वर्तक नगर चे साईबाबा…

वर्तक नगर च्या साईबाबांचा २४ वा वर्धापन दिवस.

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वर्तक नगर च्या साईबाबांचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा झाला. शिर्डी च्या साईबाबांची प्रतिकृती असलेले वर्तक नगरचे साईबाबा म्हणजे इथल्या भक्तांची प्रती शिर्डीच. मराठी तिथी नुसार साईबाबांचा वर्धापन दिवस साजरा होतो. २९ नोव्हेंबर पासून सुरु झालेला हा उत्सव ३ दिवस चालला आणि आज त्याची सांगता झाली. तिसऱ्या दिवशी बाबांची मंदिरातून पालखी निघते आणि वाजतगाजत मोठ्या थाटामाटात तिची पूर्ण वर्तक नगर मध्ये मिरवणूक निघते. हि मिरवणूक पुढे जानका देवी च्या मंदिरात जाऊन परत साईबाबांच्या मंदिरात परतते. ह्या वेळेला रस्त्यावर मोठ्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढल्या जातात. पुण्यावरून खास ढोल ताशे बोलावले जातात. सुंदर आतिषबाजी केली जाते. दांडपट्टा चालवणारे, लेझीम खेळणारे, तलवार चालवणारे अनेक कलाकार आपली कला दाखवतात. एकंदरीत खूप रम्य आणि पाहण्यासारखा सोहळा असतो. ऑफिस मधून येईपर्यंत पालखी अर्ध्याहून पुढे निघून जाते. पण आज नशिबाने दर्शन मिळाले. माझ्या जुन्या घराच्या समोरच पालखी पोहोचली होती. चांगले दर्शन झाले. पालखी सोहळ्याचे दृश्ये आणि बाबांच्या मंदिरातली काही इथे पोस्ट केली आहेत.

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

जगमोगन रेड्डी नी "घराणेशाही" साठी "भुकंप" घडवला ?

राजकारणात घराणेशाही अनादी कालापासुन चालु आहे, आणि आजच्या राजकीय परीस्थीमध्ये ती राजकीय नेत्यांची अपरीहार्यता बनली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांना मात्र ती काही प्रमाणात अडचणीची ही ठरत आहे, प्रत्येक राजकीय नेत्याचा वारसदार राजकीय दृष्ट्या परीपक्वच असतो असे नाही, त्याला गादीवर बसवल्यामुळे खुप मोठे राजकीय नुकसान त्या पक्षास सोसावे लागत असेल तर अशा वेळी कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न पक्षप्रमुखाला पडतो आणि वारसदाराच्या विरोधात निर्णय गेल्यास पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार सध्या आंध्र प्रदेशात चालु आहे. आंध्र चे मुख्यमंत्री वाय.एस.आर .यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी म्हणुन त्यांचे पुत्र जगमोगन रेड्डी यांनी खुप प्रयत्न केले  परंतू कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलून रोसय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, वास्तविक पाहता अनुकंपा म्हणून जगमोगन रेड्डी यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशी लोकभावना होती परंतु कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलले, जगमोगन रेड्डी यांनी त्यावेळी टोकाचा निर्णय घेतला नाही पण के.रोसय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी किरणकुमार यांना मुख्यमंत्रीदी बसवताच जगमोगन रेड्डी यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि टोकाचा निर्णय घेत  आपल्या कासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवुन दिला व आंध्र मध्ये खळबळ उडवुन दिली. महाराष्ट्रात शरद पवारांनी याच मार्गाने जावुन वेगळा पक्ष स्थापन केला व चांगले यश मिळवुन कॉग्रेस ला वठणीवर आणले तसे करण्याचा जगमोगन रेड्डी यांचा प्रयत्न असेल तर त्याला कसा प्रतीसाद मिळतो हे येणारा काळच ठरवेल.

ॲनिमेशन (Animation) म्हणजे काय? ……

जर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो.
खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते.
ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे मोशन पिक्चर किंवा वीडियो प्रोग्रॅम होय. ॲनिमेशन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपण त्याबद्दल थोडे जाणून घेणार आहोत.

