खाकी वर्दीची मिजास

खाकी वर्दीच्या माजोरीपणाचा अनुभव आपल्या सगळ्यांना एकदा तरी आलेला असतोच; त्यात तुमची चूक असो वा नसो. आणि मग तुमच्या माझ्यासारख्या पांढरपेशा माणसाला मूग गिळून गप्प बसण्याशिवाय काहीच मार्ग राहत नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या खात्याच्या हातात आपला समाज किती सुरक्षित आहे हे आपण सगळे जाणतोच. आजची आपली अवस्था भीक नको पण कुत्र आवर यापेक्षा काहि वेगळी नाहीच. त्यामुळ मदत राहू दे बाजूला पण यांचा त्रास नको अशीच आपली एकंदरीत मानसिकता झाली आहे.
माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले. मध्यंतरी एकदा आम्ही पाच-सहा जण मित्र विमाननगर मध्ये पार्टीवरून परत येत होतो. रात्री ११-११:३० ची वेळ रमत-गमत गप्पा टप्पा करत आमचं टोळक रस्त्याच्या बाजूने चालल होतं. (आमच्यातल्या कुणीही कसलीही नशा केली नव्हती, सर्वजण अगदी पूर्ण भानावर होते)
इतक्यात विमाननगर, कल्याणीनगर भागात फिरणारी QRT (Quick Response Troup)ची गाडी सगळा रस्ता मोकळा असताना पाठीमागून येऊन आम्हाला चिकटली; आणि त्यातला एक पोलीस आम्हाला म्हणतो कसा काय रे भडव्यानो; तुमच्या XXXजवळ गाडी आली तरी तुम्हाला शुद्ध नाही का? शुद्धीवरती आणायला लागतय काय तुमाला?
हे ऐकून आमच्यातले जे शहाणे-सुरते होते ते गपगुमान पुढ सटकले; पण एकजण जरा गरम डोक्याचा होता तो त्यांना खुन्नस देत तिथच उभा राहिला. यावर गाडीतला एकजण म्हणाला बघतोस काय रे भडव्या? माज आलाय काय तुला? ह्याला घ्या रे आत. मग मात्र मी मध्यस्थी केली, म्हणालो माफ करा साहेब; चूक झाली. इथच बाहेर जेवायला गेलो होतो. जरा उशीर झाला
यावर गाडीतनं आवाज आला ठीकाय ठीकाय; मित्राला चड्डीत रहायला शिकव; नाहीतर चड्डी फाटेस्तोवर मार खाईल एक दिवस”  मी जरा निरखून बघितला तर गाडीत फ्रंटसीटवर बसलेला तो PSI किंवा हवालदार जो कुणी होता तो चक्क दारू पिऊन झिंगत होता. मी मनात म्हटलं “XXXच्यानो कोरेगाव पार्कात तुमच्या XXXखाली बॉम्ब स्फोट झाले तरी तुमच्या खात्याला पत्ता लागला नाही आणि आमच्या सारखी सुशिक्षित पांढरपेशी माणस दिसली म्हणून लगेच मिजास कराय लागलाय काय?
ह्या गोष्टीला ५-६ महिने उलटून गेले असतील तेवढ्यात परवाच आणखीन एक किस्सा घडला. एक महत्वाच्या कामासाठी मी २-४ दिवस सुट्टी टाकून कोल्हापूरला गेलो होतो. तारीख होती १७ फेब्रुवारी; वेळ साधारण दुपारी ११:३०-१२ ची असेल. मी बिंदू चौकातून पुढे मिरजकर तिकटीच्या दिशेने माझ्या बाईक वरून चाललो होतो.
एवढ्यात मला लांबून सायरन ऐकू आला, मला वाटलं कि एखादी अम्ब्युलंस वगैरे असेल म्हणून, आधीच कोल्हापुरातले जगप्रसिध्द रस्ते (कोल्हापूरी भाषेतच सांगायचं झालं तर इथल्या आमदार खासदारानी आणि महानगरपालिकेन IRB वाल्यांच्या मदतीन कोल्हापूरकरास्नी २२० कोटी रुपयांचा घोडा लावलाय) त्यात गर्दीची वेळ. पण संधी मिळताच मी सायरनवाल्या गाडीला वाट करून दिली. बघतोय तर काय एक पोलीस गाडी.
गाडी जवळपास फर्लांगभर पुढ गेल्यावर मी माझी बाईक परत रस्त्यावर घेतली, तसे मागून २-३ मोठे हॉर्न, पुढे गेलेल्या पोलीस गाडीतून तो हवालदार मोठ-मोठ्यान बोंबलाय लागला; मला म्हणाला
“ए माकडा, पाठीमाग दिसत नाही का तुला? (हेच्या बान् माणसाला पाठीमाग डोळ ठेवल्यात……)
मी माझी बाईक झटदिशी साईडला घेतली; तर पाठीमागून एक मंत्री महोदय Ambassador गाडीतून अगदी राजाच्या आवेशात चालले होते. मी जरा निरखून बघितले; गाडीचा नंबर होता MH-09 8989. आता ते असे कुठे दिल्लीवर स्वारी करायला चालले होते कुणास ठाऊक कि आपल्याला मंत्रीपदी बसवणारी हि रस्त्यावरची जनताच आहे; याचाही त्यांना विसार पडावा?.
त्यांची गाडी पुढे जाऊन परत गर्दीत अडकली; यावेळी बिचाऱ्या २-३ रिक्षावाल्यांनी त्या पुढे चाललेल्या पोलीस गाडीतल्या हवालदाराकडून स्वता:च्या आया-बहिणींचा अस्सल कोल्हापूरी भाषेत उद्धार करवून घेतला. आता मंत्र्याच्या गाडी पुढे आपली वाहने आणू नयेत असा कुठे कायदा आहे का? आणि २-५ मिनिट उशीर झाला मंत्री साहेबाना तर असा काय फरक पडणार आहे? आयला ह्या XXXच्यानी संसदेच सगळं अधिवेशन टाईमपास करण्यात घालवल; शेकडो कोटी रुपयांचा चुराडा केला; त्यावेळी कुठे गेले होते हे पोलीस?
हे सगळ बघून माझ डोक जम सटकल; वाटल रस्त्यावरचा दगड उचलून त्या रांडच्या पोलिसाला एक टीप्पिर्र्यात गार करावा. आयला साहेब पेक्षा शिपायाचीच मिजास जास्त.
पण करणार काय? गर्दीपुढ आणि वर्दिपुढ कुणाच काय चाललय का? झालेल्या अपमानामुळ मनातल्या मनातचं चरफडत त्या हवालदाराची आई-बहिण एक केली आणि गप्प बसलो.
दोन-तीन दिवस झाले आणि तेवढ्यात दैनिक पुढारी मध्ये खाली दिलेली बातमी वाचली. मग म्हटलं चला आता यावर एक पोस्ट लिहूनच टाकू. तसही प्रापंचिक लडतरीतून आपल्या ब्लॉगकड आपलं बरच दुर्लक्ष झालय. आयता विषय मिळालाय मनातला सल बाहेर काढायला कशाला सोडा?

श्री घाटण देवीचे मंदिर

मंदिराचा बोर्ड

मागच्या महिन्यात नाशिक सेक्युरीटी प्रेस बघायचा योग आला होता. मुंबई नाशिक हायवे वरून जाताना मानस रेसोर्ट च्या आधी एका ठिकाणी काही गाड्या थांबलेल्या दिसल्या. पास होता होता एक वाकडा झालेला बोर्ड बघायला मिळाला. ” श्री घाटण देवी मंदिर” मनात लगेच विचारचक्र चालू झाली हे नाव कुठे ऐकले आहे. नंतर आठवले माझ्या बायकोच्या तोंडून हे नाव ऐकले आहे. हि घाटण देवी तिच्या गावाचे कुलदैवत. तीने सांगितले होते कि कधी नाशिक ला जायला मिळाले तर नक्की त्या देवीचे दर्शन करून ये. ते आठवेपर्यंत गाडी ९० च्या स्पीड ने खूप पुढे निघून गेली होई. ड्रायवर ला सांगून ठेवले होते कि येताना ते मंदिर आले तर सांग मला दर्शनाला थांबायचे आहे.येतेवेळी त्याने आठवणीने मानस रेसोर्ट आल्यावर सांगितले गाडी बाजूला थांबवून मी तिथे उतरलो.
श्री घाटण देवीचे मंदिर 
सुंदर छोटेसे मंदिर रस्त्याच्या बाजूला उभे होते. ते बहुतेक नवीन बांधलेले होते कारण आधीचे मंदिर जुन्या रस्त्याच्या खूप जवळ होते आणि खूप छोटे होते. रस्ता रुंदीकरणात ते मागे घेऊन नवीन मोठे देऊळ बांधले आहे.  बुटे काढून आत आलो तर समोर सुंदर देवीची मूर्ती दिसली काही माणसे दर्शन घेत उभी होती. रात्री गस्त घालणारे हायवे पोलीस साष्टांग नमस्कार घालत होते. मोठ्याने आवाज देत होते,’देवी सर्वांचे रक्षण कर, आज कुणाचा अपघाताची बातमी नको येउदे’. नमस्कार घालून ते निघून गेले.

मी मंदिर रिकामे होईपर्यंत बाहेर थांबलो कारण मला फोटो काढायचे होते. दरवाज्यातच देवीचा सोनेरी रंगातला सिंह होता. लाल रंगाच्या साडीतली देवीची मूर्ती छान दिसत होती. बघून प्रसन्न वाटले.

ह्या मंदिरानातर मुंबईकडे येताना कसारा घाट चालू होतो. पूर्वीचा घाट खूप अरुंद होता आणि अपघाताचे प्रमाण खूप होते. त्यामुळे ह्या हायवे वरून जाणारे ट्रक ड्रायवर, एसटी ड्रायवर ह्या देवीला पाया पडल्याशिवाय पुढे जात नव्हते. आता हि लोक कसारा घाट चालू व्हायच्या आधी ह्या देवीचे दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही. ह्या देवीची दर दसऱ्याला मोठी जत्रा भरते.आजूबाजूच्या गावातले सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने जत्रा साजरी करतात.
कधी नाशिक हायवे वरून पास होत असाल तर नक्की ह्या देवीचे दर्शन घ्या.
श्री घाटण देवी
श्री घाटण देवी
श्री घाटण देवी
मंदिर बाहेरचा परिसर

My Tour Diary/ माझे प्रवास वर्णन

लहानपणापासून मी अनेक मोठ्या मोठ्या लेखकांची प्रवास वर्णने वाचत आलो आहे. नंतर नंतर खूप कंटाळा यायला लागला आणि प्रवास वर्णनांची चीड यायला लागली. मधली काही वर्षे तर मी काहीच प्रवास वर्णने वाचली नाहीत. नंतर नेट आल्यावर मग भरपूर जणांची प्रवास वर्णने वाचायला लागलो तरी सुद्धा जेवढे पाहिजे तेवढे आवडत नाही. पण नवीन जागा / नवीन माहिती असेल तर वाचायला नक्की आवडते. लहानपणी विचार केला होता कि आपण पण आपला प्रवास वर्णन लिहावे पण मध्यंतरीच्या काळात त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागला होता त्यामुळे दुर्लक्ष झाले होते. ऑफिस च्या कामामध्ये फिरताना काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या पण त्या माझ्या जुन्या ब्लॉग मध्येच टाकल्या आहेत.
काही दिवसापूर्वी ठाण्यामध्येच फिरताना काही नवीन मंदिरे , जुन्या वस्तू दिसल्या तेव्हा अचानक विचार आला. आपले पण प्रवास वर्णन लिहायचे पण वाचन बोरिंग न करता फोटो लावून मोजक्या शब्दातच लिहायचे. त्या जागेबद्दल असलेली माहिती लिहियाची. मग त्या अनुषंगाने नवीन ब्लॉग लिहायचा विचार आला. ब्लॉगला नाव सुचता सुचता आणि ते ब्लॉगर वर मिळेपर्यंत एक महिना गेला. शेवटी कॉम्प्रोमाईज करत My Tour Diary हे नाव मिळाले. आणि श्री गणेश झाला. त्याची थीम आणि टेम्प्लेट करेपर्यंत दोन आठवडे गेले आणि फायनली पहिला ब्लॉग चालू झाला. तो पर्यंत ५० विझिट हि मिळाल्या…बहुतेक शोधाशोध करणारे आले असावेत.
असो फायनली ब्लॉग चालू झाला. ह्यात हेडिंग मध्ये लिहिल्याप्रमाणे अगदी घराच्या एक किलोमीटर अंतरापासून प्रवास चालू करणार आहे. ह्यात साहजिकच माझी बाईक आणि बायकोची मला चांगली साथ मिळणार  आहे.

