लाजरी

प्रिय कोकिळेस ,

आवाज  तुझा  मधुर जरी ;
फांद्यांमध्ये लपतेस तरीही .
अशी कशी गं  तू  लाजरी ?
             
             – विश्वकुमार.  

देणगी

एवढं सुंदर नाक तुला

दिलं  देवानं याच साठी,
मुरडता यावं पाहून मला-
वा चष्म्याच्या टेकू साठी !
         – विश्वकुमार.  

’स्टार माझा’ स्पर्धा

आज महाभारत थोडे बाजूला ठेवावे म्हणतो. (एवीतेवी आता ते संपतच आले आहे!)
ठरल्याप्रमाणे रविवार दि. २५ डिसेंबरला ’स्टार माझा’च्या वरळी येथील स्टुडिओत स्पर्धेचा बक्षीससमारंभ पार पडला. सर्वच स्पर्धक उपस्थित राहिले नव्हते तरी उपस्थिति चांगली होती. माझ्या या ब्लॉगला बक्षीस असल्यामुळे मी उत्सुकतेने गेलो होतो. ’हे TV Channel चे शूटिंग म्हनजे काय असते रे भाऊ?’ अशी मुख्य उत्सुकता होती! कार्यक्रम मजेत पार पडला. बर्‍याच ब्लॉगलेखकांचा कमीजास्त परिचय झाला. अनेकांचे चेहेरे ब्लॉगांवर पाहिलेले होते. श्री. प्रमोद देवहि उपस्थित होते. त्यांचेशी अनेकवार बोललो होतो, ई-मेलची देवघेव झाली होती. त्याना प्रत्यक्ष भेटता आले. परीक्षकांशी गप्पा मारून त्यांचा दृष्टिकोन समजावून घेतां आला. श्री. प्रसन्न जोशी यानी नावाप्रमाणे प्रसन्नपणे कार्यक्रम नेटका घडवून आणला.
काही ब्लॉगलेखकानी आपाअपली प्रशस्तिपत्रे हौसेने ब्लॉगवर टाकलेली पाहिली तर म्हटले आपलेहि टाकूया! मला भेटवस्त म्हणून एक Speaker cum Mike मिळाला. तो म्हणे bluetooth वर चालतो! आता हे काय नवीन लचांड? माझ्याकडे त्यातला फोन किंवा इतर काही Gadget नाही. मग मला याचा काय उपयोग होणार असे वाटले. मग Manual वाचून पाहिले तेव्हा कळले कीं त्याचा साधा speaker म्हणूनहि उपयोग करतां येईल. मग सरळ Computerलाच जोडला आणि गाणे ऐकतां आले. म्हटले चला speaker तर speaker.
तेव्हा खालचे फोटो पहा.
प्र. के. फडणीसलाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असतं……….

आदर्श म्हणॆ लवासाला
तु किती लाखाचा
तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला
तु किती कोटीचा
एक घोटाळा म्हणे दुस-याला
काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
लाखाचा असो वा कोटीचा
तुमचे आमचे सेम असते

अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी जावे लागले, दोन केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झाली, एखाद्या क्रिकेट्पटुने खेळताना नवनवे उच्चांक प्रस्थापीत करावेत तसे नेत्यांनी नवनवीन घोटाळ्यांचे उच्चांक प्रस्थापीत केले.

सरत्या वर्षात महागाईने उच्चांक गाठला, पेट्रोलच्या भावात तब्बल सहा वेळा वाढ झाली, सामान्य माणसाचा जीव या महागाईत होरपळुन निघाला, कांद्याने सामान्य माणसाबरोबर सरकारच्या ही डोळ्यात पाणी आणले, सततच्या पावसाने शेतीमालावर खुप परिणाम झाला,

काही चांगले झाले असेलही परंतु २०१० ने जनतेला महागाई, भ्रष्टाचार आणि त्रास हेच जास्त प्रमाणात दिले.

१ रेड-बुल, ४ कार, १६ यार, ६०० कि.मी. आणि डर्बन. (…भाग १…)

लहानपणापासूनच आमच्या फॅमिलीला ट्रिपा काढायचा भारी शौक. एकतर, तुम्ही पुणेकर असाल तर आसपास हिंडण्याजोगे स्पॉट्स किती आहेत हे तुम्हाला सांगायलाच नको. अगदी लोकल, सारसबाग, संभाजी पार्क, कात्रज उद्यान, इथपासून ते थेट लोनावळा, माथेरान, ताम्हेणी घाट, अष्टविनायक, इत्यादी ही असली लांबलचक यादी तर पुण्यातलं शेंबडं पोर वयाच्या पाचव्या वर्षा पर्यंत उरकून घेतं. माझ्या आईला तर हिंडण्याचा भारीच उत्साह. तिला हिंडण्याचा, आणि बाबांना तिला हिंडवण्याचा. ‘आपण कुठेच कधी जात नाही की ओ! तुम्हीतर बाई कमालीचे निरुत्साही!’, ह्या ब्लॅकमेल्ड वाक्याच्या जोरावर अक्खा हिंदुस्तान पिंजून काढला आम्ही. खुद्द महाराष्ट्रातच महाराजांची प्रॉपर्टी इतकी आहे की सात जन्म देखील कमीच पडतील ती पालथी घालायला. ३०० हून अधिक गड बांधण्याची अथवा जिंकण्याची ताकद त्यांच्यात, आणि शक्य झालं तर ते पहाण्याची ताकद आमच्या मातोश्रीं मध्ये आहे. गडांसोबतच धरणं, हा प्रकार देखील महाराष्ट्रात मुबलक आहे. नुसत्या पुण्यालाच तर अनेक धरणांनी घेरलय; खडकवासला, पानशेत, कोयना, भुशी, मुळशी, भाटघर ही काही नावं चार-चौघात घेतली जरी, तरी आपण पुणेकर आहोत हे सिद्धं होतं. आईच्या हौशीखातर आम्ही ती देखील अनेकदा बघून आलोय. अहो पण एका लिमिट नंतर कंटाळा येतो ओ! एकतर उन्हाळ्याच्या सुट्टीत, भर दुपारच्या चांदण्यात गड सर करत हिंडायचं मला फार जिवावर यायचं. पण आई-बाबा मात्र एखाद्या सरनोबता सारखं, सरबत पाजंत मला हिंडवायचे. त्यात आईला बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर ह्यांनी ट्यूशन दिल्यामुळे प्रत्येक गडाचा इतिहास तिला थोडाफार लक्षात. रायगडावरचा किस्सा सांगतो बरका! तिथे एक गाईड आम्हाला रायगडावरच्या पुरातन बाजारपेठेबद्दल सांगत होता.

‘…आणि आता इथे बघा, ही आहे रायगडावरची बाजारपेठ. इथे तुम्हाला दिसतच असेल की सर्व दुकानं थोड्या उंचीवर आहेत. कारण असं, की समजा पूर आला तर दुकानातला माल वाहून जाऊ नये म्हणून.’

गाईड पेटला होता ओ! इतकी थाप बिंदास मारली त्यानं की आईचं डोकं झालं गरम.

