वाट लावतोय रिक्षावाला…

`कामावर जायला उशीर झायला, बगतोय रिक्षावाला गं वाट माझी बगतोय रिक्षावाला…’ संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गेले वर्षदीड वर्ष धुमाकूळ घालणाऱया या गाण्यात कल्याणडोंबिवलीतील सहनशील प्रवाशांनी सध्या थोडासा बदल केला आहे. आरटीओ, वाहतूक शाखा आणि क्वचितप्रसंगी हुज्जत घालणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके खमके प्रवासी यांच्यातील कुणालाच न जुमानणाऱया उद्दाम, मुजोर रिक्षावाल्यांसाठी कल्याणडोंबिवलीतील चाकरमान्यांनी `वाट माझी लावतोय रिक्षावालाअसे नवे गाणे उद्वेगाने म्हणायला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणे, हुज्जत घालणे, मनाला येईल तेवढे पैसे मागणे अशा स्वरूपातील रिक्षाचालकांची मग्रुरी मुंबईठाण्याचे अडलेनडले प्रवासी रोजच अनुभवत असतात. पण, कल्याणडोंबिवलीतील परिस्थिती त्यापेक्षाही भीषण टोकाला पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा न मानणारी अशी येथील रिक्षाचालकांची जमात आहे. त्यांना मीटर लावण्याचा कायदा ही सक्ती वाटते, मात्र, शेअरभाडय़ाचे दर आरटीओने ठरवून देण्याआधीच परस्पर भाडेवाढ करणे हा त्यांचा `न्यायआहे. कल्याण, डोंबिवली या शहरांना मराठमोळी नगरे म्हणून सुसंस्कृत चेहरा आहे. अनेक राज्यांतून पोटापाण्यासाठी मुंबई गाठणाऱयांनीही कल्याणडोंबिवलीला आपलेसे केले आहे. या शहरांच्या सीमेबाहेर वसलेल्या मूळच्या गावापाडय़ांमध्ये विस्तारत गेलेल्या सिमेंटच्या जंगलांमध्ये या सगळ्यांचे संसार नांदत आहेत. महापालिकेची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुरेशी सक्षम नसल्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळी कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली यापैकी कोणतेही रेल्वे स्थानक गाठायचे तर रिक्षाशिवाय तरणोपाय नाही. मीटरने भाडे ही संकल्पनाच रिक्षाचालकांना मान्य नसल्यामुळे शेअर रिक्षा म्हणजे हम करे सो कायदा अशी त्यांची मनमानी अनेक वर्षे सुरू आहे. आरटीओच्या `डोळेवटारणीलाही भीक न घालणाऱया या रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांनांही `पुडीत गुंडाळून खिशात ठेवले आहे. मनाला येईल तेव्हा शेअरभाडे वाढवून प्रवाशांची लुबाडणूक करणाऱया या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांची बाजू घेऊन ज्या राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी उभे राहायला हवे, त्याच पक्षांनी आश्रय दिल्यामुळे रिक्षा संघटनांचेही फावले आहे. ही लुबाडणूक आणि प्रवाशांना वाऱयावर सोडणाऱया यंत्रणांबद्दल आम्ही सातत्याने आवाज उठवल्यानंतर आरटीओने शेअररिक्षाचे दरपत्रक जाहीर केले खरे, पण हे दरपत्रक न जुमानता आजही रिक्षाचालकांनी वाटमारी सुरू ठेवली आहे. अनेकांना तर दरपत्रक असल्याचेच माहिती नाही. सरकारी यंत्रणांचा या संघटित लुबाडणुकीला आशीर्वाद आहे, यात शंकाच नाही. आता प्रवाशांनीच बहिष्काराचे अस्त्र उपसून `वाट बगतोय रिक्षावालाअसे म्हणण्याची वेळ रिक्षाचालकांवर आणायला हवी.

पोलीस खात्याच्या आयचा घो.

(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा)

आता काय बोलणार? जरा तर काय जनाची नाही तर
मनाची? लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंची गुणच असली. आता महाराष्ट्र आणि बिहार मध्ये काय फरक उरला म्हणायचा?
खुद्द राज्याच्या गृह राज्य मंत्र्यांच्या गावात हि अवस्था….

आता खरी कसोटी आहे ती आपल्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेची.
पाहूया काय होतंय ते.

पोलीस खात्याचा कहर

ट्विट ट्विट!!!

नमस्कार,
शीर्षक वाचून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल! नसेल आलं तरी काही प्रॉब्लेम
नाही कारण आम्ही त्यासाठीच हा मेल पाठवत आहोत!

तर बातमी अशी आहे की आजपासून मराठी कॉर्नर "twitter" वर दाखल झाले आहे. आजच
आम्हाला Follow करा!

https://twitter.com/marathicorner

यात आणखी "लय भारी" सोय अशी आहे की आता मराठी कॉर्नरवर पोस्ट होणार्‍या
प्रत्येक पोस्टस या ट्विटरवर आपोआप "ट्विट" केल्या जाणार आहेत! त्यामुळे
तुम्ही पोस्ट केलेले मराठी कॉर्नरवरिल तुमचे विचार आता जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोहोचवण्याची सोय सुरु झाली आहे! आम्हाला आशा आहे आमच्या
सभासदांना ही सुविधा जरूर आवडेल!

मध्यंतरी घेतलेल्या Feedbackला देखिल सुंदर प्रतिसाद मिळत आहे. त्यात एक गोष्ट
प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बर्‍याच सभासदांना मराठी कॉर्नर "क्लिष्ट" वाटत
आहे. पण तसे मुळीच नाही. तसे वाटण्याचे मुळ कारण असे की आजवर बर्‍याच
सभासदांनी अशा प्रकारचे संकेतस्थळ कधी वापरलेलेच नाही! आज महाजालावर ज्याकाही
मराठी साईट्स आहेत त्या बहुतकरून एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यामुळे त्या
वापरताना काहीच आडचणी भासत नाहीत. पण मराठी कॉर्नर या सगळ्यांहून हटके आहे! 🙂
आम्ही तुम्हाला एकच सल्ला देऊ ईच्छितो की मराठी कॉर्नरवर तुम्ही तुमच्याकडचा
थोडावेळ घालवा. तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या सोयी जाणून घ्या जसे की "तुमची
वेबसाईट प्रसिद्ध करण्य़ाची सोय" जी तुमच्या "User control Panel" मध्ये आहे!
ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉग, वेबसाईटला बॅकलिंक देऊ शकता. अशा अनेक
सुविधा सध्या उपलब्ध आहेत. गेल्या अपडेट मध्ये आम्ही "पाहुण्यांना" असलेली
काही विशिष्ठ फोरमच बघण्याची आडकाठी देखिल काढून टाकली आहे. लवकरच
"टेक्नॉलॉजी" आणि "फॉरवर्ड मेल" असे नवे विभाग सुरू करित आहोत. आशा आहे लवकरच
तुम्हाला आम्ही मराठी कॉर्नरवर सक्रिय पाहू.

काही आणखी आडचणी ज्या तुम्हाला जाणवतात आणि त्यांचे उत्तर!

१.मराठी कॉर्नर लोड व्हायला खुप वेळ लागतो? किंवा ब्राऊजर हॅंग होतो?

हा प्रॉब्लेम एकतर तुमच्याकडील नेट कनेक्शन स्पीड असेल किंवा न साफ केलेली
Cache memory असेल. गुगलवर cache memory कशी साफ करायची याची सर्व माहिती
मिळेल.

