आता सारे शांत शांत

आता कसे सारे शांत शांत होईल

मेघ दाटून येतील, पाऊस ही बरसेल
मग सारी सृष्टी निवांत होईल

जलधारांनी या धरणीची आग शमेल
मग उन्हाळी ऋतूचा सुखांत होईल

दु:खाचे मळभ जाईल, नभ सावळे होईल
मग ही धरणी सुखाचा प्रांत होईल

उन्हे कोवळी पसरतील, इंद्रधनू उतरेल
या धरेवरी मग स्वर्गाचा भ्रांत होईल

-काव्य सागर

कारणे घ्या..

मी कविता करतो कारण…
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण…
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण…
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण…
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण…
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण…
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण…
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण…
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण…
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण…
…कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर

लाचारी

आजपर्यंत कायम ताठ मानेने जगत आलो
कधीच हार मानली नाही
कधीच लाचारी पत्करली नाही
कधीच परिस्थितीपुढे हात टेकले नाही…

…पण हल्ली कविता करायला लागल्यापासून
खाली मानेने निमूटपणे लिहित चाललो आहे
-काव्य सागर

पणजी टू कारवार व्हाया नॅशनल हायवे १७ !

( मी अणि जसजीत)


पणजी टू कारवार व्हाया नॅशनल हायवे १७ !

गेल्याच महिन्यात कॉलेज च्या मित्रांबरोबर गोवा च्या सहलीला गेलो होतो ! त्यासाठी आम्ही “Fzee bike” अणि “Activa” घेतली होती ! सहल उत्तम झाली .. ! त्यातील सर्वात अविस्मरनीय आठवण सांगू इच्छितो ! आम्ही “कोल्वा ” बीच ला जाण्याचे ठरवले जे कारवार ( कर्नाटक) पासून अगदी जवळ म्हणजे २० किमी वर आहे ! गोवा चे शेवट म्हणजे जवळ जवळ हे बीच ! तर आता आम्ही आमच्या “activa ” ने तीथे जाणार होतो ! जवळ पास सगले सामान घेतले.. पेट्रोल फुल भरले अणि निघालो “कोल्वा बीच ” कड़े ..

( आमचा कॉलेज च्या मित्रांचा ग्रुप )

आम्ही असा रास्ता ठरवला होता बागा – कलंगुटे-पणजी- अणि इथूनपुढे ओल्ड गोवा करून पुढे कोल्वा.. अणि वेळ मिलला तर कारवार ! असे करत आमची “Activa” निघाली ! “Activa ” माझा मित्र “जसजीत ” चालवत होता ! वास्तविक आम्ही असे ठरवले होते की गाड़ी चालवून जर का तो थकला तर मी चलावणार अणि मी थकलो तर तो चलावणार .. पणजी सोडून ( कारन माझ्या कड़े गाड़ी चालवायचा परवाना नाही .. अणि पणजी मध्ये पोलिस असतात .. जसजीत कड़े परवाना आहे खास गोवा ला फिरन्या साठी त्याने तो काढला ! ) असे करत अगदी आम्ही पणजी ओलांडून ओल्ड गोवा ला आलो !

( आम्ही ओल्ड गोवा ला असताना )

आम्ही ओल्ड गोवा बघितला .. आता दुपार झाली होती.. उन कडाक्याचे होते .. जसजीत ने “Activa” काढली ! आता आम्ही “कोल्वा ” बीच ला जात होतो .. आम्हाला आता नॅशनल हायवे १७ लागला होता .. ! तीथे बीच बद्दल विचारना केलि तर कलले की आता आम्हाला आधी फोंडा ला जावे लागणार अणि नंतर कोल्वा बीच ला ! असे करत करत चुकून “Longcurt” घेउन आम्ही फोंडा पर्यंत पोहोचलो कसे बसे.. परन्तु आता मात्र सकाळ पासून “Activa” चालवत असलेला जसजीत पार थकला.. पणजी च्या बाहेर आल्याने आता गाड़ी चा ताबा मी घेतला ! अणि सुसाट वेगाने महा मार्गावर गाड़ी काढली ! परन्तु मला माहित नव्हते की माझ्या वाट्याला आलेल्या १५-१६ किमी चे अंतरात भरपूर ट्राफिक येणार आहे ! आता बीच जवळ जवळ येऊ लागले होते .. आम्ही १०० किमी चा प्रवास तर नक्कीच केला होता .. ! महामार्गा वर दुर्दैवाने ट्राफिक होती .त्यामुले मना सारखी गाड़ी पलवता आली नाही ! ८ वाजता बीच जवळ पोहोचलो !
( कोल्वा बीच वर रात्री ८:३० ला मी ! )