ॲनिमेशन करण्याच्या पद्धती (टेक्नीक्स) :-

 • क्लास्सिक ॲनिमेशन
  1. स्टाइलाईझ ॲनिमेशन
  2. रोटोस्कोपिंग ॲनिमेशन
  3. लाइव्ह एक्शन ॲनिमेशन
 • स्टॉपमोशन ॲनिमेशन
  1. पपेट ॲनिमेशन
  2. क्ले ॲनिमेशन
  3. कटाऊट ॲनिमेशन
  4. सिलहाऊट ॲनिमेशन
  5. मॉडेल ॲनिमेशन
  6. ओब्जेक्ट ॲनिमेशन
  7. ग्राफिक ॲनिमेशन
  8. सॅन्ड ॲनिमेशन
  9. फ्लिपबुक ॲनिमेशन
 • कंप्यूटर ॲनिमेशन
  1. २डी ॲनिमेशन
  2. ३डी ॲनिमेशन
  3. स्पेशल एफेक्ट्स ॲनिमेशन

पाकड्यांनो आम्ही हिंमत हरलो नाहीत…

२६/११ आली 
स्रर्वांनाच आठवलं
पाकीस्तान ने दोन वर्षापुर्वी
अतीरेक्यांना भारतात पाठवलं
इथली निष्पाप माणसं मारायला
चौकाचौकात बॉंब फोडायला
पण शेवटी अतीरेक्यांनो
तुम्हीच हरलात
कारण तुम्ही बॉंब फोडले
अंदाधुंद गोळीबार केला
तरी आम्ही..
आमची जीगर हरलो नाहीत
आमची हिंमत हरलो नाहीत
आम्ही जगासमोर तुम्हाला उघडं केलं
तुम्ही मात्र उघड्या डोळ्यांनी
आमची हिंमत पहात राहीलात
आतल्या आत जळत राहीलात
आमच्या पासुन पळत राहीलात
तुमच्याशी लढताना
आमचे जवान शहीद झाले
पण जाता जाता आम्हाला
जगण्याची जिद्द देवुन गेले
पाकड्यांनो एक दिवस तरी तुम्हाला
दहशतवाद सोडावाच लागेल
आणि दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
ऐकु जाइल एवढ्या जोरात
“जयहिंद” चा नारा द्यावाच लागेल… 

(२६/११ च्या पाकीस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली)
 

…………….अमोल देशमुख,माजलगांव(बीड)

माणसं देवासारखी अचानक भेटतात तेव्हा…

आम्ही मित्रमंडळी आपल्या काही कामानिमीत्त नुकतेच मुंबई ला गेलो होतो. आम्ही यापुर्वीही मुंबई ला गेलेलो परंतू ते रेल्वेने किंवा बसने, पण या वेळेस स्वत:ची गाडी घेवुन गेल्यामुळे मुंबई मध्ये रस्ते सापडतील का या विचारात वाशी पर्यंत आम्ही विनासायास पोहोचलो, त्यानंतर आमचे काही मित्र तेथे उतरले, आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे असल्यामुळे त्यांनी सांगीतले सरळ या रस्त्याने जा चेंबुर लागेल आणि पुढे विचारत विचारत जा, तास दोन तासात तुम्ही तेथे पोहोंचाल, आम्ही निघालो, परंतु चेंबुर च्या बरेच पुढे गेल्यावर आम्हाला नेमका रस्ता कळेना, एका सिग्नल ला आमची गाडी थांबली आजुबाजुला ब-याच गाड्या येवून थांबल्या पैकी एका गाडीचा चालक सारखा आमच्याकडे पहात असल्याचे आमच्या लक्षात आले, शेवटी त्याने आम्हास बीड चे का असे विचारले आम्ही त्यास तुम्ही कोठे असता वगैरे विचारले असता त्याने मीही बीडचाच असे सांगुन कोठे जायचे आहे असे विचारले आम्ही छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे आहे असे सांगताच त्याने मझ्या मागोमाग या असे सांगुन त्याची गाडी पुढे घेतली, आम्ही ब-याच प्रमाणात चिंतामुक्त झालो, साधारणपणे अर्धा तासात त्याने आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला नेवुन पोहोचवले आम्ही आनंदीत झालो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे आभार मानण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही कारण अनेक वाहनांच्या गर्दीत तो कुठे नाहीसा झाला हे काही आम्हाला कळाले नाही आम्ही दिवसभर आमच्या कामात व्यस्त राहीलो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे साधे आभारही मानु शकलो नाही याची दिवसभर हुरहुर लागुन राहीली, एखाद्या कठीण प्रसंगात अशी माणसं देवासारखी अचानक येतात आणि आपल्याला मदत करुन निघुन जातात तेव्हा खरा माणूसकीचा प्रत्यय येतो, आपण त्यांचे साधे आभारही मानु शकत नाहीत किंवा त्यांना काहीच देवू शकत नाहीत तेव्हा खुप कसेतरी वाटते, जगात दिशाभुल करणारी माणसेही खुप भेटतात परंतू योग्य दिशा दाखवून मदत करणारी माणसे तशी अभावाने भेटतात त्या अज्ञात मदतगाराचे मनापासुन आभार फक्त या माध्यमातुन मांडणेच आपल्या हातात आहे, यानंतर मी मात्र एवढेच करु शकतो की मीही कधीतरी अशीच कोणाला तरी त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करुन त्या अज्ञात मदतगाराचे रुण फेडू शकेल एवढेच… 

यारी कि गाडी…

हिरो होंडा ची नवी जाहिरात यारी कि गाडी बघितली आहे का?