२.सतत लॉगइन करावे लागते?
याला उत्तर खुप सोपे आहे. तुम्ही जेव्हा लॉगइन करता तेव्हा तुम्हाला आम्ही २
ठिकाणं दिली आहेत. एक लोगोच्या खाली आणि दुसरी उजव्या बाजूला मध्यावर. तर
उजव्या बाजूला जो पर्याय आहे तो "क्विक लॉगइन" चा आहे. जर तुम्हाला एकदाच
लॉगईन करून ठेवायचे असेल तर लोगो च्या खालील "सदस्य प्रवेश"वर क्लिक करा. आता
तेथे तुमचा युजरनेम आणि पासवर्ड लिहिल्यानंतर खाली जे दोन बॉक्स आहेत त्यातिल
"Log me on automatically each visit" वर किलक करून त्या बॉक्समध्ये हिरवी
फुली आहे याची खात्री करा आणि मग प्रवेश घ्या. यामुळे तुम्हाला वारंवार प्रवेश
घ्यावा लागणार नाही.

३.मिनी-चॅट चा उपयोग काय?
ही एक मजा म्हणून दिलेली सोय आहे.ज्याचा वापर एकाचवेळी मराठी कॉर्नरवर प्रवेश
घेतलेल्या सभासदांना एकमेकांशी हितगुज साधता यावा यासाठी करावा.

४.मराठी कॉर्नरचा तुमच्या ब्लॉग अपडेटशी काहिही डायरेक्ट संबंध नाही!
बर्‍याच सभासदांना मराठी कॉर्नर हे "ब्लॉगसूची" वाटत आहे. तसे नाहिये! मराठी
कॉर्नरचा आणि तुमच्या स्वतःच्या ब्लॉग अपडेट करण्याचा काही संबंध नाही.
"सभासदांचे ब्लॉग" ही सुविधा तुमच्या ब्लॉगसाठी आहे. पण ती मराठी कॉर्नरची
Addon सुविधा आहे. मराठी कॉर्नरचा मुळ उद्देश "चर्चामंच" आहे! येथे विविध
विषयांचे विभाग आहेत ज्यावर त्या त्या विषयांवर चर्चा होणे आपेक्षित आहे. जसे
की "चालू घडामोडी" ज्यात सध्या सुरू असलेल्या एकना अनेक विषयांवर मौल्यवान
चर्चा होऊ शकतात ज्यामुळे तुम्ही तुमच्याकडिल माहितीची देवाण-घेवाण करू शकता.
त्यामुळे तुम्ही तुमचा ब्लॉग अपडेट केला की तुम्ही मराठी कॉर्नरवर तुम्ही
सक्रिय होता हे चुकिचे आहे. मराठी कॉर्नरवर सक्रिय होणे म्हणजे मराठी कॉर्नरवर
प्रवेश घेणे आणि विविध विषयांवर चर्चा करणे ज्यात गप्पा-टप्पा, टाईमपास गेम्स,
गंभिर गोष्टी इत्यादी सर्व आपेक्षित आहे.


हे काही प्रश्न आहेत जे अत्तापर्यंत feedback मध्ये मांडले गेले. पण तुम्हाला
याहीपेक्षा काही वेगळा प्रॉब्लेम असेल तर नक्की आम्हाला या मेलला रेप्लाय करून
कळवा. आपल्या प्रत्येक शंकेचे, अडचणीचे निर्सन करण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न
करू!

मग मराठी कॉर्नरवर सक्रिय होताय ना? तुमची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय! आजच
थोडा वेळ काढा आणि मराठी कॉर्नर नेमके कसे आहे हे जाणून घ्या! सोबत काही
महत्वाच्या सोशल नेटवर्कवर आमच्या असलेल्या सहभागच्या लिंक देत आहे. आम्हाला
आजच Follow, Like करा आणि मराठी कॉर्नरचा परिवार आणखी मजबुत आणि विस्तारित
करण्यास आमची मदत करा!

मराठी कॉर्नर ट्विटरवर:https://twitter.com/marathicorner

मराठी कॉर्नर फेसबुकवर:http://www.facebook.com/pages/marathicornercom-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE/170314392980409

मराठी कॉर्नर बझवर:https://mail.google.com/mail/#buzz/103022840241408656639

लिहायचं की वाचायचं…

माझ्या मनात पुन्हा तोच सनातन संघर्ष सुरू झालाय… लिहायचं की वाचायचं… मोठ्या उत्साहात ब्लॉग लिहायचा संकल्प सोडला होता आणि आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ब्लॉग लिहिणचं सोडल्यागत झालंय. आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुकानं वाचतात ब्लॉग, त्यापुढे काय असाही एक प्रश्न मीच मला विचरात असतो. तीही सबबच लिहायचं नाही म्हणून… लिहायचं नाही म्हणजे कंटाळा येतो किंवा काही सुचत नाही म्हणून थांबलोय असंही नाही. पण वाटतं की कितीजणांनी इतकं उत्कृष्ट लिहून ठेवलंय तेच वाचायला वेळ पुरत नाही तर लिहिण्यात आणखी वेळ घालवणं कसं काय बुवा योग्य आहे.. मग लिहायचं असलं तरी टाळलं जातं. पण मी थांबलोय हे काहींच्या लक्षात आलं आणि त्यांनी आस्थेनं विचारलं म्हणून पुन्हा हे इतकं लिहिलं… आता कदाचित लिहिन वा थांबेनही… पाहू !!

अभिमन्युवध – भाग ४

तिसर्‍या दिवशी पुन्हा त्रिगर्तानीच अर्जुनाला आव्हान दिले व अर्जुन पुन्हा एकदा त्यांच्याशी लढायला गेला असे महाभारत म्हणते. दुसर्‍या दिवशीच्या त्रिगर्त-अर्जुन युद्धाचे दीर्घ आणि रसभरित वर्णन करणार्‍या व्यासानी या दिवशीचे अर्जुन-त्रिगर्त युद्ध कसे झाले, कोणी काय पराक्रम केला, अर्जुनाने कोणाकोणाला मारले याबद्दल अवाक्षरहि लिहिलेले नाही. सर्व दिवसाच्या युद्धाचे वर्णन फक्त दोन श्लोकांत ’उरकले’ आहे. हे अतिशय संशयास्पद आहे! शिवाय यादिवशी युधिष्ठिराच्या रक्षणाची कोणतीहि व्यवस्था अर्जुनाने केली नव्हती! आदल्या दिवशी ती जबाबदारी सत्यजितावर सोपवली त्याचे काय झाले हे कृष्णार्जुनाना ठाऊक नव्हते काय? या सर्वांमुळे मला असा दाट संशय आहे कीं त्या तिसर्‍या दिवशी अर्जुन थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धाला बाहेर पडलाच नसावा! मात्र या तर्काला महाभारत ग्रंथात कोणताही आधार मला देता येत नाही. या दिवशी अर्जुन युद्धात असणार नाही हे बहुधा कौरवपक्षाला खात्रीपूर्वक माहीत नसावे कारण तसे असते तर द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याच्या दृष्टीने ’आक्रमक’ व्यूहरचना केली असती. प्रत्यक्षात त्याने दुर्योधनाला आश्वासन दिले कीं ‘आज मी पांडवपक्षाच्या एकातरी प्रमुख वीराचा वध घडवून आणीन!’ आणि त्याने कौरव सैन्याचा चक्रव्यूह रचला. या व्यूहाचे ’भेदण्यास अत्यंत अवघड’ असे व्यासानी वर्णन केले आहे. हे वर्णन बचावात्मक व्यूहाला जास्त योग्य वाटते आक्रमक व्यूहाला नव्हे! त्यामुळे असे वाटते कीं अर्जुन आज कदाचित युद्धामध्ये नसेल याची कौरवाना काही कल्पना असती तर द्रोणाने सर्व बळ एकवटून युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केला असता. बचावात्मक व्यूह रचला नसता. प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागल्यावर काय झाले ते पुढील लेखात पाहूं

यन्ना रा**ल्ला! माईंड इट!

