफळ का असंच तत्सम काहीतरी शोधून दाखवायचं होतं.. मी बावळटासारखी बघतच राहिले.. “हातात आलेल्या एक रुपयाची शाळा सुटल्या सुटल्या कैरी चिंच घ्यायची..” आमच्या निर्बुद्ध डोक्यात हे असलेच विचार कायम! तोवर या पट्ठ्याने मात्र त्या नाण्याला दोरा गुंडाळून, काहीतरी आकडेमोड करून उत्तर शोधलं सुद्धा.. तो फॉर्म्युला मला आजपर्यंत कळला नाहीये..!
आज मागे बघताना या सगळ्याची खूप गंमत वाटतेय. आमच्या वर्गात फळ्यावर रोज एक सुविचार लिहिला जायचा. त्यापैकी एक अगदी डोक्यात बसलाय. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीतत्यांच्याविषयी कधीही दु:ख्खी होऊ नये. त्यावेळी बाकी तात्त्विक अर्थ कळला नसला तरी गणिताच्या संदर्भात मात्र तो सुविचार मला फिट्ट पटला होता.. आपल्याला  गणित कधीच धड कळणार नाहीही गोष्ट कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे याच्याविषयी कधी दुःख्खी होऊ नये!!! ‘  आणि इमाने इतबारे मी आजतागायत त्याचं पालन केलंय. शेवटी कसं आहे, त्या गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण  गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय!! ती गणितं सोडवायची शक्ती मला सतत मिळत राहो,ही पायथागोरस चरणी प्रार्थना…!!!:-)
 

मराठी वेवस्थित दिसत नाही ? तसेच सॉफ्टवेअर फुकट हि साईट निट दिसत नाही ?

आपणाला जर मराठी निट दिसत नसेल तर आपण आपला   Internet Explorer म्हणून  Mozilla Firefox ची निवड करावी लागेल कारण या Explorer मुळे  तुमची इंटरनेट सर्फिंग स्पीड पण वाढते तसेच  मराठी साईट वेवस्थितपणे तुमच्या संगणकावर दिसते. हे सॉफ्टवेअर खाली दिलेल्या Download बटन ला क्किक करून Download करा.
http://depositfiles.com/files/flmzj74r3%20

मराठी कॉर्नर व्हिडिओ ट्युटोरियल

नमस्कार मंडळी,
कसे आहात? आज आम्ही बर्‍याच दिवसांनी तुमच्याशी संवाद साधतोय! या काळात मराठी
कॉर्नर खरच थंड पडले आहे. त्यामुळे मराठी कॉर्नरला पुन्हा सक्रिय करण्याच्या
दृष्टीने हा पत्रव्यवहार.
मध्यंतरी आम्ही आपल्या सर्व सभासदांकडून अभिप्राय मागवला होता आणि त्याला बराच
प्रतिसाद मिळाला. या मिळालेल्या प्रतिसादाची योग्य छाननी केल्यावर एक गोष्ट
प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बहुतकरून सभासदांना मराठी कॉर्नर नेमके कसे
वापरायचे हेच अवघड जात आहे. त्यामुळे आम्ही “मराठी कॉर्नर व्हिडिओ
ट्युटोरियल्स” सभासदांना युट्युब द्वारे उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे.

सभासदांना मराठी कॉर्नरवरिल विविध सुविधा योग्य पद्धतीने हाताळता याव्यात या
उद्देशाने या ट्युटोरियल नक्कीच उपयोगी पडतील अशी आशा आम्हाला आहे. मराठी
कॉर्नरच्या या ट्युटोरियल बघण्यासाठी आजच मराठी कॉर्नरच्या युट्युब चॅनलला
सब्स्क्राइब करा.
मराठी कॉर्नरचे युट्युब चॅनेल: http://www.youtube.com/user/marathicorner

———————————————————————————-

मराठी कॉर्नर व्हिडिओ ट्युटोरियलस आपल्यासमोर सादर करताना मनापासून आनंद
होतोय. हे व्हिडिओ नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. तरिही काही शंका असल्यास
त्या व्हिडिओजना तुम्ही कमेंट देऊ शकता किंवा आम्हाला मेल करू शकता. तर सादर
कर आहोत आमचा पहिला व्हिडिओ:

मराठी कॉर्नर व्हिडिओ ट्युटोरियल नंबर १ (माहिती व सदस्यप्रवेश कसा घ्यावा)

Marathicorner.com Video Tutorial #1 (basicinfo and how to Login)

हळुहळु मराठी कॉर्नर कसे वापरायचे याच्या ट्युटोरियल उपलब्ध केल्या जातिल.आमची
ही सुविधा आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि हो, आजच मराठी कॉर्नरवर
सक्रिय व्हा! आपले नवे लेख,विचार नक्की मांडा. आधी मांडलेल्या विषयांवर तुमची
प्रतिक्रिया नक्की द्या!