Image: रायगड बाजारपेठ
त्या पोराला असला हासडला तिने ‘ए गप रे! वाट्टेल ते सांगतोयस की. रायगडावर कुठला पूर आणलास रे! पुर्वी लोकं घोड्यांवरून स्वारी करायचे. त्यांना खरेदी करताना घोड्यावरून खाली उतरायला लागू नये म्हणून ही उंची आहे दुकानांना. एक रुपया मिळणार नाही तुला, असल्या थापा मारल्या आहेस तू.’ 

एखाद्या काळ्या-कुट्टं माणसाला शरमेनं लाल झालेलं कधी पाहीलय का? त्या गाईड्ला चॉकलेटी होताना मी पाहिलय. तेवढ्यात एकही रुपया द्यायला लागू नये म्हणून अर्धे पुणेकर पसार. उरलेलं नॉन-पुणेकर मराठी पब्लिक कनफ्यूज होऊन तिथेच आईच्या तोंडाकडे बघत उभ राहिलं. शेवटी गाईडच निघून गेला.

आईला जशी बघायची, तशी बाबांना तिथली छापील महिती वाचायची आवड. बाय-फोकल चशम्याच्या खालच्या भिंगातून ते, मान आणि पाठ वाकवून गडांवरचे, मंदिरांमधले अर्धे धुरकट झालेले बोर्ड वाचत उभे रहातात.

पुढे जसा मोठा होत गेलो, तसं आईचा-बाबांचा हात सोडला आणि हातात स्टीयरींग आलं. मागे फॅमिली ऐवजी मित्र रीप्लेस झाले. महाराष्ट्राबाहेर पाऊल पडलं आणि ट्रिपा कंटीन्यू झाल्या. लग्नं झालं आणि आम्ही शिमला-कुलू-मनालीला  हनीमून साठी गेलो. काही महिन्यांनी दापोलीला सुद्धा बायको सोबत गेलो. थोडक्यात काय तर भ्रमंती चालू आहे.

सॉफ्ट्वेयर इंजिनीयरला नुसतं ‘ऑन-साईट’ म्हणा. प्रोजेक्ट-मॅनेजर पुढे बारक्या पोरासारखं ‘मला पण जायचं! मला पण जायचं!’ असं म्हणत, जमिनीवर पाय घासत बसू शकतो तो. ही मोठी ट्रिप आपल्याला पण मिळाली ना यार! आलो साऊथ-आफ्रीकेला. जोहॅनेसबर्गमधे गेले तीन महिने तळ ठोकलाय आपण.

‘क्लायंट जंगलातला आहे. त्याचा ड्रेस-कोड हा अशोक किंवा अंब्याच्या पानांचा, अथवा चित्त्याच्या कातड्याची चड्डी घातलेला आहे. हातात बांबूच्या बारक्या कांड्या घेऊन ते ऑफीसला येतात. आपला प्रॉग्रॅम चुकू नये म्हणून भाले आपल्या डोक्यावर ताणून धरलेले असतात. एखादा टेस्टर फार आडमुठेपणा करायला लागला की त्याला जिराफचं दूध काढायला लावतात. टीम-लीडनं डेड्लाईन मिस केली की त्याला त्या बांबूच्या कांडीमधून छोटे बाण मारले जातात. तो बेशुद्ध झाला की त्याला ऑस्ट्रिच मागे बांधून गावभर लोळंवलं जातं. लंच टाईम सिंहान बरोबर शेयर करावा लागतो.’ हे असलेच विचार, मी इथे आलोय म्हणल्यावर पब्लिकच्या मनात येत असावेत.
‘एस.ए. मध्ये काय आहे यार! यू.एस.ए ला जायचं सोडून तिकडे जंगलात काय करणार तू!’
ह्या असल्या भलत्या भित्या मनात आधीच घातल्या होत्या. पण इथे आलो आणि सगळ्यांना मीच सांगतो; ‘साऊथ-अ‍ॅफ्रीका रॉक्स बेबी!’ जोहॅनेसबर्ग मधेच आम्ही रहातो पण त्याबद्दल नंतर वेगळं सांगेन. मुख्य टॉपिक आहे डर्बनची टूर.

क्रिसमस म्हणलं की बहुतेक पाश्चात्य देश नटायला, सजायला लागतात. नोकरी, धंदा अत्यंत मंदावतो. साधारणपणे डिसेंबर मध्यं ते जानेवारी पंधरापर्यंत सगळीकडे शुक-शुकाट पसरतो. भर दुपारी दिवाळीच्या आधी जसा लक्ष्मीरोड गजबजतो, तसे इथले मॉल्स भरून जातात. क्रीसमस ट्रीज, कपडे, गिफ़्ट्स, वाईन, शॅम्पेन, यांची खरेदी होत असते. माझ्या इथल्या ऑफिस मधे सुद्धा असाच रंग दिसू लागलेला. एक-एक करत लोक, ‘बाय बाय, मेरी क्रिसमस, सी यू इन द न्यू ईयर’ अश्या घोषणा करंत नाहिसे व्हायला लागले. ऑफिस मधल्या आयटम पोरी ‘सी यू सॅम, टेक केअर डूड, सी यू इन द न्यू ईयर’ असं म्हणेस तोवर मी भानावर नवतो आलो. पंचवीस डिसेंबरला नाताळ होता. फक्त तीन दिवस आधी ऑपशन्स पाहिले.

सेंट ल्यूशिया; तिथले हॉटेल्स बुक्ड.
सन सिटि; तिथे एका दिवसात परत येऊ आपण. नंतर कधीही जाता येईल, असं सगळ्यांचं मत पडलं.
क्रूगर नॅशनल पार्क; तिथे सुद्धा बुकिंग्स झालेले की ओ!
टुगेला फॉल्स; तिथे ६ तासांचा ट्रेक आहे. कॅन्सल.

काही जणांचं मत पडलं ‘कुठेच नको जायला, इथेच बसू.’ मी मात्र तयार नव्हतो. चायला इथेच बसून काय एकमेकाची थोबाडं बघायची आहेत! तितक्यात कोणीतरी सांगितलं ‘डर्बनला एक ग्रूप चालला आहे. दहा-बारा जणं असतील.’ त्या ग्रूप मधल्या एकानं डर्बनच्या हॉटेलवाल्याचा नंबर दिला; ‘तन्वीर’ त्याचं नाव. आधी तो आम्हाला एजंट वाटला, पण तो निघाला ‘चेरीवुड कंट्री रीसॉर्टचा’ मालक. पैसे ट्रान्सफर झाले अ‍ॅन्ड वी वैर रेडी टू गो. टाकी फुल आणि कार तयार. एकूण सोळा जणं जाणार हे फायनल झालं आणि निघण्याच्या आधीचा दिवस उजाडला.

‘रात्रीच निघा, एक-दोन वाजता, म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही.’, असं इथले लोकं म्हणाले.

