भारत पाकिस्तान सेमी फायनल

भारत पाकिस्तान च्या सामन्यावर खूप काही लिहिले गेले आहे. मी लिहायचा विचार केला कारण कालचा दिवस खूप चांगला गेला. त्याच्या आठवणी चांगल्या कोरून राहाव्या म्हणून विचार केला लिहून काढाव्या. आता लहान असलेली जनरेशन किंवा पुढे येणारी जनरेशन नी विचारले कि भारत पाक ची सेमी फायनल कशी होती तर सांगता आली पाहिजे म्हणून लिहून ठेवावीशी वाटतेय. काय भरवसा परत पाक भारत समोर कधी येईल आणि काही दिवसांनी तर तो देशाच्या नकाशावरूनच गायब होण्याची भीती वाटते.
सामना चालू व्हायच्या आधीच २ दिवसापासुन सुट्टी मिळेल कि नाही ह्याची चर्चा चालू होती तेवढ्यात पाक ने त्यांच्या इथे राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली ऐकून आपल्याकडे का नाही झाली ह्याची गरमागरम चर्चा चालू होती. ऑफिस मध्ये काही मित्रांनी सुट्टी टाकली पण, आणि साहेब लोकांनी इमानदारीत मान्य पण केली. माझा एक मित्र म्हणाला कि तू सुट्टी घेऊ नको करून तू सुट्टी घेतली कि आपण हरतो. (आमच्या ऑफिस मध्ये इंटरनेट सर्वाना दिलेले नाही आहे आमच्या ग्रेड ला नाहीच नाही. सुदैवाने एकदा मोठा बॉस खुश असताना त्याच्या कडून परवानगी घेऊन ते चालू केले होते. त्यामुळे मी मटा च्या साईट वर स्कोर बघून सर्व मित्र मैत्रिणींना फटाफट फोरवर्ड करत असतो. अगदीच क्रुशिअल सामना असेल तर रेडीओ वर कॉमेंट्री ऐकत मेल वर लिहून पाठवतो. आमच्या ऑफिस मध्ये क्रिकेट संदर्भातल्या सर्व साईट सर्वर पातळीवरच बंद करून ठेवल्या आहेत. नशिबाने मटा चालू असते म्हणून स्कोर मिळतो.)  तर गेल्या काही महत्वाचे सामन्याची मी रनिंग कॉमेंट्री करून सर्वाना अपडेट देत असतो. काही सामन्याच्या वेळेला माझे महत्वाचे काम असल्यामुळे मी सुट्टीवर होतो आणि त्यादिवशी सामना हरलो होतो. असे दोन तीन वेळा झाले ते सुद्धा त्याच मित्राने दर्शविले. तेव्हापासून काही महत्वाचे सामने असेल तर मी सुट्टी घेतच नाही, भले मला बघायला मिळाले नाही तरी चालेल. अर्थात सुट्टी जर ऑफिशिअल असेल तर तो अपवाद असतोच. त्यामुळे ह्या वर्ल्ड कप चे सामने बघायला तरी मिळाले.
तर मित्राने आठवण करून दिल्यामुळे मी सुट्टी टाकायचा विचारच रद्द केला आणि ऑफिस मध्येच राहायचे ठरवले. ऑफिस मध्ये टीवी चा बंदोबस्त होत होता त्यामुळे काही काळजी नव्हती. सकाळपासून सामन्याचे वेध लागले होते. बस, ट्रेन सगळीकडे तीच चर्चा चालू होती. भारतात एका अभूतपूर्व बंदला सुरुवात होणार होती. असा बंद जो कुठल्याही राजकीय पार्टीने पुकारला नव्हता आणि तरी त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळेल ह्याची खात्री होती, मोठमोठ्या खाजगी ऑफिसेस नी आधीच सुट्टी जाहीर केली होती. काही ऑफिसेस नी अर्धा दिवसाची सुट्टी दिली होती. ज्यांना पूर्ण दिवस होते ते मनातल्या मनात शिव्या घालत कामावर येणार होते. रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने हे रस्त्यावर काढणार नव्हते. सर्व राजकीय नेते रस्त्यावर न उतरता घरात टीवी समोर बसून राहणार होते. मॉल, मल्टीप्लेक्स सगळी रिकामी होणार होती. जिथे टीवी किंवा स्क्रीन चा बंदोबस्त केला होता तिथेच फक्त गर्दी दिसणार होती. रस्ते दोन नंतर ओस पडणार होते, सदानकदा भरलेल्या मुंबईच्या लोकल रिकाम्याच धावणार होत्या. एका अभूतपूर्व बंद ला सुरुवात झाली होती.
ऑफिस मध्ये पोचल्यावर एक सुतकी वातावरण होते. सुट्टी दिली नाही ह्याचे सुतक होते. जसे जसे घड्याळाचे काटे सरकु लागले तस तसे हृदयाच्या धडधडी वाढू लागल्या. एक वाजायच्या आताच जेवणं उरकून घेतली. मटा ची साईट चालू केली आणि बसलो. धोनीने अश्विन ला काढून नेहरा ला घेतले हि बातमी ऐकूनच डोके फिरले म्हटले ह्या माणसाला झालेय काय? सामना जर हातातून गेला तर नक्कीच हा शिव्या खाणार. पण बहुतेक नशीब त्याच्या बाजूने होते. टॉस जिंकून भारताने फलंदाजी घेतली ऐकून आनंद झाला चला सचिन ला सेन्चुरी करायला संधी मिळेल.
india_vs_pakistan_images

पहिले काही ओवर रेडीओ वर ऐकून तर अंगावर काटेच मारायला लागले म्हटले सेहवाग ची अशी फलंदाजी बघायला घरीच राहायला हवे होते. पण काय करणार बॉस समोरच बसून होता स्वत: पण टीवी बघायला जात नव्हता आणि त्यामुळे आम्ही पण जाऊ शकत नव्हतो. शेवटी मनाचा  हिय्या करून आम्ही दोघा तिघांनी टीवी बघायला जाऊ का विचारले आणि परवानगी मिळाली. तसाच धावत जेवायच्या रूम मध्ये जिथे टीवी लावला होता तेथे पळालो. तेथले वातावरण बघून अंगावर सर्रकन काटा मारून गेला, सेहवागने नुकतेच ५ चौकार मारले होते आणि सर्वच नाचत होते. आम्ही पण जाऊन सेलेब्रेशन करायला सुरुवात केली. पुढच्याच ओवर मध्ये सेहवाग ने उपर कट मारला आणि आम्ही एवढा गोंधळ घातला कि विचारायलाच नको,. प्रत्येक बॉलला गोंधळ चालू होता आणि अचानक सेहवाग पायचीत झाला आणि शांतता पसरली. सेहवाग ने रेव्ह्यू घेतला पण त्यात पण आउटच झाला. पुढची सर्व भिस्त आणि सचिन वर राहिली. पण पीच ला चांगला टर्न मिळत होता पाहिजे तसे शॉट बसत नव्हते.

current-pakistan-india-semi-final-photosआणि सामान्यातले दोन महत्वाचे बॉल ११ व्या षटकात टाकले गेले. अजमल च्या गोलंदाजी वर सचिन ला पायचीत दिले गेले आणि सर्व पाकड्यांनी स्टेडियम वर गोंधळ घालायला सुरुवात केली. पाक मध्ये तर नक्कीच फटाके फोडले गेले असतील. सचिन गंभीर कडे आला आणि त्याच्याशी चर्चा केली रिव्यू घ्यायचा कि नाही करण सेहवाग चा रिव्ह्यु फुकट गेला होता. शेवटी सचिनने रिव्ह्यू मागितला आणि स्क्रीन वर दिसायला लागले कि सचिन आउट नाही आहे मग जो भारतीयांनी गोंधळ घातला त्यामध्ये पाकचा आवाज कुठल्या कुठे दाबून गेला. सर्व शांत होत नाही तोपर्यंत त्याच धावसंख्येवर आणि अगदी अजमलच्या पुढच्याच चेंडूवर सचिन थोडा पुढे सरसावला आणि यष्टीरक्षक कामरान अकमलने बेल्स उडविल्या,परत टीवी अंपायर कडे निर्णयासाठी गेला. पण सचिनचा पाय त्याआधी क्रीझमध्ये पोहोचला होता आणि अशाने जल्लोषाला डबल उधान आले. अगदी नाचून, बिचून बोंबा मारत आम्ही गोधळ घातला तेसुद्धा काही सिनिअर बॉस लोक समोर असताना. त्यांनी सुद्धा अगदी मनापासून दाद दिली.
नशीब अंपायर रिव्ह्यू सिस्टीम चालू केली नाहीतर सचिन अशा बाबतीत खूप अनलकी असतो. आउट नसताना त्याला आउट द्यायची अंपायर लोकांना खूप आवड असते साले मोठ्या फुशारकीने सांगत असतील कि मी सचिन ला आउट दिले आहे.  पण कालचा दिवस सचिन चा होता एक नाही दोन नाही तब्बल सहा वेळा त्याला जीवदान भेटले. काल खरच देवच मैदानात फिरत असावा.  जसे ब्रह्मा वर संकट आले कि विष्णू धावत येतो, विष्णू वर आले कि शिवा धावून येतो तसेच क्रिकेटच्या ह्या देवाला सुरक्षा कवच घालून एखादा देवच मैदानावर फिरत असणार. म्हणून तर साधे साधे झेल पाकड्यांच्या हातून सुटत होते.

7829821सेहवाग गेल्यावर भारतीय फलंदाजी पुढे बहरलीच नाही. युवराज तर भोपळा न फोडता परतला होता. गंभीर, कोहली, युवराज, धोनी थोड्या थोड्या वेळाने परतले. पुढे रैनाने चिवटपणे मैदानावर उभा राहून स्कोर २६० वर नेला. घरी यायला बस मध्ये बसलो रस्त्यावर काही मोजके वाहने सोडले तर कोणीही नव्हते. दररोज  कमीतकमी १ ते दीड तास लागतो तिथे काल फक्त ३५ मिनिटात घरी पोचलो. पूर्ण हायवे रिकामा….सातच्या आत घरात. नुकतीच पहिली ओवर टाकून झाली होती. मग टीवी समोर बसून राहिलो ते ४० ओवर संपे पर्यंत उठलोच नाही. नेहरा, हरभजन आणि मुनाफ ची चांगली गोलंदाजी आणि रैना, कोहली ची चांगली फिल्डिंग बघून आनंद झाला. सचिनला मैदान वर बघताना छान वाटत होते. एवढी वर्षे झाली तरी अजून नवीन खेळाडू असल्याप्रमाणे प्रत्येक बॉलवर चांगली फिल्डिंग करतोय, बॉलरला येऊन टिप्स देतोय, कोणाकडून फिल्डिंग चुकली तर हाताच्या खुणा करून सांगतोय. पाक समोर खेळताना ह्या पठ्ठ्याला काय होते काय माहिती आपले जे काही खास शस्त्र, अस्त्र असतील ती सर्व काढून पाकी खेळाडूंवर तुटून पडतो. ह्या माणसाची भूक कधी थांबणार ? देव करो ह्याचा फिटनेस असाच राहो आणि हा अशा हजारो सामने खेळो.

7829812सामन्याचा आनंद लुटण्यासाठी काही राज्यकर्त्यांनी रस्त्यावर मोठे मोठे स्क्रीन लावले होते. आमच्या नाक्यावर सुद्धा अशी स्क्रीन लागली होती आणि तिथून मोठा गोंधळ ऐकायला येत होता म्हणून कपडे करून खाली जाऊन उभा राहिलो रस्त्यावर हि गर्दी पसरली होती. मी पण त्या गर्दीचा एक भाग होऊन गेलो. मित्र एकमेकांना फोन करून बोलवत होते, अरे !घरात काय बघत बसलाय येथे रस्त्यावर ये…काय धमाल येतेय बघ. आता प्रत्येक डॉट बॉल वर आनंद साजरा होत होता. गर्दी मध्ये एक माणूस होता, कोण होता ते दिसला नाही पण आपल्या फाटक्या आवाजात बॉल टाकायच्या आधी एका विचित्र टोन मध्ये ‘आता आउट’, ‘आता आउट’ असे ओरडायचा आणि नेमकी त्या वेळेला विकेट पडायची आणि सर्व लोक गोंधळ घालायचे. मला शेवट पर्यंत त्याचा चेहरा दिसला नाही. पण मजा येत होती तो जेव्हा बोलायचं तेव्हा विकेट पडायची जणू काय ह्याला स्वप्नात दिसत होते. तो पण साला पठ्ठ्या प्रत्येक बॉलला बोलायचं नाही. पब्लिक ने सांगितले तरी नाही बोलायचा, जेव्हा त्याच्या मनाला येईल तेव्हाच बोलायचा आणि विकेट काढायचा.