नमस्कार,

हे शीर्षक वाचलं की नकळतच (तुम्ही मनाशी ठरवा अथवा नको) पण “रजनिकांत” डोळ्यासमोर येतोच! हो! हो! तोच रजनिकांत ज्यांच्यावरच्या भन्नाट जोक्सनी आज संपुर्ण नेट झपाटून टाकलय! संता-बंतांवरिल होणारे अतिरेक, CID च्या पकाऊ शायरी, इतरत्र उगाचच ओढून ताणून केलेले जोक्स, याला खरोखरच कोणीतरी कॉंपिटिशन द्यायला यायलाच हवे होते आणि तेव्हाच “रजनिकांत” धावून आला!

त्यांचे सिनेमे पाहताना त्यनी हवेतल्या हवेत केलेले कारनामे, एका गोळीत दोन गुंडांचा केलेला खात्मा, वगैरे वगैरे जर न्यूटन, आईंस्टाईन, वगैरे “डोकेबाज” मंडळींनी पाहिले असते तर खरच सांगतो, “न्यूटनने आत्महत्या केली असती हो!” म्हणाला असता ” रजनिकांत हवेत राहू शकतो म्हणजे नक्कीच गुरुत्वाकर्षण वगैरे काहीही नाही!अरे ते सफरचंद खाली पडलं हा अपवाद होता.”  😀

असो, पण वयाच्या 6० ला असूनही ROBOT सारखे जबरदस्त अ‍ॅक्शनपट करणे ही काही खाऊची गोष्ट नाही. कित्येकांनी त्यांच्यासारख्या करामती आपापल्या चित्रपटांत आजमावून पाहिल्या आजचे सुपरस्टार Big B देखिल कित्येक सिनेमांत असे काही करताना दिसले पण रजनी ते रजनीच! कितिही पानचट करामती असोत, त्या फक्ता त्यांनाच शोभतात!

त्यांच्यावर होणारे विनोद पाहता एखादा वैतागून अज्ञातवासात गेला असता पण हा व्हिडिओ पाहा. इतक्या मोठ्या सुपरस्टारची विनोदबुद्धी देखिल किती अफलातून आहे!

सध्या आम्ही मराठी कॉर्नर (http://www.marathicorner.com/) वर रजनिकांतचे अफलातून विनोद एकत्र करण्याचा प्रयत्न करित आहोत. त्यासाठी एक स्वतंत्र “रजनिकांत mania” (http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=11&t=66) नावाचा  धागाही सुरू केला आहे. आत्तापर्यंत त्याला मराठी कॉर्नरच्या सभासदांकडून भरगोस प्रतिसाद देखिल मिळत आहे. एकवेळ आवश्य तेथे पोस्ट केलेले विनोद वाचा. हसून हसून लोळाल! 😀 आणि तुमच्याकडे देखिल जर काही नवे, तेथे पोस्ट नकेलेले असे विनोद असतिल तर बिनधास्त शेअर करा! जेणेकरून “रजनिकांत मराठी विनोद डाटाबेस“च जणू तयार होईल! 😀

या लेखाचा शेवट करावाच लागेल. कारण लिहित गेलो तर रजनिकांत देखिल अपुरा पडेल. ( “रजनिकांत देखिल अपुरा पडेल” असे लिहिण्याचे कारण असे की सध्या पृथ्वीला रजनिकांतचे नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि तो बहुतेक मान्यही होईल कारण रजनिकांतने होकार दिला आहे. 😀 आणि म्हणूनच २२ एप्रिलला पृथ्वीची आठवण ठेवण्यासाठी “Earth Day” सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. :D)

असो, शेवट माझ्या अत्तापर्यंतच्या लाडक्या रजनिकांत जोकने करतो:

“एकदा रजनिकांतला खुप राग आला, त्या रागाच्याभरातच त्याने आपल्या नोकराला एवढ्या जोरात लाथ मारली की बिचारा हातातल्या झाडूसकट हवेत भिरकावला गेला……
.
.
.
.
.
.
.
.
आणि दुसर्‍या दिवशीपासून तो “हॅरी पॉटर”च्या नावाने जगभर प्रसिद्ध झाला! ” 
😀  😀 

मराठी कॉर्नरवर तुमच्याकडच्या “रजनिकांत” जोक्स पोस्ट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सहसा मराठीतच जोक्स लिहिता आले तर बघा! मराठी कॉर्नरवर डायरेक्ट कोणत्याही बाहेरच्या सॉफ्ट्वेअर किंवा संकेतस्थळाची मदत न घेता लिहिण्याची सोय देखिल आहे. (या सुविधेच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा. )

-अद्वैत!
मराठी कॉर्नर टिम

शुभेच्छा


कालपासुन महाराष्ट्र राज्य तांत्रिक विद्यापिठ (MSBTE) ची अतिंम परिक्शा सुरु झाली….
त्याकरता, सर्व विद्यार्थ्यांना हार्दीक शुभ्भेच्छा…!

अस्मादिकांचा पहिला पेपर चांगला गेला…. बघु पुढे काय होते ते…..! ४ तारखे पर्यंत तरी मस्ती नाहि…!

एका चेंडूत सात धावा.. त्या सुद्धा चौकार, षटकाराशिवाय !!!क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जास्तीतजास्त किती धावा करता येतील असं तुम्हाला वाटतं ? अगदी सरळसाधा चेंडू धरला तर फोरच्या स्वरूपाच चार आणि सिक्स मारला तर ६.. बरोबर?  त्यातल्यात्यात जर नो बॉल पडला आणि मग त्यावर षटकार मारल्यास संघाच्या खात्यात ७ धावा जमा होऊ शकतात. पण नो बॉल शिवायही एकाच चेंडूवर सात धावा काढल्या असं कोणी तुम्हाला सांगितला तर? आणि इतकंच नाही तर या चेंडूवर फलंदाजाने चौकार किंवा षटकारही मारला नव्हता. विश्वास नाही बसत ना? मग हा व्हिडीयो नक्की पाहा…

२००६ च्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी (का इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी?) ही अशक्यप्राय मानली जाणारी गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवली होती. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना फ्लिंटॉफच्या गोलंदाजीवर मायकल क्लार्कने  लेगसाइडला चेंडू मारला. इंग्लंडचा क्षेत्ररक्षक होगार्ड चेंडूचा पाठलाग करत होता. त्याने सीमारेषेजवळ चेंडू अडवला आणि स्टम्प्स खूप लांब असल्याने लॉंगऑनवरून वाटेतल्या मिडऑनवर उभ्या असलेल्या पीटरसनकडे थ्रो केला. तोपर्यंत फलंदाजांनी पळून तीन धावा काढल्या होत्या. त्यानंतर पीटरसनने यष्टीरक्षकाकडे थ्रो केलेला चेंडू त्याला अडवता आला नाही आणि ओवर थ्रो होऊन चेंडू सरळ सीमारेषेपार गेला!!!  आणि अशाप्रकारे एका चेंडूवर सिक्स, फोर, नो बॉल शिवाय सात धावा निघाल्या!