‘दोन वाजता! येडा झाला का तू! अबे झोप नाही झाली तर काशी व्हायची. पाचला निघू’, असं ग्रूप मधला प्रज्वल म्हणाला (नाव बदल आहे, कारण उज्वलला लाज वाटेल.) खरं कारण वेगळच होतं. त्या रात्री एकाचं बर्थडे-सेलिब्रेशन होतं. ‘दारू’ इतकी आणली होती की अक्खि रात्र त्याच्यानं अभ्यंगस्नान होणार होतं. मी पीत नाही, पण पार्टीत नशा कसा आणायचा हे आपल्याला जमतं. पण जर पहाटे निघायचं तर लवकर उरकावं लागणार होतं. इथे तर कोणीच माघार घ्यायचा मूड मधे दिसेना. एकतर परदेश, त्यावर हायवे, त्या ऊपर ६०० की.मी.. मला खात्री होती हे भ*** सकाळचे दहा-अकरा वाजवणार. पण काय करता! शेवटी चारचा टाईम पक्का झाला. मी अडीचचा गजर लावला, आणि हाईट म्हणजे उठलोकी ओ वेळेवर! त्या ऊपरची हद्द म्हणजे सोळाच्या सोळा जणं वेळेवर तयार. एकाच्या रूमवर पहाटे चहा झाला, आणि च्या-मारी बरोबर चारला ‘जय जय रघूवीर समर्थ!’ म्हणून चक्क निघालो!

‘४ कार्स, १६ यार, ६०० की.मी. अ‍ॅन्ड लेट्स रॉक डर्बन बेबी…’

(क्रमश:)

कॄपया आपल्या कमेंट ब्लॉगच्या खाली सोडाव्यात. एका गरीब, गरजू लेखकाला तेच प्रोत्साहन आणि तीच शिकवण. इथे तुमचं ‘जी-मेल’ अकाऊंट सुद्धा चालतं बरका!

माझे इतर ब्लॉग:

Vital Image Sources:
रायगड बाजारपेठ: http://www.fotothing.com/magiceye/photo/2e428e5f341c38ba6858e68ca842ccb7/

माझ्या रोजीरोटीची कहाणी..नोकरी क्रमांक -२ (फूड प्रोसेसर मार्केटिंग)

नोकरी सोडल्यावर नुसते घरी बसायची सवय नव्हती त्यामुळे एका आठवड्यात कंटाळलो.आई बाबांचा पाठींबा होताच पण म्हणून २२ व्या वर्षी फुकट खावे हे मनाला पटत नव्हते.३ मे १९९४ ला सकाळ मध्ये एक जाहीरात आली..’फूड प्रोसेसर मार्केटिंग साठी सेल्स एक्सिक्युटीव्ह’ हवे आहेत म्हणून…म्हटले चला हे सुद्धा करून बघू!!

मुलाखतीला गेलो लगेच..त्यावेळेला माझ्याकडे लुना सुपर होती कॉलेजला जाण्यासाठी वडिलांनी घेऊन दिलेली,तीच टूर टूर करत घेऊन गेलो.मुलाखतीचे ठिकाण:रोनाल्ड फूड प्रोसेसर चे भांडारकर रोड,पुणे येथील ऑफिस..ऑफिस म्हणजे एक गाळा होता,माझ्यासारखे सर्व इच्छुक उमेदवार तिथे रेझुम घेऊन बसले होते.१ तास मुलाखत झाली,शेखर वाळुंजकर नावाचे रोनाल्ड चे एरिया ऑफिसर का कोण होते,मला निवडले..बरीच भारी उत्तरे दिली असतील मी त्यावेळेला..मला वाटतेय..?
काही प्रश्न मला अजून आठवतात
1.      डोअर टू डोअर मार्केटिंग करावे लागेल..कष्टाची तयारी आहे का?..
2.      सकाळी ८ वाजता रिपोर्टिंग आहे…घरी किती वाजता जाशील याची गारंटी नाही..चालेल का?
3.      सर्व प्रकारची माणसे भेटतील,वाटेल ते बोलतील…ऐकून घ्यायची तयारी आहे का?

सर्वाला मी हो असे उत्तर दिले..मी सिलेक्ट झालो..२ दिवसात जॉईन होतो असे सांगून मित्रांना भेटायला डेक्कन वर आलो..
मित्रांना सांगितले… डोअर टू डोअर मार्केटिंग चा जॉब जॉईन करतो आहे म्हणून..सर्वानी वेड्यात काढले..लागेल “काय चुत्या आहेस का?”,”तुझ्या डिप्लोमा ची पार आई बहीण एक होईल”. “तुला कोणी नोकरी वर घेणार नाही मार्केटिंग जॉबच आयुष्यभर करायला लागेल” वगैरे वगैरे…एकूण काय चित्र फारसे आशादायक नव्हते,पण घरी बसून करू काय?
‘चला जॉईन करू या..’ या विचाराला आई बाबांनी पाठींबा दिला आणि ७ मे ११९४ ला रोनाल्ड ला जॉईन झालो…३ दिवसाचा मार्केटिंग चा क्राश कोर्से कंपनीने करवला आणि सुरु झाली दारोदार भटकंती..मारामारी सुरु…
मला औंध एरिया मिळाला आणि तिथे Knocking करायचे सुरु झाले सकाळी ८ पासून..

आता तुम्ही म्हणाल हे Knocking म्हणजे काय रे भाऊ? थोडक्यात कस्टमरची अपोइंटमेंट घेणे
Knocking : कस्टमरची अपोइंटमेंट घेणे

सुसंवाद असा घडायचा….
उदाहरणार्थ:
मराठी घर,श्री गोडबोले/देशपांडे/ओक/जोशी इत्यादी..जनरली सकाळी बायकाच घरी असत…नवरे कामावर..
मी : नमस्कार,मी सिद्धार्थ पुराणिक ,रोनाल्ड फूड प्रोसेसर कंपनीकडून आलो आहे.आमच्या कंपनीचा एक फूड प्रोसेसर आहे ज्याचा डेमो मला तुम्हाला द्यायचा आहे.तुम्ही मला आज संध्याकाळी अशी वेळ/ अपोइंटमेंट देऊ शकाल का ज्या वेळेला तुम्ही आणि तुमच्या घरातले सर्व लोक असतील?
गृहीणी: हे काय आहे?
(वाचक हो…१९९४ साली ही कॉन्सेप्ट फार जणांना माहीत नव्हती हे लक्षात घ्या!!)
मी: मादाम, हे एक किचन मधील उपकरण आहे ज्याचा तुम्हाला दररोज च्या घरकामात खूप उपयोग होतो.
गृहीणी: हा मिक्सर आहे का…आमच्या ह्यांनी आणला आहे परवाच…आम्हाला तुमचे ते फूड प्रोसेसर का काय ते नको..
यावर हीरमुसले न होता माझे म्हणणे मी पटवून देतो कि नाही त्यावर आमची अपोइंटमेंट अवलंबून..
मी: मादाम, हा मिक्सर नाही..ते दाखवण्यासाठीच मी तुमची वेळ मागतोय..
गृहीणी:किंमत काय आहे?
      हे मात्र तेव्हा सांगायचे नाही बर का? नाही तर तुम्ही मेलात!!
मी: मादाम, किंमत फार नाही…आमच्या डेमो मध्ये ही सर्व माहीती मी तुम्हाला देईन..
मग ९०% ती अपोइंटमेंट मिळायची.परत एकदा कन्फर्म करायचे कि साहेब घरात असतील न? कारण पैशाचा व्यवहार साहेबांच्या हाती असायचा बऱ्याच ठिकाणी..
यामध्ये काही ठराविक चौकस प्रश्न असायचे
1.      डेमोला किती वेळ लागेल? आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचे आहे.
2.      डेमो बघितल्यावर घेणे कंपल्सरी आहे का?
3.      डेमो फुकट आहे का?
4.      वीज किती लागेल?
5.      वापरायला अवघड आहे का?