78299097829839खरच असे सामने एकटे बघण्याला काहीच मजा नसते. शेवटी सामना जिंकल्यावर लोकांनी खुर्च्या घेऊन नाचायला सुरुवात केली, फटाक्यांच्या माळा लागल्या, आकाशात रॉकेट सोडली गेली रस्त्यावर दिवाळी साजरी व्हायला सुरुवात झाली. भारत फायनलला गेला ह्याचा आनंद नव्हता तर पाकला चिरडले ह्याचा आनंद सगळ्यात जास्त होता. आईस्क्रीम ची दुकाने, वाईन शॉप वर थोड्याच वेळात गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. पाकला चिरडण्यात आमच्या सचिनचाच मोठा वाटा होता आणि त्याने हि सांगितले कि पाक विरुद्ध खेळलेले सर्व सामने आणि मिळवलेले विजय हे संस्मरणीय आहेत. धन्यवाद सचिन तुझ्यामुळे आमच्यासाठीहि काही संस्मरणीय आठवणी आहेत.

vijayashree thoDee door

धुंदी चढता विजयश्री ची                                                    
डोळे बंद कुणाचे होती                                                                
जनता““““ ही ““बावरी ““                                               
देशाची जनता ही बावरी 
हा तर उपांत्य सामना होता                                                          
अंतिम तर पुढेच आहे सामना                                                 
ही गोष्टा खरे इंगीत                                                                              
ध्यानी धारा हो टी व्ही रंगीत                                  
पहाता ——-ना  हो घरी ———–                      
पहाताना हो घरी                                                 
शाप jitaaMche ,hope नव्यां शत्रूची                                                   
दोन्ही मिळूनी बला वाढते त्यांची                                                                                   
जाण्या त्या दोघांनाही धीटपणे सामोरी                                                                    
राखुनी ठेवा sTAminaa तुमचा                                                                             
लढाई टी च खरी ,जी रविवारी 
शर्थीनेची लढायची  मैदानावरी                                                          
जनता ही बावरी ,देशाची–                                                         
जनता ही बावरी ———-३० मार्च 2011
                   

पाकड्यांना हरवण्याचा तो आनंद काय वर्णावा !!

पाकीस्तानला चारीमुंड्या चित करण्याचा आनंद काय वर्णावा. काल तमाम भारतीयांच्या जीवनात सोनेरी दिवसाची नोंद झाली, तमाम भारतीयांनी पाकीस्तानला नमवुन अक्षरश: दिवाळी साजरी केली, हजारो लाखो भारतीय सामना जिंकल्यावर रस्त्यावर आले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय साजरा केला.

सामना सुरु झाल्यापासुन सामना संपेपर्यंत सामन्याचा एक एक चेंडु डोळ्याची पापणी न लवु देता पाहणार्‍या भारतीय प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फिटले. कोण खेळले कोण नाही याहीपेक्षा आपला पुर्ण संघ एकदिलाने खेळला आणि अटितटीच्या लढतीत पाकड्यांना हरवुन सामना जिंकुन तमाम भारतीयांनी पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

सचिन दा परत एकदा तळपला, त्याचे शतक १५ धावांनी हुकले हीच काय ती हुरहुर कायम राहीली परंतु त्याच्या शतकापेक्षा भारताचा विजय महत्वाचा होता आणि आम्ही तो मिळवलाच. आम्ही भारतीयांच्या चेहर्‍यावरील ओसंडुन वाहणारा आनंद बघीतला, आफ्रीदी, वकार यांना रडताना पाहीले, हताश शोएब चा चेहरा बघीतला, हाच आमला फायनल होता आणि भारतीय संघाने तो वाजतगाजत जिंकला……

आम्हाला अवर्णनिय आनंद मिळवुन देणार्‍या भारतीय संघाचे शतश: आभार……….
शतकापासुन वंचीत राहीला तरी जिगरबाज खेळी करणार्‍या सचिनचे आभार…..
तमाम भारतीयांनी जयघोष केला…………खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!

पाकिस्तानहो या श्रीलंका फिर भी इंडिया का ही होगा डंका…….

चार बज गये
लेकिन पार्टी अभी
बाकि है,
चार बज गये
लेकिन पार्टी अभी
बाकि है,
पाकिस्तान को हराया
अभी श्रीलंका की
बारी है……!

अस म्हणायला काही हरकत नाही कारण कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २९ धावांनी माती चारत फायनलमध्ये पुन्हा एकदा धडक मारली आहे इंडियाने. बर जाल गिलानी ने आपल्याबरोबर दोन प्लेन आणले होते एक स्वता साठी आणि दुसरे आपल्या टीमसाठी.आता रामाने म्हणजे आपल्या सचिन ने पुन्हा एकदा हनुमानाच्या म्हणजेच  ढोणीच्या साह्याने रावणाच्या लंकेवर विजय मिळवायचा बाकि आहे.
हिप हिप हुर्रे 

चक दे … चक दे इंडिया !
best of luck India…………..

भारत वि. पाकिस्तान..मैदानावरील गरमागरम किस्से !!!

 भारत पाकिस्तानचा सामना म्हंटला की मैदानावरील गरमागरम वातावरण हे ठरलेलं असायचं. विशेषत: विश्वचषकातील लढतींमध्ये असे प्रसंग वारंवार घडलेले आहेत. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ एकूण चार वेळा एकमेकांविरोधात उभे ठाकले असून प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तावर मात केली आहे. या सामन्यांमध्येही असेच काही अविस्मरमीय प्रसंग घडून गेले आहेत. या आठवणींना व्हिडियोंसहित दिलेला हा उजाळा..

      1992 (सिडनी) – इम्रान खानच्या लढवय्या पाकिस्तानी संघाने 1992 च्या विश्वचषकात न्यूझीलॅंड, इंग्लंड अशा भल्याभल्यांना पाणी पाजत विश्वचषकावर कब्जा केला होता. परंतु या प्रवासातही भारताकडून मात्र त्यांना मात खावी लागली होती. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या या बेन्सन अॅन्ड हेजेस विश्वचषकात साखळीत भारताची पाकिस्तानबरोबर गाठ पडली होती. यापूर्वी भारताला इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. तर श्रीलंकेविरूद्धचा सामान पावसामुळे धुतला गेला होता. यावेळी अझरूद्दीन कप्तान असलेल्या भारतीय संघात कपिल देव, आताचे निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत, संजय मांजरेकर यांच्याबरोबरच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचाही समावेश होता. जडेजा, मनोज प्रभाकर, श्रीनाथ, किरण मोरे हे संघातील इतर सदस्य होते. पहिली फलंदाजी करताना भारताला सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या संथ खेळपट्टीवर 49 षटकांत 7 गडी गमावून फक्त 216 च धावा करण्यात यश आले. या धावा जमवण्यात सर्वात मोलाचा वाटा होता तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या छोट्या चणीच्या सचिन रमेश तेंडुलकरचा… सचिनने तब्बल 91 चेंडूंचा सामना करताना नाबाद 54 धावा केल्या होत्या. मात्र शेवटी याच 54 धावा निर्णायक ठरल्या. भारतातर्फे अजय जडेजा, अझरूद्दीन आणि कपिल देवनेही काही छोटेखानी पण उपयुक्त खेळी केल्या. तरी पाकिस्तानसमोर 216 चं आव्हान म्हणजे फारसं काही कठीण वाटत नव्हतं. परंतु भारताच्या श्रीनाथ आणि प्रभाकरने सुरूवातीलाच पाकिस्तानला धक्के देत इंझमाम आणि जाहिद फजलला बाद केलं. दुसरीकडे आमीर सोहेल मात्र खेळपट्टीवर टिकाव धरून होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जावेद मियॉंदादबरोबर त्याची चांगील भागीदारी जमली आणि पाकिस्तानचा डाव आकार घेऊ लागला होता. मात्र अखेर फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या सचिनने इथे आपल्या गोलंदाजीचीही कमाल दाखवली आणि सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या आमीर सोहेलला 63 धावांवर बाद केले. यानंतर पाकिस्तानी डावाची पडझड झाली आणि त्यांचा डाव 173 धावांतच संपुष्टात आला. फलंदाजीत 54 धावा आणि गोलंदाजीत 10 षटकं टाकून अवघ्या 37 धावा देत आमीर सोहेलचा बळी घेणाऱ्या सचिनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सचिनच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी हा सामना नेहमीच लक्षात रहिल. मात्र त्यापेक्षाही या सामन्याची एका खास कारणासाठी नेहमीच आठवण काढली जाते. जावेद मियॉंदाद हा नेहमीच भारताविरूद्धच्या सामन्यात काही गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असायचा. चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर षटकार खेजून पाकला विजय मिळवून देणाऱ्या जावेदची आणखी एक आठवण याच सामन्यातील आहे. जावेद मियॉंदाद आणि भारताचा यष्टिरक्षक किरण मोरे यांच्यातील प्रसिद्ध शाब्दिक चकमक आणि मियॉंदादच्या त्या माकडउड्या याच सामन्यातल्या. मियॉंदाद फलंदाजी करत असताना पाक फंलदाजांवर दडपण वाढवण्यासाठी भारतीय गोलंदाज, क्षेत्ररक्षक (खासकरून यष्टिरक्षक किरण मोरे) हे वारंवार फलंदाजाच्या पायाला चेंडू लागला रे लागला की पायचीतचे जोरदार अपील करायचे. तसेच पाकिस्तानचीच चिडखोर वृत्ती त्यांच्यावर उलटवण्यासाठी किरण मोरेचे मियॉंदादचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न चालले होते. यावर मियॉंदाद चांगलाच चिडला. सचिन गोलंदाजी करताना तो मध्येच थांबला आणि किरण मोरेला त्याने खडसावले. नंतर तर किरण मोरेला चिडवण्यासाठी त्याने माकडउड्या मारून किरण मोरेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर प्रचंड गरमागरमी असताना या दोन खेळाडूंमधील ही चकमक चांगलीच रंगली आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय प्रसंग बनून गेली.
       1996 (बंगळुरू) – किरण मोरे आणि जावेद मियॉंदादमधील किश्शाने 1992 विश्वचषकाचा भारत पाकिस्तान सामना चांगलाच गाजला. यांनतर चार वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकात भारत पाकिस्तान आमनेसामने आले. आणि यावेळीही काहीशा अशाच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. किंबहुना 92 पेक्षा यावेळी मैदानावरील वातावरण चांगलेच तापले होते असं म्हणावं लागेल. कारण 92 ला सामना दूरदेशी ऑस्ट्रेलियात खेळला जात होता, तर यावेळी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी बंगळूरच्या स्टेडियम दणाणून सोडणाऱ्या आपल्याच पाठिराख्यांसमोर खेळत होते. तसेच हा सामना साखळीतील साधासुधा सामना नव्हता. तर उपउपांत्य लढत असल्याने येथे पराभव म्हणजे घरचा रस्ता पकडणं भाग होतं. प्रचंड गाजावाजा झालेल्या या सामन्यातील हिरो (वातावरण तापवण्यासाठी) ठरले आमीर सोहेल आणि वेंकटेश प्रसाद… सिद्धूच्या 91 धावांच्या जोरावर 287 धावांचा डोंगर भारताने उभारलेला होता. याचा पाठलाग करताना या सामन्यासाठी बदली कर्णधार असलेला आमीर सोहेल आणि भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या सईद अन्वर या दोघा पाक सलामीवीरांनीही धडाकेबाज सुरूवात केली होती. श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद या दोघांची धुलाई चाललेली. अखेर संघाच्या 84 धावा झाल्या असताना अन्वरची श्रीनाथने शिकार केली. परंतु आमीर सोहेल त्याच जोशात फटकेबाजी करत होता. वेंकटेश प्रसादच्या एका षटकात तर त्याने सलग दोन चेंडूंवर कव्हर्समधून दोन सणसणीत चौकार लगावले. आणि यामुळे त्याला चांगलाच चेव चढला. चौकार मारल्यानंतर मोठ्या माजात त्याने प्रसादला कव्हर्सच्या दिशेने बोट दाखवत याच ठिकाणी मी चौकार मारेन असं सुनावलं. प्रसादने मात्र आपलं डोकं शांत ठेवत पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला आणि सोहेलचा त्रिफळा उडवला. अशारितीने सोहेलचा माज उतरला आणि नंतर पाकिस्तानने सामनाही गमावला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांतील ही एक ठळक आठवण बनून गेली.