तब न स्पीड ब्रेकर होते थे, न नो एन्ट्री
अपनी यारी कि गाडी फुरररररर सी चलती थी.
पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों
राहे बदल देता है

यारी बुला रही है….राहे दिखा रही है..
चलते ते हम जो बिछडे तो ये
ये गाडी मिला रही है….

जितनी दूर ये यारी जाये
उतनी दूर ये गाडी जाये
हिरो होंडा स्प्लेंडर ….यारी कि गाडी

आतापर्यंत पाहिलेल्या जाहिरातीतील हि सर्वात आवडती जाहिरात. सुंदर संकल्पना, सुंदर सादरीकरण, सुंदर संगीत आणि शेवटी हृदयाला स्पर्श करणारा फील.
तीन मित्र भर पावसात लहानपणी गल्लीत खेळताहेत. दोघे बसले असतात आणि तिसरा मित्र फुरररर करत गाडी चालवत येतो. बाकीचे पण त्याला सोबत देत गल्लीत गाडी चालवत फिरतात व एका चौकात बाहेर पडतात. पण तिघे तीन रस्त्याने जातात. त्यावेळेला तिघे आश्चर्यचकित होउन एकमेकांकडे बघतात. तेव्हा त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव खूप छान दाखवले आहेत. त्याच वेळेला बॅकग्राउंडला आवाज येतो.पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों…. राहे बदल देता है.
तेच मित्र मोठेपणी आपापल्या कामधंद्यात असताना त्यांना ते दिवस आठवतात. बाहेर पण तसाच पाउस पडत असतो. खिडकीतून बाहेर बघितली तर गाडी दिसते. तशीच गाडी काढून सर्व मित्र त्याच चौकात भेटायला येतात. तिघांन पैकी एका मित्राची पॅंट वर करायची जी सवय असते ती अजून गेलेली नसते. तसेच फुररर्र्र करत गाडी चालवत गल्लीत फिरतात. शेवटी एकमेकांना येऊन मिठ्या मारतात. मानवी भावनांचे खूप सुंदर चित्रण…

ती जाहिरात माझ्या Youtube च्या साईट वर टाकली आहे.
माझ्या मित्रांना पण हेच सांगावेसे वाटते कि जरा जुन्या आठवणी जागवून पहा. ते तलावपाली वर फिरणे, कॉलेज बंक करून लायब्ररीत जाऊन बसने, बस स्टॉप वर तासनतास बस ची वाट बघत बसने, एक रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे, आणि एक रुपयात सुद्धा किती कमी दिले असे बडबडत सगळे शेंगदाणे खायचे , त्यावेळेला दिवसातून १० ते १२ तास तरी एकत्र असायचो आज सहा महिन्यातून एकदा भेटायला होतेय ते सुद्धा कोणाचाना कोणाचा तरी प्रोग्राम चेंज झालेला असतो. जरा काही आठवत असेल तर बघा आठवून आणि आपापल्या गाड्या कडून या तलाव पाली ला भेटायला.
वरच्या जाहिरातीतील एका मित्राला गीटार वाजवता येत असते. माझ्या पण एका मित्राला गीटार वाजवता येते पण साल्याने कधी मनापासून तिकडे लक्षच दिले नाही. (हा ब्लॉग वाचणारे कुणी नसते तर जरा अजून शिव्या घातल्या असत्या). कधी आमची मेहफिल जमलीच नाही. त्यावेळेला वेळ होता, भेटी होत होत्या पण मजा करायला पैसा नव्हता, आज पैसा आहे तर वेळ नाही आहे भेटायला.

माझ्या सर्व मित्रांना हेच सांगणे आहे कि वेळ काढा आणि जे काही थोडेफार मित्र उरले आहोत आणि जी काही मैत्री उरली आहे ती टिकवून ठेवा. उद्या असे नको व्हायला कि पैसा कमावता कमावता, सर्व मित्रांना सोडून उंच शिखरावर जाऊन पोहोचाल, पण मागे वळून बघाल तर आम्ही शिखराच्या पायथ्याशी पण नाही दिसणार. त्यावेळेला खूप एकटे एकटे वाटेल, मित्रांची गरज भासेल पण जवळ कोणी नसेल….
जमले तर विचार करा…..आणि आपल्या आवडत्या व्यक्ती साठी,मित्रासाठी जरुर वेळ काढा…आयुष्य खूप छोटे आहे आणि वेळ खूप कमी आहे.

