देवी तुझ्या दारी आलो..

कालचीच गोष्ट…
घरी बसल्या बसल्या बोअर व्हायला लागल म्हणून मी, जीजाजी अणि ताई, असे आम्ही तिघे निघालो भटकायला..
एअक्चुली, ताई अणि जिजाजींना पुण्यात थोडा काम होता…आणि मी बोअर होत असल्यामुळे, मी सुद्धा बरोबर निघालो..
तर जिजाजींचे ओळखीचे एक जन नाशिक फाटा क्रॉस झाल्यावर “सॅन्डविक” कंपनीच्या अगदी पुढे रहायचे, जिजाजीना काम असल्यामुळे ताई अणि मी काय करायचे म्हणून समोरच असलेल्या श्री आई माता मंदिर येथे गेलो.

ते म्हणतात ना देवीच बोलावन आल्याशिवाय तुम्ही तिच्या दाराताही पाउल ठेऊ शकत नाही, असच काही…कारण ध्यानी मनी नसताना आम्ही तेथे पोहचलो.

काय सुंदर ते मंदिर. पांढर्या शुभ्र संगमरवरी दगडात मंदिर कोरल आहे. स्वछ अणि निर्मल असाच ते.
राजस्थानी कलेच ते मंदिर. (अस मला वाटतय, ते कस काय हे नंतर…)
आत गेलो अणि देवीची ती लोभस्वानी ती मूर्ति पाहून मन प्रस्सन झाले. अणि नशीब तर एवढा थोर की आम्ही पोहोचलो अणि आरतीला सुरुवात झाली.
लयबद्ध, ताल अणि सुरात झालेली त्या आरतीने, कानाचे अणि डोळ्यांचे पारणे फेडले. तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ति करतोय, पण नाही, अचानक भेटलेला आनंद, ‘जेष्ठ’ महिन्याच्या च्या गर्मिनंतर आलेल्या पहिल्या पावसाने जेवढ बर वाटत, तसाच काहीसा तो अनुभव होता. (कारण आपण देवाचे दर्शन तसेही फार कमी घेतो  🙂  ) अणि हो प्रसाद ही छान आहे.

श्री आई माता मंदिर, हे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर, “सॅन्डविक” कंपनीच्या अगदी समोर आहे.
 

नामदेव मल्हारजी म्हात्रे (…भाग २…)

अनेक महिने उलटत गेले. कधी नाम्या आणि मी एकाच प्रोजेक्ट मध्ये असायचो, तर कधी क्लायंटंच वेगळे. नाम्याला त्या कंपनीत येऊन, एक-सव्वा वर्ष झालेलं तसं, आणि एका सकाळी नाम्या आणि मी कॅन्टीन मधे गेलो. तिथे कंपनीतली एक अप्रतीम मुलगी मला भेटली आणि आम्ही थोड्यावेळ बोलत उभे राहिलो. थोड्या वेळाने ती निघून गेली आणि ब्रेक-फास्ट करून आम्ही परत आलो. उरलेला पूर्ण दिवस नाम्या एकदम शांत. लंचच्यावेळी सुद्धा काहीच बोलला नाही. मला वाटलं तब्येत बरी नसेल म्हणून मी एक-दोनदा विचारलं देखील. रात्री जेवणाच्या मेसवर ताट समोर येईस पर्यंत तोंड एकदम बंद त्याचं. मी पहिलाच घास घेतला आणि नाम्या तेंव्हा अचानक बोलला,

‘सम्या येकतरी पोरगी पाहिजे मला’
मला ठसकाच लागला एकदम,
‘ह्ये घ्ये, पानी पी’, पाण्याचा ग्लास मला भरून देत म्हात्रे बोलले, ‘भ*** ठसका तर असा लागलाय जसं काय मी वाईट-वंगाळ बोलून राहिलो. अबे पोरगी पाहिजे म्हनजे गर्ल-फ्रेन्ड म्हनून राहिलो ना बे! तुझं डोकं कसं चाललं असेल ते ठाऊके मला.’
मी ठसक्यातून सावरत म्हणालो ‘अबे ह***, तू एक तर अक्खा दिवस थोबाड बंद ठेवलंयस, आणि जेंव्हा उघडलं तर डायरेक्ट हे स्टेटमेन्ट. काय, झालय काय तुला?’
‘तुला ना मित्राचं दुख: दिसेना झालंय. नाही, बरोबरे! स्वत:चं पोट गच्च भरल्यालं असंल, तर दुसर्याच्या बरगड्या काऊ-मुन बघनार तुम्ही!’ नाम्याच्या चेहेर्यावर फ्रस्ट्रेशन साफ दिसत होतं, पण मला आणि आमच्या इतर मित्रांना हसू आवरेना.
‘हसू नकोस आनी येकतरी मैत्रीन मिळवून दे यार सम्या! तुला सांगतो सच्या, ह्या सम्याला नेहेमी पाहातो मी. एक पोरगी नसेल कंपनीत जिच्याशी ह्याची ओळख नाही. अन येकाच घरात राहून आम्हाला बघा. आमचा नंबर एकाजरी पोरीच्या फोन मध्ये दिसला तरी तिच्याशी लग्नं करीन मी, ती कशी का असेना मग! आयला माझ्या शेजारी बसनार्या त्या माधवी शक्शेनाला मी ‘चहाला येती का?’ असं विचारलं तर मला ‘नाही नको, मी चहा घेत नाही’, असं हिंदीत म्हनली. आनी पंधरा मिनीटानंतर ह्या सम्या सोबत कॉफी ढोसताना तिला मी पाहिलं. आता तूच सांग, का नाही जलनार माझी! हसनं बंद कर आधी आनी मदत कर यार सम्या.’
मी ताकाचा घोट घेतला आणि हसू आवरून त्याला म्हणालो, ‘अरे नाम्या, त्या नुसत्या फ्रेन्ड्स आहेत माझ्या.’
‘ते काही नको सांगू, फक्त पोरगी पटवून दे. लग्न कराचय बे, आता बास झालं!’ अगदी केवीलवाणा चेहेरा झालेला रे त्याचा!
मग मी कीराणा मालाची यादी सांगावी तशी कंपनीतल्या मुलींची नावं घेऊ लागलो. ह्यातून नाम्याचा चॉईस काय आहे ते पहायचं होतं मला.
‘काजल खन्ना’… ‘अबे तिच्या नावातच बॉलीवुडचा वास येऊन राहिलाय. तिला म्हातारपनी जरी मी प्रपोज क्येलं, तरी कवळी बाहेर काढून, चावा घेऊन हकलून लावेल मला.’
‘प्रियांका कुलकर्णी’… ‘वा वा! काय पन नाव घेतायत साहेब बघा! अबे ती अशी पोरगी हाये, जिन्हं फ्येसबुक मधे परवा नुस्तं ब्रॅकेट आनी ठिपके असं काढलं…’, नाम्यानी समोर ताटाच्या खरकट्यावर 🙁 हे चिन्ह काढून दाखवलं, ‘… तर नुस्तं ब्रॅकेट आनी दोन ठिपके असं काढलं तर तिला तीस कमेन्ट आल्या पोरांच्या. काही जनं तर बहुदा विचारपूस करायला तिच्या डेस्कवर पन गेले असतील ल्येकाचे. आनी आम्ही फ्येसबुक मधे त्येच केलं बरका; शेम-टू-शेम त्येच केलं; तर आम्हाला कमेन्ट तर नाहीच नाही, वर चार ‘लाईक’ आले त्या मेसेज ला. आता मला रडू येऊन राहिलं, श्याड फील होऊन राहिलं, ह्यात लाईक करन्या सारखं काये मित्रा!’, आम्ही डोळ्यातून पाणी येईस तोवर हसत होतो. नाम्या म्हणजे पेटला होता, ऐकायलाच तयार नाही! पोरगी पटवणं जर इतकं सोपं असतं तर मी स्वत: आई-बापाला कशाला अरेंज्ड-मॅरेजचा त्रास दिला असता!
‘त्ये काही नाही, दिवाळीवरून आलो परत आपन सगळे, की सम्या तू मदत करनारेस माझी सोईरीक जुळवायला. नैवेद्यापुरत अफेर झालं की लग्नच करायचय डायरेक्ट मला.’ अशी त्याची बड-बड ऐकत आम्ही टेबलावरून उठलो. नाम्यासाठी मुलगी पटवायला जायचं, म्हणजे स्वत:च्या मैत्रीणी घालवून बसायची भीती होती मला. नाही, नाम्यात काहीच कमी नव्हतं ओ, पण जे होतं ते जरा जास्तंच होतं. पण तरी मी अ‍ॅटलीस्ट एक सिम्पल मैत्रीण त्याला मिळवून द्यायला ट्राय करायचं ठरवलं. काही दिवसांनी आम्ही सगळेच दिवळीच्या सुट्टीसाठी आप-आपल्या गावी गेलो; मी पुण्याला, कोणी इंदौरला, कोणी दिल्ली तर कोणी चेन्नईला रवाना झाले. नाम्यासुद्धा त्याच्या गावी गेला; बुलडाणा जिल्ह्यातलं त्याचं कायगोली हे छोटसं गाव. नाम्याच्या भाषेत ‘प्रत्येकाला प्रत्येकाच्या चपलीचा साईज सुद्धा पाठ असंल’, इतकं छोटं गाव.
दिवाळीतंच आईनी मला एक गठ्ठा हातात दिला; अ‍ॅट-लीस्ट डझनभर मुली माझ्या लग्नासाठी शॉर्टलिस्ट केल्या होत्या. ‘अगं आई, पण इतकी काय घाई!’, असा वैताग मी काढला तर माझी आई म्हणाली, ‘अरे राजा, वय होत आलं आता आमचं. सगळं वेळेत झालेलं बरं असतं.’, हे इमोशनल वाक्य माझी आई माझ्या वयाच्या दुसर्या वर्षापासून मारत आलीये. ऐकून घेत आलोय, काय करता! स्वत: आईच हातात फोटो देतीये म्हटल्यावर मी निर्लज्ज होऊन फोटोतल्या पोरी नीट न्याहाळू लागलो. त्यात एकतर इतकी भारी होती यार, काय सांगू! पण तिची डेट-ऑफ-बर्थ मी इयत्ता पाचवीत असतानाची होती. म्हणजे माझं लग्न उतारवयात झालं असं नाही बरका, तर तिच्या बापाला घाई झालेली तिच्या लग्नाची. आईला-बाबांना सुद्धा ते मान्य नव्हतं, कारण तब्बल आठ-नऊ वर्षाचं अंतर होतं आमच्यात. पण ह्या आई नामक जीवाला लग्नाची इतकी घाई असते, की मी मुकाट्याने फोटो पाहिले, नकार दिला, एक वाद घातला, आणि मुंबईला परत आलो. असे अनेक आठवडे चालत आलेला हा सीन. त्या प्रकाराचे तर इतके आयटम किस्से आहेत, सो त्यासाठी एकदा वेगळं बसू आपण.
वाशीला परत आलो आणि कळालं नाम्याला अजून एक-दोन दिवस उशीर होणार आहे यायला. ‘सगळं ठीक आहे ना?’ हे विचारायला मी त्याला कॉल पण केला. फोनवरसुद्धा मोघम उत्तरं दिली त्याने. तीन दिवस लीव्ह एक्सटेन्ड करून तो परत आला. एरवी गावी गेला की खायला हमखास काही ना काही घेऊन येणार. पण ह्या वेळेस आला तो मोकळ्या हातानी आणि त्याहून अस्वस्थ करणार्या त्याच्या शांतते सोबत. इतकं शांत मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. ‘अरे नाम्या काय झालं गावाकडे, काहीतरी सांग?’, असं मी सतत विचारत होतो, पण तो काहीच बोलेना. दहा एक दिवस उलटून गेले पण तरी काहीच बदल नव्हता. मेसवर सुद्धा आला तर यायचा जेवायला, नाहीतर एकटाच टी.व्ही. चे चॅनल बदलत घरात पडून रहायचा. एके दिवशी माझी नजर सहज त्याच्या व्हिस्कीच्या बाटलीकडे गेली, तर थोडं विचित्रंच वाटलं. ती बाटली अर्ध्याहून अधिक भरलेली होती. नाम्या बेवडा नव्हता, पण एक दिवसाआड, किंव्हा मूड प्रमाणे, एक पेग तरी नक्की मारणार. मग मात्रं माझी काळजी एकदम वाढली, आणि म्हणून त्याला चीयर करायला मी घरातच एक पार्टी ठेवली. वीकएन्डला ग्रूप मधली दहा-बारा पोरं आली, बीयर आणि कोक आणलं, राजीबनी मस्तं चिकन बनवलं, आणि अ‍ॅज-यूज्वल झकास मैफिल जमली. हे सगळं हरवलेल्या नाम्याला परत आमच्या जगात आणायला केलेलं होतं, हे त्याला सोडून सगळ्यांना माहीत होतं. नाम्यासुद्धा जरा मूड मधे येऊ लागला. सो द प्लॅन सीम्ड टू बी वर्कींग. तेवढ्यात नाम्याचा मोबाईल वाजला. कायगोली वरतून फोन होता हे लक्षात आलं, कारण नाम्या पुन्हा सीरीयस झाला आणि फोनवर बोलायला आतल्या रूम मधे गेला. पाच एक मिनीटात बाहेर आला तो डोळे लाल आणि पाणावलेले घेऊन. बाकी कोणाचं लक्ष नाही गेलं त्याच्याकडे, आणि सगळ्यांची नजर चुकवून तो बाहेर निघून गेला. तो टेरेसवर गेलाय हे मला माहीत होतं, म्हणून मी भयनाक टेन्शन मधेच त्याच्या मागे पळालो. बाकी मित्रांना कशाचा अंदाज लागला नव्हता, सो दे कंटीन्यूड द पार्टी.
टेरेसवर गेलो आणि नेहेमीच्याच ठीकाणी, म्हणजे बिल्डींगच्या टाकीवर नाम्या बसला होता. मी वरती त्याच्या जवळ गेलो. नाम्या रंगानी ठीक्कर काळा होता, पण चंद्रप्रकाशात त्याच्या गालांवरचा ओलसरपणा लपला नाही.
‘नाम्या, भ***, आत्ताच्या आत्ता खरं काय झालंय ते बोलणार आहेस तू! डूड, आय कान्ट टेक धिस एनीमोर. प्लीज बोल यार. प्लीज काहीतरी…’
‘बाप मेला माझा आत्ताच सम्या’, माझं वाक्यं आणि मन अर्ध कापून काढलं त्याच्या वाक्यानी. त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं, पण तो ढसा ढसा रडत नव्हता.  तेवढ्यात मला काहीतरी आठवलं. ‘बाप मेला मित्रा, परत चाललो’, हे तो मला इंडक्शन प्रोग्रॅम मधे बोलला होता. मी थोडा अजूनच गार पडलेलो. ‘अरे पण तू तर म्हणालेलास…’
‘मला माहितीये तू काय विचार करून राहिलायस’, नाम्याला सुद्धा ते वाक्य आठवत होतं. मी त्याच्या शेजारी बसलो आणि खांद्यावर हात ठेवला. आय सिरीयसली डिडन्ट नो हाऊ टू रीयॅक्ट! एक मोठा सुसकारा टाकत आणि गाल पुसत नाम्या बोलला,
‘सम्या मला बाप खरं तर कधी नव्हताच. फक्त आईच्या कपळावर, आनि हळदी-कुकवाच्या कार्यक्रमात तिच्या ओटीत त्याचा प्रेझेन्स, बस्स! त्या दोघांचं लग्न झालं अन त्याची नोकरी गेली. मग काय; दोन एकर शेती, जी आमचे आबा सांभाळत होते, तीच तो नांगरू लागला. पन पाऊस कुठंय रे विदर्भात! त्याच वर्षी पूर्न शेत विकायची वेळ आली. बसा तिचायला बोम्बलंत! मग माझा जन्म झाला…’ नाम्या एकुलता एक मुलगा आहे हे मला ठाऊक होतं. ‘…माझा जन्म झाला आनी मग तो एकदम बदलंत गेला. पोटाच्या खड्ड्याचं फ्रस्ट्रेशन त्यानं दारूनं भरून काढलं. आमच्या इथे पान्याची टंचाई असंल पन म*** दारू कधीच संपनार नाही. बाटली आली आनी मग पाठोपाठ बाई पन आली बापाकडे. पन ती आई नसून आमच्या गावातली येक क्यारेक्टर-लेस बाई होती. आईला, मला आनि आबाला सोडून तो तिच्याकडे चालला-ग्येला. मग काय, वाताहत टू बी कंटीन्यूड की रे सम्या! काही दिवसांनी त्या दोघांनी गावंच सोडला. तेंव्हा पासून मल्हारजी इज प्रेजेन्ट ओनली इन माय मिडल नेम.’
बीयरचा एक घोट घेत त्याने पुन्हा डोळे पुसले. माझा श्वास सुद्धा कापत होता हे जाणवू लागलेलं मला. इतकी डिस्टर्बिंग लाईफ-हिस्टरी माझ्या सोबत रोज रहात होती हे कधी समजूनच येऊन नाही दिलेलं ह्या हलकटानं. नेहेमी हसत-हसवत रहाणार.
‘…आपल्या पहिल्या भेटीत मी जेंव्हा म्हणालो की माझा बाप मेला, तेंव्हा त्यानं एका तिसर्याच बाईशी लग्नं क्येलाचा मला फोन आलेला सम्या. आईला सांभाळायला परत जावं लागलं. बापाचा सपोर्ट काय असतो सम्या हे तुमच्या सारख्या मित्रांच्याच घरात पाहतो मी; बरं वाटतं! दिवाळीत कळालं की त्याला आजार झालाय कोनतातरी. मी विचारायला सुद्धा नाही गेलो. कशाला जाऊ! अरे माझा चेहेरा सुद्धा लक्षात नसेल त्याच्या. आता सुद्धा जाईन ते आई खातर, अन आबाचा आग्रह म्हनून त्याला आग द्यायला. नाहीतर, नॉट याट ऑल नीडेड!’
त्यानं बीयर संपवली आणि पुढचा अर्धा तास आम्ही बसून राहीलो तिथेच. मधे मी मेसेज पाठवला खाली ‘शट द पार्टी, नाम्याज फादर एक्सपायर्ड!’ रात्री त्याला झोप येईना म्हणून बाईक्सवर एका लॉन्ग ड्राईव्हला सगळेच गेलो. सकाळी त्याला गाडीत बसवून दिलं आणि मग पुढचे पंधरा दिवस तो गावाकडेच होता.
दोन आठवडे होऊन गेलेले. सकाळी सहा वाजता मी बेड मध्ये गाढ झोपलो होतो. अत्यंत भयानक स्वप्न पडत होतं आणि अचानक माझ्या अंगातला टी-शर्ट कोणीतरी फाडतय असं मला जाणवलं आणि दचकून जाग आली. नाम्यानी माझ्या अंगातल्या टी-शर्टला फाडून त्याचं जॅकेट केलं होतं, ‘अबे येडा झालास का नाम्या!’ मी ओरडतच उठलो.
‘अबे भ*** तुम्ही पुनेकर कशात पैशे वाचवाल समजून नाही राहिलं मला. कीतींन्दा सांगून राहीलो मी हा शर्ट नको घालूस म्हनून. फाटके कपडे घालनं दलिंदराचं लक्षन असतंय. आनि ऊठ लवकर तुझ्यासाठी न्यूज आहे माझ्याकडे. लग्न ठरलं ल्येका.’
चिंध्या झालेला टी-शर्ट फेकत मी ओरडलो ‘अबे काय सांगतोस! कोण, कुठली, कसं काय, काय करते?’
‘अबे मला पन थोडं विचित्रंच वाटून राहिलय सगळं, पन आईनं आधीच पाहून ठेवलेली म्हने. यंगेजमेन्ट आहे दोन महिन्यानी. गावतलीच आहे, वर्गात होती माझ्या, साळेत असतानी. आयला तेंव्हाच पटवली असती तर लऊ-म्यारेज झालं असतं ना गड्या! म्हनलं तुझ्या भरवश्यावर रहान्यात काहीच पॉईन्ट नाही. आमच्या विदर्भातली पानी टंचाई संपेल पन पोरगी पटायची नाही.’
‘नामदेव मल्हारजी म्हात्रे’ वॉज बॅक!
(क्रमश:)
भाग १ च्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद!
It takes a lot of efforts and time, and much more thinking to write. Feels good when there are people behind you and your art. Enjoy!  आणि नक्की कळवा रे!