      1999 (मॅंचेस्टर)– 92 आणि 96 नंतर 99 साली मॅंचेस्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले. मॅंचेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय तसेच पाकिस्तानी लोकांचे वास्तव्य असल्याने याठिकाणी सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सामन्याच्या दिवशी मॅंचेस्टर हे भारत किंवा पाकिस्तानच असल्यासारखे भासत होते. अशात अझरूद्दीनचा भारतीय संघ आणि अक्रमचा पाकिस्तानी संघ आपल्या देशाची इभ्रत वाचवण्यासाठी समोरासमोर आले. आणि पुन्हा एकदा 1996 प्रमाणेच वेंकटेश प्रसादने भेदक गोलंदाजी करत भारताला पाकिस्तानविरूद्ध विश्वचषक स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवून दिला. भारताच्या 227 या धावसंख्येला उत्तर देताना प्रसादच्या पाच विकेट्समुळे पाकिस्तानी टीम 180 मध्येच गारद झाली. यावेळी श्रीनाथनेही तीन बळी घेत प्रसादला मोलाची साथ दिली. भारतातर्फे सचिनने सलामीला येत 45, अझरूद्दीनने 59 तर राहुल द्रविडने 61 धावा केल्या होत्या.

2003 (सेंचुरीयन)– पुन्हा एकदा 2003 मध्ये सेंचुरीयनवर भारताची पाककिस्ताविरूद्ध गाठ पडली. या सामन्याचे वर्णन करायचे झाल्यास सबकुछ सचिन असंच म्हणावं लागेल. यावेळी 92 च्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा 11 वर्षांनी सचिनने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. सईद अन्वरने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 101 धावांची शतकी खेळी केल्याने पाकिस्तानने भारतापुढे 274 धावांचे आव्हान ठेवले होते. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत पाकिस्तानविरूद्ध धावांचा पाठलाग करणार होता. यापूर्वी तिन्ही खेपेस भारताने प्रथम फलंदाजी केली होती. आणि पाकिस्तानचा संघ दडपणाखाली येऊन कोसळला होता. मात्र आता परिस्थिती नेमकी उलट होती आणि पाकिस्तानी फलंदाजांनी आव्हानात्मक धावसंख्याही उभारली होती. त्यामुळे भारतावर दडपण आले होते. परंतु भारताची फलंदाजी चालू होताच अगदी पहिल्या षटकापासून सचिन-सेहवाग यांनी अशी काही फटकेबाजी चालू केली की पाकिस्तानी गोलंदाजच दबावाखाली आले. आग ओकणारा शोएब अख्तर, वकार युनूस अशा कोणालाच या दोघांनी जुमानले नाही आणि सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मग सेहवाग बाद झाल्यानंतरही सचिनने आपला धडाका कायम ठेवला. सचिनचं शतक मात्र अवघ्या दोन धावांनी हुकलं. पण त्याच्या 75 चेंडूंमधील 98 धावांच्या या तुफान खेळीने भारताला कधीच विजयाच्या दाराशी नेऊन उभे केलं होतं. त्यानंतर द्रविड आणि युवराजने नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला भारतासमोर लोटांगण घ्यावं लागलं. यावेळी सुरूवातीच्या षटकांत सचिन-सेहवाग फलंदाजी करत असतानाचा त्यांचा तुफानी अंदाज निव्वळ दृष्ट लागण्यासारखा होता. अलीकडेच सेहवागने केलेल्या खुलाशानुसार शोएब अख्तर वारंवार त्याला बाउंसर टाकून हुसकावत होता. तेव्हा त्याने समोर तुझा बाप उभा आहे, त्याला बाउंसर टाक, तो सिक्स मारेल असं सुनावलेलं. यावेळी शोएबने सचिनला तेजतर्रार बाउंसर टाकताच सचिनने एक शानदार हुकचा फटका लगावर चेंडू सीमारेषेपार भिरकावून दिला होता. हा सामना पाहिलेला कोणीही भारतीय हा षटकार आपल्या उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही.

मोबाईल आणि गेम्स -भाग १

           साधारणपणे मोबाईल फोन्स सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले तेव्हा मोबाईल गेम्स पाळण्यात होते.(२००० ते २००५ च्या सुमारास) तेव्हा ब-याच लोकांकडे नोकिया ११०० वगैरे फोन असायचे, त्यातला सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेला गेम म्हणजे ’स्नेक’. पाहिलं तर अतिशय साधा, कुठलेही डोळे दिपवणारे ग्राफिक्स नाहीत, कुठलंही संगीत नाही, फक्त व्हायब्रेशन असायचं. तेसुद्धा बंद करता यायचं. लोक आपले तासनतास तो गेम खेळत बसायचे. ख-या अर्थाने त्या गेमने लोकांना गुंगवून ठेवलं. लोक इतके फटाफट बटन्स दाबायचे की जसं पियानोच वाजवताहेत. प्रवासात तर तासनतास तो गेम खेळण्यात निघून जायचे. बरं तेव्हा नोकियाच्या विद्युतघटांची (बॅटरीची) कार्यक्षमता आजच्यापेक्षा नक्कीच बरी होती. त्यामुळे तासनतास फोन वापरला तरी विद्युतघट चालत असे.

“आग लागो त्या मोबाईलला… मी काय सांगते याचं लक्षच नसतं! अभ्यास गेला उडत!” – आईचा त्रागा.

“हे काय रे, मी तुझ्याशी बोलतेय आणि तू गेम काय खेळतोयेस? मी फेकून देईन हं तुझा मोबाईल! ” गर्लफ्रेंड संतापून!
असे संवाद तेव्हा कायम झडत असत, इतकं त्या गेमने लोकांना वेड लावलं होतं.

         नंतर नोकियाचे ३१००, ३३१५ असे फोन आले. त्यातही तो गेम होताच. ३३१५ तर निव्वळ दगड होता. गर्लफ्रेंडने खरंच फेकून दिला तरी भीती नव्हती. कसाही आपटला तरी तो व्यवस्थित चालायचा. तेव्हाची मोबाईलची स्क्रीनसाईज १२८ बाय १२८ असायची. त्या आधीही त्यापेक्षा लहान स्क्रीन असलेले फोन्स होते. (उदा. ९६ बाय ६५ पिक्सेल्स.आठवा रिलायन्सचे पाचशे रुपयातले फोन). पण त्यावर गेम्सची ती मजा नव्हती जी १२८ बाय १२८ स्क्रीनवर होती.


       त्यावेळचे गेम्स साधारणपणे पूर्वस्थापित (प्री-इन्स्टॉल्ड) आणि दुस-या फोन वर कॉपी न करता येणाजोगे होते. ते फोन घेतेवेळेसच त्यात असत. ते काढूनही टाकता येत नसत.

मोबाईल फोन नादुरुस्त झाला की आपण त्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जायचो.

“साहेब सॉफ्टवेअर उडालंय! नवीन टाकावं लागेल.”

“चालेल, कधी मिळेल?”

“दोन-तीन दिवस लागतील साहेब!”

“चालेल!” (आणि मनात, च्यायला दोन-तीनशे रुपये गेले तरी चालतील, नवीन मोबाईल कुठुन घेऊ? आपण काय लॅंडलॉर्ड नाहीये!) असं चालायचं. यातलं सॉफ्टवेअर म्हणजे सी-मॉस असायचं. फोनवर तोपर्यंत चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आलेली नव्हती.

       त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम्स आल्या. त्याबद्दल सविस्तरपणे स्वतंत्र पोस्ट टाकेनच.

          त्यानंतर हळूहळू रंगीत स्क्रीन्स आल्या. पण त्यांची रंगांची क्षमता मर्यादित होती. पण लोकांना त्या आवडल्या. त्यावर गेम्ससाठी मागणी होऊ लागली. जेव्हा ’सन मायक्रोसिस्टिम्स’ ने जेटूएमई (झ२ंऎ) ही ’जावा’ चा भाग असलेली प्रोग्रामिंग लॅंग्वेज बाजारात आणली तेव्हा ख-या अर्थाने गेमिंगला चालना मिळाली. अनेक कंपन्यांनी यात बराच फायदा आहे हे ओळखून छोटे छोटे मोबाईल गेम्स बाजारात आणायला सुरुवात केली. अनेक जण जेटूएमई शिकून स्वत:च गेम बनवायला लागले आणि विकूही लागले. अनेक परंपरागत गेम्स, जे आपण वर्गात मागच्या बाकावर शिक्षकांचं लक्ष चुकवून खेळायचो ते मोबाईलवर यायला लागले(उदा. फुली गोळा). यात आपला दुसरा भिडू म्हणजे मोबाईल असायचा. त्यात असा प्रोग्राम बसवलेला असायचा जो आपल्या चालीवर पुढचा निर्णय स्वत: घ्यायचा! ही ’आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ची सर्वसामन्यांना झालेली ओळख होती.

        कितीतरी दिवस असे गेम्स चालले. सोनी एरिक्सनने मोबाईल गेमिंगच्या क्षेत्रात खूप भर टाकली.त्यांनी त्यांच्या एस.डी.के.(एस.डी.के. म्हणजे असं एकत्रित पॅकेज ज्यात प्रोग्रामिंगचे वेगवेगळे टूल्स, त्यांची माहिती, ते कसे वापरायचे याची उदाहरणं आणि नोंदी असतात) अशा खूप गोष्टी दिल्या ज्यामुळे मोबाईल गेम बनवणं सोपं झालं. तशीच भर नोकियानेही घातली. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व टूल्स मोफत उपलब्ध होते. त्यामुळे ह्या क्षेत्राची वाढ तेव्हा फार मोठ्या प्रमाणात झाली. आंतरजालावर असे गेम्स बनवणा-यांचे गट बनू लागले. वेगवेगळ्या साधकबाधक चर्चा झडू लागल्या. नवीन लोकांना बरंच मार्गदर्शन मिळू लागलं. अनेक कंपन्यांनी ’मोबाईल गेम्स’ असा विभागच चालू केला. अनेक फक्त मोबाईल गेम्स बनवणा-या कंपन्या अस्तित्वात आल्या. त्यातल्या मोजक्या कंपन्या मोठ्या झाल्या तर खूप सा-या बंद पडल्या. कारण लोकांना नेहेमी काहीतरी नवीन हवं असतं की जे त्यांना गुंगवून ठेवेल, ते देण्यात त्या कंपन्या कमी पडल्या.

       पुढील भागांमधे आपण गेम्स बनवणा-या कंपनीचं काम कसं चालतं, एका गेममागे किती लोकांची मेहनत असते, प्रत्येकाच्या कामाचं नेमकं स्वरुप काय, गेम्सचे किती प्रकार अस्तित्वात आहेत, मोबाईलवर कुठल्या चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम्स) उपलब्ध आहेत, त्यासाठी नेमके कुठल्या प्रकारचे गेम्स बनतात, त्या चालनप्रणालींचं वैशिष्ट्य काय यावरील लेख बघूयात.

        आपल्या सूचना आणि प्रश्नांचं स्वागतच आहे.

(सर्व चित्रे आंतरजालवरुन साभार)

वाघाची संख्या वाढली……एक बातमी

आज जवळपास सर्वच दैनिका मध्ये एक चांगली बातमी वाचायला मिळाली की, देशामध्ये वाघाची संख्या २९५ ने वाढली. वाघांसाठी आरक्षित असणाऱ्या १७ राज्यातील ३९ प्रकल्पामध्ये एकूण १७०६ वाघ आढळले.सन २००६ च्या वाघांच्या गणणे नुसार देशात १४११ वाघ होते. चालू वर्षीच्या गणणे नुसार ही संख्या २९५ ने वाढून १७०६ इतकी झाली.जगातील एकूण वाघांपैकी जवळपास निम्मे वाघ भारतात आहे.वाघाची कमी होणारी संख्या ही सर्वच देश्यापुढे गंभीर समस्या होती.परंतु दूरदृष्टी समोर ठेवून केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम आहे.
झपाट्याने कमी होणारया जंगला मुळे जंगलातील प्राणी त्याची तहान-भूक भागवण्यासाठी लगतच्या गावात शिरतात.व गावकरी स्वताच्या जिवाच्या भीतीने त्यांना मारून टाकतात या मध्ये वाघाची संख्या जास्त असल्यामुळे देशभरातून वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती परंतु सरकारी उपाय योजनेमुळे आता ही संख्या वाढू लागली आहे.भारतामध्ये वाघांच्या शिकारीवर बंदी असली तरीही वाघाच्या कातडीला चांगली किमत मिळत असल्या मुळे लपून छपून याची शिकार चालू आहे.पण सरकारच्या सतर्क वनविभागा मुळे अश्या प्रकारच्या शिकारीला खीळ बसला आहे.याचे परिणाम आता दिसू लागले आहे.जंगलाचा राजा जर जंगलातून कमी होत गेला तर जंगलात काहीच उरणार नाही.मागे आम्ही विदर्भातील ताडोबाच्या सफारीला गेलो होतो.तिथे दोन दिवस राहून वाघाचे दर्शन आम्हाला झाले नाही.त्यामुळे आम्ही सर्वच उदास झालो होतो परंतु पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा तेथे जाऊ तेव्हा आता आम्हाला नक्कीच वाघाचे दर्शन होईल. 