लाईफ़ इन आय.टी

लाईफ़ इन आय.टी.…Received it as forward…ज्या अनामिकाने हे लिहिले आहे त्याची दाखल घेऊन तुमच्यासाठी पोस्ट करतोय


कि-बोर्ड च्या बटनांच्या आवाजाने संपुर्ण आसमंत भरुन गेलेला आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव, कायमचाच भरलेला असतो. बाहेरच्या ऍटेंन्डन्स बोर्डला गळ्यातल्या कार्डने नोंद करुन काचेचे दार उघडुन आत आले की हा लगेच तणाव जाणवतो.
भयाणं.. अंगावर दडपण आणणारा..
 
आपल्या मागे काचेचे दार बंद होते आणि आपला आणि जगाचा जणु भौतीक संपर्कच तुटतो. काळ्या काचेच्या खिडकीतुन बाहेरील वेळ कळणे केवळ अशक्यच असते. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.

शनिवार-रविवारची जोडुन आलेली सुट्टी सुध्दा चेहऱ्यावर प्रसन्नता आणु शकत नाही.
इन-बॉक्स मध्ये ऑर्कुट, फेसबुक वर आलेल्या मित्रांच्या नोंदीची मेल्स असतात. पण वाचत बसणे जवळ जवळ अशक्यच होऊन गेलेले असते. कारण साता-समुद्रापार बसलेल्या क्लायंटच्या विकेंड्ची सुरुवात अनेक कामं ऑफ्लोड करुन झालेली असते.
वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी.

कामाच्या दडपणाचे भुत क्षणाचाही विलंब न करता मानगुटीवर चढुन बसते.
बोटं कि-बोर्ड वर सराईतपणे फिरु लागतात. प्रोजेक्ट मॅनेजरची लाल-उद्गारवाचक चिन्ह असलेली महत्वाची मेल प्रोजेक्ट ‘येल्लो फ्लॅग’ मधुन ‘रेड फ्लॅग’ मध्ये गेल्याची बातमी देत असते.
भितीची एक लाट अंगावरुन धावत जाते. कुणाला घाम फुटलेला असतो तर कुणी भितीने आधीच गारठलेले असते. थिजलेल्या शरीराव ए/सी चा थंडगार वारा काटे आणत असतो.

‘कॉफी?’ संगणकाच्या पडद्यावर बाजुच्याच क्युब मध्ये बसलेल्या मित्राचा मेसेज फडफडतो. शरीरावर चढत असलेले दडपण दुर करण्यासाठी तुम्ही उठण्याचा विचार करता, पण समोर साठलेला कामाचा ढीग पाहुन,
‘नो यार, बिट बिझी! लॅटर’
‘ऑल राईट, सी या’
दरवेळी मदतीला हमखास धावणारे गुगल नेमके आजच बावचळल्यासारखे करत असते. मिळणारे अनेक पर्यायांपैकी एकही तुम्हाला उपयोगी पडत नसतो. तासभर प्रयत्न केल्यावर तुमची चाळवा-चाळव सुरु होते. तुम्ही पुन्हा एकदा मान उंचावुन बघता.
संगणकाच्या पटलावर पुन्हा एकदा मेसेज फडफडतो.. ‘कॅन यु कॉल मी नाऊ’ क्लायंट उगवलेला असतो. तुम्ही चरफडता. ‘साले, रात्री झोपत नाहीत का? यांना ना नवरे ना बायका, मोकाट सोडलेल्या वळु सारखे फिरत असतात.’