स्थळ: अपोइंटमेंट घेतलेल्या कस्टमर चे घर,संध्याकाळी ७ वाजता
नवरा बायको दोघेही घरात,मी बेल वाजवतो,बायको(दुसऱ्याची!!! J) दार उघडते.
सुहास्य वदनाने मी: नमस्कार मादाम,आत येऊ का?
गृहीणी(दुसऱ्याची बायको!!): अरे हो पुराणिक…मी यांना सांगायचेच राहीले तुम्ही येणार म्हणून,आम्ही आता बाहेर चलो आहोत…सोर्री हं,तुम्ही उद्या याल का?

      राग गिळून मी :मादाम…मला फक्त अर्धा तास लागेल डेमो द्यायला.मी वाटल्यास पटापट देतो..आज प्लीज ऍडजस्ट कराल का?

गृहीणी: ओके…       अहो…,येताय न डेमोला

नवरा: तुम्ही सुरु करा (डेमो)…मला इंटरेस्ट नाही.. 

जरा कुरकुरत मी: मादाम ,साहेब आले असते तर बरे होईल.डिसिजन घेता येईल ना पटकन?

गृहीणी:अहो,५ मिनिटे बाहेर या…फार वेळ जाणार नाही.

(मला उद्देशून)...अहो पुराणिक..फार वेळ नाही जाणार न…आमचे हे भारी तापट आहेत..
नवरा आतून येतो..जरा वैतागून…सोफ्यावर धडकन बसतो..

नवरा:काय तो डेमो आटपा लवकर..

मध्येच त्यांची…बंटी/बबली येऊन मला काका काका करतात..”हे काय आहे…आम्हाला तुम्ही हे गिफ्ट देणार का?” त्यांच्या भोळेपणावर मी हसतो..

आता माझ्या आरती ची सुरुवात होणार…म्हसोबा आणि सटवाई ला पुजून… :

मी: नमस्कार,मी सिद्धार्थ पुराणिक ,रोनाल्ड फूड प्रोसेसर कंपनीकडून आलो आहे.आमच्या कंपनीचा एक फूड प्रोसेसर आहे ज्याचा डेमो आज मी तुम्हाला देणार आहे..डेमो नंतर तुमच्या जा काही शंका असतील त्याची उत्तरे मी तुम्हाला देईनच…
      (याचा अर्थ पुणेरी भाषेत असा कि ‘मध्येच शंका विचारून डेमो मध्ये व्यत्यय आणू नका’)
या फूड प्रोसेसर ने तुमच्या घरातील किचन मधील जवळपास सर्व कामे कमीत कमी वेळात होतात या प्रोसेसर मध्ये एक पॉवरफुल मोटर आहे…८०० W कॅपासितीची..वापरायला एकदम सोपे आहे कारण याला एकाच भांडे आहे…इतर प्रोसेसर सारखी अनेक भांडी आणि बोल्स नाहीत जे धुवायला किचकट असतात…(हा फटका एकदम भारी बसतो…कारण गृहीणी लगेच हे मान्य करते!!)
नवरा: मग काय सारखे तेच तेच भांडे परत धुवून सर्व गोष्टी करायला लागणार…त्यात वेळ जाणारच कि.. आणि तुटले कि सारखे बदलायला लागणार,.ह्या ह्या ह्या……
आता असे म्हटले कि चिडायचे नाही ही पहीली गोष्ट…याचा अर्थ असा कि नवरा सुद्धा आता डेमो मध्ये इंटरेस्ट घेणार ….आता आला कि नाही लाईनीवर…मी मनात म्हणतो!!
यावर माझे उत्तर तयार असायचे..
मी: सर,हे भांडे सारखे धुवायला लागणार नाही कारण हे नॉन स्टीक polycarbonate या मटेरिअल पासून बनवलेलेल आहे..ते तुटत नाही आणि पदार्थ याला चिकटत नाही..
गृहीणी ला  उद्देशून मी: मादाम…मी तुम्हाला कणिक मळून दाखवतो.. जरा गव्हाचे पीठ द्याल का??

(आता डेमो च्या आधी ही सर्व तयारी मी घरातल्या बाई ला सांगून ठेवायचो…गव्हाचे पीठ,गाजर,काकडी,शेंगदाणे काढून ठेवायला…त्याने वेळ वाचायचा माझा ही आणि बाईचा सुद्धा!!)

मग पुढच्या ३० मिनिटामध्ये मी त्यांना सर्व डेमो द्यायचो…बाई खुश व्हायची आणि बऱ्याच वेळेला नवरा सुद्धा..मला ८०% धंदा मिळून जायचा…

माझी भांडी आणि ब्लेड्स मी त्यांच्या सिंक मध्ये विसळून घ्यायचो..bag मध्ये भरून हेच काम दुसरी कडे..दररोज ३-४ डेमो व्हायचे…गाडी चालवून मात्र पाठीची वाट लागायची!!
ऑर्डर मिळाली तर ऑर्डर फॉर्म भरून घ्यायचो..आणि डीलिव्हरी द्यायचो दुसऱ्या दिवशी.. पण कधी कधी prospective customer असल्यास  मशीन घेऊनच जायचो आणि लगेच चेक/कॅश/कार्ड ने पैसे घ्यायचो..फार बरे वाटायचे ऑर्डर मिळाली कि…तेव्हा तर मी अट्टल सेल्समन होतो..चांगली माणसे असतील तर एखादे ब्लेड फ्री द्यायचो…ते खुश होऊन मला काही रेफेरंस द्यायचे त्यांच्या मित्रांचे..त्यांच्याकडे सुद्धा मग गुडविल वर विक्री व्हायची!! अशी चेन ऑर्डर  म्हणत मिळाली कि खूष व्हायचो..छान दिवस होते ते..!

आता यामध्ये तुम्ही म्हणाल डेमो देण्यात काय विशेष आहे…हे तर आम्ही अनेक प्रदर्शनात सुद्धा बघतो काकड्या गाजर कापताना!!
(मंडळी हो.. Knocking  करताना लोक ज्या वेळेला तुमच्या नाकावर दार धाडकन आपटतील किवा हुडूत हुडूत करतील त्या वेळेला कसे वाटेल ते पहा…भांडी विसळून बघा दुसऱ्याच्या घरी जाऊन..किती लाज वाटेल ते पहा पहिल्यांदा..दुसऱ्याच्या घरी भांडे विसळताना आईची आठवण होते..घरी आईने जी शिस्त लावली होती ती मला उपयोगी पडली.ज्यांना चहाचा कप धुवायची सुद्धा सवय नाही त्यांना तर…भगवान बचाये..!!
काही लोक तर चोरटे समजून आत सुद्धा घ्यायचे नाहीत,watchman ला बोलावून चौकशी करायचे  त्यावेळेला रागाने नाक लाल व्हायचे..पण करतो काय ‘धंदा है पर गंदा है ये’ म्हणून सोडून द्यायचो..)