स्वप्न काय असतात ?

स्वप्न काय असतात ?
ती आपल्याला का पडतात ?
त्यांचा अर्थ तरी काय असतो?

मला नेहमी वाटायचा स्वप्न म्हणजे आपले विचार (अर्थातच चांगले, वाईट, गोड, अणि बरेच.. ) जे आपल्या डोक्यात असतात.
मला आठवतय लहान असताना प्यांट वर लाल चड्डी घलुन उडत सुपरम्यान झालो होतो स्वप्नात  🙂 अणि जसा जसा मोठा होत गेलो तर आधी बिल गेट्स नंतर मार्क झुकरबर्ग (फेसबुक  वाला) झाल्याची स्वप्ने पडायला लागली.


काल रात्रीला सुद्धा असेच एक स्वप्न पडल, खर तर ते माज्या पूर्वीच्या एक निर्णयाशी रिलेटेड होत…त्यावरून माला वाटला की मी जो निर्णय घेतला होता, तो चुकीचा होता, कारण काय माला नक्की आठवत नाही, पण कदाचीत काहीतरी, कुठेतरी मिस कम्मुनिकेशन झालं होता… 


असो …
तर सांगायचा मुद्दा हा की, स्वने ही खरच आपल्याला काही सूचित करत असतात काय? कारण कधी कधी मी स्वताला स्वप्नात, प्यांट न घालता फ़क्त इन्नर वेअर मधे ऑफिस ला बसल्याचे बघितले आहे…
 🙂   🙂

ट्रॅव्हल्स

           पुण्यातून घरी जाण्यासाठी मला ट्रॅव्हल्स हाच एकमेव सोयीचा मार्ग आहे. कारण चारशे किलोमीटरचा प्रवास मी बसने तर नक्कीच नाही करु शकत! ऐनवेळी जाणं होत असल्याने ट्रेनचा प्रवासही शक्य नाहीये. शेवटचा पर्याय म्हणजे ट्रॅव्हल्स!

              तर गेल्या शुक्रवारी मी ट्रॅव्हल्सने घरी यायला निघालो आणि मला या ट्रॅव्हल्सवाल्यांच्या मनमानी कारभाराचा चांगलाच अनुभव आला.

             झालं काय की एकतर गाडी पाऊण तास उशिराने आली. बर ड्रायव्हर महाशयांनी वाकडेवाडीला एक तास उभी करुन ठेवली. जवळजवळ अकरा वाजता गाडी पुण्याबाहेर पडली. संध्याकाळी मला ऑफिसमधून यायला वेळ झाला होता म्हणून मी ढाब्यावर जेवण करायचं ठरवलं होतं. तर या ड्रायव्हर साहेबांनी साडेबारा वाजता ढाब्यावर गाडी उभी केली. तोपर्यंत भुकेने प्रचंड कासावीस झालो होतो. जळगावला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते. सकाळी सहाच्या आधी जळगावात पोचणारी गाडी इतक्या उशिराने पोचलेली पाहून ड्रायव्हर साहेबांच्या कूर्मगती ड्रायव्हिंगची कल्पना आलीच! जळगावला जवळजवळ सर्वच गाडी खाली झाली. आम्ही भुसावळला जाणारे फक्त नऊ जण उरलो होतो. सर्वांनी चला चलाचा गलका केल्यावर गाडी निघाली. तरी जळगावमध्ये एक तास मोडलाच!

              खरी कमाल तर यापुढेच झाली. जळगावच्या बाहेर गाडी आली न आली तोच आमच्या “सामर्थ्यशाली सारथ्याने” परत एकदा थांबवली! का म्हणून विचारलं तर म्हणे क्लिनर (यांच्या भाषेत किन्नर, आणि हा यक्ष!) गावात गेलाय, येईल पाच मिनिटात! पंधरा मिनिट झाले तरी त्याचा काही पत्ता नाही! लोक आरडाओरडा करायला लागले तर हा सरकारी कर्मचा-यांसारखा ढिम्म! अजून पाच मिनिटांनी एक ओम्नी येऊन थांबली. त्यातून “किन्नर” आणि त्या ओम्नीचा सारथी उतरले.(हा सारथी बहुतेक गंधर्व असावा! आमचे किन्नर साहेब त्याला आणायला गेले होते!).

’किन्नर’ साहेब म्हणाले,”चला सगळ्यांनी या गाडीत बसून घ्या!”.
काही लोक लगेच बॅगा वगैरे घेऊन उतरायला लागले.
आता मात्र माझा संयम संपला! आणि त्या यक्ष आणि किन्नर जमातीबरोबर जरासा ’प्रेमळ’ संवाद घडला! तो असा:

मी: का? या ओम्नीने का जायचं?
किन्नर: साहेब नऊच लोक आहेत, त्यामुळे…
मी: मग काय झालं? आमच्याकडे भरपूर सामान आहे, त्याचं कसं करायचं? माझ्याकडेच पाच बॅग्स आहेत.
किन्नर: मी बसवतो ना बरोबर! तुम्ही काळजी करू नका साहेब!
मी: एका ओम्नीत नऊ लोक! सामानासुमानासकट! कसं शक्यय?
किन्नर: खरं सांगू का साहेब, आमच्या मालकांना एक लग्नाची ट्रीप मिळालीये जळगाव ते भुसावळ अशी! त्यामुळे…
मी: म्हणजे आम्ही इतके स्लीपरने येणारे मूर्ख आहोत का? आम्ही इतके पैसे का भरतो? प्रवास नीट व्हावा म्हणून ना? की तुमच्या मालकाला फक्त पैशाशी घेणंदेणं आहे! मला नंबर द्या त्यांचा! मी बोलतो त्यांच्याशी! (बाकीच्या प्रवाशांना) कुणीच जायचं नाही ओम्नीतून!
गंधर्व (ओम्नीचालक): साहेब नवी गाडीये आपली!
मी: एक मिनिट, तुम्ही मधे बोलू नका! नवी असो की जुनी, आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये!
(आमच्या किन्नरला)हे बघा, तुमच्या मालकाला औरंगाबादहून ट्रीप मिळाली असती तर तिथून आम्हाला ओम्नीतून पाठवलं असतं का? आम्हाला काय मूर्ख समजलात का? तुम्ही आम्हाला भुसावळपर्यंत स्लीपरने पोचवण्यासाठी कमीटेड आहात. एकतर दुसरी ट्रॅव्हल्स आणा नाहीतर हीच गाडी भुसावळ पर्यंत घेऊन चला! नऊच प्रवासी आहेत तर त्याला आम्ही काय करणार! एकतर सकाळी सकाळी डोकं फिरवू नका! मला नंबर द्या मालकांचा!
किन्नर: जाऊ द्या साहेब, चला! (त्या ओम्नीवाल्याला) तू जा आता, तुझ्याशी नंतर बोलतो!
ओम्नीवाला: xxxxx xxxxxxxxx xxxxxxxx xxx
              गपगुमान त्याने गाडी भुसावळपर्यंत आणली!