कॉल सुरु होतो.. तो बोलत असतो, तुम्ही ऐकत असता. कॉल संपतो. तुम्ही चरफडत बाहेर येता. प्रोजेक्ट मध्ये थोडा बदल असतो ज्यामुळे तुम्ही केलेले खुप सारे काम स्क्रॅप झालेले असते. पुन्हा नविन सुरुवात, पुन्हा नविन उमेद.
आठवड्याचे चार दिवस सतत १२-१६ तास काम करुन तुमचा कलीग थकलेला असतो. शुक्रवारी तरी घरी वेळेवर जाऊ या विचारात असतानाच एक ‘एस्कलेशन’ येते. तो जाम वैतागलेला असतो. क्लायंटला कळकळीच्या स्वरात विचारतो, ‘आठवडाभर १६ तास काम केले आहे, एक्सलेशन p2 च आहे, सोमवारी बघीतले तर चालेल का?’
थोड्यावेळाने तुमच्या बॉसला क्लायंटचा फोन येतो, ‘आमचे कॉन्ट्राक्ट तुमच्या कंपनीशी आहे, तुमच्या एखाद्या इंजीनीयरशी नाही. तो १२ तास काम करतो का १६ तास त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, तुम्ही मागता तेवढे पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचे काम वेळेवर करुन हवे.’
शुक्रवारची संध्याकाळ सोडाच, आता शनिवार-रविवार सुध्दा त्याचा राहीलेला नसतो.
‘बाबा मला सायकल शिकवा ना..’ पोराची आर्त विनंती या आठवड्यात सुध्दा अर्धवटच रहाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी तरळते.
दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. बायकोने डब्यात प्रेमाने दिलेले अन्न ए/सी मुळे गारठलेले असते. एव्हाना तुमची खाण्यातुन वासना गेलेली असते. डबा परत कसा न्हायचा म्हणुन तुम्ही कसंबसं पोटात ढकलता.
क्षणभर विरंगुळा म्हणुन आलेल्या स्क्रॅप्स, ट्विट्स, मेसेजेसला तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकता. बॅकेच्या स्टेटमेट्स वर एक नजर जाते. काहीच उरलेले नसते. गलेलठ्ठ दिसणारा पगार इनकम-टॅक्स नामक अक्राळ-विक्राळ भस्मासुराने आधीच गटकलेला असतो. उरलेला पैसा इ.एम.आय ने महीन्याच्या पहिल्या आठवड्यातच उचललेला असतो.
कुणाच्या घरात बारसं, कुणाचे पहिले वाढदिवस, कुणाच्या ऍनीव्हर्सरी, तर कुणाच्या पालकांची साठीचे कार्यक्रम ठरत असतात. तुमच्या दृष्टीने पंचांगाची किंमत शुन्य असते. महत्वाचे असते ते प्रोजेक्ट डेडलाईन्सचे कॅलेंडर.
तुमच्यापैकीच कोणी परदेशात स्थाईक झालेले असता. आपला आनंद, आपले सुख तुम्ही निसर्ग-रम्य स्थळांभोवती, बर्फामध्ये फोटो काढुन, हॅलोविनचे भोपळे हातात घेऊन काढलेले फोटो सोशल-नेटवर्कींग वर शेअर करुन मित्र-मंडळींना जळवु पहाता. तुमच्याकडे बोलण्यासारखे सांगण्यासारखे खुप काही असते. परंतु दिवाळी-दसरा, रक्षाबंधन, श्रावण-सणाला तुमच्याकडचे शब्दच थिजुन जातात. शेअर करण्यासारखे काहीच रहात नाही.
कुठुन आय.टी. मध्ये आलो.. पश्चातापाचा एक विचार पुन्हा एकदा डोक्यात तरळुन जातो. मित्राने एकदा सांगीतलेले असते, ‘अरे तुला माहीत आहे, तो शंकर महादेवन आहे ना, तो संगणक तज्ञ होता आधी!, ओरॅकल मध्ये कामाला होता. पण तो वेळीच बाहेर पडला. आता बघ तो कुठे पोहोचला!.’
तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आठवतात. ‘लकी गाय’, त्याला शक्य झाले, आपणं कधी बाहेर पडु शकतो या जंजाळातुन?
मौत का कुवा! डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होतात. तो मोटारसायकल वाला त्या विहीरीत गोल गोल फेऱया मारत असतो. प्रचंड वेगाने, तेच तेच, त्याच त्याच गोष्टी, परंतु प्रचंड एकाग्रता. एक छोटीशी चुक, एक क्षण विश्रांती आणि होत्याचे नव्हते होऊन जाऊ शकते.
थांबला तो संपला….
समोरच्या भितीवर लावलेल्या अनेक देशांमधील वेळ दाखवणाऱ्या घड्याळांचे काटे फिरत असतात.. न थांबता.
कंटाळवाण्या मिटींग्ज्स, ट्रेनींग सेशन्स, निरर्थक बडबड डोक्यावर आदळत असतात. तुमचा मौल्यवान वेळ वाया चाललेला असतो.
तुमच्याच ग्रुप मध्ये एक नविन ‘बकरा’ रुजु झालेला असतो. आज पहिलाच दिवस असतो. घड्याळात ७ वाजलेले बघुन तो आवरा-आवर करुन बाहेर पडत असतो. तेवढ्यात मॅनेजर त्याला गाठतो..
‘जा रहे हो?’
‘हा सर!’
वेळ माहीत असुनही घड्याळात एक कटाक्ष..
‘अच्छा ठिके.. जाओ.. वैसेभी तुम्हारा आज पहेला दिन है.. आदरवाईज, धिस इज जस्ट अ हाल्फ डे, इजंट इट?’
त्याची ती थंडगार स्माईल पुन्हा एकदा सर्वांगावर काटा आणते..
वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….

कधी संपणार या मालीका ?

हिंदी असो वा मराठी
बहु असो वा बालीका
टिव्ही लावला की
दिसतात त्याच त्याच मालीका
किती वर्षे झाली तरी
सासूचे चार दिवस
काही संपत नाहीत
रोज तेच तेच ऐकूण
पेक्षकांचे कान कसे विटत नाहीत
मालीका पाहुन प्रेक्षक म्हातारा झाला
पण मालीकातल्या सासू अन सुना
दोघीही सारख्याच तरुण दिसतात
मालीकातील सारीच नाती
आतुन पोखरलेली
बहुतेक वरुनच ती तशी भासतात
टीव्ही वर बहु असो वा बालीका
अरे देवा खरच
कधी संपणार या मालीका ?