रात्र झाली .. आता काय करणार म्हणून हताश बसण्या पेक्षा .. आम्ही रात्रि ८:३० च्या सुमारास पाण्यात उड्या मारल्या .. अणि अगदी १ तास मनसोक्त बीच वर पोहत बसलो ! आमचे हे अजब -गजब धैय्र पाहून बाकीची मंडली सुद्धा आली ! अणि अगदी मनसोक्त पोहून झाल्यानंतर भूक लगली नशिबाने समजले कि इथून ५-१० मिनिटाच्या अंतरावर “Dominose Pizza” आहे .. ! मग तिथेच रात्रीचे जेवण केले .. ! अणि आता आमच्या पुढे एकाच लक्ष होते ” कारवार” कारण आता परत काही आम्ही एवढ्या लांब येणार नव्हतो ! काढल्या गड्या परत सुसाट .. ! अणि पोहोचलो थोड्याच वेळात !

आता सुरु झाला सर्वात कठिन अणि सर्वात अविस्मरनीय परतीचा प्रवास ! जसजीत च्या अंगात जणू भुतच चढले होते अन तो बोलला की आता मी चलावणार ! मी होंकार देऊन मागे आराम करण्याचे ठरवले ..! आता आम्ही महामार्गाच्या छोट्याश्या रस्त्यातून ८० च्या स्पीड ने जात होतो.. रत्यावर लाइट नव्हत्या .. की पुलिस नव्हते .. ! आम्हाला गरम होत होते . म्हणून आम्ही आमचे कपडे कडून फ़क्त “Half Pant” वर गाड़ी चालवत होतो.. रात्रीच्या अंधारात सुसाट वेगाने जात असताना वार्याची मंद झुलुक अंगाला स्पर्श करून जात असे.. अणि डोळे बंद केले की आपण कोणा वेगळ्या जगात तर नाही ना असेच वाटायचे.. ! आता आम्ही सगले ८ ही जन रांगेत जात होतो.. सुसाट .. वेगात .. अणि बघता बघता अर्ध्या तासात पणजी आले सुद्धा ! आम्हाला सकाळी यासाठी जवळ जवळ १ तस १५ मिनिटे लागला होता .. तेच अंतर आम्ही आता अर्ध्या तासात गाठले.. ! अणि पणजी शहराच्या ब्रिज वर आराम करण्या साठी थाम्ब्लो.. तेव्हा देखिल “विदाउट शर्ट” होतो !
( पणजी ब्रिज वर घेतलेला होल्ट )
आता पर्यंत चा अविस्मरनीय प्रवास केला होता .. .! आता १५ किमी बाकि होते बाघा बीच म्हणजेच आमचे होटल पणजी पासून ! आता जवळ जवळ सगलेच थकले होते .. फटाफट गाड़ी चालू करून आता आम्ही आमच्या होटल ला जायची तयारी करत होतो..! तेव्हा वाटले की खरेच हे क्षण कधी न विसरानारे आहेत ! कॉलेज मध्ये असना कधी असा विचारही नाही केला होता की एखाद्या दिवशी मित्रां बरोबर गोवा ला जाईन.. अणि असा रात्रीचा “Adventures” प्रवास करीन.. विचार करत असताना होटल केव्हा आले ते कलले देखिल नाही !

पाठलाग !


पाठलाग !