आता या नोकरी तून काय शिकलो.
1.      दारावरील कोणाही माणसाला हुडूत हुडूत करायचे नाही..सेल्समन लाच काय कामवाल्या बाईला सुद्धा!!..मी काही चहा नाश्ता म्हणत नाही किमान पाणी विचारायला काहीच हरकत नाही माणुसकीच्या नात्याने!!
2.      इतक्या लोकांना भेटलो कि सांगायची सोय नाही…सर्व थरातल्या लोकांशी बोलणे व्हायचे..अगदी साध्या कामगार,अभिनेते,अभिनेत्री ते कंपनी डिरेक्टर पर्यंत सर्वांशी..
पोलीस हवालदार ते कमिशनर पर्यंत ओळखी झाल्या..माझी डायरी सर्व लोकांची साक्ष आहे..ती मी अजून जपून ठेवली आहे.

शेवटी एक खरे…तुम्ही जे मन लावून कराल ते चांगले…आता मी जग फिरतो..IT Infrastructure Manager म्हणून पण या आठवणी एका कप्प्यात जपून ठेवल्या आहेत…
संपवतो…अजून खूप लिहिण्यासारखे आहे..पण पाल्हाळ नको..धन्यवाद!!

ती आणि मी

                                                           तीनं पाहिलं   माझ्याकड,                                                                                                                            

      मारक्या म्हशी सारख  
मीही  पाहिलं तिच्याकड,
        भेदरलेल्या सशासारख !
तीनं म्हटलं  मला,
  “कच्चा खाईन रे तुला !”
मीही म्हटलं तिला ,
                 “सोडून दे ग मला
                                          मरीमी आय ,
रोडगा वाहीन तुला !”
                
                                           –विश्वकुमार

ठाण्याचे ८४ वे साहित्य संमेलन…

मागच्या आठवड्यात ठाण्यात ८४ वे साहित्य संमेलन चालू होते. साहित्य संमेलन ला जायचा योग पहिल्यांदाच आला. पुस्तकावर प्रेम असून आणि वाचायची आवड असून सुद्धा ८४ वे साहित्य संमेलन ला जायचा योग आला. ते सुद्धा सोसायाटी मधल्या एका काकूंना खाडीलकरांचे एक पुस्तक हवे होते म्हणून. दुसऱ्या दिवशी गेलो तर खुप गर्दी होती आणि गाडी पार्किंग ला सुद्धा जागा नव्हती म्हणून परत आलो. तिसऱ्या दिवशी अचानक ऑफिस ला सुट्टी मारली आणि संमेलनाला जायचा योग आला. कदाचित ते नशिबी होते म्हणूनच आज ऑफिसला दांडी झाली असावी.

आतापर्यंत वादामुळे नेहमीच चर्चेत असलेले साहित्य संमेलन ह्या वेळेला सुद्धा वादात होते. एक तर संभाजी ब्रिगेडने स्टेडियमच्या नावावरून वाद झाला. संभाजी ब्रिगेड काय सिद्ध करू इच्छिते आहे काय माहित? दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हते. हे कागदीपत्री सिद्ध करा पुरावे दाखवा आणि मग इतिहास बदला. त्या साठी आधीच घिसाडघाई करून संमेलन कशाला उधळायचे. हे साहित्य संमेलन आहे ज्यात आपल्या लेखकांचा, त्याच्या कवितांचा, लेखांचा, कादंबरीचा गौरव करायचा आहे. आजच्या पिढीला वाचनाकडे आणायचं आहे. त्यांना पुस्तके घेण्यास प्रवृत्त करायचे आहे का त्यांना संमेलन उधळून लावायच्या भीतीने पळवून लावायचे आहे. स्टेडियम चे नाव क्रित्येक वर्षापासून दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे अचानक एका रात्रीत त्यांना जाग आली आणि स्टेडियमचे नाव बदलण्याची इच्छा झाली ते सुद्धा साहित्य संमेलन तोंडावर असताना. संभाजी ब्रिगेड चा मुख्य राग बहुतेक ब्राह्मण समाजावर आहे असे त्यांच्या एकंदर जाहिराती आणि भाषणावरून वाटते आणि त्यासाठी ते साम दाम दंड आणि भेद वापरायलाहि तयार आहेत. त्यांच्यात आणि इतरांत फरकच तो काय उरतोय? नशीब शिवसेनेने दंड थोपटले आणि त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले. त्यामुळे निदान साहित्य संमेलन तरी सुखरूप पार पडले.

त्याचे सावट दूर व्हायच्या आधीच अजून एक उभे राहिले ते म्हणजे संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसे चे नाव टाकले. ते ठाण्यातल्या एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला आवडले नाही म्हणून त्यांनी हैदोस घातला. त्यांचा तो राग नक्की नथुराम वर होता कि मंडपाचे टेंडर नाही मिळाला म्हणून होता काय माहित? आजच सामना मधील संपादकीय लेख वाचला त्यात नथुरामने आपल्या सफाई मध्ये कोर्टापुढे जे वक्तव्य केले होते ते वाचण्यासारखे होते. त्या लेखातील तो भाग जसाच्या तसा इथे देत आहे.

‘‘मला चांगल्याप्रकारे जाणणार्‍यांना माहीत आहे की मी शांत प्रकृतीचा माणूस आहे; परंतु आम्ही जिला आपली परम आराध्य देवता मानतो अशा आमच्या मातृभूमीची कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी फाळणी केली आणि गांधीजींनी त्याला संमती दिली. तेव्हा माझ्या मनात भयंकर संताप दाटून आला. थोडक्यात सांगायचे तर मी गांधीजींना ठार मारले तर माझा सर्वनाश होईल आणि लोक माझा भयंकर तिरस्कारच करतील. माझी माझ्या प्राणाहूनही जास्त मोलाची अशी प्रतिष्ठा धुळीस मिळवतील हे सर्व मला आधीच दिसत होते. मी विचार केला तेव्हा या सर्व गोष्टी स्पष्टच दिसल्या; परंतु त्याचबरोबर मला असेही वाटते की, गांधीजींवाचून भारतीय राजकारण नक्कीच व्यावहारिक बनेल. ते जशास तसा प्रतिकार करण्यास समर्थ होईल आणि सशस्त्र सेनादलांनी सुसज्ज राहील. व्यक्तिश: माझा सर्वनाश नक्कीच होईल; परंतु पाकिस्तानच्या धाडींना नक्कीच पायबंद बसेल. मला लोक माथेफिरू किंवा मूर्ख म्हणतील; परंतु राष्ट्र तर्कसंगत मार्गक्रमण करायला मोकळे राहील आणि निकोप राष्ट्रनिर्मितीसाठी हीच गोष्ट अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटत होते. या प्रश्‍नाचा सर्व साधकबाधक अंगानी पूर्ण विचार केल्यावर मी अंतिम निर्णय घेतला. सारे धैर्य एकवटून मी ३० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसमधील प्रार्थना मैदानावर गांधीजींवर गोळ्या झाडल्या…’’