अल्टि पल्टी दे घुमाके, ये वर्ल्ड कप हमको ही दिला दे

         नाही नाही म्हणता म्हणता मला पण या विषयावर लिहायचा मोह मला आवरला नाही. ज्याने सर्वाना जोडून ठेवला आहे अश्या एक “क्रिकेट” नावाच्या महायुद्धला सुरुवात झाली आहे. ओपनिंग सरेमोनी त ब्रायन महाशयांनी तर गाने म्हणून रंगतच आणली, आणि सोबतीला सोनू निगम आणि शंकर महादेवन ही होते…तर एकुणच दिमाखदार अशीच सोहळ्याची सुरुवात होती.    
       आणि आता ज्याची आपण सर्व आतुरतेने वात बघत होतो तो दिवस आला… भारत (ज्याला तुम्ही इंडिया म्हणून संबोधता, क्रिकेट खेळताना)  आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली मैच. वातावरण तर आधीच क्रिकेटमय अणि त्यात शनिवार पहिली मैच..आता पुढे काय राव…२:३० वाजले बंगलादेश ने टॉस जिंकुन भारताला फलंदाजी (ब्याटिंग) ला बोलावल…आणि क्रिकेट विश्वातील सर्वात बेस्ट ओपनिंग जोड़ी (आफ्टर ऑल मी भारतीय आहे)  सचिन अणि सेहवाग आलेत..पहिला बॉल अणि…४ , बस तिथेच ठरला की मैच आपण जिंकणार. सचिन च्या ब्याटिंगला आपण मुकलो खरे अणि बहुतेक तेच सेहवाग ला खटकल अणि म्हणून काय त्याने एकट्यानेच त्याचे अणि सचिनचे दोघांचे रन्स काढलेत तेहि पूर्ण १७५. सोबतीला कळस म्हणून कोहली होताच अणि त्याने त्याच ‘विराट‘ स्वरूपात नॉट आउट १०० रन्स केलेत. अणि पुढे काय तुम्हा सर्वाना तर माहितच आहे, भारताने त्याच दिमाखात पहिली मैच जिंकली.
          चला सुरुवात तर चांगली झाली आहे…वातावरण ही क्रिकेटमय आहेच.. म्हणजे अवघी पंढरीच ही क्रिकेट च्या रंगात न्हाउन निघाली आहे…अपेक्षा करुया की हेच वातावरण असेच राहिल आणि आपल्याला भारताच्या अश्याच म्याचेस (जिंकनार्‍या) आपल्या बघायला मिळोत….अणि परत एकदा हा विश्व कप आपल्यालाच मिळावा हीच अपेक्षा…
                 तर सर्व मिळून म्हणा   “अल्टि पल्टी दे घुमाके, ये वर्ल्ड कप हमको ही दिला दे” 

हनिमूनला गेल्यावर…

हनिमूनला गेल्यावर… 

मागच्या पोस्ट मध्ये हनिमून ला जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लिहिले आहे. सर्व तयारी करून हनिमून ला पोचल्यावर कोणत्या गोष्ठी लक्षात ठेवू शकता हे इथे दिले आहे.

 1. हनिमून च्या ठिकाणी सकाळी किंवा दुपारी पोचाल अशा हिशोबाने निघा कारण नवीन शहरात हॉटेल शोधताना त्रास होऊ शकतो. जर तुम्ही पॅकेज मधुन जाणार असाल तर टूरिस्ट वाले तुमच्या साठी सर्व बंदोबस्त करून ठेवतात पण जर तुम्ही स्वत: प्लॅनिंग केले असेल तर दिवसा उजेडी नवीन शहरात पोहचणे चांगले. किंवा जर तुम्ही हॉटेल बुकिंग केले असेल तर हॉटेल वाले हि तुमच्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट वर गाडी पाठवतात. 
 2. प्रवासात आपल्या पार्टनर ला कधीही एकटे सोडू नका. जर चुकामुक झाली तर खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे बस अथवा रेल्वे स्टेशन ला थांबली असताना फिरून येणे टाळा. जर गाडी चुकली तर विचार करून बघा नवीन शहरात किती मनस्ताप होईल ते ?
 3. तुम्ही जर टॅक्सी किंवा रिक्शाने जर हॉटेल वर पोचणार असाल तर छोट्या छोट्या गोष्टीवरून किंवा पैशावरून त्यांच्याशी हुज्जत घालू नका अशाने तुमचा मुड हि खराब होतो आणि पार्टनर समोर इमेज हि खराब होते.
 4. हनिमुनला गेल्यावर मनमोकळा खर्च करा. काही पैशांसाठी चांगल्या हॉटेलात जाणे, वस्तू विकत घेणे टाळू नका. (त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर ऐकावे लागू शकते.)
 5. हनिमून ला गेल्यावर पैशांचे पाकीट बाळगण्यापेक्षा प्लास्टिक मनी म्हणजेच डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड वापरा ते सोयीस्कर पडते. पण हाताशी सुट्टे पैसे पण बाळगा. सर्व पैसे स्वत: कडे न ठेवता अर्धे आपल्या पार्टनर कडे देऊन ठेवा जेणेकरून जर तुमचे पाकीट कधी मारले गेले तर तुमच्या पार्टनर कडे तरी काही पैसे राहतील.
 6. सहसा हनिमूनला गेल्यावर नवदाम्पत्यांची चांगली बडदास्त ठेवली जाते. हनिमून कपल ला सर्व ठिकाणी आदराने मदत केली जाते. त्यामुळे  हॉटेल मध्ये गेल्यावर तिथे तुम्ही हनिमून ला आला आहात असे समजले तर हॉटेल वाले तुमची चांगली खातिरदारी करतात. काही हॉटेल मध्ये स्पेशल हनिमून स्युट असतात ते तुम्हाला मिळू शकतात. ते तुमची रूम चांगली सजवूनहि देतात. नसेल देत तर काही पैसे देऊन तुमची रूम चांगली सुवासिक फुले किंवा सुगंधी मेणबत्ती लावून सजवून घ्या. त्याने तुमची रात्र नक्कीच चांगली जाईल.
 7. महत्वाचे : रूम वर गेल्यावर सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व रूम चेक करा. आजकाल छुपे कॅमेरे आणि टू साईड मिरर मुळे तुमचे खाजगी जीवन धोक्यात येऊ शकते.कदाचित हे वाचायला तुम्हाला विचित्र वाटेल पण ह्या गोष्टींची शक्यता टाळता येत नाही अगदी मोठी मोठी ५ स्टार हॉटेल हि ह्या प्रकरणात सामील असतात. त्यामुळे आपण काळजी घेतलेली बरी.
 8. हे कॅमेरे शक्यतो एखाद्या वस्तुत लावले असू शकतात जेथून तुमचा बेड व्यवस्थित दिसतो. त्यामुळे रुम मधल्या सर्व वस्तू चेक करणे चांगले. जसे भिंतीवरील एखादे पेंटिंग, शोपीस , बेड वर लावलेले डिझाईन , फ्लॉवरपॉट, पेन, रंगीत दिवे, आरसे, कुठलीही इलेक्ट्रिक वस्तू, बाथरूम मधील एखादा नको असलेला पाईप, बाथरूम च्या खिडक्या वगैरे अनेक गोष्टीमध्ये छुपे कॅमेरे असू शकतात. त्यामुळे सर्व वस्तू हलवून, फिरवून ठेवणे चांगले. 
 9. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न झाल्यावर इतक्या विधी असतात कि जेणे करून नवीन कपल ला हनिमून ला जाण्यापूर्वी खूप वेळ मिळतो. ह्या सर्व प्रसंगात आपल्या पार्टनर ला ओळखून घ्यायचा प्रयत्न  करा. वेळ आणि एकांत मिळेल तेव्हा एकमेकांना हलकाच चोरून स्पर्श करा. सर्वांच्या नकळत हलकेच हात हातात घेऊन दाबा. अगदीच मिळाले तर गालावर चुंबन करा. जेणेकरून एकमेकांच्या स्पर्शाची सवय होईल आणि हनीमून च्या वेळेला तुमच्या मिलनाच्या इच्छा चांगल्या जागृत होतील.
 10. आज कालच्या मुली जरी मॉड असल्या तरी काही मुली आपले घर, आई वडील ह्यांना सोडून आल्या असल्यामुळे जरा नाराज असतात. सासर चे नवीन आई वडील, नवीन कुटुंब, खाण्याच्या, राहण्याच्या पद्धती ह्यामुळे जरा बावरलेल्या असतात. त्यात एक पुरुषाबरोबर नवीन ठिकाणी जावे लागल्यामुळे हि जरा घाबरलेल्या असतात. त्यामुळे एकदम त्यांच्यावर तुटून पडू नका. प्रवासात त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना विश्वासात घ्या. हातात हात घेऊन हलकेच दाबा त्यामुळे त्यांना विश्वास वाटेल आणि जरा सावरायला मदत होईल.
 11. आई वडिलांना सोडून आल्यामुळे मनातून उदास असतात त्यामुळे वेळ भेटेल तेव्हा त्यांना घरी फोन लावून द्या. त्यामुळे जरा उदासी कमी होईल. (तुम्हाला रोमिंग चार्जेस लागतील पण ते दुर्लक्ष करा. फोन लावायच्या आधी त्यांना कल्पना द्या. फोन लावल्यावर सांगू नका…त्यांना राग येतो) 
 12. फिरायला गेल्यावर पार्टनर ला एकटे सोडून जावू नका. कुठे चुकामुक झाली तर कुठे भेटायचे हे सांगून ठेवा. मोबाईलची रेंज असेलच सांगता येत नाही. 
 13. साईट सीइंगचे, फिरण्याचे शेड्युल आधीच आखून ठेवावे. मोजक्याच जागा बघाव्या अन्यथा थकायला होते आणि रात्री जगायचे पण असते ना !! 
 14. हनिमून च्या पहिल्याच रात्री घाई करू नका जर लग्न अरेंज मॅरेज असेल तर दोघांनी एकमेकांना समजण्यास वेळ घ्यावा आणि मगच शारीरिक संबध प्रस्थापित करावे. 
 15. जेवताना  प्रमाणात खा आणि खाल्ल्यावर दात घासायला विसरू नका. माउथ फ्रेशनर चा उपयोग हि करू शकता. जेवल्या जेवल्या लगेच बेड वर जाऊ नका. जवळपास फेरी मारून या किंवा हॉटेल च्या बगीच्या मध्येच फेरी मारा.
 16. नशापान करणे टाळा. पार्टनर वर वेगळाच परिणाम पडू शकतो.
 17. खाताना, फिरताना, काही गोष्ट करताना वाद टाळा. एकमेकांवर कमेंट मारू नका किंवा एकमेकांचा पाणउतारा करत बसू नका. काही चुकले तर एकांतात किंवा रूम वर आल्यावर समजावून सांगा.
 18. लग्नात आलेले कौटुंबिक समस्या, लग्नातले वाद, देवाण घेवाण वरून झालेले वाद आपल्या हनिमूनला तर नक्कीच टाळावे. ऑफिस च्या गोष्टी, फोन टाळा.
 19. शक्य तवढे दागिने आणि मौल्यवान वस्तू  कमीत कमी घेऊन जा.

आता काही मिलनापुर्वीच्या महत्वाच्या गोष्टी 

 1. पहिल्याच रात्री शारीरिक संबंध साठी घाई करू नये. जर अरेंज मॅरेज असेल तर मुलीला सावरायला वेळ लागतो. पहिल्या रात्री गप्पा हि मारू शकता एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेऊ शकता. 
 2. मिलनापुर्वी अंघोळ नक्की करा त्याने अंगाला घामाचा वास हि नाही येणार आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
 3. पार्टनर ला हलकेच स्पर्श करा, हात हातात घेऊन हलकेच दाबा. एकांतात मिठीत अलगद ओढून घ्या. लाजून मुलगी बाजूला होत असेल तर तिला होऊ द्या पुढच्या वेळेला मिठीत घेतली कि ती नाही बाजूला होणार. ओठांवर चुंबन घेण्याची घाई करू नका. पहिले गालावर करा, कपाळावर करा आणि मग ओठांवर करा.
 4. वातावरण निर्मिती करण्यासाठी लाईट डीम करू शकता, रूम सुगंधित करू शकता, एखादी सुगंधी अगरबत्ती लावू शकता. सुगंधी फुले बेड वर टाका. रोमॅंटिक  गाणे लावा. गाणे लावायला काही नसेल तर मोबाईल मध्येच लावा. 
 5. वातावरण निर्मिती झाली कि मग हलकेच स्पर्श करा. स्पर्शात जी भावना व्यक्त करण्याची ताकत असते ती कशात हि नाही. हळुवार आलिंगन द्या कुठेही घिसाड घाई करू नका.
 6. आधी सांगितल्याप्रमाणे पार्टनर ला काहीतरी सरप्राईज  गीफ्ट द्या. छान अशी अंतर्वस्त्रे द्या.बाजारात हनिमून स्पेशल अशी अंतर्वस्त्रे मिळतात.  त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी एक छानसे आपल्या हाताने प्रेम पत्र लिहा. प्रेम पत्र कसे लिहायची ह्याच्या काही छान टिप्स तुम्हाला प्रशांत रेडकर ह्यांच्या ब्लॉग वर मिळतील.
 7. आजकाल च्या मुलांमध्ये एक भीती असते, तणाव असतो कि आपण हे करू शकू कि नाही आपण लवकर एक्साईट होऊन काही गडबड तर नाही ना करणार. ह्या तणावामुळे मुले चांगले प्रेम हि करू शकत नाही. तीच गोष्ट मुलींच्या बाबतीत असते. भीतीमुळे त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही आणि नर्वसनेस मुळे त्या प्रतिसाद देऊ शकत नाही आणि पहिली रात्र तणावाखाली वाया जाते. ह्या सर्व गोष्टींचे टेन्शन न घेता बिनधास्त प्रेम करावे. काही चुकले माकले तरी ते दोघांमध्येच राहणार असते. दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यावे.
 8. तुझे हे पहिले चुंबन होते का ? तुझे हे पहिले प्रेम होते का ? तुझ्या आयुष्यात आलेला मी पहिलाच/ पहिलीच आहे ना ? असे फालतू प्रश्न विचारू नये. समजा उत्तर “नाही” आले तर ..ते सहन करायची ताकत असायला हवी.
 9. फॅमिली प्लॅनिंग नक्की करा. निदान सुरवातीचे २ वर्षे तरी.
 10. जास्त  डीटेल मध्ये आता लिहीत नाही बाकी तसे आपण सुज्ञ असलाच.

