शेत लाचार झाले

शेत लाचार झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?

दावा

Read full storyComments Off

शेत लाचार झाले

शेत लाचार झाले आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे पडताच वीज लखलख थरकापता भयाने निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे कायम गहाण सारे करण्यास सातबारा बँकेसमोर झाले लाचार शेत आहे छाटून पंख आधी केलेय जायबंदी आता … Continue reading

Read full storyComments Off

राईस क्रिस्पीज सिरीयलचा चिवडा

साहित्य:


राईस क्रिस्पीज सिरीयल पुडा – १
भाजलेले शेंगदाणे – १ मूठ

कढीपत्यांची पान – ७ – ८ (ऐच्छिक)
सुकं खोबर्‍याच्या चकत्या - २५-३०
डाळं – २ -३ चमचे
तेल – अर्धा डाव 
तिखट/ लाल मिरची  - १ चमचा
साखर – १ चमचा
मीठ –  १ चमचा
फोडणीचे साहित्य (हिंग, हळद, मोहरी)
आमचूर पावडर  (ड्राय मॅंगो पावडर) – १ चमचा
गरम मसाला  - १ चमचा

कृती:

  • पातेल्यात तेल गरम करुन फोडणी तयार करा. (तेल तापल्यावर मोहरी, हिंग, हळद तापलेल्या तेलात घालणे)
  • शेंगदाणे, सुकं खोबरं, डाळं, आमचूर पावडर, गरम मसाला, तिखट/ लाल मिरची , मीठ, साखर या क्रमाने एकेक करुन परता
  • राईस क्रिस्पीज सिरीयल घालून गॅस बंद करा आणि सर्व व्यवस्थित एकत्र करा

वरील सर्व साहित्य चवीनुसार कमी जास्त करता येतं.  नेहमीच्या पोह्याच्या चिवड्यापेक्षा याला तेल कमी लागतं, सिरीयल खायची सवय असणारी मुलं आवडीने खातात.


                                               



Read full storyComments Off

पाहुनी तुला

पाहुनी तुला पापणीची ओलावली कडा जराशी डोळ्यात स्वप्न माझ्या आतुर होती जराशी धुंद कोवळ्या मिठीचा स्पर्श हळुवार झाला वेणीत मोगऱ्याच्या रंगून गेली जराशी घेता जवळी मला तू शब्द हरवून गेले निसटून बंध सारे बंदीनी तुझी जराशी ओढून आकाश सारे बरसले तुझ्यावरी मी ओंजळ चांदण्यांनी उजळून गेली जराशी