असो राजकारणाचा भाग सोडला तर बाकी साहित्य संमेलन खूप छान होते. ठाण्याच्या नगरीमध्ये होते म्हणून तर अजून छान वाटले. कडकडीत पोलीस बंदोबस्त होता. जवळपास २३० च्या वर प्रकाशक आणि विक्रेते ह्यांची दुकाने लागली होते. वर्तमानपात्रच्या आकड्यावरून जवळपास दोन कोटीच्या वर पुस्तके विकली गेली. मृत्युंजय, छावा, ययाती सारखी गाजलेली पुस्तके खूप कमी किंमतीत विकली जात होती. मीही काही चित्रकलेची पुस्तके विकत घेतली. अगदी दूर दूरच्या शहरातून माणसे पुस्तके विकत घ्यायला आली होती. ठाण्याच्या अनेक वस्तू, तलाव, रस्ते, ऐतिहासिक वाडे ह्यांचे एक छोटेखानी प्रदर्शन हि होते. जवळपास पूर्ण ठाणे त्या फोटो प्रदर्शनात समाविष्ट केले होते.

नक्कीच एक आयुष्यभरासाठी चांगला अनुभव होता.गोड गैर-समज

ज्याला मी सूर्यफुल समजलं,

सूर्याकडे एकटक पाहणारं;
ते तर एक रानफूल निघालं………
वाऱ्यावर वाट्टेल तसं
                                    डोलणारं …….!!   
  
                           
                 -विश्वकुमार  
      

माझ्या रोजीरोटीची कहाणी..नोकरी क्रमांक -1

मी आजच विचार करत होतो कि नोकरी करून मला जवळपास १७ वर्षे झाली…१९९४ मध्ये इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग डिप्लोमा (जो जवळ जवळ तुम्हाला अर्धवट इंजिनीअर बनवतो पण कामगार बनवण्यापासून वाचवू शकत नाही,निदान पहिली काही वर्षे तरी.) 1st कलास मध्ये पास झालो आणि नोकरी मध्ये घुसलो.

माझ्या बाबांच्या एका मित्राचे Control Panels बनवण्याचे माणिक बाग-सिंहगड रोड जवळ वर्कशॉप होते तिथे  चिकटलो.तेथे काही दिवस काम केले आणि त्यांनी अजून एका मोठ्या वर्कशॉपमध्ये मला रेकमेंड केले ..नाव होते PANKOSYS CONTROL SYSTEMS

खरे तर तिथे मी फार दिवस नाही पण ३ महिने काम केले आणि जे लोक शॉप फ्लोरवर आयुष्यभर काम करतात त्यांच्या कष्टाची कल्पना आली.सकाळी ८ वाजता दिवस सुरु व्ह्यायचा आणि रात्री १०.३० ला संपायचा.

सकाळी ८ वाजता चहा पिऊन झाला की वायर्स कापायला सुरुवात होई जो सर्वात कुशल कामगार होता,(बहुतेक हेमंत होते नाव त्याचे),त्याच्या शिव्यांनी कामाची सुरुवात होई..अरे गाढवा…काय कचरा केलास?तुझ्या बापाने अश्या केबल कापल्या होत्या का? हेच शिकवले का डिप्लोमाला??(आता त्याला हे सांगून उपयोग नव्हता कि अरे बाबा वायर्स कापताना कचरा होणारच किवा माझ्या बापाला शिव्या देऊ नकोस…किंवा डिप्लोमाला वायर्स कापायला शिकवत नाहीत..गुपचूप ऐकून घ्यायचो आणिक काय?तिथे मी एक अकुशल कामगार होतो…दुसरा काही नाही.

नंतर फेरुल्स लावायचा कार्यक्रम (खरेच कार्यक्रमच असायचा तो) सर्व वायरची भेंडोळी घेऊन त्यांच्या मध्ये पिवळ्या रंगाची फेरुल्स लावायला सुरुवात व्हायची.

फेरुल्स म्हणजे एक प्रकारची लेबल्स असायची जी वायरमध्ये दोन्ही बाजूला ओवत असत,म्हणजे दोन्ही साईड ची कनेक्शन्स योग्य प्रकारे करायला मदत होई,कारण एकदा पानेल्स बनवली कि ५-१००० वायर्स मुळे प्रचंड गोंधळ होत असे..असो…हा लेखाचा विषय नाही…जरा थोडी माहिती … .. नंतर एक हार्डवेअर जोडणारा कामगार येई आणि सर्व शेल्व्स नटबोल्ट लावून टाईट करे..त्याला सर्व मास्तर म्हणत कारण ड्रिलिंग,मापे घेणे आणि सर्व पानेल्स दरवाजे लावून तयार करणे हे कष्टाचे काम असे.. पण खरे तर ते फार कठीण नसायचे..कारण मी नंतर ८-१० दिवसांनी हे काम सहज करू शकत होतो.त्यामुळे मी जरा पॉप्युलर झालो इतर कामगारांमध्ये…त्याची पानेल्स माझ्यामुळे पटापट व्हायची.अजून दुसरे कारण म्हणजे हा मास्तर आम्हाला किवा तेथे उभा पण करत नसे कारण तो आम्हाला एकदम फालतू समजे इतरांना समोर तो रॉकेट बनवण्यासारखा आव आणायचा..कारण आम्ही नवीन आणि अकुशल होतो..

नंतर फेरुल्स लावलेल्या वायर्स जोडण्याच्या कामाला जवळपास ७-८ दिवस लागत बोट कापायची,पायात खिळे,चुका घुसायच्या,पण सवय झाली होती कोणी जास्त ओरडायला लागलं अश्या वेळेला कि सर्व जण म्हणायचे काय बाईवाणी ओरडतोस? त्यामुळे सर्व वाघासारख्या मर्दासारखे सोसत काम करायचे! भावना बोथट होणे म्हणजे काय याचा अनुभव यायचा पदोपदी.. (शब्द:श..कारण पायात इतके टोचून सुद्धा नंतर गप् बसायची सवय लागली)

ओवर टाईम ६ वाजता चालू व्हायचा म्हणजे दररोज ४.३० तासाचे डबल पगार मिळे.पण हो खुश होऊ नका…यामध्ये २ वडापाव आणि २ वेळेचा चहा+जेवणाची सुट्टी मिळून ४० मिनिटाचा ब्रेक असायचा…बाकी अंग दुखेपर्यंत काम…वड्यामध्ये येवढा सोडा घातलेला असायचा कि सांगायची सोय नाही..त्याचा आकार जवळपास एका बनपावायेवढा असेल पण पोटात गेल्यावर सोडा आणि पोटामध्ये जे काही गुटूर गुम व्हायचं कि ज्याचे नाव ते.तात्पुरते वाटायचे कि कसले गच्च पोट भरले पण १० मिनिटे झाली कि त्याची हवा सुटायची.इतक्या शिव्या त्या वडापाव वाल्याला मिळून सुद्धा तो काही सुधारला नाही कि आमच्या मालकाने त्याला बदलला नाही.आयुष्यात इतके कप:दार्थ कधी खाल्ले नव्हते आम्ही,(चैतन्य वडापाव…नाव आठवले आत्ता)

CONTROL पानेल्स बनवून टाटा हनीवेल ला विकायचो जवळपास दुप्पट तिप्पट किमतीला पण पगार मात्र १५००/- प्रती महिना त्या वेळेला मी एक ट्रेनी कामगार म्हणून काम करत होतो त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार अशी गत होती. काही चोइस नव्हताच..रात्री ११.३० ला घरी आल्यावर अंग दुखायचे त्यामुळे पायाला तेल लावत बसायचो..पिताश्री म्हणायचे “च्यायला…तरूण पोरे न तुम्ही? काय म्हातारया सारखे तेल लावत बसला आहेस?”…आमची दु:खे आम्हाला ठावूक.. 