आणि हो ! सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे दोन्ही कुटुंबासाठी काही भेटवस्तू आणायला विसरू नका त्याने तुमचे सासर बरोबर रिलेशन चांगले राहतात आणि बायको पण खुश राहते…..

मधुचंद्राच्या शुभेच्छा !!!
Happy Honeymoon. !!!

(सर्व चित्रे नेट वरून साभार/ Image Source: Internet)

नामदेव मल्हारजी म्हात्रे (…भाग ३…)

बायोडेटा वरती एक्स्पीरीयन्स ३.६ दिसू लागलेला. हे अनुभवाचं वय सांगायची गम्मत अशी की आज-काल माझ्या मुलाचं वय सुद्धा मी १.३ सांगतो. नॉन-आयटी वाल्या लोकांना गम्मत वाटते ऐकताना. तर मूळ मुद्दा असा की ३.६ वर्ष झालेली आणि मी मुंबई सोडून पुण्याला आलो. काही दिवसांनी नाम्यानी कंपनीच सोडली आणि पुण्याला शिफ्ट झाला. दोघांचीही लग्न ठरलेली. माझी होणारी बायको विदर्भातली आहे ह्या एकाच पॉइन्टवरती तो माझा मेव्हणा झाला. 

‘आयला सम्या, लग्नानंतर तुझ्या घरी जेवनाची जुगलबंदी चालनार बघ. वहीनी तिखट, आनी तू गोड. फार गोड खाता राव तुम्ही पुनेकर. चिकन, मटन मध्ये साखर टाकता येत नाही म्हनून खोबरं टाकून त्ये पन गोड. आरारारा! आनी आमचा विदर्भी ठसका बघ आता. झन-झनीत!’ माझ्या सुदैवानं तसं काही नाही झालं. बायको अगदी सुगरण मिळाली, नाहीतर पाईल्सची स्वप्नं पडू लागलेली मला ह्या ह*** नाम्यामुळे.
काही महिने उलटले आणि आमची लग्नं सुद्धा पार पडली. संसार सुरू झालेले आणि मग करीयर मधला फोकस वाढू लागला. नाम्याशी कॉन्टॅक्ट संपले नाहीत, पण दुर्मीळ झाले. महिन्यातून एखादा फोन कींवा मेल, तर कधी चॅट. नाम्यानी पुण्याच्या मध्यभागी, अगदी पेठेत एक जागा भाड्याने घेतली. कोणी विचारलं की ‘नाम्या कुठे रहातोस?’ तर आवलीपणा दाखवत ‘डाऊन-टाऊन पुने’ असा टिळक रोडचा वरचा त्याचा पत्ता सांगायचा.
सगळं तसं नॉर्मल चालालं होतं पण एक मोठी उडी हवी होती. एखादा सैनिक बॉर्डरवर लढण्याचं जसं स्वप्नं पहातो, तसाच प्रत्येक सॉफ्ट-वेयर इंजिनीयर ऑन-साईटचं स्वप्नं पहातो. ह्याचंच ध्येय उराशी बाळगून करीयरची सूरूवात होते. एका रविवारी संध्याकाळी मी आणि नाम्या ‘एस.पी. कॉलेज’ समोर भेटलो आणि हाच विषय निघाला 
‘च्या-मारी सम्या हद्द झाली राव’ असं म्हणत नामदेवनी कटिंग-चहाचा घोट घेतला. टिळक-रोडवरच्याच एका अम्रुततुल्या मध्ये आम्ही बसलेलो. (नॉन-पुणेकर लोकांसाठी; अम्रुततुल्य इज-ईक्वल-टू चहाचं हॉटेल कींवा टपरी).
‘काय झालं रे?’ मी विचारलं.
नाम्यानी अजून एक चहा मागवला आणि म्हणाला, ‘अबे परवा माझा पासपोर्ट एक्सपायर झाला. आयला राव कोनताही ऐरा-गैरा जाऊन राहीला ना राव ऑन-साईट, अन आपन बसलोय इथच. नेपाळचा का होईना, पन एकतरी वीजा पासपोर्टला चिकटू देत यार. ’
‘खरंय यार नाम्या. पण नशीबात असेल तर मिळेल रे. आणि तसही तुझं ऑनसाईट झालय की रे!’ मी खवचटपणाने म्हणालो.
‘हा बरोबरे! करा चेष्टा आमची. आयला माझं ऑन-साईट म्हनजे दोन महिने कोल्हापूर आनि सहा महिने इचल-करंजी. आनि हो; मध्ये तीन महिने उरूळी-कांचन. तेच आमचं यू.के. म्हनायचं झालं.’ नाम्या आधी सातार्याला एका छोट्या कंपनीत होता. मालक आणि तो, असे दोनचं प्रोग्रॅमर त्या कंपनीत. पत-पेढ्या, सहकारी बँका, छोट्या दुकानांची, कारखान्यांची बिलिंग सिस्टिम असे प्रोजेक्ट असायचे तिथे. म्हणून हीच शहरं हे त्याचं ऑन-साईट. आणि खरं सांगायचं तर, नॉन-आयटीवाल्यांसाठी ऑन-साईट म्हणजे परदेश, असं ईक्वेशन झालं असलं तरी ते चुकीचं आहे. ऑन-साईट म्हणजे थेट क्लायंट कींवा कस्टमरच्या ऑफिस मध्ये बसून करण्याचं काम; भले मग शहर कींवा देश कोणताही असो. मला सुद्धा एका परदेश यात्रेची अत्यंत ओढ लागलेली, अ‍ॅन्ड फायनली वन डे माय प्रेयर वॉज अ‍ॅन्सर्ड; साऊथ-आफ्रीका! ज्या दिवशी हे तिकीट आलं, त्या दिवशी नाम्या माझ्यापेक्षा जास्तं खुश होता. माझ्या आणि माझ्या बायको सोबत ते कपल शॉपिंगला सुद्धा आलं. 
जवळपास दोन महिने झालेले मला जोहॅनेसबर्ग मध्ये येऊन, आणि कंपनीत डेटाबेसच्या माणसाची रीक्वायरमेन्ट आली. वेळ न दवडता नाम्याचा रेज्यूमे मी पुढे सरकवला. टॅलेन्ट आहे त्याच्यात, तो सिलेक्ट सुद्धा झाला. मग काय यार! नाम्या महिन्याभरात साऊथ-अ‍ॅफ्रीकेत माझ्या सोबत. एका घरात नाही रहात, पण एकाच बिल्डींग मध्ये आहोत. म्हणालो ना, काही माणसं च्यूविंग-गम केसांना चिकटावं तशी चिकटतात!
परदेश म्हटलं की नवीन कल्चर, नवं शहर, नवी माणसं आणि नवे कोरे किस्से. तसं तर इथे बरच काही घडत असतं, पण काही ठरावीक सांगतो.
जोहॅनेसबर्ग हे अत्यंत सुंदर महानगर आहे, पण त्याचं अजून एक मोठं कारण म्हणजे इथल्या पोरी यार! काय सांगू राव! कोणाचे डोळे छान, कोणाचे केस, कोणाच स्माईल, तर कोणाची स्टाईल; हे असं आपण नेहेमी ऐकत असतो. इथे म्हणजे रस्त्यावर ब्यूटी कॉम्पिटीशन सुरू असते. नाम्या म्हणजे पहिल्या आठवड्यात सैरा-वैरा धावत सुटलेला. आपलं लग्न झालय हे विसरून, टक लाऊन उभा असायचा. मात्र फालतूपणा आम्ही कधीच केला नाही. भारताची सीमा एकदा का ओलांडली की काही लोकं चारीत्र्याची सीमा ओलांडायचा वीजा मिळालाय, असा समज करून घेतात. मी, नाम्या आणि आमच्या आजू-बाजूच्या अनेक मित्रांनी मात्र हा बॅलेन्स कधीच ढळून दिला नाही. मजा करा, दंगा करा, अरे मी तर म्हणतो व्यसन नाही लागत तितकी दारू सुद्धा प्या. आमचा नाम्या आठवड्यातून एक-दोन पेग मारतोच की. पण नको त्या गल्लीत आपली उपस्थिती दाखवणं; कधीच नाही. असो! प्रत्येकाला अक्कल नावाचा अवयव नाही देता येत देवाला, पण तो प्रकार अस्तित्वात असतो. म्हणून ते मी इथे पाजळत नाही. लोकांना तोंड काळं करायचय, त्यांनी करूर करावं. पण माझ्याकडे ‘चल की एकदा, काय होतय!’, असं म्हणत आलात पुन्हा, तर त्या रंगात निळा रंग मिसळायला मी मागे-पुढे पहात नसतो; आणि माझ्यापेक्षा नाम्या!

नाम्याचा अजून एक हिट किस्सा म्हणजे इथल्या एका सलून मध्ये घडला. जोहॅनेसबर्गमध्ये फोर्ड्सबर्ग नावाचा एक एरीया आहे. भारतीय, पाकीस्तानी, बांगलादेशी आणि आफ्रीकी लोक इथे अत्यंत शांतपणे आप-आपला धंदा करत असतात. इथल्या एका हेयर-कटींग सलून मध्ये आमची महिन्यातून एकदातरी चक्कर असते; चाऊ-थाई मेन्स पार्लर. आता पाकीस्तानी माणसानी चायनीज नाव का द्यावं त्याच्या दुकानाला हे एक कोडंच आहे. असो! तर आम्ही एका रविवारी इथे आमची डोकी दाखवायला गेलो. परदेश म्हटलं की नाम्या इंग्लिश मध्येच सुरू होतो एकदम. ते ठीक होतं, पण पाकीस्तान्यानं हिंदी सूरू केलं, तेंव्हा नाम्याची तंतरली. मग एकदम गप्प झाला आणि त्याच्या सोल्जर-कटसाठी खुर्चीवर बसला. दुकानात एक टी.व्ही. चालू होता आणि त्याचे चॅनल आमचा नागेश बदलत बसलेला. नाम्याचंच नशीब बघा, नागेश नेमका ‘गदर’ ह्याच पिक्चरवर येऊन थांबला. पाकीस्तानी सलूनवाला अचानक थांबला आणि एकदा नागेशकडे नजर टाकली. नाम्या सोडून बाकी कुणालाच काय झालं ते नाही समजलं. ‘सनी देओल’ हॅन्ड-पंप उखडतो तो सीन चालू झाला आणि सलूनवाला नाम्याचे केस त्याच स्टाईल मध्ये उखडू लागला. नाम्या आम्हाला खुणावत होता पण लक्ष कोणीच देईना. त्याची कटिंग झाली आणि आम्ही दुकानातून बाहेर पडलो. बाहेर पडताना सुद्धा नजर टी.व्ही. कडेच होती आमची. आम्ही जरा आड बाजूला आलो आणि मग नाम्यानी शिव्यांचं म्यूजियम उघडलं. मला, नागेशला, केदारला आई-बहीणीच्या इतक्या शिव्या झाल्या, आणि मग आम्हाला आमची चूक समजली. हसणं कंट्रोल होत नव्हतं, आणि नाम्याला मानेवरची जळ-जळ सहन होत नव्हती. सलूनवाल्याला, सनी देओलनी फारच पेटवलेलं. गळ्यावरून वस्तरा फिरवता आला नाही म्हणून त्यानं सगळा राग मागच्या गल्लीत, मानेवर काढला होता. कोकचा चिल्ड कॅन लाऊन नाम्या मानेला शांत करत होता.
नाम्या जेंव्हा जो-बर्गला आला तेंव्हा त्याच्या बायकोला कायगोलीला सोडून आलेला. तिच्या जवळ मोबाईल होता, पण कॉल्स महा-महाग राव! आठवड्यातून एखादा कॉल करायचा तो, आणि ते सुद्धा मस्त तासभर. तसं नुक्तच लग्नं झालेलं त्यांचं, सो तो जरा जास्तच मिस करत होता तिला. नाम्याला कधीच कोणत्या मुलीशी बोलताना मी ऐकलं नव्हतं, त्या मुळे बायकोशी तरी कसं बोलतो हे मला एक कोडंच होतं. तसा अधून-मधून माझ्याकडून टिप्स घ्यायचा, पण इमप्लीमेन्ट झालेलं कोणीच नव्हतं ऐकलं. एका रात्री मी कंपनी मधून उशीरा घरी आलो आणि नाम्याच्या रूमवर गेलो. दार सताड उघडं टाकून, अगदी अंधारात नाम्या बायकोशी बोलत होता. तसे कोणाचे पर्सनल कॉल्स ऐकू नयेत, पण माझ्या अंगातले कीडे वळवळत होते. नाम्या नक्की बोलतो कसा हे मला ऐकायचं होतं. तो डोक्यावरून पांघरूण घेऊन आरामात पडलेला, आणि आतून आवाज ऐकू येत होता. मी जवळ जाऊन ऐकू लागलो.

