फक्त सक्तीने काय होणार?


कालच आमच्या घरी थोड्याशा बांधकामानिमित्ताने आलेल्या कामगारांमध्ये एका लहान १३-१४ वर्षांचा मुलाला बघितल्यावर मी त्याचाशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केला असता मला समजले की,त्या मुलाने चार वर्षांपूर्वी पाचवीत असताना शाळा सोडली….. आणि तो सध्या बांधकामाच्या ठिकाणी वाळू/खडी वाहण्याचे काम करतो.लगेच मला आठवले की नुकताच भारत सरकारने शिक्षण सक्तीचा कायदा पास केला आहे आणि मनात विचार आला कदाचित उद्याही हीच परिस्थिती असली तर काय उपयोग होणार या कायद्याचा?
आज जरी बालमजूरांना कामावर ठेवणे गुन्हा असले तरी आपण हॉटेल,दुकाने,बांधकामे अशा सर्वच ठिकाणी बालमजूर राबताना सर्रासपणे दिसतात.इतकेच काय तर अगदी पोलीस स्टेशनसमोर परिसरात देखील असेच दृश्ये असतात.यावर विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की नुसते कायदे करून काही होत नाही.आपणास लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावला पहिजे.ज्यांना दोन वेळ्चे जेवण धड नीट मिळत नाही ते काय शाळेत येणार?आणि शिवाय कसेबसे आलेच तर या महागाईच्या शिक्षणात जेथे मध्यमवर्गीय हैराण झाले तेथे काय तग धरणार?
त्यामुळे मुलांच्या घरचे त्यांना शाळेएवजी कामावर पाठवतात.यावर अशाच एका पालकाशी चर्चा केली असता त्याची प्रतिक्रिया अशी होती,”काय करणार शाळा शिकूण तो?नोकरीला थोडीचं लागणार आहे?आपल्याला काय परवडणार आहे का?मला आहे ३ मुलं आणि मी जातो १००-१५० रू रोजानी कामाला त्यात होणार आहे का हे सगळं?तो कामाला जातो तेवढाच घराला हातभार….”यावर विचार केला असता लक्षात आले की जेथे ३५ -४०% जनता दारिद्ररेषेखाली जगते तेथे अशी नाही मग कशी उत्तरे भेटणार?एकीकडे इंटरनॅशनल स्कूलच्या नावाखाली दरवर्षी लाखो रूपये खर्च करून आपल्या पाल्याचे हवे ते चोचले पुरविणारा एक वर्ग आणि दुसरीकडे अशी स्थिती! यातून शिक्षण हे फक्त एका ठराविक वर्गासाठी मर्यादीत होत चालले आहे.
पण ही कोणत्याही न्यूज चॅनलसाठी न्यूज ठरत नाही तर त्यांना फक्त सलमान-कॅटरिनाच्या प्रेमप्रकरणाची वृत्ते, आय.पी.ल.च्या मॅचेसची दृश्ये आणि खेळांडूचे पानचट वागणुकी किंवा सानिया-शोएब यांच्या लग्नात जेवायला काय काय पदार्थ बनविले आहेत याचे चोवीस तास लाइव्ह टेलिकास्ट करण्यात धन्यता वाटते.मायबाप सरकारबद्द्ल काय बोलायचे,एखाद्या मंत्र्याला याबद्द्ल विचारले असता कदाचित साहेबांच्या मनात विचार येइल,’माझा मुलगा अमुक अमुक इंटरनॅशनल स्कूल किंवा अमुक खाजगी शाळेत हायफाय शिक्षण घेतो. बाकींच्याचा करूया की नंतर विचार!’ यामुळे आपल्या मूळ समस्या अजूनही तशाच आहेत,हे आपले दुर्दैवच!!!

Today’s Discovery….!!!

After a long time had a loooooooooooooooong interactive telephonic conversation with my school best friend. Yes! A realization.! I guess i got exact thread in my hand from where we might lost ourselves..! we are so much involved RIGHT NOW in the world world us; may be few joyful moments, may be few tensions, may be ….what soever..!!

I have no clue about others but what me and my best friend used to do in school was a very fantastic discussion about every thing that we thought is new, that we thought something to learn from, that we thought as a mistake may be… ! Right from school homework to playground stuff, tiffin group problems ..