रस्ते

रस्ते बांधले
झाडं कापून
इवल्या पक्षांचं अंगण टाकून
अन् आकाशाला गवसणी घालायला निघालो आपण
किती लोक रस्ता धरतात
सकाळ होता होता
कितीही कोंडी झाली तरी
माणूस कोंडीत सापडत नाही रस्त्यावर
घरच्यासारखा
नि रस्ता मागे खेचत नाही
घरच्यासारखा
हा हा म्हणता
केवढी प्रगती झाली राव
तरी लोक रस्त्यावरच उतरू पाहताहेत
मैदानं सोडून
मिरवणूका वराती यात्रा अंतयात्रा
मोर्चा दंगली फटाके अश्रूधूर
शतपावली मॅरेथॉन धावपळ
खाणं पिणं थुंकणं
गप्पा टाळ्या कट्टा शिट्ट्या
पेपर बातम्या अफवा
शाळा दुकानं
सगळा संसार थाटला रस्त्यावर
काही संसार रस्त्यावर आले
ते निराळेच
तरी रस्तेच चुकत राहिले नेहमी
माणसांऐवजी
माणसं चुकलीच नाहीत राजे
वर चुकणा-याला रस्ताच दाखवला गेला शेवटी
इतक्या रस्त्यातही रस्तेच
सापडले नाहीत न काहींना
रस्त्यांने देऊ केलाच त्यांनाही एक कोपरा
आणि ज्यांना मिळाले रस्ते ते
रस्त्यावर येईनासे झाले
अजून कितीतरी नवे रस्ते
बांधायचे आहेत म्हणे यंदा

भाग # 1-माझ्या रोजीरोटीची कहाणी..नोकरी क्रमांक–4 (Infosys Technlogies Limited)

छान उत्तम तर चालली होती TCS  ची नोकरी,काही होता का प्रॉब्लेम? खरे तर नाही.monsterindia  नामक एक जॉब साईट आहे बऱ्याच बेकारांना उदार निर्वाहासाठी नोकरी मिळवून देण्याचे पुण्यकर्म ते करतात..त्यांची माझ्यावर मेहेरबानी …चांगल्या भाषेत,कृपादृष्टी झाली वाटते आणि मी अगदी कॅज्युअली टाकलेला रेझुम त्यांनी पोचवला… (म्हणजे चांगल्या ठिकाणी!!)
मुंबई:२६ नोव्हेंबर २००३—संध्याकाळचे ५:३०
एका सुंदर संध्याकाळी म्हणजे मुंबईची सुंदर संध्याकाळ,ती ही ऑफिस मध्ये असते तेवढीच सुंदर…मी माझा मेल बॉक्स  उघडून बसलो होतो..जंक मेल मध्ये ६००+ मेल…( indiatimes.com…..email with all junk facility!!) पडल्या होत्या…सरळ राईट क्लिक….delete all spam  हाच ऑप्शन होता.पण एक मेल दिसली,”डिनर विथ ऐश्वर्या राय”….(त्यावेळेला अभी बच्चन रावांचे नाव घेऊन,थोबाड इकडे कर मेल्या म्हणत जिलेबीचे तुकडे त्यांना भरवले नव्हते त्यावेळेची गोष्ट सांगतोय मी!!… सर्व चीडचीड आमची म्हणजे आम्हाला सोडून बच्चन खानदानाच्या सुपुत्रामध्ये एवढे काय बघितले हीच होती…असो!)
SPAM mail   पाठवणारे पण काय डोकं लढवून मेल पाठवतात..आकर्षक..जाऊ दे ज्या गावाला जायचे नाही ती बस नको पकडायला असे विचार आले आणि त्याच्या खाली असलेली  एक मेल होती  तिच्याकडे उंदीर वळवला.
SUBJECT: IT Infrastructure Consultant:8-10 years needed…
रोज १०० मेल यायच्या या subject line  ने,कधी बघितले नव्हते..पण काहीसे intuition ,sixth sense  वगैरे म्हणतात ना..म्हणून मेल उघडली.नेहेमीप्रमाणेच interview call  होता…होती …आणि interview  ची सुद्धा वेळ होती..२६ नोव्हेंबर २००३…संध्याकाळी ५:३० चीच…
स्थळ: हिंजेवाडी पुणे..कंपनी होती INFOSYS  technologies limited
दुर्लक्ष करण्यासारखी कंपनी नव्हती!!
लिहिलेल्या ओळी साधारणतः अश्या…
Please confirm your presence 30 minutes before interview.If you are unable to make it,it will be very difficult for us to make it next time.
Regards,
ABC……
मी हादरलो पण वेळ निघून गेली होती..मी ज्या वेळेला जंक मेल चा फोल्डर उघडला त्यावेळेला कुणी तरी माझ्यासारखाच तिथे इंटरव्यू देत असणार या कल्पनेने मी हादरलो…मी संधी गमावली होती… मी वेडा झालो…इन्फोसिस सारख्या कंपनीची मेल जंक फोल्डर मध्ये आल्यामुळे मला बघायला उशीर झाला होता आणि मी सोन्यासारखी संधी गमावली होती….मी मनातल्या मनात Indiatimes ला ४-५  शिसवी शिव्या हासडल्या…यांचा  Junk domains  च्या  database  मध्ये इन्फोसिस सारख्या बड्या कंपनीचे नाव होते आणि मला जबरदस्त फटका बसला होता.सुदैवाने मी निदान जंक फोल्डर स्कॅन केला म्हणून हे समजले तरी..
मी सुन्न झालो…
पण त्याच तिरीमिरी मध्ये पुन्हा रिप्लाय केला की मी  इंटरव्यू आत्ता अटेंड करू शकत नाही काही वैयक्तिक कारणामुळे..लगेच उत्तर आले,पुढील  क्वार्टर पर्यंत आता पुण्यात इंटरव्यू स्केद्युल करता येणार नाहीत म्हणून…मी वैतागून कपाळाला हात लावला…
संध्याकाळचे ७ वाजता…माझा एक मित्र प्रवीण कुटे नावाचा नाईट शिफ्ट मध्ये येताना  TIMES OF INDIA  घेऊन आला होता.तो पेपर सहज वाचायला घेतला…पान क्र. ८-९ असेल कदाचित…इन्फोसिस ची जाहिरात होती…रविवार ३० नोव्हेंबरला सिडनेहॅम कॉलेज मध्ये कॅम्पस इंटरव्यू होते….लिहिले होते ‘strictly by appointment’……… मी चान्स घ्यायचे ठरवले…. जाता जाता पुण्याच्या इंटरव्यू स्केड्युलची प्रिंट घेतली…
तडमडत गेलो लोकलला लटकून…नेहेमी प्रमाणेच पांढऱ्या शर्टचा रंग पिवळा झाला होता अनेक लोकांमध्ये मिसळून..जेव्हा पोचलो सिडनेहॅम कॉलेजला तेव्हा तेथे उमेदवारांचा महासागर होता…माझ्यासारखे अनेक नोकर+इच्छुकांची तेथे जत्रा होती…कसा लागणार माझा नंबर?? माझा नंबर जवळपास १००० वगैरे असेल…त्यातच भरीस भर म्हणून कॉलेजच्या पोरांचे  Gathering  चालू होते…तिथल्या सर्व मजा करणाऱ्या पोरांमध्ये आम्ही नोकरी मागायला आलेले उमेदवार अगदीच बापुडवाणे दिसत होतो..
तेवढ्यात एक HR चा बॅज लावून फिरणारा इन्फोसिस चा एम्प्लोयी दिसला,त्याला माझ्याकडची printout  दाखवली.त्याने मला विचारले “ How did you miss yesterday’s appointment?”
आत्ता कपाळ माझं!!आता त्याला हे सांगू तुमची मेल माझ्या जंक फोल्डर मध्ये अली होती म्हणून….तो म्हटला विचारून बघतो आत शक्य आहे का??…१० मिनिटाने परत आला म्हणाला.”लेट’स डिस्कस”….चला…गंगेत घोडं न्हायलं..मला आत नेताना पब्लिक ने बोंब मारली…’”च्यायला…आम्ही काय येडे म्हणून सकाळपासून उभे आहे का?”…इथपासून….” अरे जावई आहे का इन्फीचा??”….”बरोबरच आहे…मी जरी त्यांच्या जागी असतो तरी शब्द तेच आले असते…
गेंड्याची कातडी पांघरून आणि दुर्लक्ष करून आत गेलो आणि मला इंटरव्यू साठी स्लॉट मिळेल हे कळले. असे सांगितल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही….जसे काही माझे सिलेक्शनच झाले होते….
३० मिनिटात बोलावणे आले….१ तास इंटरव्यू झाला…उत्तम झाला…नंतर  2nd  राउंड सुद्धा लगेच झाला,मला वाटले झाले की सिलेक्शन!! पण अजून काही नक्की नव्हते..
घरी फोन करून आनंदाच्या भरात सांगितले..’चला ..बंगलोर ला जायचे आहे…मला मिळेल नोकरी इन्फोसिस मध्ये”……सौभाग्यवतीने  एकाच वाक्य उच्चारले “ कुल डाऊन…लेटर मिळाले आहे का?? विमान उडवू नकोस आत्तापासून!!” मी दुसऱ्या क्षणी शांत!!  Smile
चला आता वाट बघा….एक एक दिवस जात होता…पहिले आठ दिवस  excitement  राहिली…नंतर वाटले,काही होत नाही पुढे…डिसेम्बर असाच गेला आणि मी  TCS  मध्ये परत जुंपून घेतले..मधेच कधीतरी जंक फोल्डर चेक करत !! विसरून गेलो सर्व आणि म्हटले एकदा रिजेक्ट झालात की ९ महिने परत अप्लाय करता येत नाही..त्याची भीती होती..
१६ जानेवारी….सकाळी ९ च्या सुमारास दोन फोन आले..
एक इन्फीचा…तुझे सिलेक्शन झाले आहे म्हणून आणि एक सम्याच्या अपघाती मृत्यूचा!!  वाचा…(“ए अडीच!!” उर्फ..सम्या विद्वांस) प्रतिक्रिया काय द्यावी हेच कळेना…खुश होऊ का रडू?गप्प पडून राहिलो…  No celebrations at all!!
 ९ फेब्रुवारी २००४:  Electronic City,Hosur road,Bangalore.
‘साम्र्याज्य’ हा एकच शब्द…दुसरे काही नाही..प्रचंड मोठा कॅम्पस,भयंकर ताण होता मनावर,जमेल ना बाबा तुला येथे काम करणे? आजकाल फसाफसा नोकरी बदलणाऱ्या लोकांपुढे मी एकदम जुनिअर..७ वर्षे TCS  मध्ये काढल्यानंतर तेथील सेफ वातावरण,सर्व ओळखीची  माणसे सोडून या नवीन घरात मी जरा बावरल्यासारखाच झालो,(lighter note  वर सांगायचे झाले तर मला ‘  नववधू प्रिया मी बावरते’ हेच गाणे आठवले..)
अबब!! केवढा हा पसारा!! कसले ऑफिस प्रचंड होते.  TCS  ही काही  छोटी कंपनी नव्हती पण इन्फीच्या  central operations  च्या कॉन्सेप्त मुळे होसूर रोडचे ऑफिस हे mind boggling  च होते.शहरातून आलेला मी,खेड्यातून आल्यासारखा खुळा होऊन बघत होतो,पंचतारांकित सुखसुविधा  असलेले हे एक शहरच आहे.एक अभिमान पण वाटला की अनेक लोकांना स्वप्नवत वाटणाऱ्या या कंपनीमध्ये मी आहे…

आता पुढे!!


आयडिया केली ……

मार्च-एप्रिलचे दिवस होते. दिवसाचा उन्हाचा तडाखा सहन होत नव्हता आणि रात्रीच मरणाच उकाडायच. भरीस-भर म्हणून सरकारच्या कृपेन लोड शेडींगमूळ गावात १२-१२ तास लाईटच नसायची. मग कसला फ्यान अन् कसलं काय. निम्म गाव अंगणात झोपायच.
पण चौगले गल्लीतलं दादयाच घर तस जरा गचडीतच हुत; आजूबाजूला सगळी भावकितलीच घर चिकटून चिकटून बांधलेली; त्यामुळ गल्ली सुध्धा चिंचोळीच झालेली आणि त्यात कुणाच्या गाड्या; कुणाचा ट्रक्टर यामुळ रस्त्यावरन सप्पय चालायची बोंब मग झोपायच तर लांबच. दादयान मनातल्या मनात सगळ्या भावकीचा उद्धार केला आणि विचार करू लागला आयला यातन मार्ग काय काढावा?
असा विचार करत करत दादया गल्लीच्या कोपऱ्याला आला तसा तिथं त्याचा दोस्त संप्या  गाठ पडला. दादयान त्याला आपलं दुखण सांगितलं; दोस्तान दोन मिनिट विचार केल्यागत केलं आणि म्हणला एक आयडिया हाय; आपण आस करू तुमच्या गल्लीतली दोन-चार पोर गोळा कर आपण तळ्याकाठच्या देवळात झोपायला चालू करू आजपास्न!! तसपण लोड-शेडींगमूळ आता म्हाताऱ्यांची भजन-बिजन सगळी बंद झाल्यात; आपल्याला रान मोकळच हाय आता.
दादयाला आयडिया एकदम पसंत पडली. दादयान लगीच गल्लीतली २-४ पोर तयार केली आणि वळकटी-बिळकटी घेऊन देवळात झोपायला जायला चालू केलं. हळू-हळू आयडिया हिट झाली आणि जवळ जवळ आठ-दहा पोर झोपायला यायला चालू झाली.
तळ्याकाठच खंडोबाच देऊळ म्हणजे सगळ्या गावच श्रद्धास्थान एकदम जुनं, आणि प्रशस्त अलीकडच गावकऱ्यांनी देवळाचा जीर्णोध्धार केलता, सभामंडप चारी बाजून बंदिस्त करून ग्रील मारून घेतल होत; त्यामुळ दादयाची आणि दोस्त मंडळींची चांगलीच सोय झाली होती. रात्रीच तळ्यावरन येणाऱ्या गार वाऱ्याला पडायला भलतीच मजा यायची.
असेच १०-१२ दिवस गेले आणि एक नवीनच त्रास चालू झाला. सगळी झोपली कि हिकड-तीकड हिंडणारी ३-४ कुत्री हळूच येऊन अंथरुणात शिरायची आणि उबिला पडून राहायची.
झोपत कुणाचा हात पाय पडला कि कुंई-कुंई करत बसायची; आयला नसता डोक्याला ताप. मग उठायचं आणि सगळी कुत्री हाकलून काढायची पण झोपेच खोबरं व्हायच ते व्हायचंच.
काय करायचं काय करायचं असा विचार करण्यात दोन दिवस गेले, आता कुत्र्यांची संख्या पण वाढली होती. पण आमचा दादया म्हणजे कसला माणूस? तेच्या सुपीक डोक्यातन एक आयडिया निघालीच. दादयान पोर गोळा केली; म्हणला च्यामायला मी ह्या कुत्र्यांच्या!! निकालच लावून टाकूया आज
नेहमीप्रमाण सांच्यालाच पोर देवळात गोळा झाली, गप्पा-टप्पा आणि गावाची मापं काढून झाल्यावर अंथरून टाकली आणि जेवायला गेली. नेहमी पोर जेवायला गेली कि कुत्री एक एक करून अंथरुणात शिरून बसलेली असायची.
पण त्यादिवशी परत येताना दादयान सांगितल्याप्रमाण पोरं तयारीन आलती, प्रत्येकजण येताना टोणे, काठ्या घेऊन आलता. सगळीजण देवळाबाहेर जमल्यावर मग कुत्र्यांच्यावर एकदम हल्ला करायचं ठरलं. त्या बेतान एक एक जण आवाज न करता हळूच आत शिरला, एकान पुढ जाऊन गाभाऱ्याचा दरवाजा बंद करून घेतला. एक जण हातात टोना घेऊन सभामंडपाच्या दारात उभा राहीला आणि बाकीचे तिघे चौघे जण आत आपापली पोझिशन घेऊन उभे राहिले. दादया सगळ्यांचा म्होरक्या; तावा-तावान गेला पुढ आणि अंथरुणात शिरलेल्या एक कुत्र्याच्या पेकाटात एक रट्टा हाणला तस कुत्र जिवाच्या आकांतान केकाटत दरवाज्याकड पळाल; पण तिथ एक जण अगोदर तयार हुताच; तेन काय त्या कुत्र्याला बाहेर जाऊ दिलं नाही. आणि मग एक एक करून सगळ्या कुत्र्यांची तीच अवस्था झाली.
केकाटनारी कुत्री आणि चेव चढलेले हे ५-६ जण शूर-वीर; देवळात नुसता हैदोस चालला होता. आधीच सगळीकडे अंधार त्यात कुणाचा कुणाला पत्ता नाही. नुसती झोडपा-झोडपी. कुत्र भिऊन कोपर्यात जाऊन उभ राहील कि दादया शोधत शोधत जाऊन तेला मधी आणायचा आणि मग परत सगळ्यांनी मिळून तेला झोडपायच असा हा जंगी कार्यक्रम चांगली १०-१५ मिनिट चालला होता. शेवटी मारून मारून दादयाचे हात भरून आले तसा दादयान दोस्ताना इशारा केला आणि पाप बिचारया कुत्र्यांची सुटका झाली.
हाश्श-हुश्श करून दादया अंथरुणात टेकला….. एवढ्यात तेच्या हाताला ओल-ओल कायतरी लागल; दादया हात नाकाजवळ नेत वरडला आरं XXXच्यानो; हे काय हाय ……?   
सगळ्यांची अंथरुण भरून गेल्याली; देवळात बी सगळीकड चिकट चिकट लागतेलं. सगळी गप्-गुमान घरला सुटली. दुसऱ्यादिवशी गावात हि बातमी समजली……..
त्यानंतर दादया आणि तेची दोस्त मंडळी दोन दिवस तळ्यावर मुक्कामालाच हुती.
आता सगळयांची अंथरूण आणि आखंड देउळ धूऊन काढायचं म्हणजे येवढा वेळ लागणारच की राव.