‘हं… काय म्हनली?… काही ऐकू येऊन नाही राहिलं… कुठंय तू आत्ता?’, नाम्याचं पुट-पुटणं सुद्धा अगदी क्लीयर ऐकू येत होता. मी मोबाईलचा रेकॉर्डर चालू केला. कीडेच ते, त्यांना मी तरी कसं आवरू!

‘… अगं त्ये रानात कशाला गेली आत्ता! त्ये शिंत्रे तिथंच बसतात परसाकडला. झाडा मागून म्हातारा कधी अनि काय ऐकल काही भरवसा नाही. तुला घान कशी वाटत नाही गं!’ मी तोंडात टॉवेल घातलेला हसू आवरायला.

‘… आनि बाकी कशेत सगळे?… हं…हं… माझी आठवन येती का? तुले येत नसेल, तरी मले फार येती’, हे मले-तुले अधून मधून बर्याच वेळेला ऐकलय नाम्याच्या तोंडून; ग्रामीण विदर्भातली अजून एक मराठी अदा.

मग एकदम रॉमॅन्टीक नाम्या जागा झाला, ‘बाहेर चंद्र पाहिलास का शीतल? कशी पोर्निमा खुलून राहीलीये बघ जरा. त्या चंद्राकडं पाहिलं की तुझीच आठवन यून रहिली बघ मले’, डोक्यावरून चादर ओढलेली ह्या ह***, आणि ह्याला चंद्र दिसला बरका! ‘…आ, काय सांगते! आज पोर्निमा नाही? चंद्र अर्धाच दिसतोय? आयला मला कसा पुर्नं चंद्र दिसून राहिला मग! त्ये देश बदलला ना की चंद्राची डायरेक्शन पन बदलते बघ’, अगगग! थाप मारावी, पण इतकी मोठी! माझ्या तोंडातला टॉवेल मी अजूनच आत दाबला. डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं आणि हसू कंट्रोल करणं अवघड होत होतं.

आणि फायनली, ‘… चल आता ठेवतो रानी; बील वाढत चाललंय. आय लव यू, म्हन की येकदा… आयला म्हनलंस की लगेच! मले वाटलं लाजशील. प्र्याकटीस दिसून राहीली तुले.’ आणि मग स्वत:च जोरात हसला. खूद्द बायकोला असलं स्टेटमेन्ट हाच मारू शकतो. त्याने फोन कट केला आणि मी तोंडातला बोळा काढून जोर-जोरात हसायला लागलो. अंधारात दचकला नाम्या, आणि मग जेंव्हा ते रेकॉर्डींग त्याला ऐकवलं, तेंव्हा माझ्या उरावर बसून ते डीलीट करायला लावलं. अ‍ॅक्चूवली ते डीलीट केलं नाही मी, अजून सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये आहे. सॉरी काय करू, आहेतच तसे कीडेच अंगात!

(क्रमश:)

तिसरा भाग तसा मी संपवला होता. पण व्रूषाली, स्वप्निल, प्रशांत, आशीष, दिनेश, नागेश आणि इतर अनेक लोकांच्या सजेशन्स-कम-शिव्या खाल्या आणि कंटीन्यू करावं लागलं.

स्पेशल थॅंक्स टू ‘समीक्षा नेटके’, माझ्या ब्लॉगचा उल्लेख मुम्बईच्या ‘प्रहार’ ह्या न्यूज-पेपर मध्ये त्यांच्या लेखात केल्याबद्दल. हा लेख तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर…
१. http://epaper.prahaar.in/ ही वेबसाईट ओपन करा.
२. वरती तारीख ६ फेब्रीवारी २०११ करा. क्लिक बटन `GO’.
३. वरतीच ‘कोलाज’ ह्या पुरवणी वरचं, ४ नंबरचं पेज क्लिक करा.
४.  लेख : ‘व्यायामसोहळा’.

ब्लॅक फ्रायडे (भाग ७ : अंतिम)

“तुला माहितीये मी काय आणि कशाबद्दल म्हणतोय ते!” राहुलने सुहासकडे रोखून पहात विचारलं. तसा सुहास सटपटलाच.
“तू कशाबद्दल म्हणतोयेस मला नाही कळत!” -सुहास नजर चुकवत बोलला.
“मग नजर चुकवत का बोलतोयेस?” -राहुल्याचा स्ट्रेट ड्राईव्ह!
“बघ राहुल, मी नजर चुकवत बोलायचा प्रश्न नाहीये! तू स्पष्ट बोलल्याशिवाय मला कसं कळेल की तू कशाच्या बाबतीत बोलतोयेस?” -सुहास.
“ऐकायचय! का कुणास ठाऊक, पण तुझ्याकडे इन्टर्नलचे पेपर्स आहेत अशी मला शंका आहे. मी कधीची स्वत:चीच समजूत काढत होतो की नाही, सुहाससारखा सरळमार्गी मुलगा असं करणं शक्यच नाही! तो स्वत:च्या अभ्यासाने पुढे जाणारा आहे. त्याला अशा कुबड्यांची गरजच नाही. सरळमार्ग सोडून जाणा-यांमधला सुहास नाही. पण तू गेल्या काही दिवसांपासून काहीतरी लपवतोयेस माझ्यापासून असं मला जाणवतंय! सांगायचं नसेल तर नको सांगूस! तू समजो अथवा न समजो, मी तुला एक चांगला मित्र समजतो, तुला समजण्यात बरेच जण चूक करतात. आपल्याला सिद्ध करायचंय की तू चूक नाहीयेस. तू मिळवत असलेले मार्क्स हे तू मेहनतीने मिळवलेले आहेत. त्याकरता तू कुठल्याही लांड्यालबाड्या केलेल्या नाहीयेस. बरोबर आहे ना? ” -राहुल्या वरवर साधं वाटणारं, पण सुहासला डिवचणारं बोलला. एका परीने तो अंदाज घेत होता, सुहास काही सांगतो का याचा!
शेवटी अपेक्षित परिणाम झालाच. सुहासने एक क्षण राहुलकडे टक लावून पाहिलं आणि डोळे बारीक करत तो म्हणाला, “दोस्त, तुला अशी शंका येण्याचं कारणच काय?”
“काही नाही रे, माझं आणि सम्याचं याच विषयावरुन तर भांडण झालं. तो म्हणत होता सुहासकडे पेपर्स आहेत आणि मी म्हणत होतो शक्यच नाहीये! सुहाससारख्या मुलावर आरोप करतांना तुम्ही विचार करुनच बोला. त्यावर ते सगळे म्हणे तुला जर त्याच इतकाच पुळका आला असेल तर त्याच्याकडेच जा! आमच्याशी कॉन्टक्ट ठेवण्याची गरज नाहीये! मीही ठणकावून सांगितलं, मी तुमच्या नाही तर सत्याच्या बाजूने आहे, सुहासची बाजू सत्य आहे त्यामुळे मी त्याच्या बाजूला आहे. जळतात स्साले तुझ्यावर रे!” राहुलने अगदी वर्मावर बोट ठेवलं.
“काय सांगू यार, मलापण चुकीचं वाटत होतं पण…”, सुहासने एक मोठ्ठा पॉज घेतला. क्या करे क्या ना करे अशी त्याची परिस्थिती झाली होती. राहुलला हाच पॉज हवा होता. “काय सुहास, थांबलास का? बोल ना!” -राहुलने अंदाज घेत विचारलं.
“पण यार माझ्याकडे खरंच क्ल्यू आहे क्वेश्चन पेपर्सचा!” सुहासने मान खाली घालत सांगीतलं.
“क्काय? सांगतोस काय? यार तू सुद्धा माझ्या विश्वासाला तडा दिलास! मला हे अपेक्षित नव्हतं!” राहुल्याने अगदी अविश्वास दाखवल्यासारखं म्हटलं. सुहास गप्पच होता.
“तुला अशी काय गरज पडली होती रे! तू शेवटी सिद्धच केलंस की सगळेच पाय मातीचे असतात. तुला काहीच कसं वाटत नाही रे!” राहुल्याचा आवाज आता चढलेला होता. सुहास खाली मान घालून ऐकत होता. त्याची सिट्टीपिट्टी गूल झाली होती.
“राहुल, माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स नाहीयेत रे! कायकाय क्वेश्चन्स येऊ शकतात याची आयडिया आहे. राहुल, तू कुणाला सांगणार नसलास तर मी तुला सांगतो की हे कसंकाय जमून आलं.”
“तुझी इच्छा!” राहुल मानभावीपणे बोलला.
“खरं सांगायचं तर मी काळेसरांना लाडीगोडी लावून ह्या टिप्स मिळवल्यात. त्याकरतापण मला पैसे मोजावे लागले आहेत. एका पेपरसाठी हजार रुपये घेतले त्यांनी! तुम्ही म्हणजे तुमचा ग्रुप सगळ्यात पुढे होता ना, मी जळायचो रे तुमच्यावर! मला कसंही करुन तुमच्या पुढे जायचं होतं, कुठल्याही प्रकारे! म्हणून मी हा मार्ग पत्करला. प्लीज कुणाला सांगू नकोस! नाहीतर मी उगाच गोत्यात येईन. काळे सरांना जर याबाबत काही कळलं ना, तर माझी काही खैर नाही. तू माझ्यावर इतका विश्वास दाखवलास म्हणून मी तुला सांगतोय. प्लीज प्लीज कुणाला सांगू नकोस! मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही पण तुला हिंट्स देऊ शकतो!” सुहास बोलला. आता लपवालपवी करण्यात काही अर्थ नाही हे समजून तो बोलत होता. त्याचं सगळं लक्ष आता राहुल काय बोलतो याकडे लागलेलं होतं.
“जाऊ दे, मला क्वेश्चन पेपर्स नकोयेत. काय सांगता येतं की ते खरे असतील की नाही. काळे सर तुलाही बनवत असतील. ऐन परिक्षेच्या वेळेस वेगळेच क्वेश्चन्स येऊ शकतात आणि याबद्दल तू काळे सरांना जाबपण विचारु शकत नाहीस. सगळंच इल्लिगल आहे!” -राहुल्याने उगाच त्याच्या डोक्यात संशयाचं एक पिल्लू सोडून दिलं. सुहास खरंच विचारात पडला. “खरंच यार, खरंच असं असलं तर? आपण काहीही करु शकत नाही. गेले पैसे! कशाच्या नादात आपण काय करुन बसलो. पैसे तर गेलेच, अभ्यासाचा पण बट्याबोळ झाला. मागच्या दोन वेळेपासून सर बरोबर टिप्स देतायेत पण आतापण बरोबरच असतील कशावरुन?” विचार करकरुन सुहासचं डोकं फिरायची वेळ आली होती. राहुल मस्त माईंड गेम खेळत होता आणि सुहास त्यात बरोबर अडकत चालला होता. असं डोकं शांत ठेवून आपण सुहासला बरोब्बर लाईनवर आणू शकतो हे राहुलला पूरेपूर उमगलं होतं.
“राहुल, कॉलेजची लॅब…” इतकंच सुहास बोलला. राहुल मनातल्या मनात काय ते समजला. पण वरकरणी तसं न दाखवता तो म्हणाला, “काय लॅबचं?”
“काही नाही रे, असंच.. मी म्हणत होतो प्रॅक्टिकल्स आहेत ना आता आपले, तर लॅब अपडेट करतील बहुतेक!” -सुहासने वेळ मारुन नेली. पण राहुलला क्ल्यू मिळाला होता.
रात्री राहुलने ग्रुपला पूर्ण हकिकत कथन केली. बरीच चर्चा झाली. सम्या म्हणाला,
“राहुल्या, त्या सुहासचा विषय सोड आता! आपल्याला लॅब हा क्ल्यू तर मिळालेला आहे! आता शुक्रवारच्या प्रॅक्टिकलला काय काय करायचं ते ठरवू. रव्या, तू आणि पश्याने सरांना बोलण्यात गुंतवायचं. निल्या, तू एका कॉम्प्युटरवर बसून लॅनमधून सगळे कॉम्प्युटर्स स्कॅन करायचे. पेपर्स सापडले की तू ते फोल्डर मिनिमाईज करुन ठेवायचं आणि तिथून उठून जायचं. उठताना मला खूण करायची. मी पासवर्ड्स असतील तर तोडून ठेवेल आणि एका ठिकाणी कॉपी करुन ठेवेल. त्या कॉम्प्युटरवर प्रॅक्टिकलची फाईल ओपन करुन ठेवायची, म्हणजे कुणाला काही शंका येणार नाही. मग राहुल्या, मी तुला माझा एक प्रॉब्लेम सोडवायला बोलवेन, तू फ्लॉपी ड्राईव्हमधे फ्लॉपी टाकून ठेवायची आणि मला तुझ्या सिस्टिमवर बोलवायचं, सांगायचं की तिकडे ये मी तिकडे सांगतो. निल्या, मग तू त्या सिस्टिमवर बसायचं आणि सगळे क्वेश्चन पेपर्स फ्लॉपीमधे कॉपी करायचे. लक्षात ठेव,हे काम एकदम बिनबोभाट व्हायला हवं. सापडलो तर आपली खैर नाही हे लक्षात ठेवा. एकही चूक खूप महागात पडू शकते. तेव्हा बी अलर्ट! आता…मिशन फ्रायडे! “
शुक्रवार… शुक्रवार ठरला होता. साळसूदपणे सगळे त्यादिवशी प्रॅक्टिकलला आले. शांतपणे सरांकडून स्लिप्स घेऊन सोडवायला लागले. आणि एका बाजूला शांतपणे मिशनपण सुरु होतं. सहाचे सहा पेपर्स कॉपी झाले होते, फक्त फ्लॉपी बाहेर काढायची होती, पण पाटील सरांचं कसंकाय लक्ष गेलं कुणास ठाऊक, त्यांनी निल्याला फ्लॉपी घेऊन बोलवलं आणि सगळं कामच आटोपलं. त्याक्षणी सगळ्यांना आपल्याला धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. सर्वजण माना खाली घालून लॅबच्या बाहेर निघाले. रव्या म्हणाला, “यार मिशन फ्रायडे तर आपल्यासाठी ’ब्लॅक फ्रायडे’ ठरला यार! आत्ता काय करायचं?”
“गप बे! प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे का? शांत बैस जरा. विचार करु दे ना!” -मन्या बोलला.
“चला आधी एक एक कटिंग मारु! त्याशिवाय डोकं चालणार नाही !” विज्या बोलला आणि सगळेच शिवाच्या चहाच्या टपरीकडे चालायला लागले.
चहा घेता घेता राहुल्या म्हणाला, “साले पेपर्सपण गेले आणि इज्जतपण! बरं हे पण माहीत नाही की ते खरे की खोटे! सगळंच संपलं सालं! नशिबच ख्रराब आहे यार!”
“नशिबाला दोष नको देऊ! प्लॅन फसलाय फक्त! आणि महत्वाचं म्हणजे घाबरु नका. पाटील सरांनी जरी तक्रार केली तरी आपण कॉपी करत होतो याचं त्यांच्याकडे काहीच प्रूफ नाहीये. होतं ते त्यांनी त्यांच्याच हाताने मिटवलंय. फ्लॉपीच फॉरमॅट केलीये! आणि मला नाही वाटत हे प्रकरण काळे सरांकडे जाईल! गेलं तरी काळे सर विश्वासच ठेवणार नाहीत. आपली आधीची पुण्याई कधी कामास येणार मग?” -सम्या गालातल्या गालात हसत बोलला. हा विचार येताच सगळे रिलॅक्स झाले.
“आता इंटर्नल एक्झाम तर पुढच्या आठवड्यात आहे. अभ्यास तर बोंबललेलाच आहे! काय करायचं काय आता?” -निल्या.
“चिल मार यार! उगाच टेन्शन घेतलं तर आपण काहीच करु शकणार नाही! चिल मार!” -रव्या.
…अचानक काहीतरी सुचून निल्या म्हणाला “राहुल्या, अरे तुझा भाऊ एम.ई. करतोय ना पुण्याला?”
“आता माझा भाऊ कुठे आला मधेच?” -राहुल्या.
“अबे ऐक तर खरं, तुला माहीतीये का ’सी’ लॅन्ग्वेजमधे गेलेला डेटा परत मिळवायचा प्रोग्राम लिहिता येतो.”-निल्या.
“मग? त्याचाही काय संबंध?” -राहुल्या.
“अरे मठ्ठ माणसा, फ्लॉपी कुठेय? त्यातला डेटा परत आणता येईल ना!” -निल्या चित्कारलाच!
“हा यार! हे कुणाच्या डोक्यातच आलं नव्हतं!” -सम्या.
“सो गाईज….. काय करायचं?” सम्या म्हणाला सगळेच हसायला लागले.
(समाप्त)