जाहिराती

          माझ्या लहानपणी आमच्याकडे टी.व्ही. नव्हता. मी आणि माझ्यासारखे बरेच जण शेजाऱ्यांकडे जाऊन टी.व्ही. पाहायचे. तेव्हा ज्यांच्याकडे असायचा त्यांच्याकडेही लाकडी खोक्याचा शटरवाला Black-N-White टी.व्ही. असायचा. शनिवारी आणि रविवारी हिंदी चित्रपट लागायचे. एखाद्या दिवशी अमिताभ बच्चनचा  चित्रपट असला की सगळे म्हणायचे “आज टी.व्ही. ला छान पिक्चर आहे” मग तो “पिक्चर” पहायची उत्सुकता असायची. पण मला त्याही

विकतचं सुख

परवा मी आणि बायको सहज म्हणून मॉलमधे गेलो होतो. घ्यायचं असं काहीच नव्हतं, पण जस्ट टाईमपास म्हणून! तिथे एक मुलगा आला, असेल वीसेक वर्षांचा! व्यवस्थित कपडे घातलेला, केस चांगले चापूनचोपून व्यवस्थित बसवलेला आणि चेहे-यावर ब-यापैकी आत्मविश्वास असलेला! आला तो सरळ माझ्याकडे!
“सर एक काम होतं.” -तो.
“काय?” -मी.
“सर प्लीज हा फॉर्म भरुन देता का?”
“का?”
“सर मी अबक कंपनीकडून आलेलोय. आमची एक प्रमोशनल ऑफर आहे. त्याबद्दल आम्ही एक लकी ड्रॉ काढतोय. त्यासाठी तुमची माहीती हवी होती. फक्त नाव आणि मोबाईल नंबर द्या!”
“बरं मग मीच का?”
“तसं नाही सर, इथे येणा-या रॅन्डम लोकांकडून आम्ही फॉर्म भरुन घेत आहोत. यात जर तुमचा नंबर लागला तर आम्ही तुम्हाला तसं फोन करुन कळवू! यात तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे!”
“एक विचारु, हा डेटाबेस विकण्याचा तर प्लॅन नाही!” माझं डोकं आधीच्या आधीच निगेटीव्ह चालायला लागलं!
“नाही सर, विश्वास ठेवा!” त्याच्या चेहे-याकडे बघून हा तितका बनेल असेल असं काही मला वाटलं नाही. म्हटलं याला जरी माहिती दिली तर हा फार फार तर काय करेल, एखाद्या कंपनीला माहिती विकून पैसे कमवेल. ती कंपनी आपल्याला कॉल करेल, सर ही ऑफर आहे, ती ऑफर आहे, असं आणि तसं! आपण अशा ऑफर्सला नाही सांगू शकतो. असा विचार करुन मी त्याला फॉर्म भरुन दिला.
ही गोष्ट मी विसरुनही गेलो. रविवारी सकाळी त्यांचा फोन आला.
“सर मी अबक कंपनीमधून अमुक अमुक बोलतेय. काल तुम्ही अमुक अमुक मॉलमधे कूपन फॉर्म भरुन दिला होता का?” – एक नाजूक आणि मंजूळ आवाज.
“हो, का?”
“सर अभिनंदन! तुमच्या कुपनला बक्षिस लागलंय! आज तुम्ही आणि तुमच्या मिसेस बक्षिस घ्यायला येऊ शकता का? आज संध्याकाळी पाच वाजता अमुक अमुक ठिकाणी… मी तुम्हाला पत्ता एसएमएस करते. तुम्हाला एक बाऊल सेट आणि पंचवीस हजार रुपयांचं एक गिफ्ट हॅम्पर मिळालेलंय!”
मी अजून धक्क्यातून सावरतच नव्हतो! इतकं मोठं बक्षिस! मला… का पण? काही कळेचना! बायकोला सांगितलं. तिलाही खूप आनंद झाला! शेवटी विचार केला जाऊन तर बघू! हे प्रकरण काय आहे हे तिथे गेल्यावरच कळेल. तेव्हाच त्या नाजूक आवाजाला सांगून टाकलं की आम्ही येतोय. तरीही डोक्यात किडा वळवळतच होता की हे नक्की असं काही नाहीये! देव माझ्यावर इतका मेहेरबान नक्कीच नाहीये! काहीतरी वेगळंच आहे हे!
तिथे गेल्यावर बघितलं तर आमच्यासारखे अनेक कपल्स तिथे आले होते. सगळ्यांच्या चेहे-यावर उत्सुकता आणि आनंद दिसत होता. अनेक टायधारक इकडून तिकडे फिरत होते. त्यांच्या हातात ब-याचशा फाईल्स होत्या. आतमधे एक हॉलमधे बरेचसे टेबस मांडून ठेवलेले होते. वरवर पाहता ते एखाद्या रेस्टॉरंटसारखं वाटत होतं. आम्हाला एका टायवाल्याने आत नेलं आणि एका टेबलावर बसवलं. तोही आमच्यासमोर बसला.
“सर हे काय आहे तुम्हाला काही कल्पना आहे का? की आम्ही हे गिफ्ट का देत आहोत?” -टायवाला.
“हो. ही तुमची सेल्स प्रमोशनल ऑफर आहे!” -मी.
“बरोबर सर! तुम्ही आमच्या कंपनीचं नाव आधी कधी ऐकलं आहे का?”
“नाही!”
मग जवळजवळ अर्धा तास तो ही कंपनी कशी आंतरराष्ट्रीय आहे, जगभरात तिच्या किती शाखा आहेत हे गुणगान करत होता. त्याने आम्हाला बरेच प्रश्नही विचारले जसं तुम्हाला फिरायला आवडतं का? आतापर्यंत कुठेकुठे फिरला आहात? काय करता? वार्षिक उत्पन्न किती ?(इथे माझ्या भुवया मनातल्या मनात उंचवल्या गेल्या!) मग त्याने सांगितलं की ही कंपनी किती मोठी आहे, आम्ही तुम्हाला ह्या कंपनीची लाईफटाईम मेंबरशिप देऊ करतो आहोत. कालपर्यंत आम्ही दहा हजार कूपन्स वाटली आहेत. त्यातून आम्ही शंभर भाग्यवान विजेते निवडलेले आहेत. त्यात तुम्ही एक आहात. तर जर तुम्ही या क्लबचे मेंबर झालात तर आम्ही तुम्हाला ह्या ह्या सुविधा पुरवू. ह्या सुविधा जगभर आहेत. तुम्हाला आमच्याकडून सौना बाथ, जाकुझी आणि ब-याच काही सुविधा मोफत आहेत. असं बरंच बरंच काही त्याने सांगितलं. आणि अजून एक….
“यासाठी तुम्हाला इतके इतके पैसे भरावे लागतील. ते तुम्ही हप्त्यातही भरु शकता.” ती रक्कम जवळजवळ दोनेक लाखांच्या घरात जात होती. आणि याच प्रश्नाची मी वाट बघत होतो की हा मुद्याचं कधी बोलतो!
मी त्याला म्हटलं,”एक प्रश्न विचारु?”
“विचारा.”
“तुम्ही सौना बाथ घेतलाय कधी?”
“नाही. का?”
“त्यावाचून तुमचं काही अडलं का?”
“नाही!”
“मग माझं काय अडणार आहे? हे फक्त एक उदाहरण झालं. यातल्या किती गोष्टींचा आपल्याला खरंच गरज असते? आज मी जगभर, जगभर जाऊद्या भारतभर फिरायला कधी जाणार आहे, उद्या मी काय करणार आहे हेच मला माहीत नाही, तर मी या वर्षी, पुढच्या वर्षी कुठे फिरायला जाणार हे आत्ताच कसंकाय सांगू शकतो? मी रोज ऑफिसमधे येऊनजाऊन तीस किलोमीटर फिरतो. दर महिन्यातून एकदा माझ्या मूळ गावी जातो. ते इथून साडेचारशे किलोमीटर आहे, म्हणजे जाऊनयेऊन नऊशे किलोमीटर,अशा सरासरीने मी रोज जवळजवळ साठ किलोमीटर फिरतो. मग मला सांगा, इतकं रोज फिरल्यावर मी मला यावर्षी फिरायला अमुक अमुक ठिकाणी जायचंय असं ठरवू शकतो का? तुम्ही मला वर्षातून आठ वेळा समारंभासाठी हॉल फुकट वापरायला देऊ करताय, खरंच मी वर्षातून आठ समारंभ तिथे करणार आहे का? तुम्ही केले असते का? बरं त्या हॉलच्या व्यावसायिक वापराला तुमचा नकार आहे! मग मी हॉल घेऊन काय करु? पैसे म्हणाल तर तो प्रॉब्लेम मला नाहीचे! पण गरज वेगळी आणि हौस वेगळी!” यावर मात्र तो निरुत्तर झाला.
खरंच विकतच्या अशा सुखाची गरज असते का? मी जर उद्या अशा ट्रीपला गेलो आणि जर माझ्या डोक्यात हाच विषय असला की या महिन्याचा हप्ता मी कसा भरु, इतके पैसे तर आज माझ्याकडे नाहीयेत, तर मी त्या ट्रीपचा आनंद खरंच लूटू शकेन का? माझ्या उत्पन्नातला काही भाग मी मौजमजेवर जरुर खर्च करेन, पण किती, कुठे आणि केव्हा हे देखील मीच ठरवेन की नाही? आपण खूपदा गरजा विकत घेतो, त्याबदल्यात आपलं सुख, आपली मन:शांती आपण देऊन टाकत असतो. हा प्रसंग तर एक उदाहरण होता. असे अनेक मोह आयुष्यात येतच असतात. नि:संशय त्यांची स्कीम चांगली होती, पण मला तरी ती अनावश्यक वाटत होती. आज पैसे द्यायचे, ती स्कीम विकत घ्यायची, तिचा हप्ता मागे लावून घ्यायचा, कुणी सांगितली ही कटकट? मी क्रेडिट कार्ड वापरत नाही. त्याचे बरेच फायदे आहेत मला मान्य आहे, पण ते हातात आल्यावर आपलाच आपल्या खर्चावर लगाम राहील याची खात्री कुणी द्यावी?
आज संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर घरात जे घरपण जाणवतं ते मला बाहेर जाणवणार आहे का? मला ट्रीपला जायचं झालं तर मी जवळपास कुठेतरी दोनचार दिवसांकरता जाऊन येऊ शकतो. त्यासाठी मला ऋण काढून सण करण्याची अजिबात इच्छा नाही.
आपल्या गरजा आणि आपल्याला उपलब्ध होऊ शकणा-या सुविधा, यात कुठेतरी एक धूसर सीमारेषा असते. त्या सीमेवर आपला प्राधान्यक्रम लोंबकळत असतो. आपल्याला जर आपला प्राधान्यक्रम ठरवता आला तर जगण्यातले अर्धेअधिक प्रश्न सोपे होतील! तुम्हाला काय वाटतं?