मी आणि माझी मुलगी…’सई’

मी आणि माझी मुलगी ‘सई’…साधारण सर्व बाप लोकाना मुलीची जास्त माया असते असे म्हणतात आणि  मी अपवाद नाही.. होण्याची सुद्धा अजिबात इच्छा नाही. :).ऑस्ट्रेलिया मध्ये असताना सर्वात जास्त आठवण तिची येते..(बायको अणि मुलाने माफी द्यावी…त्यांच्यावर माया नाही असे अजिबात नाही..पण  ती माझ्यावर खूप अवलंबून आहे…तिच्या प्रत्येक हसण्यामध्ये मला जो आनंद लाभतो ते मी शब्दात सांगू शकत नाही…

 दिपावलीची सुट्टी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच संपली !!! आणि ऑस्ट्रेलिया ला जायचा दिवस आला..मी assignment ला जाताना तिचे रडणारे एवढेसे तोंड बघून मी खूपच उदास होतो…इथे परदेशात बसून मला तिची भयंकर आठवण येते..रडू येते..


Saiee—10 years… 🙂Saiee -7 years…in Herzo,Germany

‘सई’ १ दिवसाची होती तेव्हापासून ते या १९ डिसेम्बर २०१० ला १० वर्षाची होइल.. तेव्हापर्यंतचे सर्व क्षण आठवले की वाटते की मुलगी असलेला बाप सर्वात भाग्यवान..तिच्या वाढदिवसाला मी भारतात नसेन याचे मला अनेक पटीने दुःख होतय..मी एक टिपिकल बाप आहे…कितीही मी वयाने मोठा झालो किवा ती मोठी झाली तरी हे असेच चालणार.शेवटी सर्व ठीक आहे की मुलांसाठी सर्व करावे लागते ..(अहो सर्व थिअरी मला सुद्धा माहीती आहे..पण जाताना जे दुःख होते ते फार वाईट असते..)


जेव्हा सई जन्मली तेव्हा म्हणजे १९ डिसेम्बर २००० मध्ये तेव्हाची गोष्ट ..
बाप झालो आणि दुसर् या दिवसापासून काही लोकांनी सल्ले द्यायला सुरुवात केली ’हुंड्यासाठी पैसे जमवा आता’…’आता दुसरा मुलगा पाहिजे.’…(आता हे काय आत्ता सांगायची वेळ आहे??…पण नाही)
ख्ररे सांगू?…मला तर जुळ्या मुली हव्या होत्या..मजा आली असती..
चांगल्या गोष्टी तर बर्र्याच आहेत…पहिली मुलगी धनाची पेटी म्हणतात ते काही खोटे नाही कारण नंतर दिवस पालटले चांगली नोकरी मिळाली सर्व आलबेल झाले…आता कसे हा लेखाचा विषय नाही पण जी लोक मुलगी झाली म्हणून नशिबाला बोल लावतात ते सहस्त्र मूर्ख आहेत असे माझे प्रांजळ मत आहे आणि कोणाला ते भोचक वाटले तरी मी ते बदलणार नाही…असो..

आर्थिक स्थिति बेतास बात होती २०००-२००४ पर्यंत  म्हणजे सर्व साधारण मध्यम वर्गीय लेट twneties मधील माणसाइतकी.15k पगार होता.अजुन ही वाटते तिला अजून काही देता आले असते तिच्या बऱ्याच हौशी राहून गेल्या त्या वयातल्या.. म्हणजे चांगली खेळणी वगैरे.. आता द्यायचा प्रयत्न करतो पण त्या आधी न मिळाल्य़ाने तिला फार खर्चिक हौशी नाहीयेत..त्याने झालेय  काय की आता तिचा काही हट्टही नसतो..    जे मिळेल त्यात आनंदी …  आता तुम्ही म्हणाल…त्यात काय वाईट आहे…चांगले आहे की!!.पण माझे  बापाचे मन स्वस्थ बसू देत नाही ना!!