दिलेली ठराविक कामे उरकून मित्रांना भेटायला निघालो होतो… तेव्हढ्यात समजले की मित्र रहायला येणार आहेत . . . थकलेला असा मी आता त्यांची सेवा करण्यात व्यस्त होणार होतो ! एवढ्यात आमच्या ग्रुप मधील १ मित्र मणिन्द्र ज्याच्याकडे “ब्लेज़” नावाची १२५ सी सी क्षमतेची २ व्हीलर होती ! तिच्या वरुनच आता आम्ही आज रात्रि साठी जरुरीचे सामान आणायचे ठरवले ! वास्तविक मणिन्द्र कड़े गाड़ी चालवायचा परवाना होता ! पण पुढे काय होणार होते हे माझ्या तेव्हा लक्ष्यात आलेच नाही !

चांगले सामान मिळते म्हणून “मुलुंड वेस्ट ” च्या बाजाराची ख्याति होती ! म्हणून मुलुंड वेस्ट लाच जायचे ठरवले ! त्याप्रमाणे तयारी करून आता आमची “ब्लेज़” ब्रिज उतरून रस्त्याला लागली होती… अणि आता आम्हाला “मुलुंड वेस्ट” ज्यासाठी सर्वात अधिक प्रसिद्ध आहे ती त्याची ” ट्राफिक” लागली अणि अचानक आमचा स्पीड ५० वरून १० वर आला ! आता आम्हाला या ट्राफिक बरोबरच चालायचे होते .. अणि आमचे दुकान लागले….पण प्रॉब्लम असा होता ते आमच्या उजवीकडे होते .. अणि उजवीकडे सरळ जावे तर ती ” नो एंट्री ” होती ! परन्तु तरीही सगले धाडस एकत्र करून आम्ही ” नो एंट्री मध्ये ” शिरलो ! जरा पुढे गेलो.. अणि सध्या वेशातले २ पोलिस ( ट्राफिक पोलिस नाही) आमच्या समोर उभे राहिले.. आम्ही जसे कही मुंबई वर अतिरेकी हल्ला केला आहे अश्या आवेशात ते जणू आमच्या कड़े पाहत होते ! त्याच्या चेहर्यावरचे भाव लागलीच आम्हाला समजले ! आम्ही आजची सर्वात मोठी चुक करून बसलो होतो याची जाणीव मला आता झाली !

आता नेहमी प्रमाने त्यानी आमच्या कड़े आमच्या परवान्याची मगनी केलि.. ती मणिन्द्र ने लगेच परवाना दाखवून पूर्ण केलि नंतर त्यानी जरा नाखुशिनेच कागदपत्रांची मागणी केलि..परन्तु ती कही आमच्या कड़े नव्हती ! आम्ही पुर्तेच अडकले होतो.. आम्ही गयावया करणार एवढ्यात ते म्हणाले ” चल चल गाड़ी चौकिला लाव ” मुलुंड वेस्ट ची चौकी क्षणात माझ्या डोळ्या समोर आली.. सगळ्यात महत्वाह्चे म्हणजे मुलुंड ची ही एकाच चौकी आहे जिला “जेल” आहे ! म्हणजे आजची रात्र जेल मध्ये जाणार.. विचारानी मी अणि मणिन्द्र पुरते हैरान झालो होतो .. पण आम्ही एकटे नव्हतो आमच्या बरोबर अजुन ३ चालक होते ! तेव्हढ्यात मणिन्द्र मला गुपचुप बोला.. बोल निनाद सटकूया का ? अणि क्षणाचा ही विचार न करता मी उत्तर दिले हो ! त्या पोलिसनी आम्हाला गाड़ी त्यांच्या मागे आणायला सांगितली… त्याप्रमाणे आम्ही परत गाड़ी सुरु केलि.. पोलिस + ३ चालक + नंतर आम्ही असे जात होतो …मगाशी सांगितल्या प्रमाणे आम्ही तिथून पलुन जायचा प्लान ची अमल- बजवनी करणार होतो.. अणि इतक्यात पोलिसांची नजर चुकवून……… आम्ही सटकलों !