Read full storyComments Off

ग्रीस पुराण कथा-कोश

 Grisa purana katha-kosa /

भारतीय संस्क्रुती ही विश्वातील एक अतिप्राचीन आणि कालौघातील बदल पचवत आजही टिकुन राहिलेली संस्क्रुती आहे. त्याबाबत यथोचित अभिमान बाळगणे योग्यही आहे. परंतु अनेकदा अन्य प्राचीन जागतीक संस्क्रुत्यांबद्दल आपण उदासीन असतो. मग ती सुमेरियन, अक्काडियन, इजिप्शियन माया-इंकादि संस्क्रुती असो कि अगदी अरबी आणि ग्रीक संस्क्रुती असो. मराठीत कोशवाद्मय विपुल असले तरी त्याने अन्य संस्क्रुत्यांबद्दल आपल्याला त्यांनी अनभिद्न्यच ठेवले आहे असे म्हणावे लागते. परंतु हिंदीत कमल नसीम यांनी “ग्रीस पुराण कथा-कोश” लिहून एक अमुल्य कामगिरी केलेली आहे.
    ग्रीक संस्क्रुतीशी भारताचा पुरातन काळापासुन व्यापारानिमित्त संबंध आला आहे…इतका कि ग्रीक भाषेत अनेक भारतीय शब्द सापडतात. इतकेच नव्हे तर ग्रीकांचा मुख्य देव झेउस आणि आपल्या ईंद्रात कमालीचे साधर्म्य आहे. झेउसचे वज्र, चिलखत, त्याचे देवतामंडळासह ओलिंपस पर्वतावर राहणे, मानवी जीवनात अकारण (?) हस्तक्षेप करणे…मानवी भाव-भावना बाळगणे ई. साम्ये चकित करणारी आहेत. असे असले तरी स्वत: खास ग्रीक संस्क्रुतीचे अवगुंठण त्यावर आहेच. म्हणजे झेउस हा पित्याची हत्या करुन देवसम्राट बनलेला आहे तर त्याची सहोदर भगिनी हेरा ही त्याची पत्नी आहे. याच प्रकारे अन्य अनेक ग्रीक दैवतांशी भारतीय दैवतांशी साम्य-विभेद या कोशात सापडतात.
    मला हा कोश आवडण्याचे कारण तो मुळात रुढार्थाने कोश नाही. कोशात एरवी अकारविल्हेप्रमाणे नोंदींची सोय लावली जाते असला प्रकार यात नाही. कोशवाद्मयात एरवी असणारा कोरडेपणा तर मुळीच नाही. ग्रीक महाकाव्ये वा नाट्यांत असनारी अत्यंत जीवंत काव्यमय आणि खुद्द हिंदी भाषेलाही नवे आयाम देणा-या भाषेत पुरातन ग्रीक पुरा-कथांपासुन सुरुवात करत एकेक दैवी व मानवी व्यक्तित्व जीवंत करणारी अद्भुत शैली कमल नसीम यांना साधली आहे. “कोश असाही असु शकतो…” ही नवीच द्रुष्टी हा कोश देतो आणि हे त्याचे अनुपम वैशिष्ट्य आहे.
    पुरातन मानवी निर्मल मनाचा आरसा म्हनजे त्या-त्या संस्क्रुतीतील पुराणकथा होत असे नमुद करत कमल नसीम या कोशाची सुरुवात करतात. आणि ते किती खरे आहे हे येथे वेगळे सांगण्याची गरज नाही. स्रुष्टीच्या आरंभाबाबतच्या ग्रीक संकल्पनांपासुन हा कोश सुरु होतो ते पुरातन देवता, त्यांच्याशी निगडीत कथा, आख्याने, महाकाव्ये, प्रेमकथा ते ग्रीक वीर नायकांचा सर्वकश आढावा घेत हा कोश संपन्न होतो. संपुर्ण ग्रीसचा भुगोल या पुराकथांत कसा सामाविष्ट केला गेलेला आहे हे पाहुन आपण विस्मित होतो. या कोशात  टेंटेलास, थेसटीज, ईडिपस, एपिगनी, पुराणप्रसिद्ध राजा मिडास, ओडिसियस अगममेनन यांच्या धीरोदात शोकांतिकाही येतात. ग्रीक मन हे प्राय: नियतीवादी होते. आपल्या श्रेष्ठ साहित्त्यिक जी.एं. वर या ग्रीक नियतीवादाचा अद्भुत पगडा होता. प्रस्तुत कोशलेखकाने प्रत्येक कथा देतांना वा व्यक्तिमत्वे चितारतांना पिंडार, होमर, इस्खिलुस, हीसियड, ओविड, रोडस, ल्युसियन आदि असंख्य ग्रीक कवी, लोककवी, नाटककार यांच्या द्रुष्टीकोनातले फरकही अत्यंत समर्पकतेने दाखवलेले आहेत.
    कोशकार हा नुसता कोरडा विद्वान नसतो. तो स्वत: एक तत्वचिंतकही कसा असतो हे पहायचे असेल तर हा कोश वाचायलाच हवा. जागतीक पुराकथातद्न्यांनी पुराकथांचा उगम कसा होतो यावरील विविध मतांचा वेध घेत मानवी आदिम प्रेरणांचे स्रुष्ट-दुष्ट भावनांचे कथात्मक/काव्यात्मक प्रकटीकरण म्हणजे पुराकथा होत या मुलभुत सिद्धांताला या कोशात सबळ केले आहे, हे या कोशाचे अधिक एक वैशिष्ट्य होय. मराठी कोश हे प्राय: माहितीपर व रुक्ष असतात, त्यामुळे अनेकदा वाचक त्याकडे वळतही नाही. ही अभिनव कोशशैली मराठीत येणे मला गरजेचे वाटते.
    पुराकथा ही आपल्या पुर्वजांची एक अनमोल ठेव आहे याची जाणीव करुन देत जर आपल्याला वैश्विक मानव व्हायचे असेल तर जागतीक पुराकथा कशा आणि का अभ्यासाव्यात याचा नवा द्रुष्टीकोन हा कोश देतो. ग्रीक संस्क्रुतीची आजही पाश्चात्य साहित्य-कलांवर व अगदी तत्वद्न्यान-विद्न्यानावरही अमिट छाप आहे. आपण भारतीयही कळत-नकळत ग्रीकांच्या मोहपाशात असतोच. त्याचे मुळ समजावून घ्यायचे असेल तर हा, कोश नव्हे, एका पुरातन अद्भुत दैवी व मानवी विश्वाची खरी ओळख करुन देणारा ग्रंथ वाचायलाच हवा. या ग्रंथाची भाषा हिंदी आहे…पण ती एवढी काव्यमय आहे कि कोणालाही सहज समजेल.