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले या धुंद दारुड्यांचा
संपेल न कधीही हे खेळ बाटल्यांचा

ही दारू न स्वयंभू, सोडा तू ओत थोडा
उपवास सोडताना, बंधने सारी तोडा
पित्यास होई भारी, हा शाप श्रावणाचा

आभास बायकोचा, होतसे बाटलीत
हे सत्य नाही सांगे, चकणा या ताटलीत
भितात बायकोला हा दोष, न पिण्याचा

या साजीऱ्या क्षणाला, का असशी घाबरून
सुटतील सारे प्रश्न, घे थोडी तू पिऊन
गवसेल सूर भलता, या झिंगल्या मनाचा

-काव्य सागर

४६. पापाचे धार्मिक महत्व

ख्रिश्चन हा आपल्या हिंदू धर्मासारखा सरळ आणि साधा धर्म नाही.
त्यातून कॅथॉलीक ख्रिश्चन हा तर आचरावयास खुपच कठीन धर्म म्हणावा लागेल.
आपल्या हिंदू धर्मात करण्यासारखं ’असं’ खुप कमीच असतं. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव हे सगळे सण समारंभ. ते साजरे करणे म्हणजे धर्माचरण करणे असं आम्हाला वाटतं. पण तसे काही नाही. धर्म ह्या शब्दाची व्याप्ती खुप मोठी आहे. ख्रिस्तांच्या धर्मात करण्यासारखे खुप कांही असते. हा धर्म जरा इव्हेंटप्रिय असावा. आणि त्यांना असं कांही केल्याशिवाय आपण धार्मिक आहोत असं वाटत देखील नसावं. दर रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करा. फादरसमोर कंफेशन करा (त्याअगोदर थोडीफार पापं करा) दुस-यावर प्रेम करा. शेजा-यांवर प्रेम करा. गरीबांना मदत करा. (जमलंतर त्यांना धर्मांतर करायला भाग पाडा) इ.इ.
नित्से म्हणतो की हे ख्रिश्चन लोक शेजा-यावर प्रेम करतात कारण त्यांना स्वत:ला स्वर्गात पोहोचायचे असते आणि पापी शेजा-यांना नरकात यातना भोगताना पहायचे असते.

“पाप” वरून आठवलं.
एकदा एका शाळेत लहान मुलांना ख्रिश्चन धर्माविषयी माहीती दिली जात होती. कार्यक्रमाच्या शेवटी त्या नननी विचारले,” सांगा पाहू कोणाकोणाला स्वर्गात जायचे आहे?”
बहूतेक सर्व मुलांनी हात वर केले मात्र एका मुलीने केला नाही. तीला विचारले तेव्हा ती म्हणाली,” मम्मीने मला शाळा सुटल्यावर दुसरीकडे कुठे न जाता सरळ घरी ये असं सांगीतलं आहे.”
मुलं किती सरळमार्गी असतात नाही?.
त्या ननने पुढचा प्रश्न विचारला,” सांगा बरे मुलांनो, स्वर्गात जाण्यासाठी अगोदर काय केले पाहीजे?”
” पाप” एका मुलीने उत्तर दिले.
ती मुलगी पुढे म्हणाली” कारण, पाप केल्यानंतर आपण जेव्हा प्रभूची क्षमा मागतो तेव्हाच आपल्याला स्वर्गाचा दरवाजा उघडतो.”
लहान मुले प्रत्तेक गोष्ट सरळ सरळ पाहतात. लहान मुलांना आपल्यासारखे “अनुभव” नसतात व “ज्ञान” कमी असते, त्यामूळे ते पुर्वानुमानाने किंवा पुर्वग्रहाने कोणतीही गोष्ट पहात नाहीत.
हां एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे ’पाप’ म्हणजे काय हे त्यांना इतक्यात कळत नाही. ते कळण्यासाठी त्यांना थोडे मोठे व्हावे
लागते.
“पाप” वरून आणखी एक कथा आठवली.
एकदा एका ख्रिश्चन पाद्र्याची (फादरची) सायकल हरवलेली असते.
आपली सायकल हरवल्यामुळे ते खूप बचैन झाले होते. सायकलीमुळे त्यांची कामे वेळेवर व्हायची.
आज रविवार त्यांना सायंकाळच्या प्रार्थनेसाठी वेळेवर पोहोचायचे होते. म्हणून ते घाईघाईने चालत जात होते. चालता चालता सायकल चोराला दुषणे देत होते. एका फादरची सायकल चोरायची म्हणजे काय?
आज प्रार्थनेनंतरच्या प्रवचनादरम्यान आपण पाप-पुण्य इ. विषयी चांगले भाषण ठोकायचे असे त्यांनी ठरविले. आपले भाषण ऐकून त्या चोराला आपल्या अपकृत्याची आठवण होऊन त्याने आपली सायकल परत करावी असा त्यामागे हेतू होता.
प्रवचनादरम्यान ते पाप-पुण्य, चोरी, सत्य-असत्य, प्रेम-इर्षा असे करत करत ते व्यभिचार-वेश्यागमनपर्यंत आले. वेश्यागमन, परस्त्रीगमन या शब्दांनंतर ते एकदम थांबले, त्यांना आठवले की त्या रात्री त्यांची सायकल नेमकी कोठे विसरली होती.
त्यांनी प्रवचन संपवले. ते चर्चबाहेर पडले आणि तडक चालू लागले.

(मी या कथा कोठेतरी वाचल्या आहेत. कोठे? ते नक्की आठवत नाही.)

majhyaa viTThalaa

आनंदाने मी वाहतो तव चरणावर कुडी
अवतन मजला लवकर धाड़ी,जोवर भजनाताच गोंडी
तालात भजनाच्या रंगू दे,मम ट़ा लांची  जोड़ी
नमस्कार तुजलाच करू दे मम हातांची जोड़ी
मुखात माझ्या सदा असावे केवल रामनाम 
चित्ती बसावे गोड़ रूप ते प्रभूचेच ठाम
गंध फुलांचा घेण्याआधी तव चरनी ती वाहीन 
मंद श्वास मम होण्याआधी तुझेच गीत गाइन.

`
l

नामदेव मल्हारजी म्हात्रे (…भाग १…)

आपल्या लाईफ मधल्या घटना आणि त्यात भेटणारी माणसं जर आपल्याला निवडता आली असती तर अ‍ॅट-लीस्ट मला तरी बोर झालं असतं. निसर्गानं असं काही आर्कीटेक्चर बनवलय, की जे कोणी आपल्याला भेटतं, त्याचं काही-ना-काही कारण नक्की असतं. म्हणजे लगेच प्रत्येक नात्यात ‘आपलं काही काम निघतय का!’, हे शोधायला सुरु करा असं मी मुळीच म्हणणार नाही. लोकं भेटत जातात, नाती बनत जातात. इट्स यू, हू हॅज टू डिसाईड अ‍ॅन्ड जस्ट मेनटेन दोज रीलेशन्स. माझ्या आयूष्यात इतरांसारखेच बरेच लोक आले, पण काही लोकं च्यूविंग-गम केसांना चिकटावं तसं चिकटतात.