मोबाईल आणि गेम्स

       नवीन तंत्रज्ञान आलं की आधी कुतुहुल म्हणून, नंतर हौस म्हणून , कधीकधी ’ऑड मॅन आऊट’ या भीतीपोटी आणि शेवटी गरज म्हणून माणूस ते वापरुन बघायला लागतो. नंतर त्याला त्याचं व्यसनच जडतं. सोशल नेटवर्किंग साईट्स नव्हत्या तेव्हा आपलं काय अडायचं? काहीच नाही! आज जर सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स बंद झाल्या तर काय होईल? कल्पना करून बघा! सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स चालण्याचं एक बेसिक तत्त्व आहे, ते म्हणजे,’माणसाला आपल्या आयुष्यापेक्षा दुस-यांच्या आयुष्यात जास्त रस असतो.’ जाऊ द्या मुद्दा भरकटतोय! तर मी आज मोबाईलबद्दल सांगणार होतो. नाही नाही ’मोबाईलचा इतिहास’ हा या पोस्टचा विषय नक्कीच नाहीये! पण मोबाईल तंत्रज्ञान, विशेषत: गेमिंग कुठपर्यंत गेलंय हे गेमिंग अगदी बेसिक असल्यापासून बघतोय.

        मी माझ्या करिअरची सुरुवात ’मोबाईल गेम पोर्टर’ म्हणून केली. पोर्टर म्हणजे शब्दश: हमाल नाही! तर एका मोबाईलसाठी बनवलेला गेम इतर मोबाईल्सवर चालतो आहे की नाही ते बघणे आणि तो नीट चालण्यासाठी त्या कोडमध्ये योग्य ते बदल करणे हे माझं काम होतं. याला गेमिंगच्या भाषेत ’पोर्टिंग’ म्हणतात. तर माझ्या सुरुवातीच्या कंपनीत आम्ही सपोर्ट करत असलेले फोन्स होते तब्बल साडेसातशे आणि आम्ही पोर्टर होतो फक्त तीन! तेव्हा आम्हाला बहुतेक फोन्सचे वैशिष्ट्य पाठ झाले होते आणि त्यांच्या खोड्याही! आमच्याकडे तेव्हा एक एक्सेलशीट असायची त्यात प्रत्येक फोनची स्र्कीनसाईज, डेन्सीटी आणि इतर वैशिष्ट्य नमूद केलेले असायचे. आम्ही ती फाईल ’पोर्टिंग गाईडलाईन’ म्हणून वापरायचो. आहाहा… काय दिवस होते ते! नॉस्टेल्जिक व्ह्यायला होतंय! आम्ही एकमेकांना सांगायचो, “अरे, एखादा १७६ बाय २०८ फोन दे रे! मला टेस्ट करायचाय हा कोड!” इथे १७६ बाय २०८ ही त्या फोनची स्क्रीनसाईज असायची. असा फोन म्हणजे नोकिया ६६००. असे बरेच फोन्स होते. तेव्हा आमची भाषा म्हणजे १७६ बाय २०८, १७६ बाय २२०, १२८ बाय १२८, २४० बाय ३२० अशीच होती.


       एखाद्या पोर्टरला मोठ्या स्क्रीनसाईजचं काम मिळालं की पठ्ठ्या खूष! कारण एकतर अशा फोन्सची इंटर्नल मेमरी जास्त असायची, त्यामुळे त्यावर गेम्स मस्त चालायचे. त्याला पोर्टींगमधे कमीतकमी अडचणी यायच्या! साधारणपणे नवीन पोर्टरला असे फोन द्यायचे. छोटे फोन्स जसा नोकिया ३१०० (जुना) यावर अनुभवी लोक काम करायचे, कारण त्यांना या फोन्सला येणारे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे पाठ झालेलं असायचं.

     साधारणपणे सहा महिने वगैरे तुम्ही पोर्टर म्हणून काम केलं की तुम्हाला नवीन गेम बनवायला द्यायचे! कारण तोपर्यंत गेम्स कसे बनतात याचं प्राथमिक ज्ञान तुम्हाला आलेलं असायचं. काही प्रॉब्लेम्स आले तर मदतीला सिनिअर्स असायचेच! तुम्ही एक छोटंसं मॉडेल बनवलेलं चालतांना बघून जो आनंद व्हायचा ना, जसं आपल्या बाळाने पहिलं पाऊल टाकलं की आईच्या डोळ्यात दिसतो.(असंच काही काही!)

          नोकिया, सोनी एरिक्सनवर काम करायला मिळालं तर सगळ्यांना खूप आनंद व्ह्यायचा! कारण हे फोन अगदी आज्ञाधारकपणे काम करायचे. सोनी तर गेमिंग फोन्सचा बादशहा होता! सॅमसंगचे फोन म्हणजे लहरी मोहम्मद! चालले तर असे चालतील नाहीतर बश्या बैलासारखे तिथल्या तिथे! बर सेम कोड एका सेम फोनच्या एका पीसवर चालला तर दुस-या पीसवर लगेच हे राम म्हणायचा! त्यामुळे सहसा कुणी त्या फोन्सवर काम करायला राजी नसायचं! एखादा त्या प्रॉब्लेमला शिंगावर घ्यायचा! “च्यायला… का होत नाहीये! बघतोच आता!” म्हणून तो जो त्या फोनच्या मागे लागायचा तो तो प्रॉब्लेम सोडवूनच दम घ्यायचा!

          मी स्वत: हे सगळं अनुभवलंय. जवळजवळ सगळ्या कंपन्या आंतरजालावरुन कल्पना उचलायच्या आणि त्यांच्यावर आधारित गेम्स बनवायच्या! त्यावरुनही भांडणं व्हायची, आमची कल्पना तुम्ही उचलली म्हणून! बरं गेम्सचं आयुष्य काही मोठं नसतं. थोडे दिवस आपण खेळतो आणि नंतर ते फोल्डर उघडूनही बघत नाही! तुम्हीच बघा ना! नवीन फोन घेतल्यानंतर काही दिवस तुम्ही अगदी उत्साहाने त्यातले गेम्स खेळता आणि आठवड्याभराने, महिनाभराने, (व्यक्तिसापेक्ष) तुमचा रस कमी कमी होत जातो. तुम्ही गेम्स अ‍ॅडिक्ट असाल तर गोष्ट वेगळी. कालांतराने आपल्या मोबाईलमधे असा गेम आहे हेसुद्धा तुम्ही विसरुन जातात. त्यामुळे गेमिंग कंपन्या कायम नवनवीन गेम्स बाजारात आणत असतात. गेम्सचा व्यवसाय चित्रपटसृष्टीसारखा आहे, कारण ब-याचदा तुम्ही एखादा फ्लॉप गेलेला चित्रपट बघत असतांना तुम्हाला वाटतं की हा चित्रपट का चालला नाही? खरंच छान बनवलाय! मग का नाही चालला? तो चित्रपट जरी तुम्हाला चांगला वाटत असला तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांना तो आवडलेला नसतो. त्यामुळे तो फ्लॉप होतो. गेमचं पण तसंच आहे. तुम्ही खूप मेहनत घेऊन, रात्रंदिवस एक करुन गेम बनवता, बाजारात आणता आणि तुम्हाला मिळालेला प्रतिसाद बघता ’हेची फळ काय मम तपाला..’ असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येते. आज तुम्ही आठवा बरं एखाद्या साताठ महिन्यांपूर्वी रिलिज झालेल्या चित्रपटातलं गाणं! सहज आठवणार नाही! गेम्सचं पण तसं आहे. मुळात डेव्हलपरसुद्धा गेम बाजारात आणायच्या वेळी त्या गेमला कंटाळून गेलेला असायचा, कारण गेल्या दोन-तीन महिन्यापासून तो जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेच बघत असायचा. त्यामुळे कधी एकदा ह्या गेमला बाजारात उतरवतोय आणि कधी दुसरी गेमची कल्पना प्रत्यक्षात आणतोय असं त्याला झालेलं असायचं.

        चित्रपटांच्या पायरसीप्रमाणे गेम्सची पायरसी ही त्या काळात मोठीच डोकेदुखी होती. आज जर तुम्ही गेम विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला सहज एका डॉलरमधे गेम मिळून जातो. क्वचित दोन डॉलर लागतात. तीनेक वर्षांपूर्वी एका गेमची किंमत सात-आठ डॉलर असायची. बरं गेमची फाईलपण सहजपणे इकडून तिकडे या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर फिरु शकत होती. बरेच जण आपण विकत घेतलेला गेम सहज फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध करुन द्यायचे. त्यामुळे कंपन्यांचे पैसे बुडायचे. हा वेगळाच ताप होता. गेम्स डाऊनलोड करण्यासाठी एकमेव असं अधिकृत ठिकाण नव्हतं. ’एक ढूंढो हजार मिलेंगे’ अशा खूप साईट्स होत्या ज्यावर गेम्स फुकट उपलब्ध असायचे.


             ह्या क्षेत्रात खरी क्रांती झाली ती जेव्हा अ‍ॅपलचा आयफोन आणि गुगलचं अ‍ॅंन्ड्रॉईड बाजारात आलं! गुगल आणि अ‍ॅपलने जास्त क्षमतेचे आणि जास्त सुविधा असलेले फोन्स बाजारात उपलब्ध करुन द्यायला सुरुवात केली आणि गेमिंग जगताने खरी दिवाळी साजरी केली. त्याआधी गेमिंगमधे ’टचस्क्रीन’ची संकल्पना फारशी वापरात नव्हती. फार फार तर पाच टक्के गेम्सना ’टचस्क्रीन सपोर्ट’ असायचा. असे गेम्स बनवणंही किचकट काम असायचं. आता ’कीज’ जवळपास हद्दपारच झाल्या आहेत. सगळं टचस्क्रीन! आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारे ’नेव्हीगेशन’ करता येऊ शकणारे गेम्स उपलब्ध आहेत. ’ग्रॅव्हीटेशनल सेन्सर्स’ वर चालणारे गेम्स त्याचं एक उदाहरण आहे. एकदम मोठ्या प्रमाणात फोन्सची उपलब्धता आणि फोन वापरण्याच्या बदललेल्या संकल्पना, यामुळे या क्षेत्रात आज प्रचंड संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर अनिश्चितता खूपच वाढली आहे. तुमचा एक छोटासा गेम बाजारात चालला नाही तर कंपनीतून तुमची हकालपट्टी होऊ शकते. हे आजचं गेमिंग क्षेत्रातलं वास्तव आहे. कोडिंग खूप सहज झाल्याने खूप लोक या क्षेत्राकडे वळताहेत. ख्रिसमसच्या काळात तर अ‍ॅंन्ड्रॉईड मार्केट आणि अ‍ॅपस्टॉअर वर छोट्या छोट्या गेम्सचा महापूर येतो. त्यातले बरेचशे तर असे असतात की त्यांना गेम का म्हणावं हा प्रश्न असतो.

                ’नवनिर्मिती’ हे तुमचं ध्येय असेल, तुम्हाला नेहेमी नव्यानव्या कल्पना सुचत असतील तर गेमिंग क्षेत्रात तुम्ही किती पुढे जाल याला मर्यादा नाही!

(सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार.)

हृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल?


Dr. Devi Shetty.

गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाशिवरात्रीच्या आधी माझ्या चुलत काकांना आला,एका मित्राच्या आजीला आला, दुसरे एक मोठे काकांना वेळेत उपचार झाल्यामुळे त्रास झाला नाही. काल एका मित्राच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. आताच त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊन बघून आलो. सर्व जवळपास ६० वयाच्या पुढचेच आहेत. ह्या वयात त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात. गेल्या काही दिवसापासून मी नेट वर शोधातच होतो कि ह्या हृदयविकारापासून वाचण्यासाठी काय करायचे त्याच वेळेला फॉरवर्डेड ईमेल मध्ये डॉ देवी शेट्टी ह्याच्याबरोबर झालेल्या मुलाखतीचा गोषवारा आला. डॉ देवी शेट्टी हे नारायण हॉस्पिटल बंगलोर मधील मुख्य हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांच्याबद्दलची जास्त माहिती ह्या लिंकवर दिलेली आहे. 