हनिमुनला जाण्यापुर्वी

हनिमूनला  जाण्यापूर्वीच्या टिप्स 


नुकतेच माझ्या एका मित्राचे लग्न झाले. ३ ते ४ दिवसांनी तो हनिमून ला जाईल. तेव्हा सिनिओरिटि च्या नात्याने त्याने माहिती विचारले. सिनिओरिटि अशा साठी कि माझे लग्न होऊन दोन वर्षे होत आली आहेत आणि आम्ही हनिमून ला जाऊन आलोय. अर्थातच आपल्याला कुणी भाव देऊन विचारले तर नक्कीच आपण २ इंच छाती फुगवून त्याला आपल्या अनुभवाचे बोल सांगतो. तसेच काही माझ्या बाबतीत हि झाले. म्हटले ज्या टिप्स त्याला दिल्या आहेत तेच ब्लॉग वर टाकू जेणेकरून इतरांना हि फायदा होईल.
काही गोष्टी अनुभवाच्या आहेत तर काही आजूबाजूच्या परिस्थिती वर अवलंबून आहेत.लग्न झाले आणि सर्व धार्मिक विधी उरकत आले कि नवदाम्पत्यांना हनिमून ची ओढ लागायला लागते. प्रत्येकालाच आपला हनिमून हा चांगल्या शहरात, मोठ्या हॉटेलात, सुंदर निसर्गरम्य वातावरणात आणि एकांतात  साजरा करायचा असतो. पण काही छोट्या मोठ्या चुकांमुळे व काही गोष्टी विसरल्यामुळे हनिमून च्या मजेवर पाणी फिरू शकते.

हनिमूनला जाण्यापूर्वी 

 • हनिमून चे ठिकाण निवडण्यापूर्वी आपल्या पार्टनरचा विचार नक्की घ्यावा. असे नको व्हायला कि तुम्ही जिथे बुकिंग कराल तिथे तुमचा पार्टनर आधीच आपल्या कुटुंबाबरोबर जाऊन आला किंवा आली असेल तर मग तुमची सगळी मजाच जाईल. एक वेळ मुले जाऊन असेल तरी ठीक आहे. जेणेकरून नवीन जोडप्यांना अनोळखी ठिकाणी फिरताना अडचण होणार नाही.
 • स्थळ निवडताना असेही होऊ शकते कि तुम्ही आपल्या भावी पत्नीला विचारात असाल तर ती लाजेल सुद्धा, अशावेळी तिला सरळ प्रश्न न विचारता विश्वासात घ्यावे आणि गप्पांच्या ओघात तिच्या मनाचा कल जाणून घ्यावा. 
 • हनिमून चे ठिकाण ठरवताना तिथल्या वातावरणाची, ऋतू, तिथले सण/उत्सव ह्याची सुद्धा माहिती घ्यावी. कारण जर थंडीच्या दिवसात तुम्ही हिल स्टेशन ला गेलात तर तिथली थंडी तुम्हाला सहन होत नाही. आता  पूर्ण कपडे घालून हनिमून कसा करणार ? काही शहरामध्ये तिथले धार्मिक उत्सव चालू असतात अशा वेळी जर आपण तिथे हनिमून ला गेलो तर राहण्यासाठी हॉटेल मिळत नाही, शहरात गर्दी असल्यामुळे हनिमून ला लागणारा एकांतहि मिळत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर दसऱ्याच्या सुमारास जर मैसूर ला गेलात तर राहायला हॉटेल्स नाही मिळत. राजवाड्यातून निघणारी मिरवणूक बघण्यासाठी खूप पर्यटक येतात. 
 • स्थळ जेवढे शांत, रमणीय आणि सुंदर असेल तितकाच तुमचा हनिमून मादक आणि बेभान होतो. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या ठिकाणावरच तुमचा ५०% हनिमून सक्सेस होतो.
 • हनिमून पॅकेज देणाऱ्या अनेक कंपनी किंवा खाजगी टूरिस्ट वाले असतात. सगळ्यांची पॅकेज चांगली बघून घ्यावी पूर्ण माहिती काढावी मगच निर्णय घ्यावा. जर नेट वरून बुकिंग करणार असेल तर आधी जाऊन आलेल्या लोकांचे कमेंट नक्की वाचावे. कधी कधी हॉटेल चे फोटो खूप चांगले लावलेले असतात पण प्रत्यक्षात हॉटेल्स तेवढे चांगले नसतात.
 • ठरवलेले ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीचे सर्व पर्याय (रस्ता,रेल्वे,हवाई) बघावे. जर रस्ता प्रवासाने जाणार असेल तर बस ची कंडीशन नक्की बघून घ्यावी. कारण प्रवासात नंतर त्रास होतो. रेल्वेने जाणार असेल तर तिकीट कन्फर्म असेल तरच जावे. नवीन नवरीला घेऊन उभ्याने प्रवास केला तर आयुष्यभर बायकोचे ऐकावे लागेल. हवाई प्रवास असेल तर पहाटेचे विमान पकडावे जेणेकरून तुम्ही दिवसा नवीन ठिकाणी पोहोचाल आणि काही शोधायचे असेल तर दिवसा शोधणे सोपे असते. नवीन ठिकाणी रात्रीचे उतरल्यावर हॉटेलपर्यंत पोचण्याचा त्रास होऊ शकतो. कारण आपल्या देशातली जास्तीत जास्त विमानतळे (काही मुख्य शहरातील अपवाद सोडला तर) हि शहरापासून दूर आहेत.
 • शक्य असल्यास कमीत कमी ७/८ दिवसांचे ते १५ दिवसापर्यंतचे पॅकेज बुक करावे. चार पाच दिवसांचे पॅकेज स्वस्त असले तरी वेळ खूप कमी भेटतो आणि हनिमून चा आनंद घेतल्या सारखा वाटत नाही. 
 • बजेट जेमतेम असेल आणि वेळ कमी असेल तर जाताना रेल्वेचा प्रवास करू शकता आणि येताना विमानाने प्रवास करू शकता. येताना थकला असता ना !
 • विमानाने प्रवास करताना काही लिक़्विड वस्तू जसे लोशन, हेअर क्रीम वगैरे घेऊन जाऊ नका. नेलकटर, शेविंग किट अगदी बिसलेरीचे पाणी हि घेउन जायला परवानगी नसते. त्यामुळे जेवढ्या गरजा आहेत तेवढेच सोबत घ्या. 
 • काही महत्वाच्या वस्तू म्हणजे माउथ फ्रेशनर, परफ्यूम, डीओ जेणेकरून तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर राहताना एकदम फ्रेश राहाल.
 • हनिमून ची तारीख पक्की करण्याआधी भावी वधूची मासिक सायकल पण लक्षात घेणे जरुरी आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीवर तिच्याशी बोलू शकत नसाल तर आपल्या घरातील कोणी बायका मंडळीना सांगून माहिती करून घ्या. नाहीतर तुमचा मधुचंद्र पूर्ण वाया जाऊ शकतो. जर हि गोष्ट लक्षात नाही राहिली आणि तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवलं असेल आणि मुलीची तारीख पण त्याच दरम्यान असेल तर डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या आणि मुलीच्या तारखा पुढे ढकलण्यासाठी गोळ्या हि घेऊ शकता.
 • हनिमून हा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या पार्टनरला अशी एखादी त्याची आवडती वस्तू द्या कि ती त्याने आयुष्यभर आठवणीत ठेवली पाहिजे. पण हि वस्तू हनिमून ला जाण्यापूर्वी घेतलेली चांगली कारण नवीन ठिकाणी जाऊन तुम्ही शोधणार कुठे ? आणि पार्टनरला सरप्राईज हि राहणार नाही.
 • ह्या वस्तू मध्ये तुमच्या ऐपती प्रमाणे अगदी गुलाबाचे फुल पासून सोन्याचा एखादा दागिनाहि घेऊ शकता. ह्यात फुले, एखादा सुंदर ड्रेस, साडी, पर्स, छोटे दागिने, एखादे आवडते पुस्तक, मुव्हीची सीडी (जो तुम्ही लग्न आधी एकत्र बघितलेला असू शकतो), मोबाईल, घड्याळ, अंतर्वस्त्रे (लिन्जेरी), स्वत: लिहिलेले प्रेमपत्र  वगैरे गोष्टी देऊ शकता. महाग वस्तू घेतली असेल तर जास्त आकडू नका नाहीतर पार्टनर ला वाटेल कि पैशाने प्रभावित करतोय आणि एखादी स्वस्त वस्तू घेतली असेल तर पार्टनरला त्या मागच्या तुमच्या भावना समजावून सांगा अन्यथा असे वाटेल कि आपला पार्टनर किती कंजूष आहे.
 • हनिमून चा अर्थ हा बहुतेकजण फक्त मौजमजा, फिरणे आणि शारीरिक संबंध एवढाच घेतला जातो. माझ्या मते हा समज काढून टाकावा हनिमून कडे एक आपल्या सुंदर वैवाहिक जीवनाची सुरुवात म्हणून बघावे. पहिले मनाचे मिलन झाले पाहिजे मग शरीराचे मिलन सहज होते.
 • हनिमून च्या आठवणी कायम राहण्यासाठी कॅमेरा किंवा विडीओ शुटींग हि करू शकता. पण आपल्या खाजगी क्षणांची शुटींग करणे टाळावे. करण्यात काही अडचण नसते पण भीती हीच असते कि ती तुमच्याकडून गहाळ किंवा चोरली गेली तर आपले खाजगी जीवन बाहेर पडू शकते. काही जण मोबाईल मध्ये आपल्या पार्टनर ची शुटींग करतात आणि मोबाईल चोरी ला गेला किंवा दुरुस्तीला दिला कि  प्रॉब्लेम होऊ शकतो आणि  आपले खाजगी क्षण सहज पब्लिक क्षण होऊन जातात.  कोणी आपल्याला ब्लॅकमेल हि करू शकतो. 
 • प्रवासात लागणाऱ्या तसेच नवीन ठिकाणी लागणाऱ्या वस्तूची शक्यतो यादी बनवून ठेवा जेणेकरून आयत्यावेळेला घाई होणार नाही आणि वस्तू विसरणारहि नाही.