ग्रीस पुराण कथा कोश
ले. कमल नसीम
प्रकाशक: अक्षर प्रकाशन प्रा. लि., नवी दिल्ली (१९८३)
राजकमल प्रकाशन प्रा. लि., नवी दिल्ली (आव्रुती २००८)
प्रुष्ठसंख्या ५२३. मुल्य: रु. २५०/-

Read full storyComments Off

अमृतकण

                                                               अमृतकण   
                                                             
१.  ”या जगातून कुणीतरी उठून जातं, तेव्हा मागे केवळ त्याच्या आठवणी उरायला नकोत ; त्याच्या संवेदनशिलतेने तयार झालेल्या आसपासची पोकळी जाणवायला हवी !”
                                                                       —– ऑस्कर वाईल्ड —–

२. “जो जातिवंत आहे त्याने जाळायलाच हवं. शोभिवंत आहे तो चंदनाच्या हारासारखा. कायम तसाच. अशा गायकाचा पहिला आणि पाचशेवा,हजारवा कार्यक्रम सारखाच असतो. जातिवंत गायकाला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे जिवंत करायचं सामर्थ्य रसिकांच्या टाळ्यात असतं.”
                                                                       —– व. पू. काळे (‘वपुर्झा’तून) —–

३. “कलाकार जो है वो दो किस्म के होते है ! एक जो होता है वो ‘पेट से’ करता है ! और दुसरा जो है वो ‘पेट के लिये’ करता है ! तो इस ‘से’ और ‘लिए’ में फर्क होता है !”
                                                           —- किशोर कुमार (पार्श्वगायक) —-

४. “इन्सान कि शर्म उसकी रुह में और उसकी आखोमे होती है ! ना कि उसकी कापडोंमे !”
                                                                       —- इब्राहीम अल काझी —-
                                                                         (एन. डी. एस. चे संचालक

५. “यशाचा मूलमंत्र -: जे कराल ते वेगळ्या पद्धतीने करा ! यशस्वी माणसे फार काही वेगळे करीत नाहीत. ते जे करतात, त्यात वेगळेपण असतं.”
                                   —- शिव खेरा —-
                               (प्रसिध्द व्यवस्थापन तज्ञ)

६. “सौंदर्य हे सुंदर दिसणारे बाह्य कवच किंवा कव्हर आहे. एखाद्या पुस्तकाकडे तुमचे लक्ष जाते ते त्याच्या सुंदर कव्हरमुळे. पण त्या पुस्तकाच्या आतला मजकूर सुंदर नसेल तर ते तुम्ही बाजूला टाकता. मला वाटते, वरच्या सौंदर्यामुळे माझे आतले पुस्तक अधिक सुंदर हवे.”
                                —- सुश्मिता सेन —-
                         (मिस युनिवर्स – १९९४, अभिनेत्री)

७. “कलाकार जो है वो एक बूंद कि तरह होता है ! हर बूंद कि यह इच्छा होती है कि वो समंदर बने ! जबतक उस बूंद कि इच्छा होती है, प्यास होती है के वो समंदर बने तबतक एक कलाकार अपना काम करता रहता है ! तो उसकी कला कभी खत्म नही होती है ! जैसे सात सरगम से, सात सुरोंसे सात करोड नगिने बनते है, उसी तरह कलाकार कि कलासे हमेशा कल का अविष्कार होता रहता है !
                          —- समीर —- (शायर,गीतकार)    

८. “माझे मौन जर बोलत नसेल तर मग माझ्या शब्दांचा उपयोग तरी काय ?”
                                         —- अवतार मेहेरबाबा —-
    (९ जुलै, १९२५ रोजी त्यांनी अखंड मौनव्रत धारण केले होते, पुढे ४५ वर्षे अखंडपणे ते व्रत चालू ठेवले होते.)                   