आम्हाला तुमचा Feedback हवा आहे

नमस्कार,
आज बरेच दिवस झाले आपण मराठी कॉर्नरवर active दिसला नाहीत! त्यामुळे आम्हाला आपले मत/ feedback जाणून घ्यायचा आहे. गेल्या महिन्यात अचानकच मराठी कॉर्नर थंड पडलेले दिसून आले. जे सतत active असायचे ते देखिल शांत दिसत आहेत! त्यामुळे आम्हाला आपले मत जाणून घ्यायचे आहे. आम्ही सभासदांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न केला आहे तरिही अशी शांतता ? “ये बात कुछ हजम नही होती यार!” त्यामुळे आम्हाला तुमचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. कदाचित सभासदांना काही problems येत असतिल, किंवा तुम्हाला काही नवे सुचवायचे असेल तर बिनधास्त  येथे “Feedback” या topicवर आपले मत मोकळेपणाने मांडावे.

तुम्हाला जर काही अडचणी येत असतिल, तुमची प्रोफाईल हाताळताना काही गैरसोयी होत असतिल किंवा याहूनही काही वेगळे problems येत असतिल तर नक्की आम्हाला कळवा! तसेच आमचे सर्व मेल तुम्हाला मिळतात ना? हे देखिल जाणून घ्यायचे आहे. सतत तुम्ही तुमच्या मेलचे “Spam” किंवा “Junk” हे फोल्डर तपासत जा! कारण कधी कधी आमच्याकडून आलेले मेल तेथेही जाऊ शकतात!

आपले मत/Feedback जाणून घेण्यास आम्हाला निश्चितच आवडेल आणि आमचे काही चुकत असेल किंवा आणखी काय सुविधा आमच्या सभासदांना हव्या आहेत हे देखिल जाणून घेण्यास आवडेल!
आपल्या feedbackच्या प्रतिक्षेत!

marathi corner team

अजब भिकारी

 भिकारी म्हटला कि, फाटके मळके कपडे घातलेली,ओबड-धोबड चेहऱ्याची कितीही नाही म्हंटले तरी तुमचा पिछ्या न सोडणारी लोचट व्यक्ती डोळ्या समोर उभी राहते.रस्त्याने,स्टेशन च्या बाहेर,बस स्थानक,देवळा जवळ हमखास दिसते.कारण त्यांना माहित असते कि माणसाच्या मनात श्रद्धा,दया करूणा भरलेली आहे आणि माणसाची हीच वृत्ती त्याला भिक देण्यासाठी मजबूर करीत असते.
मुंबईच्या या भिकार्यांच्या जीवनावर एक “ट्राफिक सिग्नल” नावाचा चित्रपट सुद्धा निघाला आहे.अश्या या भिकारी संबंधी लोकमत या वृत्तपत्रात एक बातमी वाचण्यात आली. या बातमी नुसार एकट्या मुंबई मध्ये आज साडे तीन लाखाच्या वर भिकारी आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यांची संख्या तेवढीच आहे. आणि ती वाढत्या बेकारीमुळे वाढतच आहे.कारण भिक मागणे हा बिन भांडवलीचा धंदा आहे.तस पाहीलेतर भिकारी हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित घटक आहे.त्याला ह्या व्यवसायापासून परावृत्त करण्या साठी शासनाजवळ कोणत्याही ठोस योजना नाही.
भिकार्याच्या मालमत्ते विषयीची माहिती जेव्हा शासना समोर आली तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातली.मुंबईतील एकूण भिकाऱ्या पैकी काही भिकारी श्रीमंत असून त्यांच्या नावावर मुंबईत फ्ल्याट आहेत तर काहींच्या नावाने बँकेत लाखोंच्या ठेवी आहेत.काही भिकारी तर उच्यविद्याविभूषित आहे त्यांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला आहे.काहींच्या तर पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करीत आहे.हा असा एक धंदा आहे कि ज्या मध्ये कोणताही कर द्यावा लागत नाही.मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असल्या मुळे त्याचा हिशोब ठेवावा लागत नाही.एकट्या मुंबईत भिकार्याच्या  पैश्याची वार्षिक उलाढाल एकशे ऐंशी कोटीच्या पेक्ष्या जास्त आहे. तुम्हाला रस्त्याने जाताना एखाद्या भिकार्याने भिक मागितली तर त्याला पैसे देताना नीट विचार करा कि, तुम्ही ज्याला भिक देत आहात तो कदाचित तुमच्या पेक्षाही श्रीमंत असू शकतो. नाही का? 