मला पहिली कंपनी ही कॅम्पस मधेच मिळाली. आई-वडीलांच्या अशिर्वादाने आणि आई भवानीच्या क्रुपेनेच उच्च शिक्षण पूर्ण झालं, कारण त्यासाठी कष्ट केल्याचं मला तरी काही आठवत नाहीये. मग आला ‘इंडक्शन प्रोग्रॅम’. ज्यांना हे काय असतं ते माहीत नसेल तर सांगतो. ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ म्हणजे फ्रेशर लोकांना कम्पनी मधे हळूवारपणे सामावून घेण्याचं तंत्र. म्हणजे ते बावरून जाऊ नयेत, आणि कंपनी बद्दल ‘आहाहा… काय कंपनी आहे आपली! काय पोरी आहेत इथल्या!’ असाच गोड गैरसमज निर्माण करण्याची आयडीया. तर असाच ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ माझ्या पहिल्या कंपनीने शिमल्याला ठेवला होता, ते देखील संपूर्ण एक महिना. एकूण ३५० भारतीय पोरं-पोरींना इथे एकत्र आणलं होतं. एका कॉलेजच्या हॉस्टेल मधे आमची राहायची सोय केली होती. जॉयनिंग फॉर्म भरून घेणं चाललेलं. माझ्या सोबत अजून सात जणं आमच्या कॉलेजचे इथे सिलेक्ट झाले होते. मी नाव लिहीणार तोच अचानक माझ्या फॉर्म, पॅन्ट आणि उजव्या खांद्यावर काळ्या शाईचे ठिपके प्रकट झाले.
‘तुझ्या ***, कोण केलं रे हे!’ असं बोंबलतंच मी उठलो. मागे पाहिलं तर काही पोरी फॉर्म्स भरत होत्या आणि त्यांच्याकडे तर बॉलपेनं होती. त्यात एक-दोन दिसायला लईच भारी होत्या त्यामुळे मी पुढची शिवी आवरली. पण मुख्य गुन्हेगार पसार झालेला.
‘कंपनीच्या पहिल्याच दिवशी काळी शाई अंगावर म्हणजे चांगलं लक्षण नाही सम्या!’ असलं अपशकूनी बोलणं फक्त धर्मेशंच करू शकतो. हा माणूस कधीही बघावं तर दुसर्याच्या फाटलेल्या पॅन्ट कडेच बोट दाखवताना सापडलाय मला. एक नंबरची सॅडिस्ट असतात काही माणसं यार. मला सवय झालीये म्हणून मे दुर्लक्ष केलं, पण त्या गडबडीत तो माणूस सापडलाच नाही. तण-तणतच मी दुसरा फॉर्म घेतला आणि भरायला बसलो. अर्धाच भरून झाला होता आणि,
‘म्हात्रे नामदेव मल्हारजी… आईचा घो! चायला चुकून राहिलं ना नाम्या, काय करायला!’ असं स्वत:शीच शेजारी कोणीतरी ओरडलं.
इतक्या मोठ्या कंपनीत आल्यावर सुद्धा कोणाचं चालतय हे थोबाड, हे बघायला जवळपास सगळेच वळाले. बाकीचे जे नाही वळाले ते अमराठी होते ते ओळखलं. लाईट-पिंक टी-शर्ट, फॉर्मल काळी पॅन्ट, काळा रंग, आणि हातात काळं शाई-पेन घेऊन हा माणूस फॉर्म भरताना मला दिसला. च्या मारी, सापडला की राव! ते पेन बघून मी ठरवलेलं की ह्याला नंतर हटकायचं. पण त्यानेच माझ्याकडे पाहिलं आणि थोडा स्माईल दिला. मग फॉर्म घेऊन माझ्या जवळ येऊन बसला.
‘इज धिस ट्रू? माय सर-न्येम इज म्हात्रे.’, माझ्या समोर त्याने फॉर्म धरलेला.
मी पूर्ण ब्लँक झालो, ‘म्हणजे काय!’, असं मी थोडं इरीटेट होऊन आणि चेश्टेच्या सुरातच बोललो.
मराठी सापडलेला पाहून तो थोडा निवांत झाला ‘अरे म्हनजे इथे सर-नेम ची जागा नाही ना, म्हनून विचारलं मी.’
‘अरे लास्ट-नेम आहे की.’
डोळे मोठे करून, मी अत्यंत हुशारीचं काहीतरी बोललो आहे असा त्याचा चेहेरा झाला एकदम, ‘आयला लाश्ट-नेम इज ईक्वल टू सर-नेम, हे मला ठाऊक नव्हतं ल्येका!’
‘ह्या असल्या आयटमला इतक्या मोठ्या कंपनीत सिलेक्ट तरी कसं केलं!’ हे आम्ही नंतर बराच वेळ एक ईगोइस्टिक-डिस्कशन केलं. आम्ही बाकी राज्यातल्या पोरीन बरोबर इंट्रोड्यूस होत असताना माझं लक्ष नाम्याकडे गेलं. एका झाडाखाली त्याच्या आई, वहीनी, किंवा बहिणीनं दुधाच्या पिशवीत बांधून दिलेलं थालीपीठ खात बसलेला तो.
हॉस्टेलच्या रूमचा नंबर समजला आणि मी रूम मधे गेलो, तर समोर बेडवर ओळखीचा लाईट-पिंक टी-शर्ट दिसला. ‘शिट!’ येवढाच आवाज तोंडातून आला. एक अख्खा महीना नाम्या बरोबर! नो वेज डूड! कुणालाही समजायच्या आत मी रूम पटकन बदलून घेतली आणि म्हात्रे एकटाच त्या रूम मध्ये राहू लागला. फक्त पंधरा दिवस झालेले जेंव्हा आम्ही शिमल्यात धिंगाणा घालत होतो आणि मला अचानक नाम्या सूटकेस घेऊन रीक्शात बसताना दिसला. मी विचारलं तर थोडा थांबला, काहीतरी विचार केला, एक सुसकारा टाकला आणि म्हणाला ‘बाप मेला मित्रा, परत चाललो.’ इतकच बोलला आणि शेक-हॅन्ड करून त्याची रीक्षा निघून गेली. पूर्ण पंधरा दिवसात कोणाशीच मैत्री न करता नाम्या वेन्ट अवे.
आज त्या सगळ्याला पाच वर्ष उलटून गेली. तो इंडक्श्न प्रोग्रॅम आता फेस-बुक किंवा पिकासा मध्ये मधून-अधून दिसुन येतो. आपण किती बालीश होतो आणि आपल्यात किती मोठा फरक पडलाय हे देखील लगेच समजतं. म्हणजे दिसण्यात बरका, बालीशपणा बद्दल नो कमेन्ट्स! Maturity of thoughts is never dependent on years of work experience. आपण किती मॅच्यूअर आहोत हे सिच्यूवेशन दाखवते, व्हेयर पीपल हार्डली पास दॅट टेस्ट. असो!
पण आजपेक्षा थोडं मागे जातो. अंदाजे तीन वर्षापूर्वी एके दिवशी अचानक, माझ्या जुन्या कंपनीत डेटबेसवाल्या मुलानी पेपर टाकले. पेपर टाकले म्हणजे लगेच पहाटे सायकलीवर, गारठ्याचं, पावसा-पाण्याचं तो घरो-घरी पेपर टाकत सुटला असं नाही. आमच्या इंडस्ट्रीत ‘पेपर टाकणे’ हे ‘रीझाईन करणे’ ला समानार्थी असतं. तर आमच्या डेटाबेसवाल्या पोरानी रीजाईन केलं. प्रोजेक्ट ऐन रंगात असताना, त्याच भांडण आमच्या पी.एम. बरोबर झालं आणि त्याने आपला रंग दाखवला. मग काय, नवीन माणूस शोधणं आलं की! तोंडावर लग्न आहे आणि घरात अर्धी रूम रंगवून झाल्यावर अचानक रंगार्याचं भांडण त्याच्या कंत्राटदारा सोबत झालं, आणि तो तण-तणंत निघून गेला तर भिंत कशी दिसेल, तसा आमचा प्रोजेक्ट दिसू लागला. एखाद्या आठवड्यानंतर नवा माणूस येणार असं कळालं. ‘खूप कडक इंटरव्ह्यू घेतलाय मी’ असं आमचा एक सिनीयर मला म्हणाला. ह्याचा स्वत:चा इंटरव्ह्यू कोण घेतला हे आधी आम्हाला शोधायचं होतं. अरे डीझाईनींग जो माणूस फक्त पेन्ट-ब्रश मधेच करू शकतो; ज्याच्या ई-मेल पुढे स्पेल-चेकनी सुद्धा हात टेकले आहेत आणि जो दिवसभर फेसबुकचा उपयोग मॅट्रीमोनी साईट सारखा करत बसलेला असतो, असा माणूस होता हा. त्याची चॉईस आहे म्हटल्यावर आम्हीच पेपर टाकायचा विचार करत होतो. काही दिवसांनी आला तो माणूस समोर. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. मी माझं नाव सांगितलं आणि तो चार-चौघात एकदम म्हणाला
‘आय नो यू बरका! वी ह्याव म्येट बिफोर समीर’, अस्सल गावरान मराठ्मोळ्या इंग्लिश मध्ये त्याने ओपनिंग स्टेटमेन्ट केलं. साक्षात नाम्या माझा समोर उभा आहे हे बघून मला धक्काच बसला. 
‘आय अ‍ॅम सॉरी आय डिडन्ट रेकगनाईज यू अ‍ॅट फस्ट!’, एक नजर पी.एम. वर ठेवून मी आवाजात जरा सॉफिस्टिकेशन आणून म्हणालो.
‘त्यात काये येवढं, यार! अरे ल्येका दोन्ही पैकी काहीच दांडगं नाही ना आपल्यात; ना माझी पर्सन्यालिटी, ना आपली ओळख. कशाला टेन्शन घेतो!’ आणि मग त्याचे काळे ओठ, थोडेसे पिवळे दात-कम-आवलीपणा दाखवत हसले. हे स्टेटमेन्ट मारल्या बरोबर सगळेच भेदरलेल्या नजरेनी आमच्या सिनीयर कडे बघू लागले; ज्याने ह्याला सिलेक्ट केलं होतं. पी.एम. नी रुमाल काढला आणि बहुतेक त्याचं अप्रेजल चुलीत गेल्याचं त्याला एखादं छोटसं स्वप्न देखील पडलं. त्याने घाम टिपला आणि मलाच ‘प्लीज टेक केयर’ असं म्हणून निघून गेला. म्हणजे केयर नक्की कोणची घ्यायची होती; नाम्याची, प्रोजेक्टची, का स्वत: माझी. आहो टीम-लीड म्हटल्यावर मॅनेजर काय अवाजवी एक्सपेकटेशन ठेवतील सांगता येत नाही!
आठवडा उलटून गेलेला आणि नामदेव म्हात्रे नुसताच डेटबेस न्याहाळत बसलाय हे दिसू लागलं. काम पुढे सरकेचना. बरं एखादी तरी ईमेल यावी त्याच्याकडून, तर ते सुद्धा नाही. सगळी टीम ‘काही खरं नाही! काही खरं नाही!’ हेच बोलताना दिसत होती. मग एके देवशी मला आणि नाम्याला पी.एम. कडून एक ईमेल आली. नाम्याच्या प्रोग्रेसवर डाऊट येऊ लागलेला म्हणून एक टीम मीटिंग बोलावली. खात्री होती आम्हाला, की नाम्याला लवकरच लाथ बसणारे. मीटिंग-रूम गच्चं भरलेली, पण सगळे शांत. मग नाम्याकडे बघून पी.एम. नी विचारलं, ‘प्लीज टेल द स्टेटस नामदेव. दहा दिवस झाले आता.’
आणि मग मल्हारजींचे सूपुत्र बोलले ‘आय डोन्ट थिंक वी कॅन प्रोसीड लाईक दिस! पार लावून ठेवलीये डेटाबेसची!’ आवंढा गिळताना सुद्धा इतका त्रास होवू शकतो हे मला त्या दिवशी समजलं. आमचा पी.एम. आधीच गोरापान. त्याच्या कानाच्या लाल रंगावरून त्याच्या अंगाच्या टेम्प्रेचरचा अंदाज आला. ‘अरे पण मग तू हे आधी का नाही बोललास!’ पी.एम. भडकला होता, ‘तुला म्हणून तर रीक्रूट केलेलं, सो दॅट यू विल टेक केयर. दहा दिवस झाले नामदेव, आणि आज मी मीटिंग बोलवल्यावर तू हे सांगतोस की प्रोजेक्ट असा प्रोसीड होवू शकत नाही म्हणून. आय अ‍ॅम गोइंग टू गो क्रेजी नाव!’ सगळी रूम शांत आणि स्तब्ध. सगळेच जणं जमिनीकडे बघून, एक-मेकांना आणि खास करून पी.एम. च्या नजरेला टाळत होतो, आणि तेवढ्यात नाम्या बोलला ‘मी प्रोजेक्टबद्दल काहीच बोललो नाहीये अजून. मी म्हणालो आय डोन्ट थिन्क वी कॅन प्रोसीड लाईक दिस. म्हणजे आय ह्याव अनादर सोल्यूशन. डोन्ट वरी!’ आणि वर त्या शांततेत तो जोरात हसला. पी.एम. नी हताश-स्टाईलमधे डोकं हालवलं आणि तो काहीच न बोलता बाहेर निघून गेला. स्वत: शांत न राहाता, टीमला सुद्धा पॅनिक कसं करायचं हे आम्ही त्याच्याकडूनच शिकलो. रूम मधून बाहेर आलो आणि सरळ खाली टपरीवर चहा प्यायला एकटाच गेलो. अर्धा कटिंग चहा हातात घेऊन मी जमीनीकडे नजर खिळवून बसलेलो. अप्रेजल बोंबललय हे क्लीयर दिसत होतं. 
‘टेन्शन घेऊ नकोस मित्रा, आपण करू सगळं नीट.’ एका हातात सिग्रेट आणि दुसर्या हातात मशीनची कॉफी घेऊन नाम्या शेजारी आला होता.
पुढचे पंधरा दिवस आणि रात्र कसे गेले समजलंच नाही. काम दनादन सुरू झालं आणि हाईट म्हणजे द प्रोजेक्ट वेन्ट परफेक्ट. क्लायंटची कौतुकास्पद मेल सुद्धा आली आणि वर त्याचा कडून नवा प्रोजेक्ट सुद्धा आला. पी.एम. नी झकास पार्टी वगैरे दिली. नाम्या एकदम हीरो झाला. आम्ही सगळ्या पोरांनी त्या रात्री कुलाब्याला एका बार मध्ये नुस्ता दंगा केला. तिथून रात्री दीडला, बॅन्ड-स्टॅन्डला बाईक्सवर गेलो. नाम्या आणि मी नुसते हसत सुटलेलो. नाम्या पीऊन आणि मी न पीताच नशेत होतो. यशाचा नशा!
मध्यरात्री वाशीच्या रूमवर परत आलो आणि मी नाम्याला विचारलं, ‘गड्या तू पहिले दहा दिवस काहीच कसं नाही बोललास. तुझा प्लॅन जर तू पी.एम. ला सांगितला असतास तर शिव्या नसत्या बसल्या.’
‘शेत पेरन्या आधी जमिनीचा अंदाज तर घ्यावाच, पन त्या अदूगर नको असलेलं गवत उपटनं आनी जमीन साफ करनं जास्त गरजेचय. मी आधीच्या त्या डेटबेसवाल्याची घान, आधीचे तीन दिवस पाहिली, आनी मग सात दिवस साफ केली. यू शुड फश्ट श्टेयर याट द शी, बिफोर शेलिंग इन वाईल्ड वॉटर्स! म्हन्जी, वादळात नाव सोडन्या अदुगर समिंद्राकडं एकदा बघनं फार गरजेचं असतय गड्या!’ मी डोळे मोठे करून त्याच्याकडे पहातच राहिलो. ‘काय झालं असं पहायला?’ नाम्यानं विचारलं. 
‘मी फार मोठी गोष्ट शिकलो नाम्या आज.’
‘काय? माझं समिंद्राचं वाक्य ना? हा, मला पन त्ये लईच पटल्येलं. फार भारी आहे त्ये वाक्यं.’ नाम्या भुवया उंचावून मला सांगत होता.
‘ते नाही रे. कुणाच्या चेहेर्यावर कधी जायचं नाही हे शिकलो!’, माझा चेहेरा अ‍ॅज यूज्वल मिश्किल होत चाललेला मलाच जाणवत होता.
नाम्या हसत-हसतच म्हणाला ‘आयला राव सम्या, म्हन्जी मी चेहेर्यावरून खुळा वाटलो होय र तुला. तुम्ही पुनेकर कधी काय बोलाल सांगता येत नाही!’ 
दोघांनाही झोप येत नव्हती आणि दुसर्या दिवशी सुट्टी होती. रात्रीचे तीन वाजलेले. आम्ही सी.डी. लावली आणि ‘कॅच मी इफ यू कॅन’ पहात बसलो. सगळा सिनेमा मला सीन-बाय-सीन त्याला समजावून सांगावा लागलेला.
दोन-अडीच महिने उलटून गेलेले आणि सम्या-नाम्या ही जोडी पूर्ण कंपनीत फेमस झालेली. कुठेही जा, आम्ही एकत्र. काही दिवसांनी माझ्या रूम-मेटला ऑन-साईट मिळालं आणि तो अमेरीकेला गेला. नाम्या माझ्या सोबत लेगचंच शिफ्ट झाला. वी बिकेम बेस्ट फ्रेन्ड्स! त्याच्या सोबत कधीच काही टेन्शन नाही झालं. ना पैशाची घासा-घीस, ना सतत हिशोबाची कट-कट. आठवड्यातून त्याची एकदा दारू आणि थियेटर मधे आमचा एक पिक्चर. ‘पुनेकर असून बर्यापैकी पैसा खर्च करतोस ल्येका तू. एखाद-दिवशी तुमच्या महापौराला कळलं तर हाकलेल तुला शहराबाहेर. इट डजन्ट सूट यूवर पुनेकर पर्सन्यालिटी!’, ही असली वाक्य हा मला नेहेमी ऐकवायचा. स्वत: बुलडाना जिल्ह्यातल्या एका छोटाशा गावतला आहे हा.
मार्च ते मे, हे अप्रेझलचे महिने. जस्तीत-जास्त पगारवाढीपेक्षा, कंपनीला आणि मॅनेजमेन्टला जस्तीत-जास्त शिव्या घालण्याचे हे महिने. अप्रेझल-इंटरव्यूसाठी नाम्याला बोलावणं आलं. इंटरव्यूला आमचे पी.एम., डेटाबेसचे पी.एम. आणि प्रोजेक्ट-लीड असे बसलेले. ह्या इंटरव्यूच्या मार्कांना रेटिंग असं म्हणतात. नाम्याचे मार्क उर्फ रेटींग आलं. अगदी बेस्ट मार्क्स आणि पगारवाढ घेऊन साहेब प्रमोट झाले. हे काही केल्या आमच्या प्रोजेक्ट-लीडला पटंत नव्हतं. मी नाम्याला विचारलं,
‘काय रे, आपला प्रोजेक्ट-लीड तुझ्यावर सतत खेकसत का असतो? तू नक्कीच अप्रेझल मध्ये तोंड फाडलं दिसतय.’
नाम्यानी चहाचा घोट घेतला आणि म्हणाला, ‘अबे ते च*** का नाही भडकनार! त्याचा अप्रेझल डेटा पाहिलाय मी. हातावर तम्बाखू ठेवालिये कंपनीनं त्याच्या, आणि तोंडाला चुना फासलाय पी.एम. नं. माझं अप्रेझल पाहून जळतंय तिचायला!’
‘पण नक्की झालं काय इंटरव्यू मध्ये?’
‘अबे मला आधी ह्यानं कमी मार्क दिले बरका. मी विचारलं, काऊ मुन? तर म्हनला कमुनिकेशन स्किल्स खूप वीक आहेत तुझ्या…’
नाम्याच्या इंटरव्यूचा किस्सा म्हटल्यावर दंगा असणार, मी चहाचा लास्ट घोट गटकला आणि पुढे ऐकू लागलो.
‘… तर मी म्हनालो, दोन मिनीट दे मी माझ्या सगळ्या ईमेल प्रिन्ट मारतो. जश्ट टेल मी व्हेर माय ग्रामर इज रॉन्ग. जश्ट टेल मी व्हेर द क्लायंट डिड नॉट अंडरश्ट्यान्ड माय ल्यान्गवेज…’
सिगरेटचा कश मारत नाम्या कंटीन्यूड, ‘… तर ते लीड मला म्हनलं, ते सगळं ठीक आहे पन तुझी वर्बल, म्हन्जी बोली भाषा, इम्प्रूव होनं गरजेचं आहे. मी म्हनालो, ते शक्य नाही. शेतातल्या मातीचा वास तर मार्केटच्या भाजीला सुद्धा येतो, तर माझ्या भाषेला का नसंल! दॅट इज हू आय याम! अ‍ॅन्ड इफ यू फील द्याट इज द प्रॉब्लेम देन द्याट इज यूवर प्रॉब्लेम, नॉट माईन. कमुनिकेशन इज अबाऊट पुटिंग फॉरवर्ड द मेसेग. त्यो मेसेज जर समजला, तर तू पन जिकला अन मी पन. झाली की ल्येका तुमच्याच म्यानेजमेन्टची ‘विन-विन’ सिचूवेशन. म्हनून चिडलय त्ये, कारन माझं कमुनिकेशन साहेबाला पटलं, ह्या ह*** ला नाय ना!  कॉनफिडन्स आणि ट्यालेन्ट महत्त्वाचं, काय! अ‍ॅन्ड प्लस आय अ‍ॅम ट्राईंग टू इम्प्रूव.’