         

     
                                                           

Read full storyComments Off

कंटाळ्याचाही कंटाळा !

कधी तरी दु:खांनो माझेही घर टाळा
आता आला कंटाळ्याचाही कंटाळा

जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुलाच बघणे…

Read full storyComments Off

‘शिवराज्याभिषेक दिन’च्या शुभदिनी शिवरायांचे गुण अंगी बाणवण्याचा संकल्प करूया ! (२१ जून २०१३) (Balsanskar.com)


   0102google0405Android©-2013
    Also available in Marathi :  http://balsanskar.com/marathi/lekh/cid_187.html
                      in Hindi :        http://balsanskar.com/hindi/lekh/198.html
                      in English :   http://www.balsanskar.com/english/lekh/cid_29.html 
                      in Kannada : http://balsanskar.com/kannada/lekh/697.html


You received this message because you are subscribed to the Google Groups “Baalsanskar” group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

Read full storyComments Off

क्लिक क्लिक भटकंती. – शिरगाव किल्ला, जत्रा, केळवे – माहीम, भवानगड..


डीएसएलआर घ्यायचे डोहाळे लागले असतानापासुनच जागोजागी फक्त फ्रेम्स दिसायच्या. मुंबई टाउन साईडला तर अशा फ्रेम्स दिसतात. फक्त नजर हवी. 