सचिन वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

चार दिवसापासून आमच्या नाक्यावर सचिन तेंडुलकरला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करणारा एक मोठा बॅनर लावला होता. नशीब आमच्या राजकारणी लोकांना स्वतःचे बॅनर लावण्यापासून फुरसत मिळाली आणि नशीब क्रिकेटच्या देवाची आठवण झाली. 
आपल्या सचिनचा आज वाढदिवस. देव करो आमच्या ह्या देवाला उदंड आयुष्य लाभो. महाभारतात एकदा पहिले होते. जेव्हा भीष्म युद्धापूर्वी दुर्योधनाला समजावत असतात की पांडवांबरोबर युद्ध करू नकोस साक्षात भगवंत  (श्रीकृष्ण) त्यांच्या बाजूने आहे. मला नेहमी विचार पडायचा कि ह्यांना कसे समजत असेल की श्रीकृष्ण देवाचे रूप आहे. तीच गोष्ट श्रीरामाच्या बाबतीत होती. त्यावेळेची प्रजा, ऋषी हे रामाला भगवंताचे रूप मानायचे. मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा कि ते देवाला कसे ओळखत असतील? साक्षात देवा बरोबर राहायला त्यांना कसे वाटत असेल? देवाचे चमत्कार बघताना काय मनात येत असेल? पण जसजसा मोठा होत गेलो आणि सचिन ला बघत गेलो. त्याच्या बॅटीतुन घडणारे चमत्कार पहिले आणि माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळत गेली. 
image001ऍलन बॉर्डर ने जेव्हा गावस्करचा रेकोर्ड तोडला होता त्यावेळेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता. मला वाटत नाही हा रेकोर्ड जास्त दिवस माझ्या नावावर राहील. सचिन तेंडूलकर सारखे बॅटसमन सध्या क्रिकेट खेळत आहेत.त्यावेळेला तर सचिन खूप लहान होता. नुकताच बहरत होता. अजून त्याने आपले रंग पण दाखवले नव्हते. तरी सुद्धा बोर्डरने त्याच्यातल्या देवाला ओळखले होते.
गेले वीस बावीस वर्षे तो खेळतो आहे. कधी कोणाबरोबर भांडणे नाहीत, झगडे नाहीत, स्लेजिंग नाही, पोंटिंग सारखे प्रेस कॉन्फेरन्स घेऊन दुसऱ्या टीमवर कधी कमेंट नाहीत, कोणी कितीही टीका करुदेत कधी कोणाला उलटी उत्तर नाहीत, जे काही सांगायचे आहे त्याने ते त्याच्या बॅटनेच सांगितले. पाकिस्तानच्या सेमी फायनल आधी सुद्धा त्याने नवीन बॅट घेतल्या होत्या तेव्हा तो कितीतरी तास लाकडाच्या हातोडीने बॅटला ठोकत बसला होता. फक्त बॅट चा स्ट्रोक वाढवण्यासाठी. ह्या वयात पण तो धावा मिळवण्यासाठी एवढा उत्सुक असतो जेवढा एखादा नवीन भरती झालेला खेळाडू असतो. 
ग्रेट !! सिम्पली ग्रेट !!!
त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात माहिती आहे?
” मला वाटते माझ्या मुलाने सचिन तेंडूलकर बनावे.” ब्रायन लारा.

“आम्ही इंडियाच्या टीम बरोबर नाही हरलो. आम्ही फक्त सचिन तेंडुलकर नावाच्या माणसाबरोबर हरलो”-मार्क टेलर.

“तुमच्या बरोबर काहीही वाईट घडू शकत नाही जर तुम्ही भारतातील विमानात असाल आणि सचिन तेंडूलकर तुमच्या सोबत असेल.” हाशिम आमला.

” तो चालताना वापरायच्या काठी ने सुद्धा चांगला लेग ग्लान्स खेळू शकतो.”- वकार युनूस.

“..जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज आहेत. १. सचिन तेंडूलकर आणि २. इतर सर्व.”- अँडी फ्लॉवर.

‘ मी देव पहिला आहे. तो टेस्ट मध्ये भारतासाठी चवथ्या नंबरवर फलंदाजी करतो.” – मॅथ्यु हेडन.

“मी स्वत:ला बघतो जेव्हा मी सचिन ला फलंदाजी करताना बघतो.”- सर डॉन ब्रॅडमन.

“जेव्हा सचिन फलंदाजी करत असतो तेव्हा तुम्ही तुमचे गुन्हे आरामात करू शकता, कारण देव सुद्धा सचिनची फलंदाजी बघण्यात व्यस्त असतो.” – ब्रिटीश मिडिया.

” मला क्रिकेट बद्दल काही माहिती नाही पण मी सचिनला खेळताना बघतो. मला त्याचे क्रिकेट आवडते म्हणून नाही तर त्यावेळेला माझ्या देशाचे उत्पादन ५% ने कमी का होते ते जाणून घेण्यासाठी.” बराक ओबामा.

” सचिन, आम्हा सगळ्यांना बनायला आवडेल असा माणूस.” अँड्रयु सायम्ंडने त्याच्या टी शर्ट वर लिहिले होते. सचिनने हा टी-शर्ट स्वत: साईन केला होता.

“तुझे पता है तुने किसका कॅच छोडा है.”- वासिम अक्रमने अब्दुल रज्जाकला सचिन चा झेल सोडल्यावर.

” सचिन प्रतिभाशाली आहे. मी नश्वर आहे.” – ब्रायन लारा.

” मी त्याला जेव्हा जास्त बघतो तेव्हा जास्त भ्रमित होतो कि मी जे बघतोय ती सचिनची सर्वात चांगली खेळी आहे का?”….एम. एल. जैसिम्हा.- पूर्व क्रिकेटर.

” मी शंभर टक्के सांगू शकते की सचिन एक मिनिट पण नाही खेळणार जेव्हा तो स्वत: क्रिकेट एन्जॉय करणार नाही. तो अजून ही तेवढंच वेडा आणि उत्सुक आहे क्रिकेट खेळण्यासाठी.” -अंजली तेंडूलकर.

” इंडियामे आप एक बार पंतप्रधान को कोर्ट के कटघरेमे खडा कर सकते हो, सचिन को नही.” नवज्योत सिंग सिद्धू.

” त्याची विकेट घेण्यासाठी तयारी न केलेली बरी कारण तुम्हाला वाईट तरी नाही वाटणार जेव्हा तो तुमच्या उत्कृष्ट बॉल वर जेव्हा चौकार मारतो.”- ऍलन डोनाल्ड.

” शिमला वरून दिल्लीला ट्रेन ने जाताना मध्ये एक स्टेशन लागते. गाडी तेथे फक्त दोन मिनिटे थांबते. पण गाडी जास्त वेळ थांबली कारण सचिन ९८ वर खेळत होता. सर्व प्रवासी, रेल्वे ऑफिसर, मोटरमन सर्व जण सचिनचे शतक बघायला थांबले होते. हा प्रतिभाशाली खेळाडू भारतात वेळेला पण थांबवू शकतो.” … पीटर रेबौक – ऑस्ट्रेलियाई पत्रकार.

“नशीब क्रिकेट त्यावेळेला प्राचीन युगामध्ये नव्हते. नाहीतर क्रिकेट हे देवाचे नाव झाले असते आणि सचिन त्याचा अकरावा अवतार झाला असता” – हरि पटनायक

“सचिन कधीच चीटींग करू शकत नाही. तो क्रिकेट साठी महात्मा आहे जे गांधीजी राजकारणासाठी होते.”
एनकेपी साळवे, पूर्व केंद्रीय मंत्री जेव्हा सचिन वर बॉल कुरतडल्याचा आरोप केला गेला होता तेव्हा.