ह्या झाल्या काही बेसिक गोष्टी ज्या हनिमून ला जाण्यापूर्वी विचारात घेऊ शकता. हनिमून ला गेल्यावर काय काळजी घ्यावी ह्या पुढच्या भागात लिहिल्या आहेत.

(सर्व चित्रे नेट वरून साभार/ Image Source: Internet)

मोदींचा गुजरात

मोदींना गुजरात  दंगलींबाबत कितीही हाणलं तरी नवा गुजरातही तेच घडवत आहेत हे नाकारता येणार नाही. ग्रंथालीच्या ‘रुची’मध्ये त्यांच्या या प्रयत्नांविषयी माणिक मुंढे यांचा लेख प्रसिद्ध झालाय. मोदींचा हा चेहरा आणि त्यांचे प्रयत्न जाणून घ्यायचे असतील तर ही माहिती घेणेही आवश्यक आहे. जे आपल्याकडे अपवादानेच घडतंय किंबहुना नाहीच ते गुजरातमध्ये घडतंय… आपण काय करतोय?
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0Bx1wEkTwhB_aMjBlMzgwNzEtMmRmOC00MzVkLThhNDAtNWRjM2UxYjBkY2Zj&hl=en

पिंपातले जगणे आहे आपले

वयाची चाळीशी वगैरे गाठली ना की बर्याचजणांना एक सिनिकपणाचा फील यायला लागतो. आजवरच्या वाटचालीत आपण फार म्हणजेफारच बरे-वाइट सॉसलेय, कसले कसले विदारक अनुभव गाठीशी जमा झालेत, असे काय काय वाटायला लागलेले असते… खूप पाहिलय,भोगलंय, चटके सोसलेत, हादरे मिळालेत असं सारं वाटायला लागतं… मी त्यातलाच एक होतो- (आता नाही )
वर्ल्ड प्रेस फोटोचे यंदाचे विजेते फोटो त्यांच्या साईटवर जाऊन पाहिलेत ना का हे सारे समज-गैरसमज आपोआप गळून पडतात. आपले कसलेहादरे आणि कसले जीवनाभुव. खरोखरीच पिंपातले जगणे आहे आपले एवढे मात्र कळते सिनिकपणाचा आपला फील नष्ट व्हायला आणिमनाच्या गाभ्यापर्यंत तळ ढवळून काढणारा भूकंप काय असतो याचा थेट अनुभव घेण्यासाठी तरी या साइटवरील फोटो पहा. हा फोटो केवळ वानगीदाखलआहे. नवर्याच्या घरी नांदत नाही, पळून आली म्हणून नाक-कान कापलेल्या बीबी आयशा  या अफगाण युवतीचा… संवेदनशील असाल तरसमूळ उन्मळून पडाल असे बरेच फोटो या साईटवर आहेत.

 

World Press Photo of the Year 2010
Jodi Bieber, South Africa, Institute for Artist Management/Goodman Gallery for Time magazine
Bibi Aisha, an 18-year-old woman from Oruzgan province in Afghanistan, who fled back to her family home from her husband’s house, complaining of violent treatment. The Taliban arrived one night, demanding Bibi be handed over to face justice. After a Taliban commander pronounced his verdict, Bibi’s brother-in-law held her down and her husband sliced off her ears and then cut off her nose. Bibi was abandoned, but later rescued by aid workers and the American military. After time in a women’s refuge in Kabul, she was taken to America, where she received counseling and reconstructive surgery. Bibi Aisha now lives in the US.

 http://www.worldpressphoto.org/?bandwidth=high
 http://www.worldpressphoto.org/index.php?option=com_photogallery&task=view&id=2055&Itemid=292&bandwidth=high


ब्लॅक फ्रायडे (भाग ६)

दुस-या दिवसापासून राहुल्या आणि सम्या एकमेकांना पाठीमागे शिव्या द्यायला लागले. कुणालाच कळत नव्हतं की हा ग्रुप असा का वागतोय, कालपरवापर्यंत गळ्यात गळे घालून फिरणारे आज एकदम एकमेकांचं तोंडही बघायला तयार नाहीयेत… हे काय गौडबंगाल आहे? पण असं चाललं होतं खरं! आता सम्या आणि सुहास, राहुल्या आणि नेहा अन बाकीची मुलं असे सरळसरळ तीन ग्रुप पडले होते.
      .. पण रोज रात्री सम्या, राहुल्या आणि मंडळी भेटतच होती आणि आज काय काय घडलं त्याचे अपडेट्स घेत होती आणि दुस-या दिवशीचे प्लॅन्स ठरवत होती.
असाच आठवडा गेला. रोज मिळणा-या माहीतीचं विश्लेषण करुन,सगळ्या शक्यता आणि गॄहितकं लक्षात घेऊन ते या निष्कर्षापर्यंत आले की हे इंटर्नलचे क्वेश्चन पेपर्स फुटले आहेत आणि वर्गातल्या मोजक्या मंडळींकडे ते आहेत. ते आपल्याला हवेत की नको हा मुद्दाच आतापर्यंत चर्चेत आला नव्हता!
पण त्या दिवशी रात्री रव्या म्हणाला,
“राहुल्या, ते पेपर्स आपल्याला हवेत!”
“का? आपल्याला कन्फर्म माहीत आहे का की तेच पेपर्स आहेत? अरे आपल्याला जर अशी खात्री झाली ना की तेच पेपर्स आहेत तर आपण फक्त त्याचाच अभ्यास करु, बाकीचा काहीच अभ्यास करणार नाही! कशावरुन आपल्याला कुणकुण लागली आहे ते सुहासने काळे सरांना सांगितलं नसेल? कशावरुन काळे सर शेवटच्या क्षणी पेपर्स बदलणार नाहीत? आता हे नको सांगूस की सुहास मागच्या वेळीही तसाच टॉपर आला. आणि समजा मागच्या वेळी असाच किस्सा असला तरी आपल्याला कुणकुण नव्हती. अरे बाकीच्या पब्लिकला धूर दिसतोय म्हणजे आग असणारच कुठेतरी! यावेळेस ऐनवेळी क्वेश्चन पेपर्स बदलण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुला काय वाटतं, काळे सरांना काहीच कल्पना नसेल? अरे, महा पाताळयंत्री माणूस आहे तो! कुठलंही खोटं कारण काढून ते आपलं करिअर बरबाद करु शकतात. केली खोटी कॉपी केस आपल्या सगळ्यांवर मग? त्यांच्या उपद्व्यापामुळं समजा आपल्याला भरारी पथकानं डिबार केलं, काय करशील? झाला ना एका मोहापायी आयुष्याचा सत्यानाश? आपल्याला काय सिद्ध करायचंय? आम्ही यांच्या पुढे जाऊ शकतो हे? ही स्पर्धा डबक्यातल्या बेडकांची स्पर्धा आहे असं नाही वाटत तुला? मला दुस-यापेक्षा एखादा मार्क जास्त मिळाला तर मी यशस्वी ठरतो का? ही स्पर्धा मार्कांची न होता इगोंची आहे! अरे शेवटच्या क्षणी आपण ते पेपर्स मिळवण्याच्या मागे आपली शक्ती वाया घालवू नये असं मला वाटतं. आतापर्यंत अभ्यास करुन आपल्याला कमी मार्क्स मिळाले आहेत का? सांग ना आपलं काय नुकसान झालं आहे ते? आतापर्यंत आपल्याला कधीच गरज पडली नव्हती ती आज का पडतेय?” -राहुल्या.
       दूरवर बघत सम्या बोलला,
“राहुल्या, एका सिच्युएशनचा विचार कर, तुला माहीतीये की एखाद्याने, सुहासच घे ना, समज त्याने कॉपी करुन मार्क्स मिळवले आणि त्याला फर्स्टक्लास मिळाला आणि तुझा फर्स्टक्लास एका मार्काने गेला, आणि आपल्या कॉलेजला कँपसला एक चांगली कंपनी आली, तिने फक्त फर्स्टक्लास असलेल्यांना अ‍ॅप्टिट्यूड एक्झामला बसायची परवानगी दिली, कसं वाटेल तुला? सालं आपण इतका प्रामाणिकपणा करुन शेवटी हेच फळ मिळालं ना असंच वाटेल ना? त्या क्षणापुरतं तरी हा प्रामाणिकपणा काहीच कामाचा नाहीये असंच वाटेल ना तुला? मी अप्रामाणिकपणाचं समर्थन करत नाहीये, पण एक परिस्थिती तुझ्यासमोर मांडतोय! विचार कर, खरंच असं झालं तर? त्या क्षणी तुला वैताग येणार नाही? भाई, बाहेर तुला हे कुणीच विचारणार नाही की तू मार्क्स कसे मिळवलेत, किती मिळवलेत हेच विचारतील.अरे आपल्या फिल्डमधे एन्ट्री महत्त्वाची असते रे! तुला कितीही येत असलं, तू आपल्या फिल्डमधे कितीही मास्टर्स असलास तरी जोपर्यंत तुला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत तू स्वत:ला सिध्द करु शकत नाहीस! तुला फक्त एन्ट्री करायचीये आणि ती कशीही झाली तरी चालेल. ऐक, जब घी सीधी उंगलीसे नही निकलता तो फिर डब्बाही उल्टा करना पडता है! आणि आपल्याला तो करायचाच आहे! मी असं नाही म्हणत की आपण त्यावरच विसंबून राहू, पण क्वेश्चन्स खरे असले तर हातातून जायला नको असं मला वाटतं. शेवटी येनकेनप्रकारेण आपल्याला मार्क्स हवे आहेत. बाय हूक ऑर बाय क्रूक! काय वाटतं?”
     सम्याच्या या युक्तिवादावर सगळेच विचार करत होते. युक्तिवाद तर बिनतोड होता. जर मार्क्स हवे असतील तर पटो अथवा न पटो, भलेबुरे सगळे मार्ग तर अबलंबावेच लागणार होते. कुणाचंही नुकसान न करता जे जे करणं शक्य आहे ते ते करायलाच हवं असं सम्याचं मत होतं. आत्ता प्रश्न होता ते क्वेश्चन पेपर्स मिळवण्याचा!
…सम्याच्या डोक्यात त्याचीही योजना आकार घेत होती.
    एक दिवस राहुल्याने सुहासला सांगितलं,” सुहास, तुला एक गोष्ट सांगायचीये! तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव , तो तुझा प्रश्न आहे, पण सम्या आणि त्याची गॅंग तुझ्या वाईटावर टपलेले आहेत! तुला कुठेकुठे आणि कसंकसं गोत्यात आणता येईल याच्यावर त्यांचा विचार चाललेलाय. मला एक मित्र म्हणून असं वाटतं की तू कुठल्याही प्रॉब्लेममधे येऊ नये! आणि हो… फोकसमधेही!”
राहुल्याने “फोकसमधे” अशा स्टाईलमधे आणि पॉज घेऊन म्हटलं की क्षणभर का होईना, पण सुहासच्या काळजात कळ उठली. त्याला वाटायला लागलं की हा तर असं सांगतोय की जसं याला सगळं माहितीये! याला खरंच तर माहीत नसेल? तो इतका घाबरला की राहुल्याच्या म्हणण्याची सत्यासत्यता तपासून बघण्याचंही त्याला सुचलं नाही. माणूस घाबरला की चुकांवर चुका करायला लागतो. त्याकरता त्याने त्याची शांतपणे विचार करण्याची शक्ती घालवायची असते. घाबरल्यावर जर ही शक्ती घालवली, तर माणूस नक्की चुका करतो. आणि या क्षणी राहुलला नेमकं हेच हवं होतं. राहुल्याच्या जाळ्यात तो अलगद सापडत होता.
      “तुला…काय म्हणायचंय काय राहुल?” -सुहासने सावधपणे विचारलं. सावधपणापेक्षा त्याच्या चेहे-यावर भीती स्पष्ट दिसत होती. राहुलच्या ते लक्षात येत होतं, पण तो तसं दाखवत नव्हता. तो आपण अगदी अनभिज्ञ असल्याचं दाखवत होता. नाहीतरी त्याला सुहासला हळूहळूच रिंगणात घ्यायचं होतं.
(क्रमश:)