हे चालू असतानाच मी हसून-हसून वेडा होत होतो. धिस मॅन इज सो सिम्पल येट सो इफेक्टिव अ‍ॅन्ड डायनॅमिक! काय लागतं अजून काम करायला! अ‍ॅन्ड येस, ही वॉज इनडीड इम्प्रूविंग.

नाम्याबद्दल अजून सांगण्यासारखे खूप किस्से आहेत यार, पण जरा निवांत बोलूया.
(क्रमश:)
आवड-नावड कमेन्ट्स मध्ये कळवा यार नक्की! नुसत्या गोड बोलण्याने प्रगती आणि सुधारणा होत नसते. राईटिंग इज अ‍ॅन आर्ट विच डेफिनेटली नीड्स मोटीवेशन, बट विथ शूअर स्कोप फॉर इम्प्रूवमेन्ट. तर जरूर सांगा.

भारतियांना अभिमान वाटावे असे काही…

       काही दिवसांपूर्वी एका हिंदूत्ववादी मित्राने एक ढकलपत्र (फॉरवर्ड केलेली ई-मेल) पाठवले. नेहेमीप्रमाणे त्यात भारतीय संस्कृतीची तोंड फाटेस्तोवर स्तुती केलेली होती, पण त्यातील एकदोन अपवाद सोडता बाकीचे सर्व मुद्दे सपशेल चुकीचे होते तर काहिं मध्ये पराचा कावळा केलेला होता, यापुर्वी आलेल्या तसल्या (भारतीय संस्कृती अभिमानी) मेल सारखीच ही मेल देखील उडवून लावली, पण नंतर मी विचारात पडलो. भारतीयांना

२६ जानेवारी वा १५ ऑगष्ट ला आपण काय करता ???

आपण स्वतंत्र भारताचे नागरीक, आपण २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

आपण त्या दिवशी काय करतो, कारण ते आपले राष्ट्रीय सण आहेत. आपण शाळेत असताना या दोन्ही दिवशी फार उत्साहात असायचो, एक दिवस आधी आपण त्याची तयारी करायचो, शाळेच्या गणवेश तयार करणे, बुटपॉलीश करणे वगैरे तयारी करायचो आणि त्यादिवशी उत्साहाने सकाळीच शाळेत जायचो, झेंडावंदनाला आभिमानाने उपस्थीत रहायचो, प्रभातफेरीमध्ये सहभागी होवुन “एक रुपया चांदीचा, भारत देश गांधीचा”, “एक दोन तिन चार, भारतमातेचा जयजयकार” अशा घोषना द्यायचो, त्या दिवशी देशपेमात न्हाहुन निघायचो, पण आत्ता मोठ्ठे झाल्यावर आपण त्या दिवशी नेमके काय करतो ?

नोकरदार वर्ग त्यांच्या कार्यालयात झेंडावंदनाला जातात पण इतर नागरीक झेंडावंदनाला जातात का ? ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सार्वजनीक झेंडावंदन होते तेथे आपण उपस्थीत राहतो का ? शाळा, महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर किती जण न चुकता झेंडावंदनाला उपस्थीत असतात ?

आपण त्या दिवशी हे मात्र करु शकतो, झेंडावंदनाला उपस्थीत राहु शकतो, प्लास्टीकचे झेंडे वापरला बंदी असताना देखील ते झेंडे सर्रास विकायला येतात, लहान मुले ते विकत घेतात, परंतु काही वेळा ते रस्त्यावर टाकुन देतात, असे रस्त्यावर पडलेले झेंडे आपण गोळा करु शकतो, त्यामुळे झेंडे पायदळी तुडवले जाणार नाहीत ,झेंड्यांचा होणारा अपमान तरी टळेल.

वर्षभर नाही तरी १५ ऑगष्ट, २६ जानेवारी, १ मे यादिवशी आपल्या देशभक्तीला उधान आलेले असते, यावेळी किमान एवढे जरी केले तरी आपल्याला समाधान लाभेल असे वाटते .