दुसऱ्या दिवशी परत कामाला तयार..

आणि एकदा पानेल तयार झाले की टाटा हनीवेल मधून इन्स्पेक्शनसाठी पर्चेस सेक्शन मधून एक साहेब यायचे..आता नाव आठवत नाहीपण विग घालायचेआणि इतका जुना होता तो कि त्याचे धागे निघालेले असायचे..ते बघून त्यांच्यावर कॉमेंट करणे हा आमचा आवडता छंद होता,त्यांनी पास केलेली पानेल्स नंतर क्रेनने ट्रक मध्ये चढवण्याचा कार्यक्रम व्हायचा..त्यात सुद्धा अस्मादिक सहभागी व्ह्यायचे… न होऊन सांगतो कोणाला?? सर्वाना हे काम कंपल्सरी असायचे. “इंजीनीर असाल तुमच्या घरी!!” असे सर्व कामगार आणि आमचा मुकादम (मुकुंद) जोरात म्हणे..त्यामुळे सर्व इगो बाजूला ठेवून…हुप्पा हुय्या मध्ये सहभागी व्हायला लागायचे..हमाली का काय हीच असे!! ३ महिने केले हे काम पण खरे सांगायचे तर झेपले नाही. भयंकर कष्टाचे होते ते दिवस..

त्यात कामगार वर्गामध्ये असलेले अरबट चरबट विषय माझ्या साठी धक्कादायक होते..अश्लील या सदरामध्ये मोडणारे सर्व विषय मी त्या वेळेला ऐकले…वेश्यागमन,कुटुंब नियोजन आणि पोरे होणे यावरच्या खमंग चर्चा ऐकून कोणीही पांढरपेशी माणूस चक्कर येवून पडला असता कोणी किती वेळेला बुधवारात जाऊन आले आणि तेथील कुठला आयटेम भारी आहे यावर माझ्या ज्ञानात दर दिवशी नको इतकी भर पडत होती..आणि काय केले कि गुप्तरोग होणार नाहीत हे तर डॉक्टर लोकांना माहित नसतील असे उपचार हे कामगार सुचवित..आणि मी तोंड चुकवले कि फिदी फिदी हसत..बामनाचा पोरगा लाजतो म्हणून टवाळखोरी करत. एका दिवशी वैतागलो आणि एका कामगाराला हाणले असाच एक पोरगेलासा होता आणि बामण बामण करायला गेला…डोके सटकले आणि त्याला चोपला.एक मुस्काडीत हाणली आणि मारला..ते पाहून इतर कामगार आणि मुकुंद मध्ये आले. आणि कशाला राव मारामारी करतो…सोडून दे कि असे म्हणत मध्यस्थी करायला गेले.त्यावर माझे डोके अजून भडकले आणि अजून दोन चार रट्टे परत दिले त्याला..

हे बघून जरा कामगार नरमाई वर आले…आणि मला चिडवणे सोडून दिले.नंतर मात्र काही प्रोब्लेम आला नाही..पण माझा मूड गेला तो गेला..मालकांना सांगून घरी परत आलो ते न जाण्यासाठीच…आई बाबा नी काही कारण विचारले नाही.माझा ब्लू कॉलर जॉब अश्या रीतीने संपला..

पुढच्या दोन नोकर्यांबद्दल सांगेन जर तुम्हाला बोर झाले नाही तर…त्या सुद्धा वाचण्यासारख्या आहेत.. 🙂
———————————————————————————————————

कॉमेंट्स चे स्वागत आहे..कृपया  नावासकट स्तुती किवा  टीका असेल तर छान वाटेल.. anonymous ने मजा येत नाही हो..

तळलेली कोळम्बी खास ब्रिस्बेन वरून..

खरे सांगायचे तर पहिल्या महिन्यात माझी जरा निराशाच झाली येथे आल्यावर..पण आता जरा रुळलो आहे आणि खादाडी ला सुरुवात केली..पहिला मान कोळम्बीचा.माझे एक बरे आहे..मी सर्व प्रकारचे पदार्थ करतो आणि रुचकर सुद्धा पण मी असे काही म्हणणार नाही की खास कोकणी पद्धत वगैरे..छान लागणे हे महत्वाचे..
ही दारू बरोबर खाऊ नका..तव्यावरची गरम पोळी आणि तूप घातलेला भात अश्या बाळबोध भावंडाबरोबर ही मस्त लागते.. फक्त २० मिनिटात होते आणि बेस्ट लागते..

सुरु करतो..हे जमवा बर!!
 1. २५० ग्रॅम स्वछ केलेली  कोळम्बी

फोडणीसाठी:

 1. १ बारीक केलेला कांदा
 2. ३ चमचे तेल  
 3. १ तुकडा दालचिनी
 4. ३ लवंग  

खालील सर्व साहित्य एकत्र करून कोलंबीला लावून १ तास मुरवत ठेवा

 1. अर्धी वाटी आले लसूण पेस्ट
 2. २ चमचे धणेपूड
 3. २ चमचे हळद
 4. २ चमचे लाल तिखट
 5. चवीपुरतेच मीठ…जास्त घातले कि कोळम्बी चिवट होते..
 6. ३ चमचे गरम मसाला.
 7. चिमुट भर हिंग (हिंगामुळे कोलंबी मध्ये सर्व स्वाद पटकन मुरतो असा माझा अनुभव आहे..फोडणीत घालू नका)
 8. ३ चमचे लिंबू  रस 

आता बनवूया..
तेल तापवून फोडणी  करा आणि कांदा गुलाबी करून घ्या आणि त्यावर मुरवलेली कोलंबी टाका.(पाणी टाकू नका शक्यतो..कारण कोलंबी पाणी सोडते..) २० मिनिटे शिजवा पण करपू द्यायची नाही.
कोथिंबीर टाकून गरमागरम पोळीबरोबर किवा गरम तूपभाताबरोबर  जीभ भाजत असताना खा. अप्रतिम लागते..

———————————————————————————————————
कॉमेंट्स चे स्वागत आहे..कृपया  नावासकट स्तुती किवा  टीका असेल तर छान वाटेल.. anonymous ने मजा येत नाही हो..