आपला विश्वासू,
अद्वैत
मराठी कॉर्नर टिम
http://www.marathicorner.com/index.php

YouTube वरील video फास्ट play करणार सॉफ्टवेअर

You Tube  सारख्या साईट वरील video बघायचे म्हणजे बफ्फारिंग चा डोक्याला ज्याम वैताग होतो पण आता हा वैताग या सॉफ्टवेअर मुळे नक्कीच कमी होणार आहे या SpeedBit Video Accelerator या software च्या मदती मुळे  You Tube या  व या सारख्या साईट वरील video फास्ट play होतात  . जेंव्हा आपण  You Tube वरील एखाद्या video ला क्किक करता  तेंव्हा हे सॉफ्टवेअर आपोआप चालू होते.
http://depositfiles.com/files/flmzj74r3%20

नाईक, नूतन आणि कोकणी मराठा समाज सिंधुदुर्ग – संक्षिप्त इतिहास

नाईक, नूतन आणि कोकणी मराठा समाज सिंधुदुर्ग  – संक्षिप्त इतिहास

गोवा, सिंधुदुर्ग आणि कारवार या सप्तकोकणातील भागात विविध देवालये आहेत आणि या देवालयांबरोबरच देवालयीन संस्कृती नांदत होती. जी आता पूर्वीच्या स्वरुपात अस्तित्वात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही देवालयीन संस्कृतीचे मूळ होते. ही संस्कृती किती जुनी होती हे सांगण फार कठीण आहे. पण मुलनिवासी समाजाची मंदिरे प्राचीन आहेत. त्यानंतर ११००-१२०० दरम्यान सारस्वत समाजाला कदंब काळात सिंधुदुर्गात सुभेदारी मिळाली त्यांनी स्वत:ची स्वतंत्र मंदिरे उभारली.
गोवा आणि सिंधुदुर्ग मधील देवालयीन संस्कृती मध्ये थोडा फरक होता. येथिल बरीच मंदिरे ही मराठा आणि सारस्वत समाजाच्या ताब्यात होती. गोव्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही देवालयीन नोकऱ्या करणाऱ्या विविध ज्ञातींचा विकास खुंटला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली समाजसुधारणा ही बरीच जुनी आहे. समाजात रोटी-बेटी व्यवहार व्हायचा पण पोटजातीत होत नसे, त्यासाठी समाजसुधारणेची गरज होतीच. दीडशे वर्षापूर्वी निवती किल्याचे तत्कालीन किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांनी उरली सुरली अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्यासाठी जोरदार मोहीम छेडली. त्यांना त्यांचे बंधू भोर संस्थानचे सरदार नाईक परुळेकर यांची मदत होती. किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांना त्यांच्या घरातूनच विरोध झाला. त्यांच्या घरातील काही स्त्रियांनी अंधश्रद्धेपोटी त्यांना विरोध केला. हा विरोध सहन न झाल्याने त्यांच्या हातून स्वत:च्याच कुटुंबाची हत्या झाली. या प्रकाराने इंग्रजी शासन घडबडून जागे झाले. हत्येच समर्थन करता येत नाही त्यामुळेच कडक इंग्रजी शासनाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. फाशीपुर्वी त्यांनी स्वत:च्या हातातील तलवार श्री देव वेतोबाच्या हातात देण्याची आणि मंदिरात भजन करण्याची शेवटची इच्छा प्रकट केली. इंग्रजानी ती मान्य केली.
ह्या प्रकारानंतर इंग्रज शासनाने स्थानिक समाजसुधारकांच्या मदतीने नवीन कायदे केले. या समाजसुधारकांच्या नामावलीत रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचे नाव बरेच वरचे आहे. परमवीरचक्राची निर्मिती करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर लिहितात की, “He initiated a campaign against the Temple artist system custom. It was mainly thanks to him that a law was passed by the British India in this respect. He encouraged villagers by arranging for their tutions and crusading in favor of laws to better the community.”
रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांनी १८९२ साली जोरदार समाजसुधारणा मोहीम हाती घेतली. जुन्या लोकांनी सुरू केलेली ही मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पुढे चालवली. सावंतवाडी संस्थानचे (सावंतवाडी, वेंगुर्ला,डिचोली,पेडणे,कुडाळ आणि मळेवाड) तत्कालीन पोलिटिकल एजंट कर्नल नट यांच्या सल्यानुसार त्यांनी प्रथम शिक्षणप्रसारावर भर दिला. मठ येथे त्यांनी बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे हिंदूपंचायत आणि स्वामी देशराज धर्मशाळा (प्रार्थना मंदीर) या संस्थांचे कित्येक वर्षे अध्यक्ष होते. १९०३ ला मठ (पूर्वीचे सावंतवाडी संस्थान) ता. वेंगुर्ला येथे स्वखर्चाने शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. बहुजन विद्यार्थांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या. रायसाहेबांचे धाकटे बंधू कै. विठ्ठल धोंडजी खानोलकर यांनी स्वत:ला समाजसेवेस वाहून घेतले. त्यांनी डॉ. खानोलकर हायस्कूल बांधले.
रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांच्या प्रेरणेने १९२७ मध्ये नूतन मराठा हितवर्धक संघाची स्थापना झाली. ” न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ” (या जगात ज्ञानाएवढ पवित्र दुसर काही नाही) हे संघाचे घोषवाक्य ठरले. अनेक महान व्यक्तिमत्वांनी रायसाहेबांच्या नेतृत्वाखाली संघाचे कार्य केले. यात अ.ब.वालावलकर(कोकण रेल्वेचे जनक), डॉ. विष्णू रा. खानोलकर, डॉ. प्रकाश धो. खानोलकर (एम.डी.), गुरुवर्य नि.बा.नेरुरकर, रावसाहेब डॉ. लक्ष्मण गोपाळ मठकर, शं. वि. परुळेकर, डॉ. शंकर मठकर, रावसाहेब मधुसूदन विष्णू खानोलकर, डॉ. रा.गं.खानोलकर, दादा वालावलकर (द ग्रेट रॉयल सर्कस), रा.ज.वालावलकर(उद्योगपती) यांचा व अनेक इतर कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकत्रीकरणाच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाले नाहीत तरी कालांतराने सर्व पोटजातीत विवाह होऊ लागले. “कालाय तस्मै नम:” पण याचा दुष्परिणाम म्हणून समाज एकाच छत्राखाली संघटीत न होता तो विविध संस्थांत विभागला गेला. म्हणून समाज जरी एकच असला तरी तो नूतन मराठा, नाईक मराठा, कोकणी मराठा आणि गोमंतक मराठा अशा विविध नावांनी ओळखला जावू लागला. समाजसुधारक रा. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचेही नाव समाजसुधारकांच्या यादीत बरेच वरचे आहे. त्यांनी मुंबईतील आणि सिंधुदुर्गातील आपल्या समाजाला खूप मदत केली. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रो. रा ना वेलिंगकर यांनीही केला होता. १६ ऑक्टोबर ई.स. १९२६, या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावर रा. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी नाईक मराठा मंडळ या संस्थेची स्थापना केली. आज संस्थेला ८३ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेची वाटचाल यशस्वीरीत्या चालू आहे. समाजातील वधु-वरांसाठी विनामूल्य स्वरुपात “वधु वर सूचक केंद्र” नाईक मराठा मंडळातर्फे चालविले जात आहे. आपल्या समाजाने इतर समाजाना मदतीचा हात दिला. यात काही नाव विसरता येणार नाहीत. सुभेदार मेजर विष्णू परुळेकर यांनी अनेक गरीबांना मदतीचा हात दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक गरीब कुटुंबांची जमीन लिलावात विकत घेऊन ती त्यांनाच परत केली. डॉ. रामचंद्र परुळेकर, डॉ. श्रीहरी खानोलकर, डॉ. घोलेकर या तिघांनी वेंगुर्ला पंचक्रोशीत वैद्यकीय सेवा पुरवली.  डॉ. रामचंद्र परुळेकर यांनी दिवस रात्र न बघता सेवा पुरवली. त्यावेळी दळणवळणाची फारशी साधन उपलब्ध नव्हती. एका गावातून दुसऱ्या गावात चालत जाव लागयचं. मठ गावातून तुळस या शेजारच्या गावी जायचं असेल तर एक डोंगर पार करावा लागायचा. तरीही डॉक्टर रामचंद्र यांनी कोणत्याही रुग्णाला त्याच्या घरी जाऊन तपासण्यास नकार दिला नाही. वेळप्रसंगी कंदील किंवा  चूड (माडाच्या सुकलेल्या झावळ्या) पेटवून त्या प्रकाशात रात्रीच्या वेळी एका गावातून दुसऱ्या गावात जात असत. आजही अनेक जुनी लोक त्यांच्या सेवेचं गुणगान गातात.             
केवळ शिक्षणाच्या आणि बुध्दीच्या जोरावर आपल्या समाजाने जी प्रगती केली ती अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. नाईक आणि नूतन मराठा समाज हा सिंधुदुर्ग, कारवार आणि रत्नागिरी येथे आढळतो तसेच मुंबई, बडोदा, पुणे आणि बेळगाव येथेही स्थलांतरीत झाला आहे. या समाजातील अनेक कुटुंब आज परदेशात स्थायिक आहेत. अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया यादेशातून अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे.

संदर्भ  –

  1. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर स्मरणिका – केंद्र शाळा मठ नं १ – संकलन श्रीकृष्ण श्रीहरी खानोलकर 
  2. Dr. Ramaji Khanolkar – The Scholar And Reformer by Savitri Khanolkar
  3. नूतन मराठा हितवर्धक संघ नियतकालिके
  4. नाईक मराठा मंडळ नियतकालिके
  5. श्री. अनिल परुळेकर, परुळे (सध्या मुंबई) यांच्याशी झालेली चर्चा