कधी लहानपणीचं स्वप्न की आपला पण एक कॅमेरा असावा. आठवतयं, लहानपणी मामाकडे असताना, त्याच्याकडे एक हॉट शॉटचा कॅम होता. कोनिका पॉप. भारी कॅम होता. छान फोटो यायचे. आणि हॉट शॉट असल्याने काही सेटींग्ज वैगरे अ‍ॅडजस्ट करायची गरज नव्हती. फक्त फोटो क्लिक करायचे. तर एकदा मामा घरी नसताना मी तो कॅम नाचवत होतो. नाचवताना त्याची लेन्स कॅप कुठेतरी पडलं आणि संध्याकाळी नेमकी ती मामालाच सापडली. मग काय ५०१ साबणानं माझी धुलाई. बार बार लगातार.. :)  
असो. पण आता काही वाटत नाही. शेवटी इतकी वर्ष थांबुन, पैसे साठवून निकॉन डी ५१०० हा डीएसएलआर घेतला आणि मग विकेंडला घरातुन बाहेर पडायचं आणि क्लिक क्लिक करत फिरायचं. माझ्यासोबत नेहमी असणारे आमचे सचिन पाटील दादा. कधीही कॉल केला की तय्यार. मग नेहमी मुंबईत फिरताना ज्या फ्रेम्स मनात साठलेल्या होत्या आधी अधाश्यासारख्या त्या क्लिक केल्या. गेट वे, ताज हॉटेल, भाउचा धक्का, एलिफंटा केव्हज, कान्हेरी केव्ह्ज, बाणगंगा, वसईचा किल्ला, संध्याकाळच्या वेळी फ्लोरा फाउंटन, अफगाण चर्च, ग्लोबल विपश्यना पॅगोडा, आमची नेहमीची खादाडी, असे बरेच क्लिक क्लिक.. अरे हो एकदा तर स्नेहलच्या घरी सफाळ्याला पण पोचलो आणि मग तिथे सन्ध्याकाळी मठाण्याच्या बीचवर केलेली फोटोग्रॅफी. तर असं फिरता फिरता अगदी मनात आणि डोळ्यांत साठवलेलं एक लोकेशन म्हणजे पालघर. नाही म्हणायला बोर्डीला जाउन आलो होतो पण पालघर म्हटलं की त्या मनात साठलेल्या फ्रेम्स अशा उफाळून यायच्या. केळवे आणि माहीम बीच तर मस्तच. पण त्यातल्या त्यात केळव्याला दांडा खाडीवरला तो ब्रीज मला खूपच अ‍ट्रॅक्ट करायचा. कधी ७-८ वर्षापूर्वी केळव्याला मित्राच्या घरी गेलो होतो तेव्हा तो ब्रीज पाहिला होता. त्यानंतर कधी योगच आला नाही. तर मग यावेळी ठरवलं की पालघरला जायचं आणि निवांत क्लिक क्लिक करत फिरायचं. 
एका शनीवारी पहाटे मी आणि पाटील दादा निघालो. आता चर्चगेट – डहाणू लोकल सेवा झाल्यामुळे मेमु किंवा पॅसेंजर गाड्या पकडण्याची घाई नव्हती. तरीही आम्ही उशिरा म्हणजे १०:३० ला वैगरे पालघर स्टेशनवर लँड केलं आणि तिथुनच देवेन ला कॉल केला. त्यानेही आत्ताच कॅनन ६०० डी घेतला होता. मग म्हटलं त्यालाही बोलवावं. सुदैवाने साहेब घरी होते. येतो म्हणाला. मग त्याल डायरेक्ट शिरगावच्या किल्ल्यावर बोलावलं आणि मी आणि पाटील दादा निघालो. नेहमीप्रमाणे टमटम पकडून जायचं पण त्या दिवशी एक ही टमटम रिकामी नव्हती. प्रत्येक टमटम अगदी भरुन जात होती. बसही नव्हती. त्या टमटमच्या नादात अर्धा तास तरी गेला. काही वेळानं कळलं की तिथल्या जवळच्या गावात सातपाटीला जत्रा असल्याने टमटम भरुन जात होत्या. मग वैतागुन १५० रु. ठरवून रिक्षा केली आणि शिरगावच्या किल्ल्याच्या दिशेने निघालो. या आधी आम्ही या किल्ल्यावर येउन गेलो होतो. आमची एक मैत्रिण अनुजा सावे हीचं घर पालघरलाच आहे. एकदा तिथे खादाडी पिकनिक झाली होती. तेव्हा या किल्यावर आलो होतो. उतरल्या उतरल्या क्लिक  क्लिक करायला सुरुवात केली. किल्ल्याचं मुख्य दार, आणि पडझड झालेली तटबंदी. तरीही काही ठराविक फ्रेम्स क्लिक करुन झाल्या. देवेन अजुन आला नव्हता. मग फिरत फिरत मी आणि पाटील वरच्या तटबंदीवर सावलीत जाउन बसलो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकडत होतं पण समोर असलेल्या समुद्रामुळे एक सौम्य गारवाही जाणवत होता. दमुन भागुन आम्ही तिथे असलेल्या एक घुमटीत जाउन बसलो आणि गप्पा मारु लागलो. तितक्यात देवेन आपल्या बाईकवरुन तिथे हजर झाला. आल्या आल्या त्याने इडली आणि चटणीचा डब्बा समोर ठेवला. ते खाउन झाल्यावर ठरलं की जत्रेला पण जायचं. तिथे काही शॉट्स मिळतिलच आणि देवेनची बाईक असल्याने काही टेंशन नव्हतं. मग किल्ल्यात अजुन थोडावेळ फिरलो. अजुन काही क्लिक क्लिक केले. काही मुलं तिथे क्रिकेट खेळत होती.  

तटबंदी

किल्ला क्रिकेट
शिरगाव किल्ला झाल्यावर मग निघालो सातपाटीच्या जत्रेला. दुपार असल्याने जत्रेला काही मज्जा नसणारच होती. संध्याकाळी मज्जा आली असती, पण तरीही आम्ही तिकडे गेलो. बरीच दुकानं मांडलेली होती. पण सगळेजण विश्रांती घेत होते. आम्ही मंदीरात गेलो. श्री रामाचे दर्शन घेतले आणि थोडावेळ मंदीरातच बसलो. मग जत्रेत फिरायला गेलो. उन अगदी कडक होतं पण शॉट्स मिळणं मुश्किल होतं. आमच्या गळ्यातले कॅम्स बघुन एका ऑर्गनायझर काईंड ऑफ माणसाने आम्हाला हटकलं. त्याने टाकलेली होती. फोटो का घेताय?? मिडीयावाले आहात का वैगरे विचारु लागला. त्याच्याशी वाद घालण्यात किंवा बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. मग आम्ही तिथुन निघालो. खाउच्या दुकानापाशी गेलो आणि माहिमचा फेमस हलवा खायला घेतला. त्या रसरशीत फोडी बघुन तोंडाला पाणे सुटलं होतं. पाव किलो हलवा घेतला. ( आम्हालाच खायला ) आणि तिथुन निघालो. 
माहिमचा हलवा