घोडं गंगेत न्हालं

पाच-सहा वर्ष झाली या गोष्टीला. मी नुकताच केमिकल फिल्ड मधली उमेदवारी सोडून काही तरी भन्नाट करायच्या इराद्यान आणि कोल्हापूरच्या ओढीन कोल्हापुरला परत आलो होतो. घरचे दाखवत नसले तरी मनातून खार खाऊन होते; आता काय दिव लावतय कुणास ठाऊक? असा सगळ्यांचा सूर 
दिप्या माझा मित्र. अगदी खास; इंजिनिरिंगच्या पहिल्या वर्षापासूनचा त्यामुळ कॉलेज पेक्षा जास्त वेळ आमी तेच्याच रूमवर पडीक असायचो. आमच्या बहुतेक सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर Activities’ तिथच चालायच्या. दिप्या आमच्या सगळ्यात हुशार आणि होतकरू त्यामुळ आमच्या घरातल्यांचा पण कौतुकाचा. पन्हाळा तालुक्यातलं तस थोडं दुर्गम भागातल तेच गाव. त्यामुळ वागण्यात अस्सल गावरानपणा. बऱ्याचदा त्याच्या गावातल्या गमती-जमती, राजकारणाच्या गप्पा ऐकताना मज्जा यायची. दरवर्षी म्हाईला न चुकता दिप्याच्या गावाला जाऊन रावण रस्सा हाणून यायचो. कधी-कधी सेंटी झाला कि त्याच्या गावातल्या तीच्या बद्दल बोलायचा. ती त्याच्याच गावातली; आणि तशी नात्यातलीपण; पण दोन्ही घरात राजकारणामुळ वितुष्ट आलेलं. तरीही त्यातूनच चिठ्या, कधी एखादा फोन असं याचं प्रेमपण बहरत चाललेलं.
इंजीनीरिंगच्या फायनल ईयर ला जाईपर्यंत याचं सुद्धा फायनल झालं. पण घरात सांगणार कोण? कारण दोन्ही कडून प्रॉब्लेम. परीक्षेचा निकाल लागला तसे सगळेजण आपापल्या वाटेन निघाले; आमी xxx  करायला कोकणात गेलो तर दिप्या पुण्याला. असच वर्ष उलटल. दिप्यान जॉब करता करता आकुर्डीच्या डी वाय पाटील कॉलेजात एम. ई. ला Admission घेतलेलं.
मी कोकणातली नोकरी सोडली आणि तसाच पुढ पुण्याला जाऊन दिप्याची गाठ घेतली. २ दिवस मुक्काम केला आणि मगच कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आलेल्या चौथ्याच दिवशी दिप्याचा मला फोन.
आरे; तिच्या घरात कळलंय; तिच्या चुलत्याचा मला फोन आलता. परत भागात दिसलास तर पाय तोडून ठेवीन म्हणालाय…..
मी म्हटल आरे पण कळाल कसं काय? तुझी परीक्षा झाल्या शिवाय सांगायचं नाही अस ठरलं होत ना?
व्हय रे; पण तिच्या घरची तीचं लगीन ठरवाल्यात; म्हणून तीनं सांगून टाकल सगळ.
असू दे आता; लगीच काय चार दिवसात लगीन होत नाही; तुझी परीक्षा ४-५ दिवसात संपतीया; मग कोल्हापूरला ये; आपण ठरवू काय करायचं ते. लई काय टेन्शन घेऊ नको. अभ्यासाकड लक्ष दे मी अगदी मोठया तोंडान चार गोष्टी सांगितल्या.
दिप्याची परीक्षा होऊन ३-४ दिवस झाले तरी दिप्याचा पत्ता नाही. मी म्हटलं भानगड तरी काय? असा विचार करतानाच दिप्या दत्त म्हणून दारात हजर; बरोबर संदीपदा (संदीपदा आमच्या बरोबरीचाच; आमी त्याला संदयाच म्हणायचो पण या प्रसंगानंतर तो आमच्यासाठी संदीपदा झाला. आता कसा? ते पुढ बघू.)
मी म्हटलं दिप्या काय झाल रे? कुठाय पत्ता तुझा?
दिप्या म्हणला हे बघ सगळ ठरवूनच आलोय; आत्ताच येताना आर. एल. मधन एक ग्रामच मंगळसूत्रपण घेऊन आलोय.
ह्या गुरुवारी रात्री; तू, मी, दिप्या आणि वैनी (दिप्याची ती) आपण सगळी गाडीन पहिल्यांदा रत्नागिरीला जायचं आणि तिथन मुंबईला; त्यामूळ कुणाला लगेच शंका येणार नाही. मी गाडी पण ठरवून आलोय. जिप्सी. GAS-KIT हाय; त्यामुळ जास्त खर्च पण यायचा नाही. इति संदीपदा.
माझ्या डोक्यात जाळ. मी म्हटलं, अरे xxxच्यानो. तुम्ही पोरगी पळवून न्ह्यायच प्लानिंग केलायासा का? ट्रीपला जायचं. आर जरा तरी काय डोक्याचा भाग?
म्हण GAS-KIT ची गाडी हाय; आरं एकवेळ गाडीत पोरगी हाय म्हणून पकडणार नाहीत पण GAS-KIT ची गाडी हाय म्हणूनच पकडतील आपल्याला रस्त्यात
आणि मुंबईला जाऊन काय xxxणार हाईसा? काय करणार मुंबईला जाऊन?
हे बघ तू लई शाणपणा करू नकोस, तिथं जाऊन रावल्या कड राहायचं. मग बघू पुढ काय करायचं ते इति दिप्या.
हे बघ दिप्या; ह्या सगळ्या काय खायच्या गोष्टी नाहीत; जरा सिरीयसली विचार कर, पोरगी घरात नाही म्हटल्यावर सगळ्या गावात बोंबाबोंब हुणार, तिचा बाबा नाही म्हटलं तरी पोलीस कम्प्लेंट करणारच. तुझ्या घरच्यांना किती त्रास हुईल हे कळतं का तुला?
आणि चुकून बिकून जरी पोरगी आईन टायमाला पलटली तर नुसता तूझाच नाही तर तुझ्याबरोबरच आमचाबी पेपरला फोटो ईल प्रमुख आरोपी आणि त्याचे साथीदार म्हणून
हे बघ; मी पोलिसांच्या माराला भीत नाही; पण बदनामी झाली तर ते आमच्या घरात पटणार नाही त्यात आधीच मी नोकरी सोडून आलोय मी माझी बाजू सावरायचा प्रयत्न केला.  
पुढ म्हणालो अरे तुझ्या घरच्यांचा पण जरा विचार कर. किती कष्टातन त्यांनी तुला शिकीवलय. हे बघ आपण आस करू मी जाऊन डायरेक्ट तिच्या बापाला जाऊन भेटतो आणि सगळ बरोबर बोलतो; तू चांगला शिकलेला हाईस; तुझ्यासारख पोरग त्यास्नी शोधून सुद्धा मिळणार नाही.
आसल काय हुईत नसत दिप्या.
अरे पण बोलून बघायला काय हरकत हाय, पायजे तर आपण तुमच्या दादाला बोलून बघू, बघुया त्यो काय मार्ग काढतोय का ते.
त्यो काय ह्यात पडणार नाही; वरन मलाच पायताणान हाणून घराच्या भाईर काढल
दिप्यान माझे सगळे मुद्दे खोडून काढले; शेवटी कसं-बस् मी त्याला म्हटलं; दोन दिवस थंड डोक्यान तुझ्या घराचा; तिच्या घरचा, सगळ्यांचा जरा विचार कर, मग बघू आपण काय जमतं ते आस म्हणून त्या दोघास्नी घालवून दिलं.
दोन दिवसान दिप्या सांच्यालाच आमच्या घरात हजर. मग मी एक शक्कल काढली; माझ्या वळखीचा शिवाजी पेठत एक वकील हुता; त्याला केला फोन आणि म्हटलं आशान-आस हाय आणि तुम्ही जरा आमच्या मित्राला समजून सांगा.
जरावेळान दिप्याला घेऊन त्या वकिलाकड गेलो; वकिलान त्याच्या परीन दिप्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, दिप्यावर बऱ्यापैकी परिणाम झाल्यागत वाटलं. याच खुशीत आमी
रंकाळ्यावर गेलो; दाबून भेळ आणि आईस्क्रीम खाल्ल आणि परत घरला आलो.
त्यादिवाशिच्याला दिप्या आमच्याकडच झोपायला हुता. रात्री दिप्या परत सेंटी झाला आणि मूळ पदावर आला, मग मला बी काय बोलता येईना. सगळच अवघड हून बसलेलं. रातभर माझ्या डोळ्याला डोळा नाही आणि दिप्या निवांत घोरत हुता/
सकाळी उठून दिप्या मला म्हणतो कसा; चल मी निघतो आता; मला बरीच कामं हाईत
मी म्हटलं कसली रे काम काढलाईस आत्ता?
विद्यापीठात जाऊन जरा प्रोजेक्टची चवकशी करायची हाय; झालच तर एक मित्राच्या काकीला टायफाईड झालाय; तिला बघाय जायचं हाय
मी डोक्याला हात लावला आयला हेच्या असल्या भानगडीमूळ माझ्या तोंडच पाणी पळालय, टेन्शनमूळ जेवण गोड लागना आणि हेला तर काय नाहीच, निवांत आपली कसलीबी काम सुचाय लागल्यात
मी म्हटलं बर बाबा!! काय हुतय ते सांग मला, फोन करून
यावर दिप्या म्हणतो कसा आता आणि काय हुतय; संदयान सांगितलेला प्लान फिक्स हाय; तू तयार रहा म्हणजे झाल
दिप्या जाता जाता माझ्या पायात साप सोडून गेला. मी घाबरत घाबरत त्या दिवसाची वाट बघू लागलो, मला वाटलं आदी-मधी निदान प्लानिंग फिक्स करायला तरी मला फोन येईल. पण काहीच खबर-बात लागेना. आणि शेवटी तो दिवस उजाडला, दिवसभर मी फोन भवतीच घुटमाळलो; फोन ची रिंग वाजली कि दचकून बघायचो.
संध्याकाळी असाच कुठतरी बाहेर गेलतो; परत आल्यावर समजल कि दिप्याचा दोन वेळा फोन येऊन गेला. परत फोन करावा म्हटलं तर आयला हेच्या मोबाईलला रेंज नाही; घरला फोन लावला तर ह्यो घरात नाही. मला काय कराव हेच कळना. म्हटलं आयला प्लान तर आज रात्रीचाच हुता!! आता काय कराव? का जाव डायरेक्ट दिप्याच्या गावाला?
पण डेरिंग हुईना, आणि जाताना घरात तरी काय सांगायचं? घरातल्यांना तशी शंका आलातीच काय तरी भानगड चाललीय ती.
तशीच भीत भीत रात्र काढली; रात्री फोन जवळच झोपलो; म्हटलं कधी बी फोन येईल आणि आपल्याला जायला लागल. रात्रभर वाईट वाईट स्वप्नांनी जाग व्हायची; कधी आमी सगळी गाडीत बसायच्या अगोदरच पोरीच्या बाबाला गावलोय असं दिसायचं तर कधी पोलीस ठाण्यात बदया मार खाताना दिसायचो.
कशी-बशी सकाळ झाली. मला वाटलं बहुतेक दिप्याला माझ पटलय वाटत; म्हणूनच प्लान रहित केला असल. थोड्यावेळान आमच्या घरचे सगळे कामा-धंद्याला बाहेर पडले; तसा मी एकटाच सुशिक्षित बेकार घरी.
बसलो परत फोनची राखण करत. आत्ता फोन वाजतोय का मग वाजतोय.
तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी भीत-भीतच दरवाजा उघडला. बघतोय तर काय दिप्याचा दादा दोन पोरास्नी घेऊन आमच्या घरला. मी मनातल्या मनात म्हटल आता काय खर नाही, तरी बर घरातली सगळी बाहेर गेल्यात; नाही तर इथच झाली असती बिन-पाण्याची.
पण मग उसन आवसान आणून म्हणालो काय हो दादा एकदम अचानक? आणि घर कसं काय सापडलं तुम्हाला?
यावर दिप्याचा दादा म्हणतो कसा हम्म त्यात काय अवघड हाय? कोण बी कुठबी असलं तरी आपण शोधून काढू शकतोय. समजलं काय?
हेच्या वर मी काही न समाजाल्यागत करून त्यांना घरात बोलावलं. चहा करून दिला, बाहेर ह्या तिघांच काही तरी खुस-पाट चालू होत. बहुतेक मी दिप्याचा एकदम खास असल्यामुळ मी घरात सापडणार नाही; तेच्या बरोबरच गेलेलो असणार असा त्यांचा अंदाज होता, आणि मला घरात बघून दिप्याला शोधायला आलेले ते एकदम गोंधळून गेले होते.
तोच धागा पकडून मी म्हटलं कसं काय येण केल म्हणायचं?
म्हणजे तुला माहित नाही काय? तुझा त्यो दोस्त गेला कि त्या पोरीला घेऊन पळून
मी पण अंदाज काढायच्या दृष्टिन बोललो आस्सं? कधी? मला काय माहित नाही. अहो असं काय करू नको जरा घरच्यांचा विचार कर, किती कष्टात शिकीवलय तुला त्यांनी; असं मी त्याला समजून सांगितलं तर माझ्यावरच चिडून गेलाय त्यो. मला ह्यातल काहीच माहित नाही
हि मात्रा बरोबर लागू पडली. दादा म्हटला आयला मग गेल कुठ आसल ह्ये? आणि असल काय करायच्या अगोदर आम्हाला सांगितलं असत तर आम्हीच करून दिल असत लगीन, काय पावण-पै आपल्यात बसणारेच हुते.
बर ह्यो संदीप कोण? तेच्या घरला घेऊन चल आम्हाला
मी मनातन चरकलो; म्हणजे ह्यास्नी सुगावा लागलाय तर!!! पण मग लगेच सावरून म्हणालो संदीप आमच्या बरोबरच होता कॉलेजला, मला माहित हाय त्यो, पण तेच घर काय मला माहित नाहि.
बर मग राव्ल्याचा तर फोन नंबर दे, तेच्याकड तर गेलाय का बघू.
आता राव्ल्याचा फोन नंबर माझ्याकड नाही हि थाप काय दादाला पचली नसती म्हणून नंबर द्यायच्या ऐवजी मीच डायरेक्ट राव्ल्याला फोन लावला आणि बोलता बोलता त्याला अंदाज दिला कि दिप्याचा दादा माझ्या समोर आहे ते.
पण राव्ल्या कसला महाकलंदर!! मला म्हटला काय सांगतईस?? अरे त्या xxxच्या दिप्यान मला जरा तर काय सांगायचं का नाही?
मी कन्फ्यूज. मी तसाच फोन दादाच्या हातात दिला, दादाच्या तोंडावरच दिप्याला अस्सल कोल्हापूरी शिव्या देऊन राव्ल्यान दादाला पण तेच सांगितलं आणि म्हणाला चुकून बिकून जरी माझ्याकड आलीत नाही तर मला फोन केला तर पयल्यांदा तुमास्नी कळीवतो.
आता मी आणि दिप्याचा दादा दोघपण कन्फ्यूज, खरच हे दिप्या कुठ गेलं आसल?
परत दिप्याचा फोन-बिन आला तर तेला गावात पाय ठेवू नको म्हणून सांगितलंय म्हणून सांग; असा दम देऊन दिप्याचा दादा निघून गेला.
मला प्रश्न पडला हे राव्ल्या कड पण गेल्याल नाही मग नक्की गेलं कुठ आसल?
गाडी काढली आणि तसाच संदिपदांच्या घरी गेलो. संदीपदा म्हणाले काय काळजी करू नकोस मीच त्या दोघास्नी पुण्यापर्यंत पाठवून देवून आलोय.
मग ती पुढ कुठ जाणार हाईत? मी प्रश्न केला.
अरे ती आतापर्यंत राव्ल्याकड पोचलीपण असतील मुंबईला. आता राहू देत तिथं २-४ दिवस मग बघू काय होतं ते.(धन्य ते संदीपदा आणि धन्य त्याचं प्लानिंग)
मी मग निर्धास्त होऊन परत आलो. ४ दिवसांनी संध्याकाळी दिप्याचा फोन,
मला म्हणतोय कुठ हाईस? मी म्हटलं xxxच्या; पळून गेलास तू आणि वर मलाच विचारतोस व्हय?
मला म्हटला हे बघ आत्ता मी कोल्हापुरातच हाय; कुठ हाय ते उद्या सांगतो.
पण उद्या तू रेशन कार्ड आणि तुझा फोटो घेऊन तयार रहा. मी बर म्हटलं.
दुसरेदिवशी उजडायला संदिपदांचा फोन सांगितल्याप्रमाण तयार होऊन तासाभरात ताराबाई पार्कात आमुक-आमुक ठिकाणी ये. नाही तर घरात येऊन मारीन मला काय कळना. पण जास्त खोलात न जाता मी आपला ठरलेल्या ठिकाणी पोचलो. बघतोय तर एका नव्या घरात ह्या नवीन जोडीची रात्रीपुरती सोय केल्याली.
पुढची चौकशी केल्यावर मला अस कळलं कि गुरुवारी रात्री ठरल्याप्रमाण संदीपदा ठरवलेली गाडी घेऊन दिप्याच्या गावाबाहेर एक धरण आहे तिथं जाऊन थांबले. रात्री बारा वाजता दिप्या गावातल्याच एक दोस्ताला घेऊन बाहेर पडला; बाईक काढली आणि तिच्या गल्लीच्या कोपऱ्यावर आला. आधीच ठरल्याप्रमाणे दोन वेळा होर्न वाजवून इशारा दिला, पण ती काय बाहेर आली नाही. इकडं दिप्याची घालमेल. मग अस ठरलं कि तिच्या घरावरन पुढ जाऊन पुढच्या कोपऱ्यावरून परत यायचं. बाईक कोपऱ्यावर वळवून परत आणली; तसा तिच्या घराचा दरवाजा उघडला, आणि ती बाहेर आली. तशी तिला गाडी वर बसवून दिप्या आणि त्याचा दोस्त आयंशीच्या स्पीडन धरणावर पोचले.
संदीपदा तिथं वाटच बघत होते. बाईक तीथच धरणाच्या बाजूला लावली आणि सगळी मंडळी गाडीत बसून तराट कोल्हापूर पार करून पुण्याच्या दिशेन सुटली. पुण्याला पोचायला सकाळी सहा वाजले, तिथं दिप्याच्या आणी एक मित्राच्या रूमवर जाऊन कपडे-बिपडे बदलले आणि नव्या जोडीला मुंबईच्या गाडीत बसवून संदीपदा आणि दिप्याचा गावातला दोस्त माघारी कोल्हापूरला फिरले.
दिप्या आणि ती मुंबईला रावल्याकड पोचले, संदीपदा कोल्हापूरला पोचले तेव्हा दिप्याचा दादा माझ्या घरी पोचला होता, पण येता येता त्याला धरणावर उभी केलेली बाईक दिसली आणि त्याला क्लू मिळाला कि गावातलपण कुणीतरी यात सामील आहे.
तो पर्यंत रावल्यान पुढाकार घेऊन मुंबईत कुठल्यातरी देवळात या दोघांच लगीन लावून दिल पण कायदेशीर अस काहीच झाल न्हवत. इकडे दिप्याच्या दादाने दिप्याचा गावातला दोस्त पकडला आणि तेच्याकडन सगळ वदवून घेतलं. पण आता करायचं काय?
इथे मग संदिपदांची मध्यस्थी कामी आली, त्यांनी कशी-बशी दिप्याच्या दादाची समजूत काढली. पोरीच्या बापान म्हटल्याप्रमाण दिप्याच्या सगळ्या घरा-दारावर केस केलतीच.
त्यामुळ कायतरी कायदेशीर मार्ग काढण गरजेच होत.
आता पुढ काय होतं ते बघू.
मग मी, आदरणीय संदीपदा, दिप्या, वैनिसाहेब, आणि गाडीचा ड्रायव्हर अशी सगळीजण पोचलो भूयाला. (नशीब गाडीला GAS-KIT नव्हत) दिप्याच्या दादाची इथली सासुरवाडी. मी मार खायच्या तयारीन खाली उतरलो. मला बघीतल तस दिप्याचा दादा चकित झाला आणि मला रागान म्हणाला आयला बाराचा दिसतोयस कि? आमाला त्यादिवशी थुका लावून पाठीवलस. आणि आता दिप्या बरोबरच हजर!!! तरी मला तुझी शंका आलातीच.
मी म्हटल दादा इथं रस्त्यावर काय नको; तुमी आधी घरात चला!! घरात जाऊन दिप्याच्या दादाला सगळ बयाजवार समजून सांगितलं. दिप्या पण म्हणला दादा!! हेला काय माहित नाही तो आता आमच्याबरोबर आलाय
तसा दिप्याचा दादा खवळला; म्हणला तू तोंडातन एक शब्द बी काढू नकोस!! तुझ्या शाणपणामूळ सगळी बोंब झालीया. उगीच तुला शिकीवला, शेतात नांगर धराय लावला असता म्हणजे हे दिवस दिसलं नसत
वातावरण तंग झालं तसा संदिपदानी होल्ड घेतला. दिप्याच्या दादाला घेऊन भाईर गेले. मी तिथच बसलो दिप्याजवळ. थोड्यावेळान दोघबी परत आले. दिप्याच्या दादाचा राग थंड झालेला दिसला.
मग मी आणि दिप्याचा दादा भाईर पडलो आणि दिप्याच्या मापाची नवीन कापड आणि नव्या नवरीला साडी घेऊन आलो. तवर नवरा-नवरीची आंघोळ, कसली तरी पूजा-बिजा आशी इथली सगळी तयारी झालती.
मग आमी सगळीजण नवरा-नवरीला घेऊन बाहेर पडलो आणि थेट मधल्या रस्त्यान गारगोटीला रजिस्ट्रार च्या ऑफिसात पोचलो. आदरणीय संदिपदानी इथं सुध्धा सेटिंग लावून ठेवल्याली. पोरीच्या बापानं आईन टायमाला काय घोळ घालू नये म्हणून दिप्याच्या दादाच्या सासऱ्यान तिथली गारगोटीतली देसायाची पोरं आजू बाजूला पेरून ठेवल्याली जेणेकरून काय झालच तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत कुणाला रजिस्ट्रार ऑफिस पर्यंत पोहोचता येऊ नये.
संदिपदानी केलेल्या सेटिंगमूळ लगीन न होताच आमी लगीन झाल्याच रजिस्टर बिन-बोभाट करून टाकल. नाही म्हणायला आईन टायमाला डमी भटजी शोधायला थोडी पळा-पळ झाली तेवढीच. मग पोरा पोरीच्या आणि दोन साक्षीदारांच्या सह्या घेऊन; पोरा-पोरीन तिथच एकमेकःच्या गळ्यात हर घातले आणि झाल लगीन. आता ह्या सगळ्या लडतरीत गारगोटीतच वाजले आठ.
मग तिथच देसाई सरांच्या घरात त्यांचे शिकारीचे किस्से ऐकत-ऐकत चा-पाण्याचा कार्यक्रम झाला; नव्या नवरीचा हळदी-कुंकवाचा वगैरे कार्यक्रम करून आमची वरात रात्री दहा वाजता दिप्याच्या गावाला निघाली.
गाडीच्या मधल्या शीटवर दिप्या आपल्या नव्या बायकोबरोबर अगदी दाबात बसला होता; शेजारी मी, म्हटलं आयला; नंबर मारलास बाबा!! दिप्या नुसताच हसला. मी काय म्हणतोय हेच्याकड तेच लक्षच नव्हत त्यो आपल्या भावी संसाराची स्वप्न रंगवत बसला होता. हलत डुलत शेवटी बाराच्या ठोक्याला आमची गाडी दिप्याच्या दारात पोचली. सगळं गाव सामसूम, दिप्याच्या दारात तेवढा एक बल लावलेला. मला आपली धाकधूक. गाडीचा आवाज येताच घराचा दरवाजा उघडला; दिप्याची वैनी आरती घेऊन भाईर आली; नव्या जोडीला ओवाळून घरात घेतलं. आमी सुध्धा तेंच्या मागन घरात गेलो; पुढच्या सोप्यात दिप्याचे वडील आणि भावकितली दोन माणस बसली होती; तेनी आमच्या कड चक्क दुर्लक्ष केलं आता मलाच कसातरी वाटाय लागल होत; आतल्या अंगाला कणगी शेजारी दिप्याची आई वळकट घेऊन झोपली होती, दिप्या जसा आईजवळ गेला तसा वाकळीतन मुस्मुस्न्याचा आवाज येऊ लागला. आमच्या गारगोटीतल्या पराक्रमान मी जो हरखून गेलो होतो तो दिप्याच्या घरातल्या वातावरणामुळ पार भुईला आलो. दिप्या तासभर आईच्या मिन्त्या करत बसल होतं, नवी नवरी बावरून कोपरयात आसव गाळत बसली होती. याच घरात कॉलेजला असताना दिप्याचे मित्र म्हणून आमच जे कौतुक व्हायचं त्याचा आज लवशेष हि नव्हता. आमच्या दिप्याच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस असताना सुध्धा घरात नुसती भयाण शांतता पसरली होती. मला तिथं बसण अगदी असह्य झालं होत.
दिप्याच्या वैणीने जेवणासाठी हाक मारली; शिरा,मसाले भात, बटाट्याची भाजी आणि कुरुड्या पापड असा आमच्या दिप्याच्या लग्नाच्या जेवणाचा बेत होता. पुरुष मंडळी जेवायला बसली, आईला समजावण्याचा प्रयत्न करून करून दिप्या थकला आणि माझ्या शेजारी जेवायला येऊन बसला. मी आपला खाली मान घालून ताटात वाढल होत तेवढं संपवण्याच्या मार्गावर होतो; कुणीही कुणाशीच चकार शब्दही बोलत न्हवतं. तेवढ्यात आमचा दिप्या म्हणतो काय वैनी; पापड हाय जरा?   
आता मात्र माझ्याच्यान रहावल नाही मी त्याला डायरेक्ट म्हणालो आरे दिप्या; लाज कि जरा! कुठ काय पराक्रम करून आलाईस व्हय?? यावर दिप्याच्या वैणीन हं; असुदे लाजायला काय पोरगी हाय व्हय? असं म्हणत सावरून घेतलं. मी आपला मनात विचार करत बसलो कुठल्या मातीची आहेत हि माणसं? एवढ्या मोठ्या प्रसंगात सुध्धा हे सगळे एवढे निवांत कसे?
सगळ्यांची जेवण-बिवण झाल्यावर संदीपदा मला म्हणाले चला आता आपलं काम संपल निघूया आपण मी म्हटलं एवढ्या रात्री? सकाळी जाऊ कि शिस्तीत.
हं? तुला काय बाबा मला काम हाईत. संदिपदांच्या या बोलण्यावर मी काय उत्तर देणार. शेवटी काही झालं तरी मी सुशिक्षीत बेकार.दिप्याला जवळ बोलवून चार गोष्टी सांगितल्या जरा सबुरीन घ्यायला सांगितलं आणि बसलो गाडीत जाऊन.
तासाभरात गाडी कोल्हापूरच्या जवळ येऊन पोचली; आता कोल्हापुरात एन्ट्री करणार एवढ्यात शिवाजी पुलावर जकात नाक्याशेजारी आमची गाडी पोलिसांनी पकडली. नुसती पकडलीच नाही तर गाडीची आणि आमची पूर्ण झडती घेतली. म्हणाले रात्रीच्या गोव्याकडन येणाऱ्या गाड्या चेक करायला लागत्यात; नको त्यो माल असतो एखादेवेळी गाडीत. यावर पोलिसांना काय तरी थातूर मातूर उत्तरं देऊन आम्ही सटकलो, पण पुढ आल्यावर संदिपदांना म्हणालो
काय संदीपदा; त्यादिवशीपण अशीच गाडी चेक केली असती तर? संदीपदा उत्तरादाखल नुसतेच हसले. साल्याचं नशीब बघा कोल्हापूरचे दोन आणि पुण्यापर्यन्तचे चार अरे सहा नाके असताना सुध्धा हे लोक सुखरूप मुंबईपर्यंत पोहोचले; चुकून-बिकून जरी एखाद्या ठिकाणी कुणाला शंका आली असती तर???
असो. शेवटी आमच्या दिप्याच गंगेत घोडं न्हालं. सासऱ्यान केस मग घेतली, दोन्ही घरातला वाद मिटला. आज आमचा दिप्या दोन पोरांचा बाप झालाय. पुण्यात चांगल्या कंपनीत नोकरी करतोय. लग्नाअगोदर सासऱ्याला शिव्या घालणाऱ्या आमच्या दिप्याला आज सासऱ्याचा एकेरी उल्लेख केला तरी आमच्या सारख्या दोस्तांचा राग येतो
(मग आता हि पोस्ट पब्लिश केल्यावर काय होतय कुणास ठाऊक) म्हणच हाय ना जेच तेला आणि गाढाव वज्जाला
या सगळ्या प्रसंगातन आमच्या राव्ल्याचा महाबिलंदरपणा अधोरेखित झाला. आमचे आदरणीय संदीपदा महनीय ठरले आणि आम्ही नुसतेच बोलघेवडे.
अशी हि आमच्या दिप्याच्या लग्नाची स्टोरी. काय मंडळी कशी काय वाटली तुम्हाला?
काय म्हणताय? नाही नाही, क्षमा करा पण आदरणीय संदिपदांचा पत्ता आणि फोन नंबर कुणालाही द्यायचा नाही अशी वरन ऑरडरच हाय आम्हाला  