आता सुरु झाला होता पाठलाग.. ताम्बे नगर च्या चिंचोल्या गल्लीतून हा मणिन्द्र जवळ जवळ ६०-७० च्या वेगाने गाड़ी पलवत होता .. आम्हाला पाठी बघण्याची हिम्मत झालीच नाही … फ़क्त आता लक्ष दिसत होते .. घर घर घर . बस .. मला घर गाठायचे आहे लवकरात लवकर.. आता थामबलो तर संपलो.. बस घर आता हलू हलू जवळ येत होते .. बाज़ार संपला.. ब्रिज लागला… गाड़ी चौकातून ना घेता आडवलना तुन घेत होतो.. अणि शेवटी १ कर्कच्चुन ब्रेक मारून मणिन्द्र ने गाड़ी थाम्बवली..त्याचे घर आले होते काहिश्या विजयी मुद्रेने आम्ही एकमेकां कड़े बघितले.. अणि आपण हे अग्नि दिव्य पार केले हे काही मी जणू विसरुनाच गेलो होतो ! आता ख़ुशी खुशीत … जोर जोरात हसत आम्ही गाड़ी लावून घराच्या दिशेने चालत होतो.. पुढच्या वेलेस गाडीत कागदपत्रे ठेवायचे वचन मला मणिन्द्र ने दिले.. धापा टाकत टाकत आम्ही माझ्या घरच्या रस्त्या कड़े जात होतो.. आमचा हसण्याचा आवाज अजुनही ऐकू येत होता !!!

का वाटवी मातृभाषेत शिकण्याची लाज?


सध्या जिकडे-तिकडे निकालांची चर्चा सुरू आहे.थोड्याच दिवसांत आपल्या पाल्यांच्या अॅडमिशनसाठी पालकांची धावपळ सुरू होईल.मग अनेक सल्ले येतील.आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायला पाहिजे हा नवीन अट्टहास सध्या जिकडे तिकडॆ सर्रास बघावयास मिळतो.अगदी रोजंदारीच्या कामावर जाणारा देखील म्हणतो की नाही मुलाला इंग्लिश मिडियममध्येच टाकायचे.
याचे परिणाम हळूह्ळू दिसायला सुरवात झाली आहे.महानगरपालिका-झेड.पी.च्या शाळा ओस पडतायत, तर दुसरीकडे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळॆत बेमाप डोनेशन्स भरून केजीच्या प्रवेशासाठी दिवस-रात्र रांगेत उभे राहण्यासाठी लोक तयार आहेत.नुकतेच मुंबईत इंग्रजी माध्यम्याच्या शाळांची संख्या मराठी माध्यमांच्या शाळांच्या संख्येपेक्षा अधिक झाली.ज्या मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी १०५ जण हुतात्मे झालेत,तेथे मराठीची ही दयनीय अवस्था बघून या १०५ आत्म्यांना कदाचित आपले बलिदान व्यर्थ गेल्यासारखे वाटत असेल.
खरंतरं मातॄभाषेतून घेतलेले शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण मानले जाते.आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.कलाम,अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर,महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे या असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींनी देखील आपले प्राथमिक शिक्षण आपल्या मातॄभाषेतूनच घेतलेले आहे.शिवाय त्यांचे आजचे इंग्रजीवरील प्रभुत्त्व देखील आपण सर्व बघतच आहोत.परंतु आजकाल नवनवीन समजूतींमुळे लोक नको त्या गोष्टीकडे जास्त आकर्षिले जातात.असेच जर चालू राहिले तर उद्या कदाचित व्यवस्थित मराठी येणारा वर्ग या शिवाजी महाराजांच्या आपल्या १० कोटी जनतेच्या महाराष्ट्रात शोधावा लागेल.जगात प्रत्येक ठिकाणी आपल्या मातॄभाषेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले जातात.आपल्याकडेही असे प्रयत्न होतायेत,गरज आहे प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची!

नेताजी जिवंत आहेत काय ?


नेताजी जिवंत आहेत काय ?