त्यांना विचारलेल्या प्रश्नोत्तरांचे भाषांतर येथे देत आहे. सर्वात शेवटी मूळ इंग्लिश चर्चा हि जोडत आहे.

प्रश्न: हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचण्याचे काही मुलभूत नियम आहेत काय?
उत्तर: 
1. आहार – कार्बोहाइड्रेट कमी , प्रोटीन अधिक, आणि तेलकट पदार्थ कमी  
२.  व्यायाम – एक ते अर्धा तास दररोज चालणे, कमीत कमी आठवड्यामधून पाच दिवस तरी  चालावे.लिफ्ट चा वापर टाळावा. जास्त वेळ एकाच जागेवर बसने टाळावे. 
3. धूम्रपान सोडावे. 
4. शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवावे.
5. रक्तदाब वर नियंत्रण आणि शुगर कमी करावी.

प्रश्न: मांसाहारी (मासे) खाने हृदयासाठी चांगले आहे का ? 
 उत्तर: नाही.

प्रश्न: कधी कधी शरीराने सशक्त किंवा उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तीला सुद्धा हृदयझटका येण्याचे उदाहरणे दिसतात. झटका येण्याचे काही कारण असते का?
उत्तर: ह्याला मूक आक्रमण म्हणतात, ह्यासाठीच आम्ही ३० वर्ष वरील सर्व व्यक्तींना नियमित आरोग्य तपासणी करण्याची सिफारिश करतो.

प्रश्न:  हृदय रोग वंशपरंपरागत असतो का ? 
उत्तर: होय.
प्रश्न: हृदयावर जोर, तणाव (stress) पडण्याचे कारण काय असू शकतात ? हा तणाव कसा मिटवू शकतो?
उत्तर: जीवनच्या प्रति आपला दृष्टिकोण बदला. प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता (perfection) आणण्याचा प्रयत्न करू नका.

प्रश्न: जॉगिंग आणि चालणे ह्यात चांगले काय आहे? किंवा त्याहून चांगला व्यायाम आहे का? 
उत्तर: जॉगिंग पेक्षा चालणे नेहमीच चांगले असते. जॉगिंग ने लवकर थकायला होते आणि सांधे दुखी वाढू शकते. 
 
प्रश्न: तुम्ही गरीब आणि जरुरतमंद लोकांसाठी खूप काही केले आहे तुम्हाला असे करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? 
उत्तर: मदर तेरेसा, जी माझी पेशंट होती.

प्रश्न: कमी रक्तदाब असलेल्या रोग्यांना हृदय झटका येऊ शकतो का ? 
उत्तर: अत्यंत दुर्लभ

प्रश्न: कोलेस्ट्रॉल कधी पासून जमा व्हायला सुरुवात होते? आता पासून चिंता करायची गरज आहे का ? का तीस वर्ष नंतरच त्याची काळजी घेतली पाहिजे ? 
उत्तर: कोलेस्ट्रॉल अगदी लहानपणापासून जमायला सुरुवात होते?

प्रश्न: अनियमित भोजन घेण्याच्या सवयीने हृदयावर कसा परिणाम होतो?
उत्तर: अनियमित भोजन घेण्यामुळे शरीराला अन्न विरघळणारे अन्न स्त्राव कधी निर्माण करायचे ते समजत नाही परिणामी अन्न चांगले पचत नाही.

प्रश्न: मी औषधे न घेता कोलेस्ट्रॉल सामग्री नियंत्रण कसा करू शकतो?
उत्तर: नियंत्रित आहार, चालण्याची सवय आणि अक्रोड खावे.

प्रश्न: योगसाधना  हृदय रोगापासून वाचवाण्याला मदत करते का ? 
उत्तर: योग नक्कीच मदत करतात.

प्रश्न: हृदयासाठी चांगले आणि वाईट आहार कुठला? 
उत्तर: फळे आणि भाज्या चांगला आहार आहे  आणि तेल सर्वात वाईट. 
प्रश्न: कुठले तेल चांगले असते?  शेंगदाण्याचे, सुर्यफुल, ओलीव तेल?  
उत्तर: सर्व तेल खराब असतात.

प्रश्न: कुठले रुटीन चेकअप केले पाहिजे ?काही विशेष परीक्षण आहेत का? 
उत्तर: नियमित रक्त दाब परीक्षण कोलेस्ट्रॉल, शुगर सुनिश्चित करण्यासाठी, ट्रेडमिल टेस्ट.

प्रश्न: हृद्य झटका आल्यावर कुठले प्राथमिक उपचार केले पाहिजे?
उत्तर: झटका आलेल्या माणसाला झोपण्याच्या स्थितीत पडण्यासाठी मदत करावी. एक एस्पिरिन गोळी जर उपलब्ध असेल किंवा एक सोर्बित्रेत (sorbitrate) गोली जीभेखाली ठेवायला मदत करावी. त्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था करावी. कारण अधिकतम नुकसान पहिल्या एक तासात होते. 

प्रश्न: गॅसेस मुळे छातीत दुखणे आणि हृदयविकाराने छातीत दुखणे हे दोन्ही मधला फरक कसा समजावा?
उत्तर: ईसीजी केल्याशिवाय सांगणे अत्यंत कठीण असते. 

प्रश्न: तरुण  मुले/मुली मध्ये हृदय विकाराची समस्या वाढण्याचे कारण काय? ३०-४० वयोगटातील लोकांमध्ये हि समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे?
उत्तर: वाढत्या जागरुकतेने अशा घटनामध्येहि वाढ होत आहे, ह्या शिवाय आजची  जीवन शैली, धूम्रपान, जंक फूड, व्यायामाची कमतरता अशा कारणामुळे युरोप आणि अमेरिका सारख्या देशांपेक्षा आपल्या इथे हृदयरोगाच्या जास्त घटना घडताहेत.

प्रश्न:एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब हा १२०/८० ह्या सामान्य श्रेणी पेक्षा जास्त असेलआणि तरी सुद्धा तो व्यक्ती शारीरिक रित्या स्वस्थ असू शकतो का?
उत्तर: होय नक्कीच
प्रश्न: जवळच्या नात्यात केलेल्या लग्नामुळे होणाऱ्या मुलांना ह्याचा त्रास होऊ शकतो. हे खरे आहे का?
उत्तर: होय.

प्रश्न:आमच्या पैकी खूप लोकांची जीवनशैली अनियमित आहे व ऑफिस मध्ये उशिरा पर्यंत थांबणे हे आमच्या हृदयाला त्रासदायक होऊ शकते का? ह्यासाठी कुठली सावधानता बाळगायला सुचवाल ?
उत्तर: जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा निसर्ग ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. पण जेव्हा तुम्ही वयस्कर होत जाल तेव्हा जैविक घड्याळाचे (Biological Clock) ध्यान ठेवा.

प्रश्न: उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेले लोक टेन्शन कमी होण्यासाठी गोळ्या घेतात त्याचे लघु / दीर्घ परिणाम होऊ शकतात का?
उत्तर:कुठल्याही गोळ्यांना साईड एफेक्ट असू शकतात. पण आधुनिक गोळ्या ह्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून बनवल्या जातात.

प्रश्न:जास्त चहा/ कॉफी घेणे हृदयाला धोकादायक ठरू शकते का ?
उत्तर : नाही
प्रश्न : अस्थमा चा त्रास असलेले रोग्यांना ह्या आजाराची  जास्त भीती असते का?
उत्तर: नाही.

प्रश्न: तुम्ही जंक फूड कशाला म्हणाल?
उत्तर : तळलेले पदार्थ, मॅकडोनाल्ड,समोसे आणि अगदी मसाला डोसा सुद्धा.

प्रश्न: तुम्ही म्हटले कि अमेरिकन आणि युरोपिअन लोकांपेक्षा भारतीय लोकांन  तीन पटीने जास्त धोका असतो. ते लोक पण जास्त जंक फूड खातात.
उत्तर: प्रत्येक पिढी हि काही प्रकारच्या आजाराने आणि नशिबाने असुरक्षित असते. भारतात महागड्या रोगांची जोखम जास्त आहे.
प्रश्न: केळे खाल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते का ?
उत्तर : नाही.

प्रश्न: एखादा व्यक्ती हृदयचा झटका आला असता स्वत:ची मदत करू शकतो का ? कारण फोरवर्ड ईमेल मध्ये आम्ही असे नेहमी बघतो.
उत्तर: होय ! खाली आरामात आडवे झोपून घ्यावे आणि कुठलीही एस्पिरीन ची गोळी जिभेखाली धरावी. जवळ असणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगावे, अँब्युलंस ची वाट बघत बसू नये कारण शक्यतो अशा वेळेला त्या लवकर येत नाहीत.

प्रश्न: सफेद रक्त पेशी कमी असणे आणि हिमोग्लोबीन ची कमतरता हृदय रोगाला कारणीभूत ठरतात का ?
उत्तर: नाही, पण शरीरात योग्य मात्रात हिमोग्लोबीन असणे आवश्यक आहे.
प्रश्न: कधी कधी व्यस्त जीवनशैली असल्याने आम्ही व्यायाम करू शकत नाही पण अशा वेळेला जर आम्ही घरी चालत गेलो किंवा पायऱ्या चढलो तर ते फायदेमंद ठरेल का ?
उत्तर : नक्कीच. अर्ध्या तसा पेक्षा एका जागेवर बसने टाळा. एका खुर्ची वरून उठून दुसऱ्या खुर्ची वर बसने सुद्धा नक्कीच उपयोगी येते.  
प्रश्न: मधुमेह आणि हृदय रोग ह्यांचा संबंध आहे का ?
उत्तर: होय. मधुमेह रोग्यांना इतर माणसांपेक्षा झटका येण्याचे जास्त चान्सेस असतात.
प्रश्न: हृदयाचे ऑपरेशन केल्या नंतर काय काळजी घेतली पाहिजे ?
उत्तर: योग्य आहार, व्यायाम, वेळेवर औषधे घेणे आणि कोलेस्ट्रॉल, रक्तदाब व वजन ह्यावर नियंत्रण ठेवणे.

प्रश्न: रात्रपाळी चे काम करणाऱ्यांना दिवसपाळी करणाऱ्यांपेक्षा जास्त धोका असतो का ?
उत्तर: नाही.

प्रश्न: रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी आधुनिक औषधे कुठली आहेत?
उत्तर: अशी शेकडोनी औषधे आहेत. तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी नक्कीच बरोबर औषधे देतील पण माझ्या मता प्रमाणे गोळ्या घेण्यापेक्षा नैसर्गिक रीतीने रक्तदाब नियंत्रित करा, त्यासाठी व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.

प्रश्न:  डीसप्रिन आणि अन्य डोकेदुखीच्या गोळ्या रक्तदाब वाढवतात का ?
उत्तर : नाही.

प्रश्न:स्त्री आणि पुरुषांमध्ये हृदयरोगाचे काय प्रमाण आहे.
उत्तर: निसर्ग स्त्रियांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत जपतो /वाचवतो.
प्रश्न: हृदय चांगले ठेवण्यासाठी काय करू शकतो?
उत्तर : योग्य आहार, जंक फूड टाळा,व्यायाम करा, धुम्रपान सोडा, जर तुमचे वय ३० पेक्षा जास्त झाले असेल तर मेडिकल चेकअप करून घ्या. सहा महिन्यातून एकदा तरी चेकअप करावा.
वर झालेल्या संवादाचे मूळ इंग्रजी ईमेल इथे देत आहे.

A chat with Dr.Devi Shetty, Narayana Hrudayalaya (Heart Specialist) Bangalore was arranged by WIPRO for its employees. The transcript of the chat is given below. Useful for everyone.

Qn: What are the thumb rules for a layman to take care of his heart?
Ans:
1. Diet – Less of carbohydrate, more of protein, less oil
2. Exercise – Half an hour’s walk, at least five days a week;avoid lifts and avoid sitting for a longtime
3. Quit smoking
4. Control weight
5. Control blood pressure and sugar

Qn: Is eating non-veg food (fish) good for the heart?
Ans: No

Qn: It’s still a grave shock to hear that some apparently healthy person
gets a cardiac arrest. How do we understand it in perspective?

Ans: This is called silent attack; that is why we recommend everyone past the age of 30 to undergo routine health checkups.

Qn: Are heart diseases hereditary?
Ans: Yes
 

Qn: What are the ways in which the heart is stressed?What practices do you suggest to de-stress? Ans: Change your attitude towards life. Do not look for perfection in everything in life.

Qn: Is walking better than jogging or is more intensive exercise required to keep a healthy heart?
Ans: Walking is better than jogging since jogging leads to early fatigue and injury to joints.