आता कुठे?? पोटात कावळे काव काव करतच होते. मग केळवे बीचच्या दिशेने निघालो. तिथे पोचलो आणि जेवायला रेस्टॉरंट्स शोधु लागलो. शेवटी एका हॉटेलमध्ये मस्त घरगुती जेवण मिळालं. जेउन झाल्यावर खरं तर झापड आली होती. पण मग बीचवर गेलो. बीचवर फिरलो. काही फोटो घेतले. पण उन बरंच होतं. तिथुन निघालो.. आता कुठे??? 

केळवे बीच

आता.. आता केळवे दांडा खाडी.
त्या ब्रीजवर मला जायचंच होतं. मी सांगेल तिकडे पाटील आणि देव्या येत होते. काय करणार बिचारे… हे हे हे हे. 

ब्रीजवरुन सनसेट मस्त टीपता आला असता ही आयडीया होती. पण सुर्यास्ताला अजुन बराच वेळ होता. मग आठवलं की तिथे भवानगड नावाचा एक छोटा किल्ला टाईप आहे. किल्ला म्हणजे एक छोट्याश्या डेकडीवजा डोंगरावर टेहाळणी चौकी असावी. आम्ही विचारत विचारत तिथे पोचलो. रस्त्याच्या कडेलाच, झाडा-झुडुपात लपलेली एक छोटीशी टेकडी आणि त्यातून डोकावणारा भगवा! झालं! खूण पटली आणि आम्ही पायवाटेने निघालो. अवघ्या ५- १० मि. पायवाट आणि आम्ही तिथे पोचलो. तिथे शंकराचे एक मंदीर आहे जत्रेच्या खाणाखुणा जागोजाग पसरलेल्या. वाट काढत काढत आम्ही वरच्या बाजुला पोचलो. तटबंदी ढासळलेली तरी अजुनही शाबुत आहे. वर पोचल्यावर एक विहीर दिसली. पण ती लोखंडी जाळीने झाकून ठेवली होती. थोडावेळ तिथे बसलो. समोर केळवे, माहीमचा विस्तिर्ण किनारा दिसत होता. थोडावेळ बसुन मग तिथुन निघालो. आजच्या या भटकंतीत चिमुकला का होईना एक ट्रेक झाला होता आणि लाल डायरीत अजुन एका किल्ल्याचं नाव जमा झाल्याचं समाधान मला आणि देव्याला झालं होतं. 

तिथुन पुन्हा त्या ब्रीजवर आलो. आता संध्याकाळ होत आली होती. पण पश्चिमेला थोडसं ढगाळ होतं. त्यात कधी सुर्य डोकावायचा तर कधी गायब व्हायचा. त्यामुळे सुर्यास्त टीपण्याची आशा आम्ही सोडुन दिली. पण सुर्याच्या मावळणार्‍या सोनेरी किरणांनी खाडी अगदी सोनेरी झाली होती. बराच वेळ तिथे क्लिक क्लिक करत राहिलो आणि मग खाली किनार्‍यावर गेलो. जिथून मला तो ब्रीज क्लिक करायचा होता तिथे पोचलो. तिथुन मला अगदी हवी तशी फ्रेम मिळाली त्या ब्रीजची. काय माहीत का पण हा ब्रीज मला खूप म्हणजे खूप अ‍ट्रॅक्ट करतो. फक्त दोनदाच पाहिलाय. पण एखादं गुढ असं काहीसं या ब्रीजबाबत वाटत राहतं.   

केळवे दांडा खाडीवरील ब्रिज

मग किनार्‍यावर काही फोटो घेतले. आणि दिवसभा आम्हा सहा जणांचं ;)  ओझं घेउन धावणार्‍या देव्याच्या बाईकचे ही. आता निघायची तयारी पण त्यापूर्वी मला पालघर-माहीम मधला तो फेमस वडा खायचा होता. मग पुन्हा देव्याला बाईक तिकडे दामटायला सांगितली. कधी पालघरला गेलात तर माहीमचा तो प्रसिद्ध वडा खायला विसरु नका. अल्टीमेट!! तोवर बरीच संध्याकाळ झाली होती. दिवसभर आम्ही उंदडत होतो. मग देव्याचा निरोप घेतला. माहीमवरुन टमटम पकडुन पालघरला पोचलो आणि घराच्या दिशेने निघालो…. 