( टिप – पोस्ट च्या सुरवातीला दाखवलेले छायाचित्र हे नेताजिंचे सयगाव [japan] येथे घेतलेले अखेरचे उपलब्ध छायाचित्र आहे ! )
नेताजी सुभाषचंद्र बोस ! त्यांची महानता शब्दात मोजणे अशक्य आहे ! याच नेताजिंवर आज अनेक पुस्तके लिहिली गेली.. पण त्यांच्या मृत्यु वर मात्र अतिशय कमी चर्चा केली गेली ! अणि दुर्दैव म्हणजे जी कही थोड़ी फार माहिती उपलब्ध आहे ती इंग्लिश व् इतर भाषांमध्ये आहे ! मराठीत फारशी माहिती उपलब्ध नाही ! म्हनुनच मी आपल्या समोर याच संदर्भातील काही माहिती उपलब्ध करून देत आहे ! नक्कीच माझी ही मेहनत वाया जाणार नाही !

सरकारी आकड्या प्रमाने नेताजी सुभाष चन्द्र बोस हे १८ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात मरण पावले . परन्तु काही लोकाना मात्र हे पटत नाही !
1) नेताजिंविशायी अनेक समज गैरसमज आहेत . काहींच्या मते हा एक पूर्वनियोजित कट असावा जेणेकरून काही दिवसं साठी नेताजी भूमिगत व्हावे
2)काहींच्या मते तर ते जापान ला न जाता रशियात गेले.. तसेच स्वतंत्र मिळून देखिल काही काळ ते रशियाताच राहिले !


नेताजिंचा भारतातील शोध
( टिप – या फोटो मध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की १ बौध भिक्हू नेहरुना पुष्प अर्पण करत आहे ! हे बौध भिक्हू म्हणजेच नेताजी असा समज आहे ! )
१) पंडित जवाहर लाल नेहरूंच्या निधनाच्या वेळेस नेताजी सुभाष चन्द्र बोस याना पाहिल्याचे बोले जाते तसा उपलब्ध फोटो देखिल आहे . तो मी या पोस्ट बरोबर टाकला आहे ! आपण स्वताहाच खातरजमा करून पहावी ! वास्तविक असे अनधिकृत रित्या बोले जाते की भारतातल्या काही बड्या नेत्यां मुले नेताजिना असे रहावे लागले ! डाव्या बाजूला असलेली व्यक्ति हे स्वामी श्रधानंद ( नेताजी ? ) आहे असे बोले जाते .. जर नेताजिंचा मृत्यु १८ ऑगस्ट १९४५ ला झाला आहे तर हे इथे १९६४ च्या दरम्यान कसे पोहोचले ?
(यांच्या चेहर्याची खातरजमा करण्यासाठी हा फोटो अवश्य पहावा !)
२) काही हिन्दू लोकांच्या मते नेताजी हे उत्तर प्रदेश मधल्या फैजाबाद येथे “राम भवन ” नावाच्या जागेत रहत असत ! काही लोक यानाच ” गुमनामी बाबा” असे म्हणत असत . यांच्या विषयी सुद्धा अनेक शंका आहेत ! यांचा १९८५ रोजी मृत्यु झाला ! यांच्या मृत्यु च्ये वेळेस अजीब घटना घडली ती म्हणजे यांचा चेहर्यावर “आम्ल” [acid ] टाकण्यात आले होते जेणेकरून यांची ओळख लपलेली रहावी ! याच गुमनामी बाबाना नेताजी मान्यत आले ! येथील काही बंगाली लोग आजही नेताजिंचा जन्मोत्सव साजरा करतात , आपण विचार कराल यांचे पुढे काय झाले .. तर याच गुमनामी बाबांच्या कहानी वर अधिक माहिती टाकण्यासाठी “जस्टिस मुखर्जी कमीशन ” चे नेमणूक करण्यात आली ! यांच्या अहवालानुसार गुमनामी बाबा म्हणजे नेताजी नव्हेच असा निष्कर्ष काढण्यात आला !
( टिप – गुमनामी बाबांचा फोटो जरी उपलब्ध नसला तरी त्यांच्या समाधी चा फोटो देत आहोत )
३) भारतातील असेच १ सन्यासी विषयी ते नेताजी असल्याचे बोले जात होते. परन्तु त्याची माहिती मी इथे देणार नाही . कारन माझ्या माहिती प्रमाने लिखित स्वरूपात ही माहिती उपलब्ध नाही अणि या दुसर्या साधून बद्दल १ आखी विडियो मलिका उपलब्ध आहे जी आपण जरुर बघावी !
त्याचा पत्ता येथे आहे !
नेताजिंचा परदेशातील शोध