६ महिन्याची असताना तिला Primary Congenital Glaucoma झाला आणि  तिचे आणि आमचे आयुष्य एकदम बदलले..पुढचे ६-७ वर्ष तिच्या असंख्य टेस्ट्स आणि औषधे यात गेला..पण त्यातून ती बाहेर आली…यामध्ये तिचा आणि माझ्या बायकोचा मोनालीचा सिंहाचा वाटा आहे..उरलेला तिच्या ३-४ डॉक्टरांचा …थोड़ा माझ्या insurance च्या पैश्यांचा..देवाचा तर फार मोठा वाटा आहे..तो होण्यामध्ये आणि बरा होण्यामध्ये सुद्धा!! आता Primary Congenital Glaucoma  म्हणजे काय??
कृपया कंटाला न करता वाचले तर बरे होइल ..
—————————————————————————————————–
By definition, primary congenital glaucoma is present at birth. It is usually diagnosed at birth or shortly thereafter, and most cases are diagnosed during the first year of life. However, sometimes, its symptoms are not recognized until later in infancy or into early childhood.
Primary congenital glaucoma is characterized by the improper development of the eye’s drainage channels (called trabecular meshwork). Because of this, the channels that normally drain the fluid (called aqueous humor) from inside the eye do not function properly. More fluid is continually being produced but cannot be drained because of the improperly functioning drainage channels. This leads to high pressure inside the eye, called intraocular pressure (IOP).
Eye pressure is measured in millimeters of mercury (mm Hg). Normal eye pressure ranges from 10-21 mm Hg. Elevated IOP is an eye pressure of greater than 21 mm Hg. An increase in IOP can damage the optic nerve and result in vision loss and even blindness.
In approximately 75% of cases, primary congenital glaucoma is bilateral, that is, it occurs in both eyes.
Primary congenital glaucoma occurs more often in boys than in girls, with boys accounting for approximately 65% of cases.
———————————————————————————————————–
हे सर्व लिहिण्याचा उद्देश असा होता की सर्व पालक वर्गाने जागरूक रहावे…काचबिंदू फ़क्त आजी आजोबांनाच होतो असे नाही..इन्टरनेट वर याची बरीच माहिती उपलब्ध आहे..  ती वाचा..

बर हे झाले काही वाईट दिवस विषयी पण चांगल्या गोष्टी तर किती सांगू..

सई मुळे आमच्या आयुष्यात आनंद,पैसा,सुख,समृद्धी सर्व आले..तिचे सर्व बोलणे ऐकताना इतके छान वाटते की दिवस भराचा कंटाळा निघून जातो…
‘बाबा’ म्हणून जो काही आनंद असतो तो काही  वेगळाच आणि सई सारखी मुलगी नसती तर मला तो मिळाला नसते हे नक्की..तिला याबद्दल काय सांगू..कदाचित  तिला हे कळणार पण नाही तरी सुद्धा मी म्हणेन की माझ्या अणि मोनालीच्या घराला सईने जो आकार अणि अर्थ दिला तो दुसरया कशानेच मिळाला नसता..सयुडया…तुझ्यावर तुझ्या आई बाबांचे अतिशय प्रेम आहे…अजुन काय लिहू..लिहिताना डोळ्यात पाणी जमा झाले आहे..मला शब्द सुचत नाहीत नाहीतर अजून लिहिले असते…

एकदाचा शपथविधी झाला

महाराष्ट्राच्या जनतेला
नविन सरकार बद्दल
अनेक प्रश्न पडले होते
पण नव्या सरकारचे घोडे
संख्येवरुन अडले होते
एकदाचा शपथविधी झाला
आता महाराष्ट्राच्या विकासाची
घोषणा ही ते करतील
नवे मंत्री मात्र
जुन्यांचा आदर्श घ्यावा
की नवाच मेवा खावा
या विचारात पडतील

ओबामांना प्रश्न पडला..

ओबामा आले
आम्ही दाखवलेला देश पाहुन खुश झाले
हा देश महासत्ता होणार असे बोलुन गेले
इथे तर अनेक घोटाळे करुन
नेते पांढ-या कपड्यात सजले होते
ओबामांना हार घलणा-या अनेक नेत्यांचे
आदर्श सोसायटी मध्ये मजले होते
अमेरीकेत गेल्यावर त्यांना हे कळाले
तेव्हा त्यांना प्रश्न पडला
नेत्यांनी इतके घोटाळे करुनही
हा देश दिमाखात उभा कसा राहीला
त्यांना काय माहीत
नेते कसेही असले तरी
या देशातील जीगरबाज जनतेनेच
खरं तर हा देश आजपर्यंत सांभाळला

माझ्या मनाला वाटतील त्या विषयावरील या चारोळ्या..

१) डोंबारीन

दोरीवरुन चालताना
डोंबारीन खाली कधीच पडत नसते
कारण दोरी एवढाच रस्ता आहे
ही जाणीव तिने जपलेली असते…

२) सारं कसं छान आहे..

ओबामा आले आणि म्हणाले
या देशात सारं कस छान आहे
त्यांना काय माहीत
इथे तर घोटाळ्यांच रान आहे

३) पाऊस रे...