कलियुग

आवर आवर मनुजा आता,आपुल्या मनास
फार होई पाप जगात,कलला हा आस
मृग सोन्याचा नसतो,कधी ह्या जगात
नजरबंदी अपुली होते,दूर धाडीतो पतीस
दीर काढी लक्ष्मणरेषा ,ओलांडू नकोस
दशानाना तुही परस्त्री,मोह धरू नकोस
परस्त्री पूज्य माता,विसरती हे तत्व
 नि:समानवतेला तेव्हां बटटा,हि ते निसत्व
                                   कृष्णाकुमारप्रधान

साहित्य संमेलन का उधळवता ?

तब्बल २२ वर्षांनी ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहीत्य संमेलन होत आहे, ठाणेकरांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. ठाणेकरांनीही त्याची जोरदार तयारी केली आहे, संमेलनाच्या संयोजकांनी साहीत्य संमेलनातील मंचाना, प्रवेशव्दारांना  थोर साहीत्यीकांची नांवे दिलेली आहे, त्यात सावरकरांपासुन ते शाहीर विठ्ठ्ल उमाप यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे, असे हे सर्वसमावेशक संमेलन काही विषीष्ट जातीयवादी संघटनानी केवळ क्रिडा संकुलाच्या नावावरुन संमेलन उधळवुन लावु अशी धमकी दिली आहे. संमेलनाचा आणि क्रिडा संकुलाच्या नावाचा काहीही संबंध नाही परंतु ही धमकी केवळ सवंग प्रसीध्दी मिळवण्यासाठी दिली गेली की काय अशी शंका येते.

साहीत्य संमेलनात विचारांचे मंथन होते, तेथे विचारांचा सामना विचारांनी केला पाहीजे, विचारांचा सामना झुंडशाहीने करुन काय साध्य होणार आहे. हे संमेलन केवळ उच्चवर्णीयांचे आहे, त्याला आम्ही विरोध करणारच हे हास्यास्पद वाटते, आधुनिक महाराष्ट्रात जातीने कोणी उच्चवर्णीय ठरत नाही, त्याची वैचारीक पातळी उच्च असायला हवी, सर्वच जातीमध्ये चांगल्या आणि उच्च विचारांचे साहीत्यिक आणि विचारवंत आहेत, त्यामुळे केवळ जातीय राजकारणातुन असे हास्यास्पद आरोप कोणीच करायला नकोत. जशी राजकारण ही केवळ कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही तशीच साहीत्य ही सुध्दा कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही, राजकारणामध्ये दर्जा महत्वाचा मानला जात नाही परंतु आजही साहीत्यामध्ये “दर्जेदार साहीत्य” हा प्रकार अस्तीत्वामध्ये आहेच. आणि दर्जेदार साहीत्य हे समाजाकडुन आजही स्विकारले जाते, त्यावेळी साहीत्यीकाची जात पाहीली जात नाही. साहीत्य संमेलन उधळवुन लावु  या झुंडशाहीचा सर्वस्तरातुनच निषेध होईल.    

चिकन चेट्टीनाड


1) चिकन चेट्टीनाड..Chicken Chettinad

एक छान रेसिपी आज सांगतो….चिकन चेट्टीनाड.मला भयंकर आवडते.ट्राय करणार का माझ्याबरोबर??चला सुरुवात करू या..

ही रेसिपी माझ्या एक हैदराबादी मित्राच्या आजीने मला खायला घातली २-३ वर्षापूर्वी.त्याच्या किचन मध्ये बसून तोंडाचे पाणी पुसत पुसत मी ही कशी लिहिली माझे मला माहीत.त्या सुवासाने मी अक्षरश: बहिरा आणि आंधळा झालो.(कारण माझे फ़क्त नाक आणि तोंड चालू होते पुढचे १ तास…इतका जेवलो की सांगायची सोय नाही.)
माझ्या हावरट पणावर (चांगल्या शब्दात सांगायचे तर दर्दीपणावर!!) त्याच्या घरातले तर येवढे खूष झाले की मी त्यांच्या घरातलाच झालो.आता हैदराबाद मध्ये एक हक्काचे घर झाले आहे. 🙂 आज तीच पाककृती तुम्हाला सांगतो आहे.
खाण्याच्या वस्तू :)…अर्थात इन्ग्रेडिएंटस

 1. एक कचकचीत ताज़ी कोंबडी -१ किलो
 2. कांदे -३/४
 3. टोमॅटो -३/४ मध्यम आकाराचे
 4. आले -एक बोटभर लांब
 5. लसूण -१०-१५ पाकळ्या
 6. कोथिंबीर -भरपूर 🙂
 7. कडीपत्ता -१०-१२ पाने
 8. नारळ -पाव ते अर्धा वाटी खवलेला.
 9. शेंगदाणा तेल -आवडीनुसार…मी अर्धा वाटी घेतो.
 10. मसाला
 11. धणे -१ टेबलस्पून
 12. जीरे -१/२ टेबलस्पून
 13. हिरवे वेलदोडे -५
 14. लवंगा -३
 15. दालचीनी -२ काड्या
 16. दगडफूल -१
 17. मेथ्याचे दाणे -१ टेबलस्पून
 18. खसखस -१ टेबलस्पून
 19. बडीशेप -२ टेबलस्पून (यामुळे आले व लसूणाचा उग्र पणा कमी होतो)
 20. अख्या लाल मिरच्या-६ ते ८
 21. इतर
 22. लाल तिखट-१ टेबलस्पून
 23. हळद -१/२ टेबलस्पून
 24. लिंबाचा रस-१ टेबलस्पून
 25. मीठ-चवीनुसार

कृती:
चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
पेस्ट १ :कांदा,टोमॅटो,आले,लसूण यांची एकत्र मिक्सर मधून पेस्ट करा..(पाटा वरवंटा किंवा रगडा असेल तर सर्वात उत्तम!)
पेस्ट २ :कढई मध्ये तेल तापवून त्यामध्ये सर्व मसाला गुलाबी होईपर्यंत प्रेमाने परता (दिलेल्या क्रमानेच परतले तर छान होईल!) आणि पेस्ट करा.

 1. कढई मध्ये तेल तापवून त्यामध्ये कडीपत्याची १०-१२ पाने + हळद + पेस्ट १ +तिखट + मीठ टाका आणि तेल सुटेपर्यंत परता. नंतर पाव ते अर्धा वाटी खवलेला नारळ टाका.
 2.  हे मिश्रण गरम असताना त्यामध्ये चिकन टाका

 1. अर्धे शिजल्यावर लिंबाचा रस+ पेस्ट २ टाकून झाकण लावुन शिजवा.
 2.  जर पाणी टाकायची गरज वाटली तर १-१/२ कप उकळून घाला.(गार पाण्याने चव जाते!!)
 3.  भरपूर कोथिंबीर टाकून गरम फुलके आणि भाताबरोबर वाढा आणि स्वर्गसुखाचा आनंद घ्या.. 🙂

  तोंडाला पाणी सुटण्यासारख्या या डिशचे तुम्ही आयुष्यभर फॅन व्हाल!