” माझ्या वडिलांचे नाव पण सचिन तेंडूलकर आहे” – सचिनची मुलगी सारा.

” जर क्रिकेट राम असेल तर सचिन हनुमान आहे. रामाचा सर्वात मोठा शिष्य.” एम एस धोनी.

” तो स्वत:ला कधी रागावू देत नाही. मि त्याला अजून रागाने बॅट आपटताना बघितले नाही जरी त्याला चुकीचे आउट दिले असले तरी सुद्धा. त्याने एक बाउल आईस क्रीम जास्त खाल्ले कि समजायचे कि तो रागात आहे किंवा टेन्शन मध्ये आहे.” झहीर खान.

“बच्चे ! एक दिन तू बहुत बडा बनेगा. लेकिन वो टाईम पे तेरे पहिले कप्तान को मत भूलना.” के. श्रीकांत.

” ग्रेग चापेल गांगुली के जैसे सचिन से भी छुटकारा पाना चाहते थे. लेकिन उनकी योजना विफल रही.” दिलीप वेंगसरकर.

” तो नेहमी जिम ला जातो कधीच चुकवत नाही.” एक टीम प्लेयर.

” तू अश्या चुकीच्या बॉलला का आउट होतोस ?” – अंजली तेंडूलकर जेव्हा सचिन ऑफ साईड चा फटका मारताना आउट व्हायचा.

“असे माझ्या बरोबरच का झाले मला अजून क्रिकेट खेळायचे आहे?” सचिन स्वत: आपल्या बायकोला म्हणाला जेव्हा त्याला टेनिस एल्बो झाला होता आणि त्याला ऍडमिट केले होते.

अश्या ह्या ग्रेट माणसाबद्दल लिहायला बसलो तर पुढचा वाढदिवस येईल.
तुम जियो हजारो साल…साल के दिन हो पचास हजार.

मोबाईल आणि गेम्स -भाग २


     नमस्कार मित्रांनो,
आज बघूया गेमिंग कंपन्यांचं काम कसं चालतं ते!
गेमिंग कंपन्यांचं काम बरचसं आपल्या फिल्म इंडस्ट्रीसारखं आहे! कसं ते सांगतो.
चित्रपटाला प्रोड्यूसर असतो, गेमलाही असतो.
चित्रपटाला कथा असते, गेमलाही असते.
तिथे एका चित्रपटासाठी काम करणा-यांचा एक संघ असतो,(टीम असते, यात कलाकार आणि तंत्रज्ञ सगळेच आलेत.), इथेही तसंच असतं.
इतकंच नाही तर जिथे चित्रपट बनतो त्या जागेला स्टुडिओ म्हणतात, तसं इथेही स्टुडिओच म्हणतात, असे बरेचसे साम्यस्थळ आहेत.

        आधी एकजण गेमची संकल्पना घेऊन निर्मात्याकडे जातो. (चित्रपटाच्या बाबतीत कथालेखक जातो तसा!). त्या संकल्पना मांडणा-याला डिझायनर म्हणतात. तो गेम्स डिझाईन करतो. गेमिंग कंपनीत हे एक पूर्णवेळ पद असतं. निर्माता त्यावर विचार करतो आणि जर त्याला संकल्पना आवडली तर तो निर्मितीप्रमुखाला सांगतो.(जसा चित्रपटाचा कार्यकारी निर्माता…गेमची पूर्ण निर्मिती याच्या देख्रेखीखाली होते.) त्यानंतर त्या गेमवर दीर्घकाळ चर्चा होऊन हा गेम निर्माण करायचं की नाही ते ठरतं. या बाबीबर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे आहेत.

१) सद्यपरिस्थितीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाने हा गेम बनवता येईल का?
२) जर तसं नसेल, तर नविन तंत्रज्ञान शिकून हा गेम बनवायला किती वेळ लागेल? तोपर्यंतच्या चालन खर्चाचं (ऑपरेशनल कॉस्ट )काय?
३) जर तसं केलंही, तरी हा नवीन बनलेला गेम आपल्याला तितकं उत्पन्न मिळवून देऊ शकतो का, की ज्याने किमान त्याचा निर्मितीखर्च तरी भरुन निघेल?
४) या गेमसाठी लागणारं तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आपल्याकडे उपलब्ध आहे का?
५) जास्तीत जास्त तीन महिन्यात हा गेम तयार होऊ शकतो का?
६) हा गेम बनवण्यासाठी जास्तीत जास्त किती लोकांची टीम बनवावी लागेल?
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
७) आपण जो गेम बनवणार आहोत त्याला खरंच काही निर्मितीमूल्य आहे का? म्हणजे संकल्पना लोकांना आवडेल ना? तो गेम खेळतांना लोक त्यात गुंगून जातील ना? आणि असं बरंच काही…

       आता खरी गेम बनवायला सुरुवात होते. आधी या गेममध्ये कायकाय असणार आहे त्याचा तक्ता आणि प्रवाह आकृती बनवली जाते. ती टीममधल्या सर्वांना पाठवली जाते. सर्वांच्या शंका आणि सुचनांवर साधकबाधक चर्चा होते आणि या सगळ्या निकषांवर ती संकल्पना खरी उतरली तर गेम बनवणारे (डेव्हलपर्स) गेम बनवायला सुरुवात करतात.

        आधी फोनच्या कुठल्या चालनप्रणालीसाठी हा गेम बनणार आहे ते ठरतं. त्यानंतर एक आधारभूत फोन घेऊन त्यावर काम सुरु केलं जात. (बेसिक फोन). काही काही कंपन्यांमधे गेम्सचा सर्वसमावेशक आराखडा तयार असतो. (त्याला गेम इंजिन म्हणतात). त्याला हवं ते इनपुट दिलं की ते इंजिन ब-याचशा गोष्टी आपणहून करतं. तसं नसेल तर कामाच्या प्रत्येक भागाकारता (मॉडेल) नवीन कोड लिहावा लागतो. पण तो लिहितांना हे भान ठेवावं लागतं की हा कोड आपल्याला थोडासा बदल करुन दुस-या गेम्ससाठीही वापरता यायला हवा (पुनर्वापर संकल्पना (कोड रियुजॅबिलिटी)) आणि त्याने कमीत कमी जागा वापरावी (ऑप्टिमाईज्ड). कारण मोबाईलची मेमरी खूप कमी असते.

        गेम बनवातांना तुम्ही जी चित्रे बघतात ती खरंतर तुम्हाला खिळवून ठेवत असतात. त्यानंतर त्या गेममध्ये असलेले स्पेशल इफेक्ट्स तुम्हाला अचंबित करतात. हे सगळं काम कंपनीतले चित्रकार करत असतात. त्यांना आपण ग्राफिक डिझायनर म्हणतो. गेममधली पात्रे एकदा निश्चित झाली की हे डिझायनर्स ती पात्रे बनवायला सुरुवात करतात. सर्वसाधारणपणे ही पात्रे “फोटोशॉप” मधे बनवली जातात. ही सर्व चित्रे एका पट्टीवर ठेवून डेव्हलपर्सला दाखवली जातात आणि त्याला हाच परिणाम गेममधेही दाखवायला डेव्हलपरला सांगितलं जातं. उदाहरणाने स्पष्ट करतो.