चिकन सूप फॉर द सोल भाग 3 (chicken soup for The soul पार्ट 3)

“चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाप्रमाणे या पुढच्या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकन जनमानसाच्या लाडक्या लेखकांनी देशविदेशांतून अनेक कथा मागवून त्यांचं संकलन केलेलं आहे। आजच्या युगातल्या मानसिक ताणतणावावरचा रामबाण उपाय ठरलेल्या या कथा वाचताच मनाची मरगळ, नैराश्य झटकन दूर होतं व वाचक नवचैतन्याने आयुष्याला, त्यातील संकटांना, अडीअडचणींना हिमतीने सामोरा जातोच. या कथांचं टॉनिक मिळाल्यावर वाचकाला स्वत:त जो बदल जाणवतो त्या अनुभवाचं कथन तो आपल्या जवळच्यांना, मित्रमैत्रिणींना ऐकवतो व मग ही देवाणघेवाणीची न तुटणारी साखळीप्रक्रिया पुढेपुढे जात राहते. खरंच कधीकधी अशा साध्या, सरळ सत्यकथांतून थोडंफार तरी समाजपरिवर्तन होऊ शकतं ना?

चिकन सूप फॉर द सोल भाग

मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड मार्क व्हिक्टर हॅन्सन

अनुवाद : उषा महाजन
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

हेच तर खरं प्रेम असतं!

व्हॅलण्टाइन डेच्या निमित्ताने जिकडे-तिकडे लिहून येणार्या त्याच त्या सरधोपट गोड गोड प्रेमळ मुरंब्याएवजी प्रेमाविषयीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न प्रहारच्या ‘रविवार विशेष’ मध्ये आम्ही केला. त्या पानावरील तीन तर्हांचा मजकूर इथे देतोय… प्रेमात पडलेल्या, प्रेमात असलेल्या, प्रेमात पडत असलेल्या , काय करावं याबद्दल साशंक असलेल्या अशा सगळ्यांनाच हॅप्पी व्हॅलण्टाइन डे!
——————————–

र्गात तिच्या नकळत तिला पाहण्यासाठी केलेल्या मानेच्या कसरती, ती पहिली नजरभेट, वह्यांची-नोट्सची देवाणघेवाण, तिच्यासाठी वा त्याच्यासाठी तासन् तास ताटकळणं, काहीही न सांगता परस्परांना उमजलेलं फक्त दोघांचंच कोवळं गुपित, ती अवघ्या देहाची थरथर, जिवाची तगमग, सहज झाल्यागत वाटणा-या स्पर्शामुळे मनावर फिरलेलं मोरपीस, तिचं हसणं, त्याचं बोलणं, कधी तरी दुस-याच कुणाबरोबर दिसल्यावर काळजात खुपसली गेलेली विश्वासघाताची सुरी, ब्रेक-अपनंतर ओघाने येणारी उदासी, विमनस्कता, फकिरी अवतार, दाढीचे वाढलेले खुंट, अवचित भरून येणारे तिचे-त्याचे डोळे, एक ना अनेक हज्जार उपद्व्याप.. काय काय घडत असतं प्रेमात पडल्यावर त्याच्या आणि तिच्या भावविश्वात.. एक वेगळीच हुरहुर लावणाऱ्या नवथर वयातील या प्रेमाचे रंग, अनुभवांचे गंध प्रत्येकासाठी खास त्याचे असतात. खरंच असं होतं का हो? असं विचारून आणि त्यांनी सांगूनही हे सारं समजण्यापलीकडलं आहे. परस्परांमध्ये रमलेल्या या मंडळींना खरं तर उद्याच्या ‘व्हॅलंटाइन डे’चीही मातब्बरी नाही. त्यांच्यात सुंदर असं काहीतरी आधीच उमललं आहे, फुललं आहे. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी परस्परांमध्ये गुंतण्याचा आणखी एक बहाणा आहे.. त्यांचा प्रवास आता तर कुठे सुरू झालाय..

 

तसं पाहिलं तर, प्रेम म्हणजे ती आणि तो यांच्यातील त्यांच्यापुरता बंध. कधी हा बंध हळुवार, अलवार असतो आणि कधी कधी तन-मन घायाळ करणारा दुखरा, विषारी, घातकी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणाराही असतो. आपलं माणूस आपलं असल्याचा विश्वास आणि तसं असल्याचा आभास यात खूप अंतर असतं. जेव्हा या विश्वासाची चौकट विस्कटते तेव्हा हाच बंध रुतू लागतो, जीवघेणा ठरतो, दंश करतो, हे सगळं आपण अवतीभवती घडणा-या घडामोडींमधून पाहतोच. प्रेम म्हणजे केवळ दैहिक, लैंगिक आकर्षण, अंगभर फणा काढून उभी राहिलेली, तटतटून आलेली वासनेची अनावर नागीण म्हणायचं का?, असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना जेव्हा समाजात घडत असतात तेव्हा ‘व्हॅलंटाइन डे’भोवतीच्या गुलाबाच्या पाकळ्या आपोआप गळून पडतात.

 

पण, प्रेमासारख्या सुंदर भावनेला आपण फक्त ‘व्हॅलंटाइन डे’च्या कुंपणात का म्हणून अडकवायचं? या कुंपणापलीकडे प्रेमभावनेचे असंख्य आविष्कार आहेत. कुठलेही विकार नसलेली निखळ मैत्री आहे, स्नेह आहे, आपुलकी आहे, निर्मळ सदिच्छा आहेत, आस्था आहे.. या सगळ्यांचं काय? प्रेमात पडल्यापासून सुरू झालेल्या प्रवासात जेव्हा प्रेमभावनेची ही सगळी रुपं उमजायला लागतात तेव्हा परिपक्वतेच्या दिशेने त्या व्यक्तीची पावलं पडायला लागलेली असतात. परस्परांमधील प्रेमही या इथवरच्या प्रवासात मुरलेलं असतं आणि इतर नात्यांमधील पदर जाणवायला लागतात.

 

मुरलेलं प्रेम कशा-कशातून व्यक्त होतं बघा.. प्रेमाचा वसंत ऋतू सुरू असतो तेव्हा तिचं किंवा त्याचं काही म्हणजे काही खुपत नाही, आक्षेपार्ह, हास्यास्पद, विचित्र वाटत नाही. लग्न झाल्यावर नव्हाळीचे दिवस संपतात, संसाराचे चटके बसायला लागतात. तेव्हाही प्रेम असतं, परस्परांच्या सवयी, वर्तनविशेषही तेच असतात. पण, आता समीकरणं बदललेली असतात, नव्या जबाबदाऱ्यांमुळे आलेल्या मर्यादा, बंधनं जाचक वाटायला लागतात. इथेच ठिणगी पडते, लग्नाआधी काहीही वावगं न वाटलेल्या सवयी, वागणं फारच खुपायला लागतं. कारणं काहीही असोत, सुटलेल्या शाब्दिक बाणांनी विद्ध आपल्याच माणसाला केलं जातं, घायाळ मनांवर हळुवार फुंकर घालावीशी वाटू नये इतकी कटुता परस्परसंबंधांमध्ये निर्माण होते. तोपर्यंत प्रेमात परिपक्वतेची गोडी मुरली असेल तरच हे अवघड वळण सोपं होतं, तडजोड केली जाते, जोडीदाराशी जुळवून घेतलं जातं. ही तडजोड करणं, जुळवून घेणं, खटकणाऱ्या, डोकं सटकवणाऱ्या सवयींकडे समंजसपणानं दुर्लक्ष करणं, दिवसभराच्या रहाटगाडग्यानं थकल्या-भागल्या जोडीदाराला जवळ घेणं हेही प्रेमच, इथवरच्या प्रवासातील साऱ्या खाचखळग्यांतून खऱ्या अर्थानं तावूनसुलाखून निघालेलं प्रेम.

 याच प्रेमाचा आणखी एक उत्कट आविष्कार म्हणजे परस्परांवरील अथांग विश्वास. याच विश्वासाच्या बळावर परस्परांना पर्सनल स्पेस देता येते, गैरसमजांची वादळं भिरकावून देता येतात.. परस्परांच्या आश्वासक सोबतीने इथवर टाकलेली पावलं हेच तर खरं प्रेम असतं!

– शैलेंद्र शिर्के

बोल ना रे! आठवतंय का?

 

पूर्वी तिनं ‘क्लू’ दिला की, मी चुकत-माकत का होईना, उत्तरापर्यंत तरी पोहोचायचो. पण, नोकरीला लागल्यापासनं अशा गोष्टी आठवायला हल्ली मेंदूवर बराच जोर द्यावा लागतो. तेवढा वेळच मिळत नाही. म्हणून आता गोंधळ आणि वैताग दोन्हीही मनातल्या मनातच दाबून ठेवले. उगीच तेवढय़ावरनं माझी शाळा घ्यायची नाहीतर ही! तसं व्हॅलंटाइन डे भारतात साजरा करण्यामागचं लॉजिक आपल्याला तेव्हा अजिबात पटत नव्हतं. दोस्तांतदेखील मी माझं मत ठामपणे मांडायचो. पण तिच्यासमोर एकदाच
चुकून हे बोललो होतो. ‘आता शेती करायला तुम्ही बैलांऐवजी ट्रॅक्टर वापरता ना. तरीही, बैलपोळ्याला पुरणपोळी खातोस की नाही? तसाच व्हॅलंटाइनपण साजरा करायचा..’ आमच्या मातोश्रींनी हिला एकदा बेंदुराला जेवायला बोलावलं होतं. तीच आठवण तिनं उदाहरणासाठी वापरली असावी, मला बैल म्हणण्यासाठी नाही?! पण माझ्याबाबतच्या तिच्या टोमण्यांबद्दल असा संशयाचा फायदा घेऊन इज्जतीचा कचरा करून न घेतल्याचं समाधान मिळवणं रोज-रोज शक्य नाही व्हायचं.

 आजही तोच बाका प्रसंग उद्भवला होता. तिच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं? घोर विवंचनेत सापडल्यासारखं झालं. ‘बोल ना रे ! आठवतंय का?’ आवाजात असा एकाच वेळी लडीवाळपणा आणि धमकावणी, अशा परस्परविरोधी गोष्टींचं संतुलन तीच साधू शकते. जातिवंत स्टेज आर्टिस्ट. एकदम जयश्री गडकर की दुस-या क्षणाला दुर्गा खोटे. ‘ हो.. अगदी व्यवस्थित आठवतंय. ते लीप इयर होतं..’ माझा ‘पीजे’ तिनं नाकाच्या शेंडय़ानंच उडवून लावला. पण एरवीसारखा माझी रेवडी उडवायचा तिचा मूड नव्हता. कारण तिनं थेट मुद्दय़ालाच हात घातला. ‘काय घेतलंयस माझ्यासाठी?’ गिफ्ट तिच्यासमोर धरलं.