पावसाने माझे मन ओलेचिंब भिजले,
मनातील कोरडेपण मग जागीच थीजले,
पावसाच्या धारा अनं भिरभिरणारा वारा,
मनातील भावनांचा मग फुलेल पिसारा …

(यावर्षी पाऊस खुप झाला,पावसाळ्याच्या सुरुवातीला या चार ओळी सुचल्या होत्या)

मैसूर ऊटी भाग ८ / Mysore Ooty Part 8

मैसूर ऊटी भाग ८ / Mysore Ooty Part 8

दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे दृश्य / View from Doddabetta Valley
निलगिरी सुपर मार्केट – जेथे तुम्ही निलगिरीचे तेल आणी इतर प्रोडक्ट, चोकलेट खरेदी करू शकतात. इतर दुकानांपेक्षा इथे सर्वात स्वस्त वाटले. हे दुकान उटी लेक च्या बरोबर समोर आहे.
Nilgiri Super market where you can buy Nilgiri products, Chocolates and many other things in reasonable cost. This shop is situated exactly opposite of Ooty Lake.
उटी लेक चे प्रवेशद्वार / Entrance for Ooty Lake
उटी लेक / Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग /Boating in Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग / Boating in Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग /Boating in Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग /Boating in Ooty Lake
उटी लेक मधून दिसणारे दृश्य / View from Ooty Lake
रेशमी केसांचा शुभ्र घोडा/ Nice white horse with silky hair
रेशमी केसांचा शुभ्र घोडा/Nice white horse with silky hair
उद्यानातले झाड / In a garden
उद्यानातले झाड /In a garden
उद्यानातले झाड /In a garden
उद्यानातले झाड /In a garden
उद्यानातले झाड /In a garden
In a garden
फुलझाडे / flower plants
फुलझाडे / flower plants
फुलझाडे / flower plants
फुलझाडे / flower plants
फुलझाडे / flower plants
हृदयाच्या आकारात ठेवलेली फुलझाडे /Heart Shape flower plants
फुलांचे केक / Flower’s Cake
अगणित फुलांची झाडे / unlimited flower plants
Posted by Picasa
एक २५ वर्षाचे बोन्झाई झाड/25 year old Bonzai
बोन्झाई झाड/ Bonzai
बोन्झाई झाड/ Bonzai
बोन्झाई झाड/ Bonzai
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा / View from hotel room on next day early in the morning
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा / View from hotel room on next day early in the morning
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा / View from hotel room on next day early in the morning
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा /
View from hotel room on next day early in the morning
तामिळनाडू राज्याचा उपमुख्यमंत्री …एकदम स्टायलिश /
Tamilnadu Deputy Chief minister…look at his style
माईंड इट… / Mind it……
एक निसर्गरम्य जागा जेथे बहुतांशी सिनेमाची शुटींग होते /one of the sight point most of the Hindi films shooting is done here.
एक निसर्गरम्य जागा जेथे बहुतांशी सिनेमाची शुटींग होते/ one of the sight point most of the Hindi films shooting is done here.
एक निसर्गरम्य जागा जेथे बहुतांशी सिनेमाची शुटींग होते. आठवतंय हिरो आणि हिरोईन दोन्ही दिशांनी धावत येतात आणि …..
one of the sight point most of the Hindi films shooting is done here. Remember Hero and Heroine runs from opposite end and….
Shooting place
वाटेत लागलेले एक धरण / Dam on the way
निलगिरी पर्वतावरून जाताना / passing through Nilgiri hills
उंच वाढलेल्या निलगिरी झाडांचे जंगल. इथे रावण सिनेमाची चे शुटींग झाली होती. /
Nilgiri Trees grows straight in the sky. Raavan movie shooting is done here only.
उंच वाढलेल्या निलगिरी झाडांचे जंगल. इथे रावण सिनेमाची चे शुटींग झाली होती. /
Nilgiri Trees grows straight in the sky. Raavan movie shooting is done here only.

चाळीस लाखाचा इमला..

माहीतीच्या अधिकाराने आता
एक नेताही नाही सोडला
नव्या मुख्य्मंत्र्यांचा
चाळीस लाखांचा बंगला
त्यांना की हो लगेच गावला

मूलालाबा अणि नूसा बीचेस

शनिवारचा प्रोग्राम भटकायचा…येथे ब्रिसबेन जवळ दोन सुंदर बीचेस (समुद्रकिनारे हो……उगाच कुस्करा नको शब्दाचा…)
एक आहे मूलालाबा अणि दुसरे नूसा …कसली हो ही विचित्र नवे…मला अगदी अफ्रिकेत  आल्यासारखे वाटले..पण भारी आहेत…सकाळी सकाळी भल्या फाटे फाटे एक Subaru 2.5 Outback ही स्टेशन वागन भाड्याने घेतली…ऑस $ १५० ला..पाच लोक होतो टोटल…१००-११० केएम/अवर ने पोचलो मूलालाबाला…१-१/२ तासामधे ब्रिसबेनपासून

बघा जरा फोटो…
Moolalaaba & Noosa photos