युनिकोडचा वापर कसा कराल?

(आजकाल अनेकांना इंटरनेटवर खासकरून फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर मराठीत लिहिण्याची इच्छा असते. त्यासाठी मग बर्याचदा गूगल ट्रान्सलेटरचा उपयोग केला जातो. मात्र त्यातही अनेक अडचणी उद्भवतात. या सगळ्यावर जालीम उपाय म्हणजे युनिकोडचा वापर… अनेकांकडून याची विचारणा झाली होती. त्यासाठी गेल्या मराठी भाषा दिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) माझा “लोकसत्ता”मधील हा पूर्वप्रकाशित लेख येथे ब्लॉगवर टाकत आहे.)

कोणतीही भाषा टिकायची झाल्यास बदलत्या काळातील नवनवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे त्या भाषेला क्रमप्राप्त असते. याच अनुषंगाने आजच्या नव्या पिढीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनातील बहुतांश वेळ हा संगणकासमोर बसून कामकाज करण्यात किंवा सोशल नेटवर्किंग करण्यात जात असल्याचे दिसून येते. आणि नेमक्या याच मोक्याच्या माध्यमात इंग्रजीच्या तुलनेत मराठीची पीछेहाट झाल्याचे अपल्या निदर्शनास येईल. कारण संगणकावर इंग्रजीच्या मानाने मराठीची वापर हा नगण्यच आहे. आता यावर बऱ्याचदा संगणकावर मराठीत लिहिण्याची सोयच उपलब्ध नाही किंवा मराठीत लिहिणे खूप जिकिरीचे आहे, कोण तो मराठीचा टंक (फॉन्ट) आपल्या संगणकात उतरवून घेणार अशी नानाविध कारणे ऐकू येतात. मात्र खरं सांगायचं तर यात अजिबात तथ्य नाही. संगणकावर मराठी वापरासंबंधीचे लोकांमध्ये असलेले अज्ञान हेच मोठे दुर्दैव आहे. कारण मुळात संगणकावर मराठी वापरणे हे अतिशय सोपे असून त्यासाठी काही शोधाशोध करण्याची किंवा कोणताही टंक उतरवून घेण्याची गरज नाही. आपल्यापैकी काही मराठी भाषा प्रेमी सध्या उपलब्ध असलेल्या विविध टंकांचा उपयोग करून मराठीत मजकूर लिहितही असतील. मात्र अनेकवेळा हा मजकूर इतरांना पाठविल्यावर त्यांच्या संगणकावर तो विशिष्ट टंक उपलब्ध नसल्याने निव्वळ ठोकळेच दिसतात. मात्र या अडचणीवर देखील मात करणारा अत्यंत सोपा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे याची आपल्याला कल्पना नाही. संगणकावर अत्यंत सहजरीत्या मराठी व इतर अनेक स्थानिक भाषांचा वापर करता यावा यासाठी ‘युनिकोड’ ही संकेतप्रणाली आपल्या संगणकावर मुळातच अस्तित्वात असते. त्यासाठी कोणताही टंक आपल्या संगणकात उतरवून घेणे आवश्यक नाही. हे वाचल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला असेल. तसेच ही प्रणाली कशी वापरायची? त्याचा खर्च किती? असे अनेक प्रश्नही पडले असतील. तर अशा या ‘युनिकोड’च्या वापरासाठी कोणताही खर्च नसून ‘विंडोज’ कार्यकारी प्रणालीसोबत (operating system)) आपल्याला ती अगदी विनामूल्य मिळत असते. मात्र अनेकवेळा आप्लया संगणकात ती कार्यरत केलेली नसते. परंतु अवघ्या चुटकीसरशी आपण हे ‘युनिकोड’ कार्यरत करून संगणकावर इंग्रजीऐवजी मराठीत लिहू शकतो.
आपल्या संगणकावर ‘युनिकोड’ कार्यरत करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
१.Start- Contro panel- Regional & Language option या क्रमाने टिक करा (मार्क करा).
२. यानंतर एक चौकट येईल. चौकटीच्या वरच्या भागातील Language या पर्यायावर टिक करा.
३. ‘विंडोज एक्स्पी’ची चकती (सीडी) संगणकात टाका.
४. आता चौकटीच्या खालील भागातील install files for complex script and right-to-left languages (including Thai) हा पर्याय निवडा.
५. यानंतर apply आणि ‘ ok पर्यायांवर टिकटिकवा.
६. संगणक बंद करून पुन्हा सुरू करावा (रिस्टार्ट) अशी सूचना येईल. त्याप्रमाणे कृती करा.
७. तुमच्या संगणकावर ‘युनिकोड’ कार्यप्रणाली कार्यरत होईल.
यानंतर तुमचा कळफलक (की-बोर्ड) मराठीत करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
१. Start- Contro panel- Regional & Language option- Languages या क्रमाक्रमाने टिक करा.
२. चौकटीतीली details हा पर्याय निवडा.
३. यानंतर येणाऱ्या चौकटीतील add पर्यायावर टिक करा.
४. पुन्हा एक नवी चौकट येईल. यामध्ये add input language या पर्यायाखालील विविध भाषांच्या सूचीतून मराठी भाषा निवडा.
५. ok वर टिक करा.
६. याआधीच्या चौकटीतील apply आणि ok वर पण टिक करा.
७. आता तुमच्या संगणकाच्या तळपट्टीवर उजव्या बाजूस MA असे लिहिलेले दिसेल. त्याऐवजी EN असे दिसत असल्यास एकाच वेळी Alt आणि Shift या दोन्ही कळा दाबा. म्हणजे तेथे MA असे दिसेल. याचा अर्थ तुम्ही आता युनिकोडच्या माध्यमातून मराठीत लिहू शकता.
एकदा का तुम्ही ‘युनिकोड’ कार्यरत केले, की संगणकावरील संपूर्ण जग तुम्हाला मराठीत उपलब्ध होईल. याचा वापर करून तुम्ही मराठीत ई-टपाल (ई-मेल) पाठवू शकता, इंटरनेटवरील मराठीतील माहिती शोधू शकता, इतकंच काय तर आपल्या आवडत्या ऑर्कुट, फेसबुकवर सुद्धा मराठीतून गप्पा-गोष्टी करू शकता.
मग आता वाट कसली पाहताय? तडक उठा आणि कामाला लागा. आपल्या मातृभाषेविषयी अभिमान प्रक ट करण्यासाठी यापेक्षा उत्तम माध्यम शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे युनिकोड वापरा आता तुमचाही संगणक चालवा शुद्ध मराठी मध्ये..
युनिकोड वापरासंबंधीची विस्तृत माहिती marathi-vikas.blogspot.com तसेच यासारख्याच इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52259:2010-03-04-16-16-23&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81