    वरील चित्रात तुम्ही एका स्फोटाची पट्टी बघत आहात. यात एकाच स्फोटाच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत. गेमिंगमधे हाच स्फोट दाखवतांना प्रत्येक स्थिती एकदा दाखवली जाते. ती किती वेगात दाखवायची हे ग्राफिक डिझायनर सांगतो. त्यामुळे त्याला हवा तो अ‍ॅनिमेशन इफेक्ट मिळू शकतो. साधारणपणे याच पद्धतीने अ‍ॅनिमेशन केलं जातं. जेव्हा गेम्समधील पात्रे बनत असतात (गेमिंगच्या भाषेत त्यांना “स्प्राईट” म्हणतात) तेव्हा ती बनेपर्यंत डेव्हलपर्स आपल्यापुरती डमी पात्रे बनवून काम सुरु करतात. ही पात्रे अगदी ठोकळ्यापासून काहीही असू शकतात. गेमच्या मुख्य भागाला, जो तुम्ही खेळता त्याला इनगेम लॉजिक म्हणतात. त्यावर एकच जण काम करतो. दुसरा एखादा त्याचवेळी गेमच्या मेनूवर काम करत असतो. तिसरा कुणीतरी गेममधे झालेला स्कोअर साठवून ठेवण्याच्या पद्धतीवर काम करत असतो. एखाद्या गेममधे जर स्कोअर आंतरजालावरच्या एखाद्या संस्थळावर पाठवायचा असेल तर त्यावर काम करतो. प्रत्येकाचा कामाचा एक एक भाग संपला की तो भाग गुणवत्ता तपासणी विभागाकडे (क्वालिटी अ‍ॅशुरन्स टीम) जातो. त्या विभागाने सर्वकाही अपेक्षेप्रमाणे असल्याचं कळवलं की मगच पुढचा भाग तयार करतात. हे सगळं सुरु असतांना प्रोड्युसर या सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून असतो. कुठे कुणाला काही समस्या आल्यास ती सोडवण्याची तो व्यवस्था करतो. माहिती गुणवत्ता विभागाचं काम यात अतिशय महत्त्वाचं असतं. गेम तपासत असतांना जर त्यांनाच तो आवडला नाही तर ग्राहकांना आवडेल का, हा विचार पूर्ण टीमला कायम मनात ठेवून काम करावं लागतं. गुणवत्ता विभाग अगदी डोळ्यात तेल घालून एक एक भाग तपासतो. वरवर बघणा-याला वाटतं की काय मजा आहे यांची, एकतर गेम्स खेळायचे, वरुन त्याबद्दल पैसे पण मिळणार! पण खरं असं आहे की त्यात “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!”
       अशा पद्धतीने एकदाचा एक गेम तयार झाला की त्याचं पोर्टिंग केलं जातं. पोर्टिंग म्हणजे काय हे मी मागच्या भागांमधेच स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर तो गेम विकण्यासाठी पाठवला जातो. गेम तयार होत असतांना निर्माता आणि विपणन अधिकारी एकत्र येऊन तो विकण्याची व्यवस्था करत असतात. त्यामुळे वेळोवेळी ते गेम्सची आतील चित्रे (इनगेम इमेजेस) मागून घेऊन गेम्स खरेदी करणा-या कंपन्यांना पाठवत असतात. त्याचा लूक जर आवडला तर खरेदीदार गेम विकत घेण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ब-याचदा गेम तितकासा तयार नसेल तर ग्राफिक डिझायनरच त्या इमेजेस बनवून देतात. नंतर गेम त्या चित्रातल्या स्थितीला पोचतो. अर्थात हे करणं यात फसवणूकीचा प्रकार नसून आली वेळ साजरी करणं असतं.

       बाजारात तुमच्या कंपनीचं नाव होईपर्यंतचा काळ कंपनीसाठी आणि अर्थातच सर्व कर्मचा-यांसाठी कसोटीचाच असतो. मात्र एकदा तुमचा एखादा गेम लोकांना खूप आवडला तर लोक तुमच्या कंपनीच्या पुढच्या गेमची आतुरतेने वाट बघत असतात. परत एकदा चित्रपट आणि गेमिंगमधलं साम्य सांगतो. तुम्हाला आत्ता आलेला एखादा चित्रपट आवडला तर तुम्ही तोच तो चित्रपट वर्षानुवर्ष बघत बसत नाही. गेम्सचं पण तसंच आहे. एखादा गेम खूपदा खेळल्यानंतर लोकांचा त्यातला रस कमी होतो. त्यांना पुन्हा काहीतरी नवीन हवं असतं, ते जर तुम्ही देऊ शकलात तर ठीक आहे अन्यथा तुमचा व्यवसायच बंद पडायची भीती असते. जसं एखाद्या दिग्दर्शकाचा एखादा चित्रपट लोकांना खूप आवडतो. लोक त्याला रातोरात स्टार बनवून टाकतात, त्याच्या पुढच्या चित्रपटाची आवर्जून वाट बघितली जाते आणि पुढच्या चित्रपटात जर तो लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करायला कमी पडला तर लोक त्याची पद्धतशीरपणे “वाट” लावतात. गेम्सचंही तसंच! थोडक्यात गेम्सचं आयुष्य मर्यादित असतं.
जेव्हा गेम्ससाठी जेटूएमई ही भाषा जास्त वापरात होती तेव्हा गेम्सची पायरसी ही एक मोठीच डोकेदुखी होती. जेटूएमई भाषेत बनवलेल्या गेम्सची पायरसी अतिशय सोपी होती, आहे. लोक एकदा विकत घेतलेला गेम दुस-या कुणालाही फॉरवर्ड करत असत,अजूनही करतात, त्यामुळे गेमिंग कंपन्यांचा महसूल बुडतो. प्रत्येक कंपनी आपल्या स्वत:च्या संस्थळावर हे गेम्स आपल्या मोबाईलमधे उतरवून घेण्यासाठी दुवा (लिंक) द्यायची आणि त्याबद्दल पैसे आकारायची. कुणी असा गेम उतरवून घेतला तरच कंपनीला पैसे मिळायचे. पण ज्याने तो गेम उतरवून घेतलेला आहे तो तो गेम इतर दहा जणांनाही वाटू शकत होता. गेम्सच्या वितरणासाठी कुठलीही केंद्रीत पद्धत नव्हती. आताच्या पद्धतींबद्दल सविस्तर लिहीनच.

      आपला चित्रपट धो धो चालतोय, असं बघितल्यावर त्यात काम करणा-या कलाकारांना, तंत्रज्ञांना जो अवर्णनीय आनंद होतो, तोच आनंद गेमिंग कंपनीतल्या कर्मचा-यांनाही त्यांचा गेम बाजारात चालल्यावर होत असतो.

     हे सर्व झालं आपला गेम आपणच बनवून विकणा-या कंपन्यांच्या कार्यपद्धतीबद्दल! काही कंपन्या गेम्स बनवून द्यायची ऑर्डर स्वीकारतात आणि ग्राहकाला जसा हवा तसा गेम बनवून देतात. त्यांना ’हा गेम बाजारात चालेल का?’ याचा विचार करण्याची गरज नसते. त्यांना डिझाईनही करावं लागत नाही. हे काम सोडलं तर बाकी पद्धत सारखीच असते.

साधारणपणे या प्रकारे मोबाईल गेमिंग कंपन्यांचं काम चालत असतं.
        उर्वरीत भागांवर नंतर स्वतंत्र पोस्ट टाकेनच. अचानक आलेल्या कार्यबाहुल्यामुळे ही पोस्ट टाकण्यात खूपच दिरंगाई झाली, त्याबद्दल क्षमस्व!
आपल्या सूचना आणि प्रश्नांचं स्वागतच आहे!

(सर्व चित्रे आंतरजालवरुन साभार)