Qn: You have done so much for the poor and needy.What has inspired you to do so? Ans: Mother Theresa , who was my patient

Qn: Can people with low blood pressure suffer heart diseases?
Ans: Extremely rare

Qn: Does cholesterol accumulates right from an early age
(I’m currently only 22) or do you have to worry about it only after you are above 30 years of age?

Ans: Cholesterol accumulates from childhood.

Qn: How do irregular eating habits affect the heart ?
Ans: You tend to eat junk food when the habits are irregular and your body’s enzyme release for digestion gets confused.

Qn: How can I control cholesterol content without using medicines?
Ans: Control diet, walk and eat walnut.

Qn: Can yoga prevent heart ailments?
Ans: Yoga helps.

Qn: Which is the best and worst food for the heart?
Ans: Fruits and vegetables are the best and the worst is oil.

Qn: Which oil is better – groundnut, sunflower, olive?
Ans: All oils are bad .

Qn: What is the routine checkup one should go through? Is there any specific test?
Ans: Routine blood test to ensure sugar, cholesterol is ok. Check BP,Treadmill test after an echo.

Qn: What are the first aid steps to be taken on a heart attack?
Ans: Help the person into a sleeping position , place an aspirin tablet under the tongue with a sorbitrate tablet if available, and rush him to a coronary care unit since the maximum casualty takes place within the first hour.

Qn: How do you differentiate between pain caused by a heart attack and
that caused due to gastric trouble?

Ans: Extremely difficult without ECG.
 

Qn: What is the main cause of a steep increase in heart problems amongst youngsters? I see people of about 30-40 yrs of age having heart attacks and serious heart problems.
Ans: Increased awareness has increased incidents. Also, sedentary lifestyles, smoking, junk food, lack of exercise in a country where people are genetically three times more vulnerable for heart attacks than Europeans and Americans.

Qn: Is it possible for a person to have BP outside the normal range of 120/80 and yet be perfectly healthy? Ans: Yes.

Qn: Marriages within close relatives can lead to heart problems for the child. Is it true? Ans : Yes, co-sanguinity leads to congenital abnormalities and you may not have a software engineer as a child.

Qn: Many of us have an irregular daily routine and many a times we have to stay late nights in office. Does this affect our heart ?What precautions would you recommend? Ans : When you are young, nature protects you against all these irregularities. However, as you grow older, respect the biological clock.

Qn: Will taking anti-hypertensive drugs cause some other complications (short / long term)?
Ans:Yes, most drugs have some side effects. However, modern anti-hypertensive drugs are extremely safe.

Qn: Will consuming more coffee/tea lead to heart attacks?
Ans : No.

Qn: Are asthma patients more prone to heart disease?
Ans : No.
 

Qn: How would you define junk food?
Ans : Fried food like Kentucky , McDonalds , samosas and even masala dosas.
 
Qn: You mentioned that Indians are three times more vulnerable.What is the reason for this, as Europeans and Americans also eat a lot of junk food?
Ans: Every race is vulnerable to some disease and unfortunately,Indians are vulnerable for the most expensive disease.

Qn: Does consuming bananas help reduce hypertension?
Ans : No.


Qn: Can a person help himself during a heart attack(Because we see a lot of forwarded emails on this)?
Ans : Yes. Lie down comfortably and put an aspirin tablet of any description under the tongue and ask someone to take you to the nearest coronary care unit without any delay and do not wait for the ambulance since most of the time,the ambulance does not turn up.

Qn: Do, in any way, low white blood cells and low hemoglobin count lead to heart problems?
Ans : No. But it is ideal to have normal hemoglobin level to increase your exercise capacity.

Qn: Sometimes, due to the hectic schedule we are not able to exercise. So, does walking while doing daily chores at home or climbing the stairs in the house, work as a substitute for exercise?
Ans : Certainly. Avoid sitting continuously for more than half an hour and even the act of getting out of the chair and going to another chair and sitting helps a lot..

Qn: Is there a relation between heart problems and blood sugar?
Ans: Yes. A strong relationship since diabetics are more vulnerable to heart attacks than non-diabetics.

Qn: What are the things one needs to take care of after a heart operation?  

Ans : Diet, exercise, drugs on time , Control cholesterol, BP, weight..

Qn: Are people working on night shifts more vulnerable to heart disease
when compared to day shift workers?

Ans : No.

Qn: What are the modern anti-hypertensive drugs?
Ans : There are hundreds of drugs and your doctor will chose the right combination for your problem, but my suggestion is to avoid the drugs and go for natural ways of controlling blood pressure by walk, diet to reduce weight and changing attitudes towards lifestyles.

Qn: Does dispirin or similar headache pills increase the risk of heart attacks?
Ans : No.

Qn: Why is the rate of heart attacks more in men than in women?
Ans : Nature protects women till the age of 45.

Qn: How can one keep the heart in a good condition?
Ans : Eat a healthy diet, avoid junk food, exercise everyday, do not smok and, go for health checkup s if you are past the age of 30(once in six months recommended) …

साहेब

काही लोक मनगटातली

ताकत वापरत म्हणाले;

“आजपासून आंम्हाला साहेब म्हणायचं !”

मग लोकही फारसा विचार न करता

त्यांना ‘साहेब’ म्हणू लागले…

सर्व साहेबलोक मातृभूमीला ‘रियल इस्टेट’ मानत।

एके दिवशी सर्व साहेबांनी

मिळून मिसळून एजंट पेरून

स्वर्गाचं डील केलं आणि

मग हा स्वर्ग

साहेबलोकांनी आपल्या मर्जीतल्या

(किंवा सोयीच्या)

लोकांसाठी आरक्षित केला.

उरला नर्क

तर नर्काच्या बॅकग्राऊंडला साहेबलोकांनी

विकासाचं-प्रगतीचं सुंदर चित्र रेखाटून ठेवलं.

आणि नर्कवासी होऊ घातलेल्या जनतेला सांगीतलं;

” आंम्ही तुमच्यासाठी खास हा

विकासाचा आराखडा आखून ठेवलाय.

यात रंग भरत रहा.

आपण विकासाच्या खुप जवळ येऊन पोहचलो आहोत। “

मग जनता भारावली आणि

बदलत्या काळाशी जुळवून घेत

चित्रामध्ये रंग भरू लागली…

साहेबांचा जयघोष करू लागली.

साहेबही कृतार्थ नजरेने जनतेकडे पहात राहीले.

तरीसुद्धा त्या सुंदर चित्रामागे

काही लोक विव्हळताना ऐकू येत होते.

ते म्हणे या साहेबलोकांना

निष्कारण विरोध करत होते…

निशाणी आडवा अंगठा (…भाग १…)

मला मुळातच ड्राईव्ह करायला खूप आवडतं. पण पुण्याचा ट्रॅफिक बघता कार चालवायची इच्छा इतकी मेली आहे की एक वेळ गच्च भरलेल्या बसने प्रवास करणं बरं वाटतं. म्हणून मी बाईक प्रेफर करतो. ऑफिस तसं चौदा-पंधरा कि.मी. दूर आहे, पण रस्ता माझ्याच आजोबानी बांधला आहे, आणि पुढे मेनटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा माझ्याच बापाला मिळालय, अशा मॅच्यूरीटीनी लोकंही गाडी चालवतात आणि मीही. त्यामुळे पुण्यात किंवा मुंबईत वेगळं मेडीटेशन करायची गरज पडतच नाही. ‘गाडी चालवा, एकाग्रता वाढवा’, असा समाजसुधारक विचार इथे मांडण्यात आलेला आहे. ह्या संपूर्ण एक-कल्ली यात्रे मध्ये कधीतरी असा क्षण येतोच जेंव्हा एखादी नवी व्यक्ती, अखाद्या नव्या अनुभवाची बॅग लटकवत, हमखास भेटते. ही गूढ व्यक्ती रसत्याच्या कडेला अत्यंत केवीलवाण्या (किंवा अत्यंत माजलेल्या) स्टाईलमध्ये अंगठा दाखवत उभी असते. ह्याला बोली भाषेत ‘लिफ्ट मागणे’ असे म्हणतात. मी अशी मदत बर्याचदा करतो हे माझ्या बायकोला मुळीच आवडत नाही. तिचा पॉइन्ट सुद्धा बरोबर आहे. कोण, कसा असेल काही सांगता येत नाही. पण मी तसा माणूस बघून थांबतो आणि ह्याच यात्रांमध्ये मला अनेक पर्सनॅलिटीज भटेल्या आहेत, ज्या आता तुम्हाला देखील भेटवतो.


काही वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. दिवाळी होती आणि होती पाडव्याची संध्याकाळ. मी गाडी काढली आणि एका मित्राच्या घरी निघालो होतो. आमच्या घरापासून काही अंतरावर देशी दारूच एक दुकान आहे. मी स्वत: कधी आत गेलो नाहीये, पण बाहेरून मला ते एकदमच शांत आणि निरागस ठिकाण वाटतं. बाहेरचा पुसट काळा बोर्ड ‘सरकारमान्य देशी दारूचे दुकान’ इताकीच पब्लिसीटी करत असतो; इन-फॅक्ट तेवडीच पुरेशी असते. कुठे झगमाट नाही, गोंगाट नाही. आत भरपूर प्रकाश कधीच नाही दिसला मला. थकलेल्या संध्याकाळी एक-मेकांचे फ्रस्ट्रेटेड चेहेरे बघण्यात कोणाला रस आहे, म्हणून लाईट बहुतेक डिम असावा. तर ह्या दुकानापासून काही अंतरावरच्या सिग्नलवरती मी उभा होतो. जागोजागी आकाश-कंदील लावलेले, आकाशात मस्त फटाके फुटत होते. मधूनच एक सुंदर मुलगी सिग्नल क्रॉस करून चाललेली. तिच्याकडे मी आणि इतर ड्रायव्हर टक लाऊन पहात उभे असताना अचानक माझं बॅक-सीट जड झालं. माझ्या मागे अचानक कोण येऊन बसलं म्हणून मी दचकून मागे पाहिलं तर एकदम चक्रावूनच गेलो. लाल डोळे, पापण्या मिटण्यासाठी कोणतीही किम्मत मोजायला तयार, कळकट्ट पांढरी टोपी आणि वाढलेली पांढरी दाढी. अंगात कुठल्यातरी लोकल लेझीम ग्रूपचा मळकट केशरी टी-शर्ट आणि खाली पिवळट पायजमा. हे असलं ध्यान अचानक जर तुमच्या मागे येऊन बसलं तर तुम्ही काय कराल! तब्येत अत्यंत मोडकाळलेली, म्हणून त्याला मी घाबरलो नाही, पण इरीटेट नक्की झालो. अरे यार काय एक्सपेकटेड होतं अजून! मी तोंड उघडून शिव्या सूरू करणार, तर त्याआधी तोच बोलला,

‘शिग्नल सुटला, हाल की लवकर, काय बघतो, पिला का!’

गम्मत म्हणजे मी सुद्धा न थांबता निघालो. हे असले आयटम मलाच का यार भेटतात! शेवटी मी म्हटलं, जाऊन देत, फार दूर नसेल न्यायचं,

‘कुठं जायचं मामा?’, मी विचारलं.

‘घरी’

‘कुणाच्या?’, मी पुढे विचारलं. तसं मी ठरवलेलं की फारच इरीटेट झालं तर पुढच्याच चौकात साहेबांना उतरवायचं. पण काही म्हणा, आयटम भारी होता यार!

‘दिवाळी हाये, खोटं न्हाई बोलनार. मला घरीच जायचं’.

‘अहो पण मामा, रहाता कुठं?’

‘धोत्रे भेळच्या तिथं थांब.’ धोत्रे भेळ हे तसं बरच लांब होतं, पण माझ्या रसत्यातच होतं.

‘तुझं नाव काये?’, मामांनी विचारलं.

मी अशा लोकांना खरं काहीच सांगत नसतो, म्हणून काहीतरी नाव सांगितलं.

‘तुमचं नाव काय मामा?’

‘कै… कै… कै… तिच्याईच्चा… कै… कैलास जगदाळे’, चार-पाच ट्राय, आणि स्वत:लाच एका शिवीनंतर जगदाळेला स्वत:चंच नाव उच्चारता आलं; म्हणजे बघा काय चढली असेल. मला मात्र धन्य-धन्य वाटलं. बेवडयां सोबत तासन-तास गप्पा मारू शकतो मी, आणि आज टॉप-लेव्हलच्या बेवड्यासोबत लॉन्ग-ड्राईव्ह; आहाहाहा! अजून काय लागतं दिवाळी साजरी करायला! म्हणून मग मीच पिन मारली म्हातार्याला.

‘काय मामा, आज दिवाळी आणि तुम्ही दारू पीत बसले. घरी घेतील का तुम्हाला?’