सेकंदसुद्धा न दवडता तिनं कव्हर काढलं. मी आणलेला ड्रेस तिनं निरखला, खूश झाली. आपण आनंदलो आहोत, हे ती कधी बोलून नाही दाखवत. पण अशा वेळी एरवी पीचच्या फळासारखे दिसणारे गोबरट गोरे-तांबूस गाल पिकण्याच्या वाटेवर असलेल्या स्ट्रॉबेरीप्रमाणं हळूहळू लाल होऊ लागतात. अस्फुट स्मित ओठांवर उमटतं. गालावरचा तीळ काही सेकंदांकरता खळीत जाऊन विसावतो. या तिन्ही क्रिया जेव्हा एकाच वेळी होतात, तेव्हा मॅडम तुफान खूश झाल्यात, हे लक्षात येतं.

 

आता तिच्याकडून गिफ्ट घेण्याची पाळी माझी होती. तिनं हातात एकापाठोपाठ एक असे बोर्नव्हिटाचे तीन मोठे डबे टेकवले नि माझा चेहरा न्याहाळण्यास सुरुवात केली. तसाही तो तिचा आवडता छंदच आहे. ‘पाहतोस काय असा डब्यांकडं? त्यापेक्षा स्वत:कडे पाहा. नोकरी सुरू केल्यापासनं केवढा वाळलायस. आता तुझी हाडंसुद्धा कातडीला हाड हाड करत असतील. जरा जिवाला खात-पीत जा.’ हाताच्या दोन्ही मुठी डोक्याशी नेत काडकन बोटं मोडून तिनं माझी दृष्ट उतरवली. टॉप-जीन्सवाली पोरगी असं काय करतेय, या उत्सुकतेनं आजूबाजूच्या भोचक नजरा आमच्याकडे वळल्या. पण, तिची ही नेहमीची सवय आहे.

 


माझ्या नोकरीला ती स्वत:ची सवत समजते. ही नोकरी मी का करू नये, याची किमान एकशे पंधरा कारणं पटवून देणं, हा तिचा आवडता छंद. एरवी रोज भेटणारे आम्ही आता आठवडय़ातून एकदाच एकमेकांना पाहू शकायचो, हे तिच्या माझ्या नोकरीवरच्या रागाचं मुख्य कारण आहे. ‘जन्मल्यानंतर तू पंधरा दिवस डोळे उघडले नव्हतेस. आंधळेपणाचा हा वारसा तू अजून चालवतो आहेस, हे तुझ्या नोकरीवरून सिद्ध होतं. आणि असं माझंच नाही, हे भावी सासूबाईंचंही म्हणणं आहे.’ ‘तूही ज्या ब्रह्ममुहूर्तावर जन्माला आलीस, तेव्हा दगडूशेठ गणपतीवर कुणीतरी शेण फेकलं होतं आणि पुण्यात दंगल झाली होती. हे मी नाही, माझ्या भावी सासूबाई सांगतात.’

 

आता पुढचं सारं ऐकून घेण्यासाठी मी मनाला तयार केलं. कारण, व्हॅलंटाइन डे हा प्रेमाचा वार्षिक ताळेबंद मांडण्याचा दिवस असतो, अशी तिची धारणा आहे. त्यामुळं ती दारुगोळा डोक्यात भरूनच येते. हल्ली असंच होतं. नोकरी करता-करता दिवस कसा उडून जातो, समजतच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं राबणं. सकाळी थोडी सवड असते, तेव्हा तिची मेडिकलची लेक्चर्स असतात. दुपारी जेवायला येतेस का, हे विचारण्यासाठी फोन करावा, तर तिची नाटकाची प्रॅक्टिस असते. त्यानंतर तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासायचे असतात. तिथून पुढं ती मोकळी होते, तेव्हा माझा दिवस पॅक झालेला असतो. हॅलेचा धूमकेतू ७६ वर्षानी पाहायला मिळतो ना, तसंच आमच्याही भेटीगाठींचं होतं. मग, दोघांच्याही सवडीप्रमाणं ‘फोन अ फ्रेंड’ करत समाधान मानायचं. 
तिचा त्रागा ऐकून आपण पृथ्वीऐवजी प्लुटोवर राहायला असतो, तर बरं झालं असतं, असं वाटतं कधीमधी. आपला एक दिवस तिथं साडेसहा दिवसांचा असतो म्हणे. ‘होईल सगळं व्यवस्थित..’, तिची पाठ थोपटत आश्वस्त केलं. मिनिटभर आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेलो. ‘सुंदर दिसतेयस.. सुरुवातीलाच द्यायची होती कॉम्प्लिमेंट. पण आता संधी मिळाली. ‘परत बोल..’ स्वत:चं कौतुक तिला दुस-यांदा ऐकायचं होतं. ‘लय भारी.. जगात भारी..’ शब्दांची कंजुषी करायला आपल्याला नाही जमत. ती हसली. तुफान गोड हसली. गालावर बक्षीस टेकवून बाजूला होताना कुजबुजली, ‘पुढल्या वेळी भेटू तेव्हा कामातनं वेळ काढून शेव्हिंग करून ये. पैसे नसतील, तर तेही खिशात ठेवलेत.’
– अजिंक्य गुंजाळ

आय हेट लव्हस्टोरी

तुझ्या आठवणीचं एक पान उलगडताना..
मीच विचारलं तिला..
Hi dear! कशी आहेस?

का कुणा ठाऊक

आज बोलावंसं वाटतंय..

सध्या तू कुठे आहेस

मला नाही ठाऊक

फिर भी दोस्त जिंदगी खुबसुरत है

नशिबानं पाठ फिरवली

पण जगलो ना तुझ्या आठवणीत

असो. का कुणास ठाऊक

आज काहीतरी मागावंसं वाटतंय तुझ्याकडून..

आयुष्याची संध्याकाळ सुरू झालीय

म्हणूनच लाडके एक गोष्ट मागतोय,

देशील का?

तुला आठवत असतील त्या कॅम्पसमधल्या पाय-या
आपण बसायचो त्याच त्या..

पाठीमागे काळाकुट्ट दरवाजा

बंद कायमचा

जणू काही आपल्या आधारासाठी

वर्षानुर्वष उभा द्वारपालासारखा.

पायाखालून जाणारी सुरावटीसारखी 

मुग्यांची रेष संथपणे सरकणारी 

आपल्या भोवतालचा तो हिरवा दरवळ

लाडके आजही माझ्या डोळय़ात साठवून राहिलेला 

अन् तुझ्या डोळय़ात 

दाटून राहिलेले माझं प्रेम.

लाडके, ते प्रेम मला परत देशील का?

आजही तुला आठवत असेल 

पार्कातला तो रस्ता.. 

हिरव्या कागदावरची एक 

वेडीवाकडी निळी रेषा 

तोच रस्ता तुझ्या पदस्पर्शाने सुखावलेला 

कडेवरच्या धुळीत तुझ्या-माझ्या पावलांचे ठसे 

लगट करणारे.. 

एकमेकांत मिसळणारे.. 

आजही हृदयात न पुसली गेलेली ती 

आपल्या प्रेमाची पायवाट.. 

लाडके तेच.. तेच प्रेम 

मला परत देशील का? 

आज आहे मी एकाकी 

आयुष्याच्या अखेरच्या 

पुलावरून चालतोय.. 

तुझ्या आठवणी सोबत घेऊन.. 

सगळे पाश मला 

कधीच सोडून गेलेत.. 

आता होईल हे शरीर मातीचं वारूळ.. 

मला लावायचंय त्यासमोर एक रोपटं 

तुझ्या आठवणींचं..

म्हणून तर मागतोय.. 

पुन: पुन्हा विनवतोय..

किती तरी दिवस उलटलेत..

कितीतरी महिने पसार झालेत..

तिची आठवण काढताक्षणी 

कुणीतरी हजारो सुया 

टोचतोय माझ्या अंगाला 

दात विचकून पुन: पुन्हा 

मी मात्र तिच्या गोड संवेदना 

पुन: पुन्हा झेलतोय.. 

एखादी पावसाची सर 

अंगावर घ्यावी तशी 

पण कधी संपणार हा वर्तमान काळ.. 

परमेश्वरा तू खरंच आहेस का? 

का सुटलाय मनाला कंप? 

कुठल्या वादळाची ही चाहूल आहे?

तिच्या आठवणीचं  

शेवटचं पान उलटताना.. 
भरदिवसा हा चंद्र कुठून आला? 

नियती मी तुला विचारतोय..? 

ती.. ती येणार आहे काय? 

तिचा गंध मला जाणवतोय.. 

वेदनेची चादर मी भिरकावून दिलीय.. 

त्या क्षणी ती म्हणाली.. 

Hi dear! कसा आहेस? 

इतक्या वर्षानी? 

म्हटलं लाडके खूप उशीर झालाय.. 

म्हणाली म्हणूनच मी आलेय. 

तुला मुक्त करायला.. 

फुंकर मारून तिनं विझवून टाकला 

माझा वर्तमान काळ 

आणि डांबून टाकलं 

भुतकाळाच्या काळय़ाकुट्ट कोठडीत 

डोळे उघडे असोत वा बंद 

दिसतेय फक्त तीच.. 

एकदा विचारलं तिला 

म्हटलं, का केलंस असं? 

म्हणाली संपलंय तुझं आयुष्य 

वर्तमानातली तुझी थरथर 

मला नाही पाहवणार 

तुझं कणाकणानं मरणं.. 

मी नाही सहन करणार.. 

त्यापेक्षा तू भूतकाळातच पडून राहा शांत.. 

मी वळवळतो.. किंचाळतो.. 

का..? का मला ही शिक्षा? 

असं काय पाप केलं मी..? 

म्हणाली, विचार तुझ्या मनाला 

विचार तुझ्या आत्म्याला.. 

आठव तो आपला कॅम्पस, 

तो स्पर्श हळुवार.. आठवतोय?

आठवतोय.. माझ्या मनाचा दरवळणारा गंध? 

म्हणूनच आज गडद संध्याकाळी

मी आलेय तुझ्याकडे..

युवर टाइम इज ओव्हर!

तीच म्हणाली, 

पुन्हा

चल निघायची तयारी कर

ठिकाय.. तू म्हणतेस तर.. 

गुंडाळतो माझा वर्तमान काळ.. 

मी तरी दुसरं काय करणार 

त्यावेळी तुझी प्रत्येक इच्छा.. 

तुझा प्रत्येक शब्द

माझं कर्म होतं 

अन् आता विरोध कशासाठी? 

पण एक विचारू का? 

तुझा इतका जीव होता माझ्यावर 

तर का चिनून घेतलंस माझ्यात? 

का गाढून घेतलंस माझ्या मेंदूत?

मग.. मग.. आज इतक्या वर्षानी का केलंस बंड..?
 माझं शरीर तुला कब्रस्थान वाटलं की काय
 असो.. दोष तुझा एकटीचा नाहीच 
मीसुद्धा केलं होतं ते पाप तुझ्यात एकरूप होण्याचं..
अन् तू गेलीस!नियतीनं ओढून नेलं तुला..
 काळाने फसवलं मला.. 
मग मीच करून घेतला माझ्या मनाचा नरक
 नंतर मीच खोदला खड्डा माझ्या हृदयात खोलवर.. 
गाढून टाकलं कायमचं तुला अन्
आता नाही पाहवत तुला माझं कणकणनं मरणं.. 
येस.. मी तयार आहे लाडके पण दारावर गिधाडं का फडफडतायत? 
मुर्खानो जरा धीर धरा..मीच येतोय बाहेर.. 
तुमचं खाद्य तुमच्याकडेच येतंय स्वत:च्या पायाने चालत..
 पण एक अट आहे हवं तर शेवटची इच्छा म्हणा 
हृदयावर नका हो चोच मारू
ती शांत झोपलीय.. 
गिधाडांनो एवढं कराल ना माझ्यासाठी

प्लीज इतकं कराच..!
                                         – सागर किनारे

 

Valentine Hearts

माझ्या ब्लॉगवर  अपडेट केलेली Valentine theme बघितलीच असेल. हि थीम जर तुम्हाला पण लावायची असेल. तर ह्या ब्लोगरमिंट च्या साईट वर टिचकी मारा. Falling Heart wiget वर टिचकी मारा. ती लिंक तुम्हाला तुमच्या ब्लॉगर पेज वर घेऊन जाईल. तेथे लॉगिन करा. मग ती लिंक तुम्हाला Add Page Element वर घेऊन जाईल. तेथे तुमचा ब्लॉग निवडा आणि Add Widget वर टिचकी मारा.
आणि आता ब्लॉग चेक करा
Soooo Cooooollllll na !!!!

आता तुमच्या पार्टनर ला तुमचा ब्लॉग चेक करायला सांगून सरप्राईज करा.
प्रेमदिवसाच्या शुभेच्छा….

(image: net)