१)१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजिंचे विमान अपघातात निधन झाले त्यानंतर त्यांच्या अस्थि या जापान मधील (टोकियो) “रेंकोजी मदिरत ” ठेवल्या आहेत असा दावा करण्यात आला होता ! अधिक माहिती नुसार १८ सप्टेम्बर १९४५ रोजी रात्री ८ वाजता त्या या मंदिरात ठेवण्यात आल्या ! यानंतर भारताच्या अनेक नेत्यानी या मंदिराला भेटी दिल्या ! यात सगले पाहिले होते पं. नेहरु (?) ऑक्टोबर १९५७ रोजी . नेताजिंच्या परिवराचा मात्र यावर विश्वास नाही की त्यांच्या अस्थि या “रेंकोजी” मंदिरात ठेवल्या आहेत !
(टिप – हेच ते रेंकोजी मंदिराचे छायाचित्र आता येथे नेताजिंचे स्मारक उभारण्यात आले आहे, दावा करण्यात आला की या मंदिरात नेताजिंच्या अस्थि ठेवण्यात आल्या आहेत )
२) कही जनांच्या मते “त्या” दिवशी कोणत्याही विमानाचे उडान झाले नव्हते .. तर मग नेताजी ना मृत्यु आलाच कसा ? जर ते विमानत बसलेच नाही ? त्यावेलेस जापानी अधिकार्यानी अनेक हिंदुस्थानिना नेताजिंच्या मृत्यु ची कथा सांगितली होती !

३) स्वतंत्र भारतात नंतर अशी बातमी आली की सुभाश्बबुन्शी सम्बंधित काही पत्रव्यवहार समोर आले आहेत.. या बद्दल ची सगळी माहिती आपल्याला येथे मिलु शकते !
माझे काही प्रश्न !
१) जर नेताजी खरेच जिवंत होते तर ते १५ अगस्त १९४७ नंतर परत का नाही आले ?
२) जर ते परत आले तरी पण त्यानी साधू रूप का धारण केले ?
३)स्वतंत्र भारतात त्याना कोना पासून धोका होता ?
४)जर ते जिवंत असते तर , स्वतंत्र संग्राम चालू असताना ते अचानक का गायब झाले ?
५)स्वतंत्र नंतर त्यानी आपल्या परिवराशी का संपर्क साधला नाही ?
६) काही जनाच्या मते ते रशिया ल गेले . का गेले असावे?
७)ते भारतात का परत येऊ शकत नव्हते ?
८)जर गुमनामी बाबाच सुभाष बाबु होते तर ते ८८ वर्ष जगले ?
९) सत्ताधरी कोंग्रेस पक्षा नंतर देखिल वेगले सरकार आले तेव्हा देखिल ते का प्रगट नाही होऊ शकले ?
१०) अपघाताच्या वेलेस्ची महत्वाची कागदपत्रे कुठे आहेत ?
११) नेताजी आपल्या पत्नीशी आपल्या अस्तित्वा बाबत का नाही सांगू शकले ?
१२) नेताजिंच्या अस्थि नक्की कुठे आहेत ?
१३)नेताजिंच्या अस्थिंचे DNA टेस्टिंग नेताजिंच्या परिवाराच्या व्यक्तिन्बरोबर का नाही केले ?
१४) की खरेच नेताजिंचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात मृत्यु झाला ?

या व् इतर काही प्रश्नांची उत्तरे मिलाल्यास नेताजिन विषयीचे कोड़े नक्की सुटेल.. ! सध्या तरी नतमस्तक होउन अभिवादन करणे हेच आपल्या हाती आहे ! जय हिंद !

नेताजिंविश्यी काही चांगल्या LINKS …आपण फ़क्त टिचकी ( click) मारा !


माझा हा छोटासा प्रयन्त , तसेच ही छोटीशी मेहनत नक्कीच वाया जाणार नाही अशीच अपेक्षा करतो ! तसेच आपल्या मतांचे स्वागत आहे ! जय हिंद !