‘कोनाचा बाप आडवनार मला तिचायला! बाकी कोनी कायबी म्हनंल, पन बायको जर न्हाई म्हनली तर म्या घरात जानार न्हाय.’, म्हातारा फुल व्हॉल्यूम मध्ये बोंबलू लागला.

‘काय मामा, आज पाडवा आणि तुम्ही दारू पिऊन घरी जाणार तर बायको थोडीच घरात घेईल!’

‘अरं च…च…च…चालंल मला, भीत न्हाय मी. रसत्यावर झ…झ…झोपीन, कारन बायको सगळ्यात म्होटी. तिला फोन करन. तिची पर… परमिशन नसल तर म्या घरात जानार न्हाय, कारन बायको सगळ्यात म्होटी. ती ग्रेट असतीये, म्हनून बायको असतीये,’ जगदाळे आता फुल-फोर्मात येऊ लागलेला. त्याचा थोडा झोक जात होता आणि त्यामुळे माझी गाडी सुद्धा हेलकावे खात होती.

‘अहो पण मामा तुम्हाला पोरं असतील की. ते येऊन देतील का घरात?’

‘तिचायला…भ…म…ह…च… आई…’, अशा सगळ्या शिव्या स्वत:च्याच पोरांना देऊन श्री. कैलास पुढे बोलले, ‘… त्ये कोन बोलनार मला. त्यांच्यात दम न्हाय त्यो. पन येक सांगतो मित्रा, बायको सगळ्यात म्होटी.’ पुन्हा तेच. घरी पिऊन आला म्हणून बायको बडवणार ह्याची खात्री त्यालाच काय मला सुद्धा होती. म्हणून ‘बायको सगळ्यात म्होटी, बायको सगळ्यात म्होटी’ ही लाईन इथपासूनच चालू होती.

‘अहो मग मामा, बायको इतकी मोठी आहे तर पाडव्या दिवशीच का पिली!’

‘म्या कुटं प्यालो! आई-ची-आन म्या पिनार न्हवतोच. पन त्ये बाब्यानं पाजली तिचायला. पन आता श…श…शप्पत घ्येतो बायकोची, कारन बायको सगळ्यात म्होटी. दिवाळी हाये, खोट न्हाय बोलनार. कधीच पिनार न्हाय. तू गाडी घ्ये कडंला.’

मला वाटलं जगदाळे उतरणार म्हणून मी गाडी कडेला घेतली, ‘अहो पण मामा, तुम्ही पुढे उतरणार होते ना? मग इथे कशाला उतरले?’

‘न्हाई उतरानार न्हाय हिते, टोपी उडाली, उतरानार न्हाय हिते. तू हितच थांब. तिच्यायची टोपी मी आनतो. तू जाऊ नको, हितच थांब,’ असं मला बजावून, आणि हेलकावे घेत घेत जगदाळे रसत्याच्या मधो-मध पडलेली टोपी आणायला गेले. गाड्या येत होत्या, टोपी चिरडत होत्या, उडवत होत्या. जगदाळे मामा पाचोळ्यासारखे उडत त्या टोपी पर्यंत पोचले. तितक्यात काही गाड्या हॉर्न मारत त्याला पास झाल्या. स्वत: अगदी परफेक्ट असल्यासारखं, रस्त्याच्या मधोमध उभ राहून त्यांनाच चार शिव्या घातल्या जगदाळेनी. मला खर तर ह्या म्हातार्याची थोडी दया आली. काय लाईफ आहे यार ह्या माणसाचं! व्यसन म्हणा किंवा फ्रस्ट्रेशन मुळे सुरू झालेली गरज म्हणा. असं काय डोक्यात येत असेल की ज्यामुळे दिवाळीच्या दिवशी, ही दारू उडवायची इच्छा होत असेल? फॅमिली, कल्चर, संस्कार हे शब्द सुद्धा ह्या म्हातार्याला ठाऊक असतील की नाही हा डाऊट आहे. पण तरी तो जगतोय. का, कसा, कोणासाठी, कशासाठी हा क्वेसचन-मार्क ना त्याला पडत, ना त्याला पाहून परमेश्वराला. जाऊ देत! मी काही थोर नाही किंवा प्यायलेलो सुद्धा नाही. त्यामुळे फिलॉसॉफी कशासाठी झाडतोय काय माहीत! तसंही आजकाल फिलॉसॉफर व्हायला काही खास कारण किंवा इंटेलीजन्स लागत नाही. 

जगदाळे परत आला आणि माझ्या मागे बसला. गाडी पुढे जाऊ लागली आणि मी पुन्हा विषय काढला, ‘मग मामा, आता फोन करणार का बायकोला?’

‘हा आता आधी फोन करनार, मंगच घरी जानार. तू थांबव हितं. हितून करनार फोन.’ एका पी.सी.ओ. कडे कापणारा हात दाखवत जगदाळेनी मला थांबवलं. कैलास जगदाळे मग खाली उतरले आणि माझ्याशी काहीही न बोलता हेलकावे घेत पी.सी.ओ कडे गेले. एका गजबजलेल्या वस्ती मध्ये आम्ही थांबलेलो. तिथे एका घराबाहेर एक पानाची टपरी होती. त्यात होता हा पी.सी.ओ.. टपरी मध्ये कोणंच बसलं नव्हतं. मी थोडावेळ तिथेच उभा राहीलो. जगदाळे नक्की बोलेल कसा बायकोशी, हे मला पहायचं होतं. थोडा वेळ फोनवर जोर-जोरात ओरडत बोलला म्हातारा. काहीवेळानी शांत झाला आणि मग अचानक त्या शेजारच्या घरातून एक अत्यंत लठ्ठ बाई बाहेर आली. जगदाळेच्या हातात फोन तसाच होता आणि अचानक ती म्हातारी त्याला बडवू लागली. मला काही समजायच्या आत तिने जगदाळेला पकडून त्याला बडवतच त्या घराच्या आत नेलं. मग मी त्या पान टपरीचा बोर्ड पाहिला. ‘कैलास पान मर्चंट… प्रोप्रायटर: श्री कैलास जगदाळे.’ स्वत:च्याच घरात फोन करून बायकोचा अंदाज घेणार्या ह्या बेवड्यानी माझी ती दिवाळी एकदम मेमोरेबल करून टाकली. आजही त्या रसत्यावरून बर्याचदा जातो. म्हातारा कैलास त्या पान टपरीमध्ये बसलेला दिसतो. एकवेळ पुन्हा त्या बेवड्या जगडाळेला लिफ्ट देईन, पण भानावर असलेल्या जगदाळेशी मी स्वत:हून बोलेन सुद्धा की नाही ह्याची खात्री नाही. स्टिल लाफ थिंकींग अबाऊट दॅट मॅन, अ‍ॅन्ड दॅट ईव्हनिंग.

अशा अनेक यात्रा झाल्या आणि बरेच `आडवे अंगठे’ रसत्यामध्ये डोकावताना दिसले. त्यांचाबद्दल पुढच्या भागात सांगतो.

(क्रमश:)

नवा विषय, नवी पात्रं, नवी मांडणी आणि नवा दंगा; कसा वाटला ते खाली कमेन्ट्स मध्ये जरूर कळवा.

वैश्विक वसुंधरा तास

वीज हि कोणत्याही देशाची राष्ट्रीय संपत्ती असते.आज जगभरात जवळ जवळ १३१ पेक्षा जास्त देशामधील पाच हजार शहरात एक तास वीज बंद ठेवून “वैश्विक वसुंधरा” तास पाळण्यात येणार आहे.दर वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळण्यात येतो.या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० काळात शहरातील सर्व वीज दिवे बंद ठेवण्यात येतात. याची सुरवात सन २००७ पासून ओस्ट्रेलिया या देशापासून झाली.सध्या जगातील सर्व देशांना गोबल वार्मिंग चा प्रश्न चांगला भेडसावत आहे. सर्वीकडे पृथ्वीवरचे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या मुळे बर्फाळ भागातील बर्फ सारखा वितळत असून पर्यावरणा साठी मोठा धोका निर्माण होत आहे.आज मानवाच्या जीवनात सकाळी झोपेतून उठल्या पासून  रात्री झोपेपर्यंत विजेच्या वापराचा अतिरेक झाल्यामुळे ग्लोबल वार्मिंग चे संकट जगासमोर उभे राहिले आहे.बहुतांशी देशा मध्ये वीज निर्माण करतांना कोळसा चा वापर करतात.या मुळे निर्माण होणारी राख सर्वत्र पसरते.त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना श्वसनाचे आजार निर्माण होतात.
यावर महाराष्ट्र सरकारने भार नियमनाचा उपाय काढला आहे परंतु हे भार नियमन राज्यातील खेडे विभागात जास्त राबविण्यात येते. विजेचा जास्त वापर हा खेड्यात नसून शहरात आहे. शहरांना वीज कमी पडू नये म्हणून खेड्यात भारनियमन करण्यात येते. तेव्हा हा वैश्विक वसुंधरा तास शहरांसाठी किती महत्वाचा आहे. या एकतासात शहरातील मोठ मोठे कारखाने काही काळासाठी बंद राहतील आणि त्याच काळामध्ये वीज निर्माण करणारे उर्जा प्रकाल्पामधील निर्माण होणारी वीज खेड्याकडे वळवता येईल. या साठी आपण सर्व जन या सहभागी होवून राष्ट्राची संपत्ती वाचवू.

काळा घोडा फेस्टिव्हल

काळा घोडा फेस्टिव्हल या बद्दल भरपूर ऐकले होते . पण प्रत्यक्षात जाण्याची संधी कधी आली नाही, त्या दिवशी असच दादा ने विषय काढला कि काळा घोडा फेस्टिव्हल लागले आहे जाऊन बघून ये आणि दुसऱ्या दिवशी पेपरात वाचले कि काळा घोडा फेस्टिव्हल ५ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत आहे.तेव्हा विचार केला कि वेळ पण आहे तेव्हा जाऊन बघून येऊ .मध्ये दोन रविवार भेटत होते एक सहा तारखेचा आणि मंग तेरा तारखेचा शेवटचा रविवार भेटत होता.म्हणून कॉलेज च्या मित्रांना विचारले की जाऊया का फेस्टिव्हलला आपले तेवढेच मनोरंजन पण होईल आणि नवीन काही तरी शिकायला पण भेटेल पण प्रत्येकाचे काही ना काही प्रोब्लेम होतेच. कोणाला बाहेर जायचे होते तर कोणाला आपला रविवार घरी बसून आराम करण्यात घालवायच होता . मी जर ह्यांना जबरदस्ती करत बसलो तर फेस्टिव्हल संपायचे आणि मी आलेली संधी ह्या “चू” लोकांनमुळे गामाऊन बसायचो .तेव्हा विचार केला कि ६ तारखेला च जाऊया. म्हणजे फेस्टिव्हल पण फिरून होयील आणि “अनिल नाईक” ह्यांचे जहागीर चे प्रदर्शन पण बघून होयील आणि ती त्याची लास्ट तारीख होती.