Actually No subject as such …. but our discussions were fair enough to touch each and every subject..That was an age where maturity per say really develops. we were school going kids, our problems, or our level of categorizing something as “Serious/learning experience” was different. Today we are….Ohhh…! Pretty well grown up adults about to get marry… young, generous, smart, new generation in our families..

Yes! we are changed. our working scenarios , various circumstances we had gone across, our fields are changed, style of living has changed. we used to meet each other. but we were not’ WE”
we were two girls knowing each other well, two childhood friends… That’s it!But today Ketki in me was talking to “SHE” in my friend.

See, writing this post after a long time! this means i was just living my life for the sake of living. what we usually do are the duties towards family, towards profession. we relax because we need a break from daily schedule. if u are thinking in real manner, u analyze, u discover, u learn. Actually, as we grow , life starts offering more responsibilities. where we need to think about seriously-not only seriously but generously. May be what i can point out in my life is reduced frequency of such an interactive sessions. But as a grown up, i must find out exact solution on it.
Knowing yourself is what is important.

In simple words, creation can never be there unless you are “YOU”. we do say each other like “Yes! you are changed! ” But this change should not be of loosing one or two excellent cuts of your personality . Achieving something new is all together diff. aspect which can be a welcome change. But We should never loose “WE” ……. Catch these kind of unique moment and keeping the process is what is a challenge in front of you. “WE” are very precious to someone..

All right. Lot many things i realized and i guess it’s a peace. When you are unsatisfied or having half of the knowledge ; mind continuously revolves around the thought and a moment comes where in you can feel “Brain-beats ” .. So, I think i will definitely stop writing this post.

कवितांचा पसारा

कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्‍या कवितेशी कुठेही संबंध नसतो

एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात

त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास…
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध…
तर कधी मुक्तछंदी

बर्‍याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या…

मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही…!

-काव्य सागर

बाबा कुठे गेले ?

आईची कवितालिहून झाल्यावर सहजच फेसबुक उघडले. माझ्या मुलाचा मित्र ऑनलाइन होता – अमेय . हा प्रथम मुंबईत होता रहायला , ५ वर्षा पूर्वी पुण्याला स्थायिक झाले. त्याला मित्र म्हणून फेसबुक वर मी मुलाला खुप सूचना दिल्या . तोच अमेय आहे का? त्याला पूर्वीच्या शाळेचे विचार, त्याचा इथला पत्ता विचार वैगेरे . पूर्ण खात्री झाल्या वर मी परवानगी दिली होती.

आता तर मी पण त्याची फेसबुक मित्र होते. मला पण त्याच्याशी बोलायाचे होते , कारण त्याची आई माझी मैत्रीण होती. ती आता या जगात नाही, तिच्याबद्दल नंतर सांगेन केव्हातरी . पण मैत्रीण म्हणून खुपच आठवणी ठेवून गेली.

त्याला ऑनलाइन पाहिल्यावर पहिला प्रश्न केला ,”मुंबई ला येणार आहेस का ?” कारण त्याला घरी बोलावले असते २-३ दिवस , माझ्या मुलाला पण आनंद झाला असता .
“नाही”
“माझे बाबा मला सोडून गेले आज “
“तू पुण्याला नाहीस ? बाबा त्ता कुठे सोडून गेले तुला ?”
“माझे बाबा जग सोडून गेले “
!
!

!
!
मी एकदम सुन्न होउन गेले. प्रथम मला खरेच वाटेना. आज गेले ह्याचे बाबा तर ,हा नेट वर ? त्याला कही प्रश्न विचारल्यावर खात्रीटली. पण मनात बरेच प्रश्न आले .

मुले आजकाल ऐवढी भावनाशुन्य होताहेत का ? ठीक आहे , बाबा गेले मी आता माझ्या कामाला लागतो .
त्याला प्रसंगाचे गां
भीर्य कळत नव्हते ? की त्याच्या घरात त्याला गांभीर्य जाणवू दिले नव्हते ?
अस तर नाही की मुले वयापेक्षा लवकर मोठी होताहेत ?
तरी पण एक दिवस त्याला आठवण होवू नए त्याला बाबांनी दिलेल्या एखाद्या गोष्टीची , नाहीतर त्याच्या बरोबर पिकनिकला गेला होता त्याची क़िवा त्यांच्या नसण्याची?

मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावामुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा


आज “मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा ” कार्यक्रमाला हजेरी लावायची होती.. बर्याच दिवसं पासून या कार्यक्रम बद्दल चर्चा होत होती .. शेवटी आज योग आला .. ! ५ ची वेळ असतानाही जरा उशीराच पोहोचलो.. स्वागत २ हसतमुख मुलानी केले… अणि समजले की, चला आपण उशिरा नाही आलोंत! समोर कोणीही परिचयाचे नव्हते परन्तु एवढ्या गर्दीतही १ चेहरा मात्र सतत दिसत होता तो म्हणजे “रोहन चौधरी ” !

स्वागत समारंभ झाला , चाहापन झाले , सर्वांचा परिचय देखिल झाला… तेव्हाच लीना मेहंदेले नावाच्या काकू तर चक्क ३० हुन अधिक ब्लॉग चालवत आहे असे समजले.. ! खरे तर मला १ ब्लॉग चालवताना आज खुप कष्ट घ्यावे लगत आहेत.. तरीदेखिल ३० ब्लॉग चालवणे म्हणजे.. खुप मोठी गोष्ट आहे ! असे करत करत १ -१ जन आपला आपला परिचय देत होता… !

अणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या आवडत्या ब्लॉग पैकी नेट भेट च्या ब्लॉग कर्त्याँ ची भेट झाली ! सरते शेवटी अनेक नविन मित्र झाले ! अणि कार्यक्रमा च्या अखेरीस ग्रुप फोटो झाला ! व कार्यक्रम संपला … ! एकुणच उत्तम झाला !

या कार्यक्रमात शुद्धलेखनाच्या चूका टालन्या वर भर दिला गेला… त्या मुले मी देखिल आता मझ्या पोस्ट मध्ये शुद्धलेखनाच्या कामित कमी चूका करण्याचा प्रयत्न करीत आहे ! याच बाबतीतील लीना मेहंदाले याचे अतिशय सुन्दर माहितीपर भाषण देखिल झाले ! एकुणच माहिती + मनोरंजनाने भरलेला हा कार्यक्रम संपन्न झाला !

आयोजकंचे पुन्हा एकदा आभार !
आपला , निनाद गायकवाड !

मातृदिनाच्या शुभेछ्या !!

आज Mothers डे – म्हणजे आपला मातृदिन . कदाचित पश्चिमेची संस्कृति म्हणून आपण साजरा करायची पद्धत नाही. पण आईला प्रेमाने नमस्कार करायला कुठलीही संस्कृति आड़ येऊ नए.खरतर आईच्या प्रेमाला क़िवा प्रेमालाच व्यक्त होण्यासाठी वयाचे, धर्माचे आणि वेळेचे बंधन नसावे. माज्या आईने मला नेहेमी नविन काही करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आज मी तिचीच कविता लिहून माज्या ब्लॉगचा श्री गणेशा करते.

…. माझ्या
आईने लिहिलेली कविता ……

असाच एका सांजच्या पाराक बसलय थकान भागान,
ड़ोळो लागलो गाव दिसलो ,झालय मी न्हान

एका अंगाक लांब कशी दिसता सुन्दरवाड़ी
दुसरया अंगाक आसा बाये तेरेखोलची खाड़ी
दाया हाताक शिरोडा, उजव्या हाताक साताराडा
मधि बाये सुबकसा दिसता माजा आरोंदा

चारय बाजुक हिरवी झाड़ी तलकोकण दिसता
डोंगर आणि खड़पातून पाणी व्हावता कसा
सातेरीच्या देवळत चौघडो वाजता
भद्रकालिच्या देवळात बाबलो शिंग फुंगता
अत्ताराचो फायो लावन आबा देवळात येता
देवळात बसांन दादा माजो गारहाणा घालता

सकाळच्या पारक चाय टोस्ट आता
थयसरच्या पेजेची याद माका येता
हयसर मेळता कोबी आणि टोमैटो फ्लावर
फणसाच्या भाजयेची त्याका नाय सर
पापलेट आणि हलवो कालचो मेळता हय
सुक्या बांगडयाची चव आसा खय

आंबोलिच्या घाटावरती पांधुरक्या धुक्या दिसला, म्हणजे कसा मन गहिवरून जाता
अश्या माझ्या गावाची सर खेका नाय
माका बाये जावक केवा मेळताला काय ?

मातृदिनाच्या सर्वाना शुभेछ्या !!!!!!