एक मस्त धमाल, उनाड दिवस ! एका दिवसात मस्त भटकंती. बर्‍याच दिवसानी भेटलेला देवेन. एक ट्रेक, जत्रा, खादाडी आणि त्या सर्व फ्रेम्स ज्या कधीपासुन तरी मनात होत्या….   

 - दीप्स
 

Read full storyComments Off

कैलास मानसरोवर यात्रा – परिक्रमेत घ्यावयाची काळजी आणि आहार

कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान परिक्रमेत १५६०० ते १८६०० फुट उंची वरून सुमारे
४२ किलोमीटर एवढा प्रवास तीन दिवसात चालत करावा लागतो. हाय
अल्टीटयुडमुळे यावेळी चालताना काळजी घ्यावी लागते. वर चढताना नेहमीच आपण सावकाश वर चढतो पण
खाली उतरताना धावत उतरण्याकडे कल असतो. तसे न करता खाली उतरतानाही सावकाश उतरावे.
झर झर खाली उतरू नये, कारण तसे केल्यास ढोपरांवर जोर पडून पाय लवकर दुखायला लागतात.
  

Read full storyComments Off

डायमंड रिंग

गण्या (मन्या ला) : मी माझ्या दीदी च्या नकळत गर्लफ्रेंड ला दीदीची नवीन डायमंड रिंग गिफ्ट केली…. मन्या गण्याला एक चापट मरतो आणि म्हणतो, ‘अबे….किती महागाची होती ती….तीन महिने पैसे वाचवून खरेदी केली होती मी….’ गण्या : मग एवढ्या जोरात मारायची काय गरज होती???? तुझ्याच घरात तर गेली आहे रिंग Filed under: पांचट Tagged: गम्मत, […]

Read full storyComments Off

चड्डी

बरे झाले ‘डॉलर’ नावाचीच चड्डी येते…. चुकून माकून ‘रूपया’ नावाची असती तर दिवसभर चड्डी पकडूनच फिरावे लागले असते….. किती वेळा ती घसरण ??? Filed under: पांचट Tagged: गम्मत, जम्मत, जोक्स, थोडी गम्मत जम्मत, ब्लॉग, मराठी, मराठी जोक्स, मराठी ब्लॉग, मराठी विनोद, विनोद, blog, gammat, jammat, joke, jokes, marathi, marathi blog, marathi joke, marathi jokes, marathi […]

Read full storyComments Off

टोपीवाला

एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो, म्हणून झाडाखाली विश्रांती घेतो… उठून पाहतो तर झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात… त्याला आजोबांची गोष्ट आठवते… तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने आपटतो… पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण करत नाहीत…. उलट १ माकड दात दाखवून बोलतो, “काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???” Filed […]

Read full storyComments Off

कोंबडीचे पिलू

चिमणराव : काय रे बंड्या मी तुला कोंबडीच्या पिलाला दाने द्यायला सांगितले तर तू मांजरीला का दाने देत आहेस ? बंडू : अहो मी कोंबडीच्या पिलालाच दाने देत आहे…… चिमणराव : खोटे बोलतोस का रे बंड्या कोंबडीचे पिलू कुठे आहे इथे ? बंडू : मांजरीच्या पोटात Filed under: पांचट Tagged: गम्मत, जम्मत, जोक्स, थोडी गम्मत जम्मत, […]

Read full storyComments Off

एसएमएस

नवर्याने रात्री उशिराबायकोला एसएमएस केला तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे आयुष्य धन्य झाले… माझ्यासारख्या नवर्याला सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद… तू महान आहेस… बायकोचे उत्तर आले… . . . .. .. किती पेग झाले… Filed under: पांचट Tagged: गम्मत, जम्मत, जोक्स, थोडी गम्मत जम्मत, ब्लॉग, मराठी, मराठी जोक्स, मराठी ब्लॉग, मराठी विनोद, विनोद, blog, gammat, jammat, joke, […]

Read full storyComments Off