मग काय निघालो तुम्हाला तर माहिती आहे. ट्रेन मध्ये प्रवास करणे आणि ते पण रविवारी म्हणजे युद्धभूमीत उतरण्या सारखेच फरक फक्त इतकाच कि आपण युद्धभूमीत समोरच्या शत्रूला मारून पुढे आपले स्थान मिळवतो येथे फक्त त्यांना ट्रेन मध्ये(प्रवाशांना ) ढकलून आपले स्थान मिळवायचे आणि मग बाहेर आल्यावर जस काही आपण ऐकाध्या मसाज सेंटर मधून मसाज केल्याच अनुभव येतो ते तर प्रत्येक मुंबई कराच्या नशिबी च लिहिले आहे आणि मग ऐकदाचा विटी ला उतरलो. मला खात्रीनिशी पत्ता माहिती नव्हता, पण जहागीर आर्ट ग्यालरी माहिती होती. तेव्हा चालत चालत निघालो आणि पोहचलो ऐकदाचा .मी तर फक्त एण्ट्री गेट पाहून विचारात पडलो मला तर समजेनाच हे काय आहे नक्की. मग आधी प्रदर्शन बघून घेतले कारण ग्यालरी फक्त सहा वाजेपर्यंत चालू असते आणि आधीच ४ वाजून गेले होते . चित्र तर ऐका पेक्षा ऐक सरस होती. अनिल नाईकानी तर ब्लायकेन व्हाईट फोटो जसे असतात तसे त्यांनी पेंटिंग काढली होती, ते खरेच सुंन्दर होते. त्यांचे “चारखोलचे ” काम तर अप्रतिमच होते मला खरी उत्सुकता होती बाहेर असणाऱ्या वेड्या जालेल्या कला प्रेमींची कला बघण्याची आणि लगेच पेंटिंग बघून बाहेर आलो.
मी एण्ट्री गेट पाहुन च समजलो कि आता काय काय दिसणार आहे कारण तो गेट च ऐक संदेश देत होता त्याला चक्क हेल -मेट लावले होते आणि मुंबई डब्बे वाल्यांचे डब्बे तसेच “ग्लोबलवारमींग” आणि “सेव द अर्थ” अशा पोस्टर ने तो गेट सजवला होता आणि मुंबई चे जीवन आणि जीवनाचे महत्वव्यक्त केले होते . काय कल्पना आहे ना ? फुढे तर ऐका यीथे तर खरी गम्मत आहे .आत शिरताच मोठा टेबल ठेवला होता व त्या वर कागद लावला होता . प्रत्येक जन त्या वर एक मेसेज लिहित होते .कोण आपली हस्ताक्षर करत होते मी हि लिहिले ” सेव द ट्री सेव द लाईफ ” ह्या वेळ ची थीम होती “जग” म्हणून कि काय आतमध्ये बामबूच्या काट्याना पृथ्वीचा आकार देऊन त्या मध्ये कचरा आणि प्लास्टिक टाकून प्रदूषणाची ऐक आठवण करून दिली होती. आणि पुढे मेटल ची माणसे बनऊन व त्या ऐका छोट्या टोपली मध्ये कांदे ठेऊन माहागाई वर टीका केली होती . मेटल, खीळे ,चईन आणि ईतर लोखंडी टाकाऊ वस्तून ची सांगड घालून काळा घोडा बनवला होता .तो त्या फेस्टिव्हल चा केंद्र बिंदूच वाटत होता .तसेच सुतळीचा वापर करून कल्प- वृक्ष तयार केले होते आणि त्यांना सालायींच्या बॉटल लावल्या होत्या , बुटांच्या प्रतिमा , गायीचा पुतळा व त्या वर वेगवेगळी चित्रे ,असे तेथे सर्व मांडले होते हे सर्व विचारांच्या पलीकडले होते.
कित्येक कलाकार आपली कला दाखवत होते कोण ती चित्र काढून तर, गाऊन, नृत्य करून ,बोलून , वस्तूबनऊन आणि कोण कोण त्या मार्गाने हे सांगणे कठीणच ? मला पण वाटत होते आपण पण काही कराव पण वेळ कमी होता आणि भरपूर फिरायचे बाकी होते.लोकंतर कॅमेरा घेऊन ते क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्थ करण्याचा असफल प्रयत्न करत होते पण थोडे च ते सर्व कॅमेरात बंदिस्थ होणार होते मुळीच नाही. तो असफल प्रयत्न मी हि माझ्या मोबाईल च्या कॅमेरातून केला पण ते संपतच नव्हते. ह्या फेस्टिव्हल ने सर्व कलाकारांना एक संधी दिली होती व त्या चा ते पुरे पूर वापर करत असताना भारतीयांना नव्हेच तर परदेशीय लोकांना देखील दाखवत होते. भारतीय कला जगाच्या कानाकोपऱ्यातर नेत होते, हो परदेशी पर्यटक हि भरपूर होते .काळा घोडा चा डान्स, गाणी ,थिएटर  आणि फिल्म बरोबर च यंदाच स्ट्रीट शो हा फेस्टिव्हल ची जाण होता बाहुल्यांची मोठी मिरवणूक याच बरोबर बबल परेढ हि होती . ह्या सर्व गोष्टी आपण टीव्ही वर पहिल्या होत्या पण आज प्रत्यक्षात पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .जणू काही तिथे हे सर्व कला प्रेमी आपली कला वेड्या सारखी इतरांना दाखवत होते व सर्व जन ते मंत्रमुग्ध होऊन बघत होते. न बोलता आपली कल्पना कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशी पोहोचवायची ते ह्यांच्या कडून शिकावे. हे सारे मी तुम्हाला शब्धात सांगू शकत नाही त्या साठी तुम्हाला तेथे जाऊन ते सर्व अनुभवायलाच हवं ……………………..

आपला ब्लॉग मराठीनेटभेटब्लॉगकट्ट्यात जोडा

प्रथम सर्वांना माझा “जय महाराष्ट्र”
या धकाधकीच्या युगात चार शब्द हि बोलायला सावड राहिली नाही घराच्या शेजारी राहणारा हि फक्त रविवारीच भेटतो अस म्हंटल तरी अतिशोक्ती होणार नाही आणि मन मोकळ करायला ब्लॉग शिवाय दुसरा चांगला मित्र नाही.म्हणूनच मी ब्लॉग लिहायला सुरवात केली. पण मझ्या ब्लॉगला वाचकांचा चांगला प्रतिसात मिळावा म्हणून मी अनेक ब्लॉगकट्ट्यांकडे माझे निवेदन पत्र भरले पण ह्या ब्लॉग कट्यावाल्यांची कुणास ठाऊक माझ्याशी काय दुश्मनी होती आतापर्यंत तरी कुणीच माझी दखल घेतली नाही. मी एक मराठी माणूस आहे आणि एकदा का कुण्या मराठीमाणसाच टकोरं फिरलं तर काय होत हे नव्यानेसांगायला नको ….!!!
माझ्या संगे जसी या ब्लॉगकट्यावाल्यांची दुश्मनी आहे तशीच अनेक मराठी बांधवांशी असेल म्हणूनच ठरवलं कि असा ब्लॉगकट्टा बनवायचा जिथे सगळ्या मराठी बांधवांना समावून घेता येईल आणि त्यांना ज्यास्तीचे वाचक मिळून देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न…!!!
खालील विजेटला क्लिक करून आपला ब्लॉग मराठी नेटभेटब्लॉगकट्ट्यात जोडा
मराठीनेटभेट

हॉलिवुडची `क्वीन’

एलिझाबेथ टेलर गेल्याची बातमी आली आणि अनेकांना तिचे, कॅट ऑन हॉट टिन रुफ, सडनली, लास्ट समर, को वादिस, क्लिओपात्रा, बटरफिल्ड 8, हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ?, ` टेमिंग ऑफ श्रूयासारखे अप्रतिम चित्रपट आठवले आणि त्यापेक्षाही अनेकांना तिने केलेली आठ लग्ने आठवली. नामवंत, त्यातही रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलेल्या, व्यक्तींबाबत जी शोकांतिका घडते तेच लिझच्या बाबतीतही घडावे हा दुर्दैवी योगायोग आहे. सेकंदाला 24 फ्रेम्स या गतीने कलाकारांच्या अभिनयाची आणि देखणेपणाची, सौंदर्याची कसोटी लागलेली असते त्या रुपेरी पडद्यावरचा काही काळ आपल्या अभिनयाने आणि आरस्पानी सौंदर्याने गोठवून ठेवण्याचे सामर्थ्य लाभलेल्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एलिझाबेथ उर्फ लिझ ही एक होती. हॉलिवुडमध्ये तिचे नाव गाजू लागले तो हॉलिवुडचा सुवर्णकाळ होता. ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात होऊन एका दशकापेक्षा अधिक वर्षे उलटली होती. तिच्या नीलकमल नेत्रांचे मदनबाण, मादक सौंदर्य जेव्हा शेकडोंना घायाळ करत होते त्याचवेळी पीटर उस्तीनोव्ह, पॉल न्यूमन, रिचर्ड बर्टन, मार्लन ब्रँडो, कॅथरिन हेपबर्नसारखे अभिनयाचे मापदंड तिच्या अभिनयसामर्थ्याची वाखाणणी करत होते. वयाच्या नवव्या वर्षी, 1942मध्ये `देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट‘, `लॅसी कम होमया लागोपाठच्या दोन चित्रपटांमधून लिझचे रुपेरी पडद्यावर बालकलाकार म्हणून पहिले पाऊल पडले होते. बहुतेक बालकलाकारांच्या नशिबात रुपेरी पडद्यावरील क्षणिक प्रसिद्धी आणि नंतर उपेक्षेचा अंधार असतो. पण लिझ ही वेगळी चीज होती हे तिने एमजीएमच्या `नॅशनल वेल्व्हेटया चित्रपटातून दाखवून दिले. या वेळी ती दहा वर्षांची होती. 1951चा प्लेस इन सन, को वादीस, कॅट ऑन हॉट रुफ, सडनली, लास्ट समर असे चित्रपट करताकरता तिचे सौंदर्य आणि अभिनय जोडीनेच बहरत होते. रंगमंचीय अभिनयकलेचेच धडे पडद्यावरही गिरवण्याचा, मेथड ऍक्टींगचा तो काळ होता. अशा वेळी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेल्या एलिझाबेथने तिच्या उत्स्फूर्त अभिनयशैलीने हॉलिवूडमध्ये वेगळी वाट निर्माण केली.  `बटरफिल्ड 8′ या चित्रपटातील हायसोसायटी कॉलगर्लच्या भूमिकेसाठी तिला पहिले ऑस्कर मिळवून दिले. तिच्यातील अभिनेत्री या गौरवाने कमालीची सुखावली होती. प्रत्यक्षातील एलिझाबेथचे उत्फुल्ल व्यक्तिमत्व, सहज वावर पडद्यावरील तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून डोकावत असे. `क्लिओपात्रापासून अगदी 1980मधील ` मिरर क्रॅक्डपर्यंत प्रत्येक चित्रपटात हा अनुभव येतो. `क्लिओपात्रा हा तिचा बर्टनबरोबरचा पहिला चित्रपट. रिचर्ड बर्टन तेव्हा विवाहित होता. पण लिझ आणि तो परस्परांमध्ये कधी गुंतत गेले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. प्रत्यक्षात आणि पडद्यावर त्यांचे प्रणयप्रसंग खुलू लागले. `हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ?’ या तिच्या बर्टनबरोबरच्या चित्रपटाने तिला दुसरे ऑस्कर मिळवून दिले. तोपर्यंत ते विवाहबद्धही झाले होते. हे लग्न दहा वर्षे टिकले. एकदा काडीमोड घेऊन या दोघांनी परस्परांशी पुन्हा लग्न केले होते. बर्टनशी पुन्हा घेतलेल्या घटस्फोटाने तिला मद्यासक्ती, ड्रग्ज, अतिखाणे अशा विकारांच्या वाटेवर नेऊन सोडले. तिच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. एक उत्तम अभिनेत्री, हॉलिवुडची अनभिषिक्त सम्राज्ञी या नामाभिधानांबरोबरच खासगी आयुष्यात, दुसऱयांचे नवरे पळवणारी, संसार मोडणारी अशी नकोशी बिरुदेही तिला तोवर चिकटली होती. सात घटस्फोट, आठ लग्ने, विवाहित पुरुषांशी प्रेमप्रकरणे आणि लग्न यामुळे तिची बदनामी झालीच, पण व्हॅटिकननेही तिला बहिष्कृत ठरवले होते. मधल्या काळात तिचा मित्र आणि गायकअभिनेता रॉक हडसन याचा एड्सने बळी घेतला आणि एलिझाबेथ हादरली. त्याच्या जाण्याने तिला एड्स संशोधनविषयक फाऊंडेशनची स्थापना करण्याची प्रेरणा दिली. या क्षेत्रातील योगदानामुळेच तिला ऑस्कर अकादमीने तिसरे गौरवपर ऑस्कर प्रदान केले. 
अनेक व्याधीविकारांचा सामना करताकरता तिच्या आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली होती. `मला पैसा, प्रसिद्धी, उत्तम जीवन सगळं काही विनासायास मिळाल्यागत वाटत असलं तरी मी भोगलंही खूप आहे‘, अशी वेदना तिने एकदा बोलून दाखवली होती. खेदाची बाब ही की अभिनयासाठी दोनवेळा ऑस्कर मिळवूनही समीक्षकांनी तिच्या अभिनयगुणांपेक्षा तिच्या रसरशीत शरीरसौष्ठवाच्या पारडय़ातच नेहमी काकणभर वजन अधिक टाकले होते. तरीही, चित्रपट, ब्रॉडवे आणि टीव्ही या माध्यमांतील उण्यापुऱया सात दशकांची रुपेरी कारकीर्द आणि 50हून अधिक चित्रपटांमधील ताकदीचा अभिनय लक्षात घेता, लिझसारखी सौंदर्यवती अभिनयसम्राज्ञीही असू शकते का, या प्रश्नाचे उत्तर तिचा वकूब ओळखून असणाऱया दिग्गज दिग्दर्शकांनी, तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी नेहमीच होकारार्थी दिले आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेली एलिझाबेथ ही हॉलिवुडसाठी `क्वीनएलिझाबेथच होती एवढे नक्की!